बडवा (२)

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
24 Jan 2012 - 5:50 pm

( सूचना :मी ही ललित कादंबरी लिहीत आहे. रोज नवे १ -२ भाग लिहून टाकले जातिल. माझ्या राजकिय मतांचा प्रचार करण्यासाठी हि लिहीत नाही.कारण माझी राजकीय मते कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेली नाहीत. कादंबरीचा शेवट वाचण्याआधी लेखकाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करू नयेत, ही हात जोडून विनंती. आणी शेवट वाच्ल्याशिवायच हि कादंबरी कोणाच्या बाजूने आहे ते ही ठरवू नये )

भाग १ - http://www.misalpav.com/node/20503

खरं तर विनोद न आपल्या पहिल्या वाक्यातच अर्ध मैदान मारलं होतं. इंन्स्पेक्टरची पकड ढिली होउ लागताच, आपल्या पल्लेदार्, रसरशीत आणी मुलुखमैदान तोफेसमान वक्तृत्वाने....... तो त्या पोलिस स्टेशन लाच......सभेचे व्यासपीठ बनवणार होता. आपल्या ह्या कष्टाने कमावलेल्या कलेचा बरा वाईट उपयोग कसा करायचा ? हे त्याला चांगलच ठाउक होतं. जेमतेम पाच फूट उंची, पण कष्टान कमावलेलं पिळदार शरीर; त्याला शोभणारी तलवार कट मिशी आणी चटकन डोळ्यात भरेल असा तेजस्वी रंग ल्यालेला तो, हाताची तर्जनी उंचावून खडे भाषण सुनावू लागला. त्याचे मोठे काळेभोर डोळे भाषण देता देता प्रत्येक श्रोत्याच्या नजरेला नजर भिडवत होते आणी ह्रुदयाचा ठाव घेत होते. नियतीला माहित होतं, याच अमोघ भाषणाने तो त्या पोलिस स्टेशन मधल्या सार्या स्टाफला जींकणार होता............ फक्त एक अपवाद सोडून !

शांत खोल आणि धीरगंभीर आवाजात विनोदनं बोलायला सुरवात केली, त्याच्या हालचाली संथ होत्या आणी डोळ्यात अतिशय सौम्य भाव होते. " शिवाजी महाराज सिर्फ मराठियोंके लिये लडे थे क्या ? रानी चेन्नम्मा का खून कर्नाटक के लिये बहा था क्या ? सुभाषबाबू सिर्फ बंगाल के सुपुत्र थे क्या ?क्या भगतसिंग सिर्फ पंजाब के आजादी के लिये फासी पर लटका था ? हिंदुकुश पर्वत से हिंद महासागर तक, जो भी हिंदू खून बहा है ..... उसको गाली मत दो! कुछ नही मराठी, कुछ नही बंगाली, कुछ नही पंजाबी, कुछ नही कानडी, कुछ नही तामिळी.... कुछ नही तुळू ..... हम बस हींदू ! इतिहास पढो . छोडो....... अगर नही पढना तो मत पढो. ......लेकिन रोज का पेपर तो पढो ..... कश्मीर से केरल तक जो भी बम फूटे है, जितना भी हिंदू खून बहा है .... किसने बहाया है ? और क्यों ? क्यों जादातर बम शुक्रवार को फटते है ? मस्जिद मे शुक्रवार का नमाज पढनेवाले उनके मुल्ले भाई सुमडीमे बच निकल्ते है ... फिर भी हमारे होष ठिकाने नही आते. वो सब छोडो .... जब हिंदूओंको मारते हुए वो नही देखते की ये कानडी है या मराठी ? तो हम क्यों देखते है ? जब उन्हे काफिर हिंदुओंको मारते हुए भाषा से फर्क नही पडता .. .. तो हमे क्यों फरक पडता है ? ये गद्दार बैंड बजा रहे है पूरे देश की.... और हम लोकोंने तमाशा कर रखा है हिंदुत्व का ! मेरा नाम है विनोद बडवे , बडवा का मतलब मालूम है आपको ? भड्वा नही बडवा....... बडवा ......बडवा मतलब मंदिर के आगे ढोल बजाने वाला पुजारी....लेकिन ..... मै ढोल नही बजाता,......... गद्दरोंकी ** बजाता हूं ..... हां मै आया हूं शिवाजी महाराज के महारष्ट्र से.... बस........एकही मक्सद लेके ......" हळू हळू विनोद बडव्याचा आवाज चढू लागला होता.अणुकुचीदार गोरं नाक लाल लाल होउ लागलं होतं. डाव्या हाताची मूठ कमरेवर विराजमान झाली होती. उजव्या हाताचे दुसरे बोट उंचावून तो बोलत होता. काळी रम जशी धमन्या धमन्यात पसरते, तसेच त्याचे विचार श्रोत्यांच्या अंगात भिनत होते. पोलिस स्टेशन चा सारा कानडी स्टाफ त्याकडे कुतुहलान बघत होता. संशयान बघत होता तो तिथला एकमेव मराठी पोलिस. सब इंन्स्पेक्टर राजवीर पाटील निप्पाणीकर . इंन्स्पेक्टर बनगोंड्याचा ज्युनिअर.

विनोद पुढे बोलू लागला ''और मेरा मक्सद है हिंदूओंको एक साथ जोडना, एकसाथ खडा करना. एक साथ खडे होकर हमने मूत दिया , तो भी साले १३% वाले बह जायेंगे. भाषा भेद, प्रांत भेद, जाती भेद और वर्ण भेद को भूलकर हींदुओंको एक साथ चलना होगा. एक साथ लडना होगा. समय बदल रहा है. इतिहास करवट ले रहा है. बाद्शाहोंद्वारा मंदिर गिराने का वक्त गया........ बाबरी कुचनेवाला यह वर्तमान है. कराची, पेशावर तो क्या .... काबूल कंदाहरतक परमपवित्र भगवा ध्व्ज लहरायेगा, यही दुनिया का भविष्य है. हमारी विजय सुनिश्चित है.. हिंदू बंधूओ........... क्योंकी उस विजयगाथा का पहला अध्याय हमने ६ दिसंबर को ही लिख दिया है. मैं छत्रपती शिवाजी महाराज के महाराष्ट्र से आया हूं सोता सिंह जगाने, हर दिल मे आग लगाने, हिंदू साथ जूटाने ........... दो दिन पहले हमारे महाराष्ट्र से राष्ट्रवादी कोंग्रेस का एक मराठी मंत्री इधर आया था और कह रहा था" -- महाराष्ट्राला बेळगाव नाही मिळाल, तर इथं रक्ताचे पाट वाहतील ---- " वाह रे मर्द .... उधर भिवंडी, मुंब्रा पाकिस्तान मे जानेका टाइम आया है.....मूंबई सम्हाली नही जाती .और ये बेलगाव मांग रहे है....... " विनोदचा सूर टिपेला पोचला होता. एक कसलेला कलाकारही होता तो. हातवारे करताना त्याच्या हाताची बोट थरथरत होती. चेहरा लालभडक झाला होता. त्याला विश्वास होता शेवट्च्या दोन वाक्यात आपण सारं पोलिस स्टेशन जींकलेलं आहे. मराठी माणसान कर्नाटकात अशी भूमिका घेतली , की तो लोकप्रिय होतोच ! पण त्याचा विश्वास खोटा ठरवण्यासाठीच सब इंन्स्पे़क्टर राजवीर पाटिल निप्पाणीकर त्याच्या दिशेने शांतपणे पाउलं टाकत येत होता.

राजवीर पाटिल. सडसडीत उंच नकेला आणि सावळा. टोल डार्क ऐंड हैंडसम . पण त्याचा बॉस बनगोंडा प्रमाणे तो ऐंग्री यंग मॅन मात्र न्हवता. अतिशय संयमी आणी परिस्थितीनं खोल बनवलेलं व्यक्तिमत्व होतं त्याचं. निपाणी जवळच्या अर्जुनी गावचे पाटिल. मराठी बोलणारा सारा अर्जुनी गाव सीमप्रश्नात कर्नाटकात आलेला. राजवीर पाटिलचे आजोबा क्रांतिसिंह नाना पाटलांचे सहकारी होते. प्रतिसरकारचे मंत्री होते. त्यांनी घरची लाखोंची इस्टेट स्वातंत्र्य लढ्यात फुकून टाकलेली होती. राजवीर ला ऐहीक संपत्ती काही ठेवली न्हवती त्यांनी. ठेवली होती ती कड्व्या देशभक्तीची परंपरा आणी....विचारांची संपत्ती शाहु महाराजांच्या विचारांची. आणी महात्मा फुलेंच्या सच्च्या सत्यशोधकी विचारांच सोनं . गरीबीशी दोन हात करत तो शिकला आणी बेळगाव पोलिसात चिकटला.

एव्हाना विनोदच्या भाषणाचा स्वर वरच्या सा पर्यंत पोचला होता " यह सब काँग्रेस का खेल है हम हींदूओंको आपस मे लडवाते है. जाती और भाषा के नाम पे. और देश्द्रोही मुल्लों के दाढी को धी शक्कर लगाते है............... भारत मे परिवर्तन होगा, भगवा ध्वज लहरायेगा | हिंदू हींदू एक रहेगा, राम राज तब आयेगा |"
सब इंन्पेक्टर राजवीर पाटिल एव्हाना विनोद च्या जवळ येउन पोचला होता आणि एक शब्दही न बोलता त्यानी विनोदची झडती घ्यायला सुरवात केली. त्याच्या या क्रुत्याने भाषणामुळे भारावलेलं आणि भांबावलेलं कर्नाटक पोलिस दल पण ताळ्यावर येउ लागलं होतं. पण ..... विनोदच्या खिशात काहीही न्हवत. अक्षरश। रिकामे होते खिसे त्याचे. तसंही असल्या कामगिरीवर जाताना खिशात पास्पोर्ट ठेव्ण्याएव्हढा मूर्ख नक्कीच न्हवता तो. विनोदनं राजवीरकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. राजवीरनंही हसून आपला मोर्चा विनोद च्या मित्राकडे वळवला. नाम क्या है तेरा ?

किश्या... आपलं क्रिश्ना जाधव.....

किश्याची झडती सुरू असतानाच विनोद विचार करत होता, -- नियतीचा फेरा कोणाला कोठे घेउन जाइल याचा नेम नाही. नाहीतर १२ वीला गणीत आणी विज्ञानात ९८% मार्क मिळवणारा आपल्यासारखा हुशार सोफ्ट्वेअर इंजिनिअर........या आड बेळगावातल्या पोलिस स्टेशनात रात्री दोन वाजता काय करतो आहे ?........... त्याची विचारमालिका तुटली ती इंन्स्पे़क्टर राजवीरच्या सण्सणीत आवाजाने...

ये क्या है ? त्यान क्रुष्णा जाधवच्या खिशातून एक निळ्या रंगाचं पत्रक काढलं ..
ते पत्रक राजवीरला मिळालेलं पाहून विनोदच्या चेहर्यावरचा रंग ऊड्त होता, आणी रा़जवीरच्या चेहर्यावरचे रंग बदलत होते. कधी आनंद, कधी क्रौर्य तर कधी राग असे राजवीरचे भाव बदलत होते.
पत्रकाच्या शेवट्ची सही त्यानं वाचली. ----- विनोद बडवे.

हे पत्रक कामगिरीला जाताना आणल्याबद्दल विनोद क्रूश्णा कडे खाउ का गिळू अशा नजरेने पहात होता. आणी बरोब्बर तशाच नजरेने राजवीरही विनोद कडे पाहत होता. फक्त त्याला आश्चर्य वाटत होतं... की हे बारकं सालं कुणाच्या जिवावर उडतय ?

त्याच वेळी पोलिस स्टेशनच्या बाहेर ....... पायर्‍यांवर ......कुणाची तरी भारदस्त पावले वाजत होती ............

( क्रमशः )

(अवांतर : मागच्या भागात लेखकावर मराठीवादाचे आरोप झाले या भागात ते मागे पडून हिंदुत्ववादाचे होतील, तिसर्‍या भागात मात्र त्याहून वेगळे आरोप करण्याची संधी मी देईन ही खात्री बाळगा )

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

24 Jan 2012 - 6:01 pm | मी-सौरभ

लेखन वेग पकडत आहे...
हा वेग सतत ठेवावा हीच विनंती....

वाक्यांच्या मधले टिंब-टिंब सोडून मस्त !
पुभाप्र
पुलेशु

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jan 2012 - 6:21 pm | बिपिन कार्यकर्ते

वेगवान... वाचतोय.

पारा's picture

24 Jan 2012 - 6:29 pm | पारा

वाच्तोय वाच्तोय !

हा भाग पण छान झालाय, फक्त एक विनंती आहे, तो सुरुवातीचा अन शेवटचा दोन्हीही कंस काढुन टाका, काही गरज नाही त्यांची. एवढ्या चांगल्या लिखाणावर ते उगाचच जाहिरात असल्यासारखं वाटतंय.

पक पक पक's picture

24 Jan 2012 - 6:39 pm | पक पक पक

व्हय म्या बी त्येच म्हनत व्हतो महाराज....

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jan 2012 - 6:32 pm | परिकथेतील राजकुमार

विनोद पुढे बोलू लागला ''और मेरा मक्सद है हिंदूओंको एक साथ जोडना, एकसाथ खडा करना. एक साथ खडे होकर हमने मूत दिया , तो भी साले १३% वाले बह जायेंगे.

आम्हाला राहून राहून 'शिल्पा ब' काकूंच्या उडलेल्या धाग्याची आठवण झाली.

भाषा भेद, प्रांत भेद, जाती भेद और वर्ण भेद को भूलकर हींदुओंको एक साथ चलना होगा.

और दुसरे धर्म का द्वेष करना होगा. बरोबर ना ?

असो..

आरोपांची आजाबात फिकीर करु नका राजे ,बिंधास्त लिहा . हम तुम्हारे साथ है!!

राजघराणं's picture

24 Jan 2012 - 6:40 pm | राजघराणं

कंस टाकला म्हणून वाचलो हो ... परिकथेतिल कंसकुमाराने याही वेळी आरोप केलेच आहेत

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2012 - 7:02 pm | अत्रुप्त आत्मा

@परिकथेतिल कंसकुमाराने याही वेळी आरोप केलेच आहेत>>>(अगदी योग्य उपमा)यापेक्षा फारसं वेगळं काही करणार नाहीत ते... ;-)

त्यांना हा खेळ फार अवडतो>>>

असो...आंम्हीही आहोत बरोबरिनं--- (अत्रुप्त आत्मा)

पक पक पक's picture

24 Jan 2012 - 7:18 pm | पक पक पक

लय भारी............

छोटा डॉन's picture

24 Jan 2012 - 6:44 pm | छोटा डॉन

वाचतो आहे आणि पुढच्या भागाची वाट बघतो आहे.

- छोटा डॉन

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2012 - 6:51 pm | अत्रुप्त आत्मा

हम तुम दोनो जब मिल जाएंगें,,,एकं नया इतिहास बनाएंगे...! और अगर हम ना मिल पाएं तो,तो---भी एक नया इतिहास बनाएंगे...! क्या होंगा ये इतिहास...? बची प्रतिक्रीया अगले भाग में पढियें...! ;-)

पक पक पक's picture

24 Jan 2012 - 7:20 pm | पक पक पक

इथे देखील क्रमशः च का हो..?

पैसा's picture

24 Jan 2012 - 7:01 pm | पैसा

छान. पुढचा भाग लौकर येऊ द्या!

इंटरेस्टिंग आहे.
वाचतोय..

स्मिता.'s picture

24 Jan 2012 - 8:57 pm | स्मिता.

दोन्ही भाग वाचले... इंटरेस्टिंग वाटतेय कथा.
पुढचे भागही येवू द्या.

(दिवसाला २ भाग टाकण्याऐवजी दररोज एक किंवा एका दिवसा आड एक भाग टाकल्यास आवडेल.)

लिखानाचा वेग आवडला ..
लिखान आवडले ..
परिस्थीती सुंदर मांडत आहात ..

एखाद दूसरा मुद्दा पटला नसला तरी पुढील भागात वेगळ्या पात्रांकडुन वेगळी मते येतील आणि हळु हळु एक जबरदस्त लेखन वाचण्यास मिळाले असे समाधान मिळेल
या आशेवर

लिहित रहा.. वाचत आहे

वेग आणी संवादाचा तोल एकदम मस्त साधलाय..

--टुकुल

टुकुल's picture

24 Jan 2012 - 11:02 pm | टुकुल

प्र. का. टा. आ. आ.

शिल्पा ब's picture

25 Jan 2012 - 1:10 am | शिल्पा ब

विंटरेश्टींग कथा.
अवांतरः आमचे बरेच धागे उडालेत त्यातल्या नेमक्या कोणत्या धाग्याची आठवण आली?

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jan 2012 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार

अवांतरः आमचे बरेच धागे उडालेत त्यातल्या नेमक्या कोणत्या धाग्याची आठवण आली?

'इतर धर्माविषयी वादग्रस्त लिखाण' म्हणून उडालेला तुमचा लेटेस्ट काथ्याकूट हो. आठवला का ?

इरसाल's picture

25 Jan 2012 - 10:07 am | इरसाल

राज घराण्याप्रमाणेच उत्तुन्ग लेखन.
पुढील प्रतिक्रिया कथासमाप्तीनन्तर.

मन१'s picture

25 Jan 2012 - 11:23 am | मन१

वाचत आहे.

स्वातीविशु's picture

25 Jan 2012 - 11:38 am | स्वातीविशु

वेगवान लेखन, पुढिल भाग वाचण्यास उत्सुकता वाढत आहे.

sneharani's picture

25 Jan 2012 - 11:42 am | sneharani

वेग आहे कथेला, वाचत आहे!

पप्पुपेजर's picture

25 Jan 2012 - 2:57 pm | पप्पुपेजर

वाचत आहे!

पारा's picture

25 Jan 2012 - 5:39 pm | पारा

ओ अहो !
रोज एक दोन म्हनला होतात नं !

कवाधरन झालं, वाट बघतोय म्या !!