केला इशारा जाता जाता
... मि. वॉटसनकडे पहात शेरलॉक होम्सने डाव्या हाताच्या पकडीतील पाईपमधून लांबलचक झुरका घेतला. धुराचा भपका सोडत बारीक नजरेतून...
... बिंदू, अरुणा इराणी वा तत्सम हलकट जवानीची हूल दाखवणाऱ्या बिल्लो राण्यांच्या महिला मंडळाकडून केलेल्या इशाऱ्याची वाट पाहत असलेल्या मर्दांच्या एका हातात लाल पाण्याचा गिलास तर दुसर्या हाताच्या मुठीत कडक सिग्रेटची कांडी. ओठांचा चंबू करून धुराच्या गोल गोल रिंगा काढून आपापला धाक जमवणाऱ्या कधी अट्टल पटाईतांकडे, तर कधी शेरलॉक होमला आदरपूर्वक पहात असताना आरोग्यास हानिकारक संवैधानिक उदघोषणा 'पचका' करून जातात.
पडद्यावर दिसणाऱ्यांना त्यांचे काही देणेघेणे नसते. पहाणाऱ्यांना तर त्याहून नसते. अशा इशाऱ्यास दाखवणाऱ्यांना रस नसतो पण 'संवैधानिक' नामक दटावणीमुळे त्यांनी दाखवायचे प्रेक्षकांनी निमुटपणे दुर्लक्ष करून वेळ मारून नेणे क्रमप्राप्त होते.
'फोटो लेना मना है' असे इशारे पर्यटनात विरस निर्माण करतात. सुंदर कलाकृती, भव्य भावनांचा, रम्य मनोहर देखाव्याची मजा फावल्या वेळी आपणास व अन्य रसिकांना दाखवणाऱ्यांना मनाई करण्यात या पाट्या लावणाऱ्यांना काय आनंद मिळतो कोणाला ठाऊक! राष्ट्रीय संपत्तीचा व ठेव्यांच्या रक्षणासाठी हे असे करावे लागते असे म्हणतात. पण सध्याच्या एरियल व अन्य आधुनिक साधनांनी हव्या त्या टारगेटचा शोध व वेध घेता येतो म्हणून या दाव्याचा फोलपणा पाट्या लावणाऱ्यांना ही मान्य असतो. रखवालदारांच्या हडेलहप्पीतून चतुरपणे सुटून फोटो काढले जातात. मोबाईल मधून फोटो व व्हिडीओ फिल्म बनवलेली जाते. मग या मनाईला काय अर्थ अभिप्रेत आहे?
कान बंद करता येत नाही म्हणून, तोंड आहे म्हणून बोलणाऱ्यांचे निमूट ऐकावे लागते कधी कधी.... काय करायचं...
असे आणखी काही इशारे सदस्यांनी सुचवावेत. संवैधानिक आहे म्हणून या अशा चेतावण्या जाता येता बोकांडी बसतात? यावर विचार वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
29 Nov 2013 - 3:51 pm | अग्निकोल्हा
पण कोकेन तब्येतीला हानिकारक आहे असे कुठेही इशारा पुस्तकात दिलेला न्हवता
29 Nov 2013 - 6:43 pm | शशिकांत ओक
अशा संवैधानिक आदेशाचे फॅड कोणी, का व कसे काढले यावर सर ऑर्थर कानन डायल यांनी शेरलॉक होमला ते शोधून काढायला लाऊन एक एपिसोड तयार झाला असता!
30 Nov 2013 - 1:50 am | अग्निकोल्हा
म्हणून तर अनुराग कश्यप्ला फ़ुल्ल पाठिंबा आहे.
30 Nov 2013 - 11:08 am | शशिकांत ओक
चला यावर कश्यप यांनी तोंड फोडले. फोटो काढायला
बंदीवर असेच काही तरी करायला हवे. फिल्म उद्योगाला यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
30 Nov 2013 - 12:05 pm | सुबोध खरे
ओक साहेब आपले विचार एकांगी आहेत असे वाटते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे या स्वा. सावरकरांच्या वचनाची आठवण झाली. सिगारेट पिणे म्हणजे मुक्ती किंवा स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे नव्हे. वर लिहिलेले इशारे उपयुक्त आहेत हे खाली दिलेल्या युरोपीय आयोगासाठी तयार केलेल्या अहवाला वरून दिसून येते
त्याचा गोषवारा (conclusions) खाली आहेत.
Scientific knowledge on the effect / impact of tobacco warning labels on consumers
• There is clear evidence that tobacco package health warnings increase consumers’
knowledge about the health consequences of tobacco use and contribute to changing
consumer’s attitudes towards tobacco use as well as changing consumers’ behaviour.
They are also a critical element of an effective tobacco control policy.
Warnings have a high impact in educating consumers of the health risks of tobacco use
Warnings have a medium impact in changing smokers attitudes (in particular thinking about
quitting and smoking in the presence of non-smokers)
Warnings have a medium impact in changing smokers’ behaviour (including smoking less,
smoking less around others, using quit lines, attempting to quit and quitting)
शिवाय हा दुवा पण जरुर वाचा
http://www.telegraph.co.uk/news/uknews/3302893/Film-star-glamour-of-ciga...
फोटो बद्दल आपल्याला असे आठवत असेल कि मुंबई २६ /११ हल्ला करणार्यांना माहिती पुरवणारा डेव्हिड हेडली ने मुंबईत राहून वरील माहिती काढली होती
"Between 2007 and 2008, Headley made five trips to Mumbai, scouting local landmarks where Lashkar terrorists would carry out the multi-pronged attack. Headley stayed at the Taj Mahal Palace Hotel—identified by Iqbal and Mir as their main target—and surveyed the building using his ISI training, shooting hours of video during in-house tours." Iqbal and Mir were emboldened by Headley's intelligence and decided to make their attack more ambitious in scale. As they expanded their list of targets, Headley scouted the Oberoi Trident Hotel, the Leopold Cafe, and the Chhatrapati Shivaji Terminus. When Lashkar decided to target on the Nariman House, a Jewish community center, Headley visited the location posing as a Jew.[27] Headley also took boat tours to look for places where the attackers could reach the city through the waterfront; he found a landing location at a fishermen's slum in the Colaba area of southern Mumbai, where he gathered GPS coordinates. The ten Lashkar militants carried out the attacks per the detailed intelligence gathered by Headley during his trips; the attack would lead to the deaths of 168 people, including six Americans. The intelligence he collected on the Nariman House allowed the terrorists to raid the building and execute its staff,
संदर्भ विकीपेडिया
या वरून एक गोष्ट सिद्ध होते कि मूळ फोटो काढू नयेत हा कायदा बरोबर आहे परंतु आपला भारतीयांचा "चलता है" हा दृष्टीकोन किंवा टोकाची भूमिका घेतली तर फाजील स्वातंत्र्याचा अट्टाहास हा याला आड येतो. जर आपल्या नजरेस एखादा माणूस प्रतिबंधित ठिकाणाचा फोटो घेताना आढळला तर आपल्यापैकी किती लोक त्याला थांबवतात? किन्वेखद माणूस एखादी पिशवी विसरून जात असेल तर आपल्यापैकी किती लोक त्याला "आठवण" करून देतात जोवर आपल्यापैकी प्रत्येक नागरिक असे करत नाही तोवर सरकारच्या नावाने बोंब मारण्या व्यतिरिक्त आपण काहीही करण्याच्या लायकीचे नाही असे सिद्ध होते.
मी मिपा वर एक लेख लिहिला होता "आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का?" त्यात मला हेच म्हणायचे होते. किती लोकांनी वाचला आणि त्यातून काही विचार केला ते माहित नाही.
असो यातील कोणतीही गोष्ट आपल्याला वैयक्तिक स्वरुपात म्हणून लिहिलेली नाही.
30 Nov 2013 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
+ १००
हम्म... पहिला विरोध करू... मग जमलंच तर विचार करू, ही सवय भारतात फार जुनी आहे.
30 Nov 2013 - 11:30 pm | शशिकांत ओक
सुबोध खरे जी,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तीन गोष्टीचा उल्लेख केलात त्यावर थोडक्यात विचार -
आपल्याला राष्ट्रीय चरित्र नाही. याला भारतीय ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. शिवाय भारतीय तत्वज्ञानाचा प्रभाव ही कॉन्ट्रिब्युटींग फॅक्टर वाटतात. पुर्वी एकदा सहज यावर माजी हवाईदल प्रमुखांचे विचार ऐकायला मिळाले होते. ते म्हणाले होते,सध्याच्या काळात राष्ट्रीय भावना व चारित्र्याची वानवा आहे. भारतीय जनता पूर्वापार उत्तम अनुयायी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना योग्य नेतृत्व मिळाले तर ते चमकतात.असो.
सिगरेट वा अन्य व्यसने कमी अधिक प्रमाणात आरोग्यास हानिकारक असतात. त्याचे सेवन व व्यक्तिस्वातंत्र्य, मुक्ती-मोक्ष इतके लांब जायला नको. आपण दाखला दिलेला अहवाल हाय, मीडियम असे मोघम शब्द वापरतो. टीव्हीवरच्या कार्यक्रमाच्या मधे मधे त्यांची लुडबुड नकोशी वाटते. सिगरेट पाकिटावर इशारा जरूर लिहावा.
फोटो मनाई - असताना देखील हेडली फोटो काढून गेला. मग जर अशा लोकांना फोटो काढायला पकडायला शक्य नाही वा नव्हते. तर मग अशी धेडगुजरी मनाई काय कामाची? सुंदर मुर्ती, चित्रकला, यांचा आस्वाद फोटो काढायला मनाई करून किरकिरा करायला हवा का? जेंव्हा हे नियम केले गेले त्या व आत्ताच्या परिस्थितीतच इतका फरक आहे. त्यावर पुनर्विचार करण्यात यावा. इतकेच.
म्हणून हे इशारे जाता जाता केलेले अन नाही पाळण्याकरता दिले जातात असे जाणवते.
1 Dec 2013 - 5:43 pm | अग्निकोल्हा
हम्म!
17 Apr 2014 - 9:42 am | शशिकांत ओक
दर पाच वर्षांनी आलेल्या मतदानाच्या कुंभमेळ्यात सहभागी होऊन राष्ट्रीय चारित्र्य तयार करायला मत दान करा.
17 Apr 2014 - 10:26 am | माहितगार
मंदिरांमधील छायाचित्रण प्रतिबंधांना अतीरेक्यांच्या भितीमुळे हल्ली नवे परिमाण मिळाले त्या बद्दल मला काही म्हणावयाचे नाही. पण सर्वसाधारणपणे भारतीय मंदिरांमधील छायाचित्र प्रतिबंधन हे अतीरेक्यांचा संबंध येण्यापुर्वी पासून होते . या प्रतिबंधाची कारणे काय याबद्दल चौकशी केली तर सर्वसाधारणपणे व्यक्तीगत कयास/कल्पना सांगीतल्या जातात. मला या प्रतिबंधांच्या इतिहासाची अधिकृत संदर्भा सहीत माहिती कुणाकडे असल्यास हवी आहे.
6 Sep 2018 - 11:42 pm | शशिकांत ओक
बहुतेक हे युद्ध काळातील पर्वात सुरू झाले असावे.
याची उपयोगिता चाचपून निरर्थक इशारे बंद व्हावेत.
7 Sep 2018 - 11:55 pm | चित्रगुप्त
पुण्यात राहून ‘पाट्यां’शी वैर ??
9 Sep 2018 - 12:05 am | शशिकांत ओक
'फोटो लेना मना है' ही तंबी वजा पाटी पुणेरी वाटते... अन प्रादुर्भाव देशभरात जाणवतो...
म्हणून वैर करावे असे वाटते...