टुक टुक! आमची महाराणी तुमच्यापेक्षा श्रीमंत!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
2 Dec 2013 - 9:53 pm
गाभा: 

भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान असणार्‍या महात्यागी, महासाध्वी, महाज्ञानी महाराज्ञी सोनियाजी गांधी ह्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत असल्याचा निष्कर्ष एका पहाणीत काढला गेला आहे. चला! ह्या निमित्ताने इंग्लंडचे नाक कापले (इटलीकडून उसनवारी करून का होईना!)

http://www.loksatta.com/desh-videsh-news/huffpost-report-says-sonia-gand...

साधी रहाणी आणि उच्च विचारसारणीचा दिव्य संदेश देणार्‍या थोरल्या राणीसाहेबांच्या अल्प संपत्तीची अंदाजे किंमत दोन अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.

देशाकरता इतका त्याग करुनही स्वतःची इतकी भरभराट करु शकणार्‍या ह्या देवतासमान विभूतीला आपण आपल्या देशाचा लगाम पुन्हा एकदा दिला तर ती देशाचीही अशीच भरभराट करेल ह्याविषयी मला तरी शंका नाही.

प्रतिक्रिया

lakhu risbud's picture

2 Dec 2013 - 10:32 pm | lakhu risbud

कसं काय सापडतं बुवा तुम्हाला असं ? आमाला तर बुवा अच्यर्य वाटुन ऱ्हायले. ड्वाले खाडकरून उघडले पघा !
अजून बी उघड्ल्येल्येच हायेत,मिटायला तयारच न्हाईत.

बाप्पू's picture

2 Dec 2013 - 10:41 pm | बाप्पू

साधी रहाणी आणि उच्च विचारसारणी... आणि उच्च बँक balance....

Smiley उत्पन्नाचे स्रोत काय आहेत म्हणे?

स्पंदना's picture

3 Dec 2013 - 8:37 am | स्पंदना

भारत असावा काय?

बाप्पू's picture

3 Dec 2013 - 12:03 am | बाप्पू

ना व्यवसाय; ना उद्योग; ना प्रशासकीय पद. तरीही एवढी कमी कशी काय बर?

खटपट्या's picture

3 Dec 2013 - 1:12 am | खटपट्या

हे हिमनगाचे टोक असू शकते.

विकास's picture

3 Dec 2013 - 2:01 am | विकास

सोनीयाजींची संपत्ती किती आहे आणि त्यांनी ती कशी मिळवली, या संदर्भात माझा प्रतिसाद बघू नये... पण काहीतरी गडबड आहे या बातमीत...

हफिंग्टन पोस्टच्या मूळ बातमीत सोनीया गांधींचा उल्लेख किमान मला तरी दिसला नाही. पण भारतातील सर्वच माध्यमात ही बातमी हफिंग्टन पोस्टचा उल्लेख करून झळकलेली दिसत आहे. याचा अर्थ हफिंग्टन पोस्टने ती बातमी नंतर बदललेली असावी असे दिसते. आता ती बदलायचे कारण त्यांच्या मूळ बातमीत चूक/खोडसाळपणा होता हे आहे की त्यांच्यावर दबाव आणला गेला आहे, हे सत्य कधी बाहेर येईल असे वाटत नाही. :(

विद्युत् बालक's picture

3 Dec 2013 - 2:09 am | विद्युत् बालक

Editor's Note: Sonia Gandhi and the former emir of Qatar Hamid bin Khalifa al-Thani has been removed from this list. Gandhi was originally included based on a listing on a third party site which was subsequently called into question. Our editors have been unable to verify the amount, removed the link, and regret any confusion. Sheikh bin Khalifi was succeeded by his son Tamim in 2013.
सिब्बल ने फोन मारला असेल लगेच !

विकास's picture

3 Dec 2013 - 2:42 am | विकास

ती वेबसाईट ही आहे: http://www.celebritynetworth.com/richest-politicians/sonia-gandhi-net-wo...

छ्या! हा धागा वाचून असे गर्वाने भरून आले होते म्हणून सांगतो... पण हफिंग्टनपोस्टने यकदम भ्रमनिरास केला! ;) मलातर वाटते आहे की ही भारताला कमी लेखण्याची कॉन्स्पिरसी असावी... जाउंदेत... डालर आणि पाउंडात श्रीमंत इतरत्र असतीलही, पण काय करायचे आहे असले कागदी श्रीमंत घेऊन? मनाची श्रीमंती फक्त आमच्याच बाईसाहेबांकडे आहे...त्याची सर कुण्णाकुण्णाला येण्णार नाह्ही! म्हणूनच तर अन्नसुरक्षा बिलाच्या नावाने (स्वतःचे नाहीतरी जनतेचे) पैसे मुक्तहस्ताने उधळू शकल्या! ;)

.त्याची सर कुण्णाकुण्णाला येण्णार नाह्ही! म्हणूनच तर अन्नसुरक्षा बिलाच्या नावाने (स्वतःचे नाहीतरी जनतेचे) पैसे मुक्तहस्ताने उधळू शकल्या!
हॅहॅहॅ... बाई मोठ्या मनाच्या हायेत बघा ! पैका जनतेचा असला तरी काय झाल ? इधळायला देखील मोठ मन आणि काय म्हणतात ते हं अंतरात्मा की आवाज वगरै सुद्धा ऐकु यावा लागतो. ;)

गरिबांसाठी जनतेचे का असेना पैसे खर्च केले तर सुरु झाली पोट दुखी.

गब्रिएल's picture

11 Dec 2013 - 11:13 pm | गब्रिएल

आधळं दळतय कुत्र पिठ खातय... पन आंधल्याले कुटे समजतय ! सगला जल्ला येड्याचा बाजार

गब्रिएल's picture

11 Dec 2013 - 11:13 pm | गब्रिएल

आधळं दळतय कुत्र पिठ खातय... पन आंधल्याले कुटे समजतय ! सगला जल्ला येड्याचा बाजार

विद्युत् बालक's picture

3 Dec 2013 - 2:01 am | विद्युत् बालक

हेच म्हणतो !

निवडणूक आयोग आणि प्राप्तीकर विभाग काय बुच मारून बसलेत कि काय? चायला आम्हाला मात्र पेनल्टी आणि ह्यांना मात्र कल्टी ?

जय हो सोनियाजी !

अवांतर : "जाणत्या " राजाचे काय मत आहे ह्याबद्दल?

हि बातमी जर खरी असेल तर विरोधी पक्ष का गप्प बसलाय? गप्प बसले कारण त्यांना माहित आहे बातमी खोटी आहे. जर बातमी खरी आहे ह्याची खात्री असूनही ते गप्प बसलेत तर मात्र ते विरोधी पक्षातच बसण्याच्या योग्यतेचे आहेत

इरसाल's picture

7 Dec 2013 - 11:18 am | इरसाल

सच्ची...................न सच्ची................न !!!(मी सध्या वान्खेडेवर उभारलोय !)

अर्धवटराव's picture

3 Dec 2013 - 8:49 am | अर्धवटराव

बातमी खोटी असल्याचा खुलासा झाला आहेच , पण तरिही सोनीया गांधींकडे खच्चुन पैसा असल्यास आश्चर्य वाटायला नको. नेहरु घराणं पिढीजात श्रीमंत आहे...त्यातला काहि वाटा सुनबाईंच्या नावे आला असेलच... आणि अर्थतज्ञांची फौज असेल दिमतीला तर पैसा मल्टीप्लाय होणं काहि अवघड नाहि.

सुनील's picture

3 Dec 2013 - 8:57 am | सुनील

तवा चांगला तापला होता. मंडळी कणकेचे गोळे लाटतच होते. आणि तुम्ही तव्यावर थंड पाणी ओतलेत :(

विकास's picture

3 Dec 2013 - 9:30 am | विकास

पैसा मल्टीप्लाय होणं काहि अवघड नाहि.

अगदी अगदी... त्यासाठी अर्थतज्ञांची फौज कशाला हवीय हो? इंदीरा विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्तीफिकेट्स मधे, पैसे ठेवले असतील दर पाच/सहा वर्षांनी दुप्पट! ;)

ग्रेटथिन्कर's picture

3 Dec 2013 - 9:08 am | ग्रेटथिन्कर

खोटा प्रचार करण्यासाठी फेकू आता परदेशी वृत्तपत्रांनाही पैसा द्यायला लागला आहे हेच यातून सिद्ध होते.

विकास's picture

3 Dec 2013 - 9:26 am | विकास

हे म्हणजे अगदी सुब्रम्हण्यम स्वामींच्या कॉन्स्पिरसी थिअरीजसारखेच झाले हे वरचे प्रतिसाद पाहीले तर लक्षात येईल... :)

हुप्प्या's picture

3 Dec 2013 - 11:46 am | हुप्प्या

ंअसेही शक्य आहे की महाराणीजीनी आपले अफाट धन वापरुन मूळ बातमी खोटी असल्याची ष्टोरी बनवली आणि ती यशस्वीरित्या सगळ्यांच्या गळी उतरवली. लगेच आपल्या लाडक्या पक्ष वा नेत्यावर आगपाखड करायची गरज नाही.

हुप्प्याजी तुसी ग्रेट हो!

ब़जरबट्टू's picture

3 Dec 2013 - 9:13 am | ब़जरबट्टू

अरे बाबांनो, तुमचा पगार काय ... तुम्ही बोलता काय ... =))

उद्दाम's picture

3 Dec 2013 - 9:30 am | उद्दाम

छान

विकास's picture

3 Dec 2013 - 9:39 am | विकास

मायनेता.इन्फो वर सर्वांची निवडणू़क आयोगास दिलेली माहिती आहे.

ती खरी धरल्यास, २००४ साली सोनीयाजींकडे साधारण ८५ लाख रूपये होते जे २००९ मधे १.३ कोटी झाले तर राहूल गांधींकडे अनुक्रमे त्याच काळात आधी ४५ लाख होते ते २.९ कोटी झाले!

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2013 - 10:14 am | राजेश घासकडवी

१.३ कोटी फक्त? म्हणजे दादरमध्ये फ्लॅट असणारे लोक सोनिया गांधींपेक्षा श्रीमंत आहेत तर! ऐकावं ते नवलच.

हुप्प्या's picture

3 Dec 2013 - 11:53 am | हुप्प्या

हे सगळे आकडे हे म्हणजे ज्या मालमत्तेच्या मालकीचा इन्कार करणे अशक्य आहे त्याची मोजदाद. मला खात्री आहे की कुठल्याही वरच्या नेत्याकडे ह्यापेक्षा कितीतरी जास्त जिचा मागमूस लागू शकणार नाही अशी संपत्ती आहे. किंबहुना अशा मार्गाने मिळवलेली संपत्ती कुणाला सुगावा लागू न देता योग्य स्थळी ठेवणे हे एक अत्यंत प्रगत शास्त्र आहे आणि आपले तमाम वरिष्ठ राजकारणी त्यात पारंगत आहेत.

नित्य नुतन's picture

6 Dec 2013 - 1:20 pm | नित्य नुतन

गेल्या ६० वर्षात पाठ्यपुस्तकातील एक वाक्य बदलले नाही की, भारत हा विकसनशील देश आहे ... पण याच भारतात राहून यांची संपत्ती खरबोंनी वाढली ... हे कसे काय हो ...

---- confused भारतीय

उद्दाम's picture

7 Dec 2013 - 1:52 pm | उद्दाम

शेवटी काय हो, आपण एका 'मता'चे धनी, संपत्तीचा मालक निराळाच !!!

:)

नित्य नुतन's picture

7 Dec 2013 - 3:59 pm | नित्य नुतन

खी खी खी ... फारच ब्बा इनोदी तुमचा स्वभाव ... :-) :-)

देशाकरता इतका त्याग करुनही स्वतःची इतकी भरभराट करु शकणार्‍या ह्या देवतासमान विभूतीला आपण आपल्या देशाचा लगाम पुन्हा एकदा दिला तर ती देशाचीही अशीच भरभराट करेल ह्याविषयी मला तरी शंका नाही.>>>>>

अगदी खरे हुप्प्याजी देशाचा लगाम कॉंग्रेस लाच मिळणार तुम्ही चिंता करू नका

ग्रेटथिन्कर's picture

7 Dec 2013 - 3:04 pm | ग्रेटथिन्कर

हे त्यांनाही ठाऊक आहे ,त्यामुळेच ते इथे हीरहीरीने प्रतिसाद टाकत आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Dec 2013 - 8:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>>देशाचा लगाम कॉंग्रेस लाच मिळणार तुम्ही चिंता करू नका >>>> :)

सचीन's picture

10 Dec 2013 - 10:24 pm | सचीन

मी देशात लिवलाय भाऊ. हा राज्यांचा निकाल होता.

कॉंग्रेस ला विरोधी बाकावर बसवून काय देशाचे नुकसान करायचेय?

काँग्रेस अगदी संसदेतुन हद्दपार करायची तुमची इच्छा अत्यंत अवास्तव आणि कोड्यात पाडणारी आहे.
लोकशाहीत विरोधीपक्ष अत्यंत महत्वाची भुमीका बजवतात. तुम्ही काँग्रेसला त्याकरताही नालायक ठरवुन त्या पक्षावर फार अन्याय करताहात.

विरोधी पक्षात बसण्याची कॉंग्रेसची लायकीच नाही. कॉंग्रेस हा पक्ष सत्तेवरच आला पाहिजे. देशाचे भले करण्याची ताकत असलेला एकाच पक्ष भारतात आहे तो म्हणजे कॉंग्रेस. कॉंग्रेसला विरोध म्हणजे देशाच्या विकासाला विरोध.

काँग्रेसने अनेक दशकं सरकार चालवलं आहे, शिवाय काहि वर्ष विरोधिपक्ष देखील राहिला आहे. त्या पक्षाबद्दल एव्हढं सार्कास्टीकली लिहीण्याचं काहि कारण नाहि.

सचीन's picture

13 Dec 2013 - 9:49 pm | सचीन

अर्धवटराव !अर्धवटराव !अर्धवटराव !

आपल्या डोळ्यांवरचा काँग्रेसविरोधी चश्मा काढा. थोडंफार अधिक-ऊणे प्रत्येक पक्षात असतं... पण म्हणुन सरसकट काँग्रेसच्या नावाने बोटं मोडणं योग्य नाहि.

lakhu risbud's picture

7 Dec 2013 - 11:28 pm | lakhu risbud

Old Saying "Never Argue with a fool, they drag you down to their level & beats you with experience !"

काळा पहाड's picture

9 Dec 2013 - 11:59 pm | काळा पहाड

Old Saying "Never Argue with a fool, they drag you down to their level & beats you with experience !"

एकदम पटलं.

सचीन's picture

10 Dec 2013 - 10:23 pm | सचीन

काळा पहाड उर्फ BLACK MOUNTAIN ह्यांच्याशी सहमत. खाजगी क्षेत्रात आरक्षण आणलेच पाहिजे.

अर्धवटराव तुसी ग्रेट हो!*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: