प्रतिक्रिया

सत्याची झडती

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
10 Dec 2013 - 1:39 pm

रस्त्यावरून जात होते. अचानक कानावर आरोळी आली.
‘कोणतेही पुस्तक , शंभर रुपये...’
पावलांना प्रतिक्षिप्तपणे ब्रेक लागला. वळून पहिले तर फुटपाथवर एकदोन इंच जाडीची बरीच पुस्तके मांडली होती. पायांनी लगबग केली. मांडलेल्या पुस्तकांवर नजर टाकली, तर दोन नजरेत भरली.
‘सत्याचे प्रयोग’ --- मो. क. गांधी.
‘झाडाझडती’ --- विश्वास पाटील.
पण घ्यायचे धाडस होईना.

वाङ्मयप्रकटनविचारप्रतिक्रियासमीक्षा

सिंगापुरातील दंगल

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
9 Dec 2013 - 4:12 pm

आज एक महत्वाची बातमी वाचली. महत्वाची मी म्हणतोय कारण ती मला महत्वाची वाटली. सिंगापूर मधे भारतीय वंशाच्या एका कामगाराचा अपघाती मृत्यू आणि त्यानंतर दंगल. त्या दंगलीत अनेक जखमी, लाखोंची वित्तहानी इत्यादी.

सिंगापूर हा अतिशय शांत देश आहे, तिथे न्यायव्यवस्था अतिशय कडक आहे आणि त्यामुळे तो एक सेफ देश समजला जातो. हे खरं आहे, तिथे रहाणा-या माझ्या परिचयाच्या व्यक्तींच्या अनुभवावरून मी असं म्हणू शकतो. आता तिथे ही अशी घटना झाली. जी गेल्या ३० वर्षात झाली नव्हती.

टेरीचा बाश्शाखान : रोमांचकारी अनुभव !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 9:06 pm

असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे.

इतिहासचित्रपटप्रकटनप्रतिक्रियासमीक्षाअनुभवमाहितीप्रतिभा

टी एन शेषन , केजरीवाल अन भारत ....

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 7:53 pm

आजच चार विधानसभांचे निवडणूक परिणाम प्राप्त झालेले आहेत. व त्यात भाजप ची सरकारे चारही राज्यात येणार हे दिसते आहे. भाजपाला असलेला पाठिंबा वाढला आहे का ? याचे उत्तर हे निकाल देउ शकणार नाहीत त्यासाठी मतदानाची आकडेवारी अभ्यासावी लागेल. आम आदमी चा दिल्लीतील उदय हा एक ऐतिहासिक क्षण आहे.

मांडणीप्रकटनप्रतिक्रियासमीक्षा

टुक टुक! आमची महाराणी तुमच्यापेक्षा श्रीमंत!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
2 Dec 2013 - 9:53 pm

भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणार्‍या महात्यागी, महासाध्वी, महाज्ञानी महाराज्ञी सोनियाजी गांधी ह्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याचा निष्कर्ष एका पहाणीत काढला गेला आहे. चला! ह्या निमित्ताने इंग्लंडचे नाक कापले (इटलीकडून उसनवारी करून का होईना!)

http://www.loksatta.com/desh-videsh-news/huffpost-report-says-sonia-gand...

एक आकांत : गाणार्‍याचे पोर

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in जनातलं, मनातलं
1 Dec 2013 - 9:49 pm

एका पेक्षा अनेक लग्न, बहुपत्नीत्व ह्याला उघड मान्यता नसली तरी त्यात फार वावगे नं मानणार्‍या पिढीतील पुढच्या पिढीतील एक तरुण...आपल्या अंगातील असामान्य कलागुणाची नुकतीच ओळख होऊ लागलेली...अत्यंत लहान वयात कमालीचे खडतर दिवस काढून, १२ गावचे पाणी पिऊन आलेली अकाली समज...

त्यात स्वतःच्याच मामे बहिणीशी लग्न... ३ अपत्य झाल्यावर आयुष्यात आलेली आणखीन एक तरुणी ...तिच्याशी वेगळा संसार ...दुसरीकडे स्वतःच्या विवाहानंतर झालेला आईचा 'बाळंत रोगात' झालेला मृत्यू..वडिलांनी केलेले दुसरे लग्न...आणि त्या लग्नातून पुढे झालेली ९ भावंडे ...

समाजप्रतिक्रिया

केला इशारा जाता जाता!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
29 Nov 2013 - 2:40 pm

केला इशारा जाता जाता
... मि. वॉटसनकडे पहात शेरलॉक होम्सने डाव्या हाताच्या पकडीतील पाईपमधून लांबलचक झुरका घेतला. धुराचा भपका सोडत बारीक नजरेतून...
... बिंदू, अरुणा इराणी वा तत्सम हलकट जवानीची हूल दाखवणाऱ्या बिल्लो राण्यांच्या महिला मंडळाकडून केलेल्या इशाऱ्याची वाट पाहत असलेल्या मर्दांच्या एका हातात लाल पाण्याचा गिलास तर दुसर्‍या हाताच्या मुठीत कडक सिग्रेटची कांडी. ओठांचा चंबू करून धुराच्या गोल गोल रिंगा काढून आपापला धाक जमवणाऱ्या कधी अट्टल पटाईतांकडे, तर कधी शेरलॉक होमला आदरपूर्वक पहात असताना आरोग्यास हानिकारक संवैधानिक उदघोषणा 'पचका' करून जातात.

समाजविचारप्रतिक्रिया

कसाब अजुन जिवंत आहे का ?

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
26 Nov 2013 - 11:18 am

२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील .
त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय .
या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय .

कसाब अजुन जिवंत आहे का ?

मुक्तकप्रकटनविचारप्रतिक्रियामत

पद्म पुरस्कार… सन्मान की खैरात ?

रामबाण's picture
रामबाण in जनातलं, मनातलं
20 Nov 2013 - 12:19 pm

देशातल्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होते. लगेच त्यावरुन वाद होतात. काही काळ तरी आपली चांगली करमणूक होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पद्म’ वरुन दक्षिणात्य गायिका एस. जानकी, कुस्तीवीर सुशीलकुमार यांच्या मानापमान सोहळ्याचीच जास्त चर्चा झाली. खरं तर त्यावेळीच म्हणजे जानेवारीत मी हा ब्लॉग लिहायला घेतला होता. पण नेहेमीप्रमाणेच आळस आणि पार्किन्सन्स लॉ या दोन्हींमुळे लिहिणं मागे पडलं.

धोरणमांडणीसमाजजीवनमानविचारप्रतिक्रियासमीक्षामत

मी त्याला देव मानत नाही…

रामबाण's picture
रामबाण in जनातलं, मनातलं
11 Nov 2013 - 9:40 am

मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी. त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही. असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो...

क्रीडाविचारसद्भावनाप्रतिक्रिया