सिंगापुरातील दंगल

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
9 Dec 2013 - 4:12 pm
गाभा: 

आज एक महत्वाची बातमी वाचली. महत्वाची मी म्हणतोय कारण ती मला महत्वाची वाटली. सिंगापूर मधे भारतीय वंशाच्या एका कामगाराचा अपघाती मृत्यू आणि त्यानंतर दंगल. त्या दंगलीत अनेक जखमी, लाखोंची वित्तहानी इत्यादी.

सिंगापूर हा अतिशय शांत देश आहे, तिथे न्यायव्यवस्था अतिशय कडक आहे आणि त्यामुळे तो एक सेफ देश समजला जातो. हे खरं आहे, तिथे रहाणा-या माझ्या परिचयाच्या व्यक्तींच्या अनुभवावरून मी असं म्हणू शकतो. आता तिथे ही अशी घटना झाली. जी गेल्या ३० वर्षात झाली नव्हती.

या मागे २७ संशयितांना, जे साउथ एशियन वंशाचे आहेत, (बहुतांश भारतीय, पाकिस्तानी, बांग्लादेशी असावेत असा दावा आहे) तिथल्या पोलिसांनी अटक केली आहे. तिथलं सरकार म्हणतं authorities would "spare no effort to identify the culprits and deal with them with the full force of the law.''

ते तसं करतीलच. परिणाम? तिथे असलेल्या अनेक मायग्रंट्स वर हकनाह्क टांगती तलवार. बरं तिथलं सरकार चार दिवसात नवा कायदाही आणायला समर्थ आहे आणि तसं केल्यास त्यांना कुणी एक शब्दानेही अडवू शकणार नाही. कारण? आपल्या (इथे मी हे गृहित धरतोय की दंगल करणा-यांपैकी अर्धे लोक भारतीय आहेत) लोकांनी बाहेरच्या देशात जाऊन स्वतःच्या असंस्कृतपणाचं दिलेलं हे उदाहरण. आणि बाकी (त्यातल्या त्यात) सुसंस्कृत लोकांवर आणलेली अडचण.

बातमीतील हे एक वाक्यः The violence sparked debate among Singaporeans on social media about issues of overcrowding and the increase of migrant workers hired for Singapore's construction sector and menial jobs.

ती अडचण फार अडचणीची न ठरो हीच प्रार्थना आहे. पण हे असं अनेक छोट्यामोठ्या बाबतीत होतं आणि त्याचा कसा काय त्रास होतो ते परदेशी रहाणारे मिपाकर जाणत असतीलच. दंगल ही मोठी गोष्ट झाली. पण अमेरिकेसारख्या देशात रहाणारे आणि तिथे सर्रास सिग्नल तोडणारे, वर 'बी इंडियन बिहेव इंडियन' म्हणून खो खो हसणारे महाभाग मी बघितलेत.

या व्यक्तींना स्वतःची इमेजच नसल्याने त्याची फिकीर नसते, पण आपल्या अशा वागण्याने अख्या देशाची इमेज (तीही किती आहे हा वादातीत मुद्दा आहे) गाळात घालणा-यांना योग्य धडा मिळो अशी मनोमन कामना.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Dec 2013 - 4:21 pm | मुक्त विहारि

आझाद मैदानावरील दंगल आठवली....

हि दंगल १९६० नंतर पहिल्यांदा झाली आहे आणि पूर्णपणे निषेधार्थ आहे.
लिटल इंडिया हा भाग म्हणयला लिटल इंडिया आहे पण तिथे बांगलादेशीच ज्यास्त जमतात असा माझा अनुभव आहे.
मी पहिल्यांदा मोठ्या उत्साहाने गेलो होतो, पण तिथली परिस्थिती खूपच खराब आहे.
अतिशय थोड्याशा भागात रविवारी सगळे (जवळ जवळ ३ ते ४ हजार ) कामगार जमतात, रस्त्याच्या कडेला बसतात तिथेच बीअर दारू पितात आणि हळू हळू टवाळक्या चालू होतात.
शनिवार रविवार संपला कि काहीतरी मोठी मिरवणूक गेली असेल असा कचरा पडलेला असतो.
पहिल्यापासून इकडे लोक कामगार यायला विरोध करत होते आता जोरात विरोध होत आहे.
आताच सरकार लिटल इंडियन लोकांना जमण्यासाठी ब्यान करणार आहेत अशी खबर आहे.
सगळ्यात महत्वाचे सगळ्या वाहिन्याच्यावरची चर्चा बघण्यासारखी होती कुठेही भडक बातम्या नाहीत समजून उमजून चर्चा चालू होती

मधुरा देशपांडे's picture

9 Dec 2013 - 7:13 pm | मधुरा देशपांडे

दंगल ही गंभीर घटना आहे. परंतु इतर अनेक बाबतीत हे असे आढळते. अगदी विमानात फुकटात मिळते म्हणून अति दारू ढोसून पुढे गोंधळ घालायचे, ऑफिसमध्ये फुकटात मिळणाऱ्या वस्तूंची चोरी करायची असे छोटेमोठे आणि महत्वाचे म्हणजे अस्वच्छता. काही ठिकाणी भारतीय लोक असतील तर घरे भाड्याने देत नाहीत, ते केवळ अस्वच्छतेमुळे. वरून आम्ही भारतीय आहोत, मग हे असेच करणार किंबहुना करायलाच हवे असा आव. परंतु त्रास मात्र इतरांना जास्त होतो.

वाटाड्या...'s picture

9 Dec 2013 - 9:09 pm | वाटाड्या...

मी राहिलो आहे सिंगापुरमधे. अतिशय वाईट परिस्थीती आहे लिट्ल इंडियाची. म्हणजे काय आहे की त्या लिट्ल इंडिया भागात तर आम्ही ३-४ जण शनीवारी / रविवारी जातच नसोत कारण एकतर जाम गर्दी शिवाय कामगार लोकांच्या बरोबर कोण हुज्जत घालणार. शक्यतो सगळे तमिळ भाषिक. त्यांना आपली / इंग्रजी भाषा येतही नाही आणि शिकायची पण नसते. अत्यंत घाणेरडी रेस्टॉरंटस. अर्थात स्वस्त कारण येणारा कामगार वर्ग जास्त. त्यांमूळे त्यांना परवडणारा रेट. गोपुर काय, मिरवणुका त्या स्पेशल साउथईंडियन स्टाइलच्या. कुठेही थुंकणं. फार वाइट वाटलं. त्यामानाने चायनीज लोक ज्या भागात असतात ते भाग बर्यापैकी स्वच्छ. माझा एक सहकारी चायनीज होता. तेव्हा तो मला जेव्हा चायनीज नवीन वर्षाच्या कार्यक्रमाला घेउन गेला तेव्हा अत्यंत सुंदर आणि आदबशीर वागणुक आणि वक्तशीरपणा/ स्वच्छता.

मला सिंगापुर जे माहित आहे त्यात सरकार अतिशय चांगलं आहे. ते नक्कीच जलद कार्यवाही करतील. मनापासुन वाटतं की त्या नासधुस करणार्या सगळ्या लोकांना कायम स्वरुपी सिंगापुर मधुन हाकलुन दिलं पाहीजे. मग ते कुणीही असोत.

- (सिंगापुरचा फॅन) वाट्या...

कुसुमिता१'s picture

11 Dec 2013 - 5:20 pm | कुसुमिता१

खरय कि लिटील इंडीया एरिआ अत्यंत गचाळ म्हणजे एखाद्या खेडेगावा प्रमाणेच आहे..तिथे गेल्यावर आपण परदेशात आलो आहोत अस वाटतच नाही..

नगरीनिरंजन's picture

11 Dec 2013 - 9:03 pm | नगरीनिरंजन

लेख लिहिणारे व प्रतिक्रिया देणारे सगळे सिंगापुरात राहणारे वा राहिलेले आहेत काय?

पप्पुपेजर's picture

12 Dec 2013 - 7:21 am | पप्पुपेजर

Hech lihayla alo hoto thanks singapore madhe je rahtat ani je little india madhe firle ayhet tyancha anubhav wegla ayhe. Amhala ekdahi konashi huzzat ghalavi nahi lagli ani he lok aplya swata madhe gung astat. Rahta rahila saf safai cha prashna little india madhe kinwa china town madhe paristiti same aste so no comments.

वेल्लाभट's picture

12 Dec 2013 - 8:13 am | वेल्लाभट

अच्छा म्हणजे तुम्ही `चायना टाउन' मधे घाण असते म्हणून `लिटिल इंडीया' मधल्या घाणीचं समर्थन करणार का?

पप्पुपेजर's picture

12 Dec 2013 - 6:56 pm | पप्पुपेजर

मी हिंसेचे किंवा घाणीचे कुठेच समर्थन केले नाही आहे, माझा प्रतिसाद फक्त आधीच्या प्रतिसादा वर होता. इथे फक्त भारतीय लोकांचा संबंध नाही आहे बाकी पुष्कळ देशाची पब्लिक पण तिथे होती. सिंगापोर चे सरकार तसे हि खूप समर्थ आहे, बांधकाम कामगारांच्या अजून पुष्कळ गोष्टी आहेत ज्या बाहेरच्या लोकांना माहित होत नाहीत.

मृत्युन्जय's picture

12 Dec 2013 - 5:01 pm | मृत्युन्जय

आपणा महाराष्ट्रात बसुन काश्मीरच्या समस्येचे विश्लेषण करतोच की नाही ननि? जो काही प्रकार झाला तो सरळ आहे. त्यासाठी सिंगापोर मध्ये राहण्याची आणि राहुन आल्याची गरजच काय? एखादी अप्रिय घटना घडली की सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करायचे, गाड्या जाळायच्या, दगडफेक करायची ही आणि असली घाण आता या लोकांनी बाहेरच्या देशात सुद्धा पसरवायला सुरुवात केली असेल तर त्यांना जिथल्या तिथे ठेचलेलेच बरे. शिवाय झाला तो प्रकार एक अपघात होता. ते काही वर्णविद्वेषी कृत्य नव्हते की भारतीयांविरोधात सरकारने सुरु केलेली कुठली मोहिम नव्हती. मग कशाबद्दल हे दंगे? आपली विकृत मानसिकता दाखवण्यासाठी आणि देशाचे नाव खराब करण्यासाठी?

गोव्यात मागच्या महिन्यात नायजेरियन लोकांनी जो गोंधळ घातला त्याविरुद्ध तर आपण सगळे दात ओठ खाउन बोललो असु ना? मग सिंगापोरमधल्य दळभद्री भारतीयांना वेगळा न्याय का?

मधुरा देशपांडे's picture

12 Dec 2013 - 6:13 pm | मधुरा देशपांडे

+१
मृत्युंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत

वाटाड्या...'s picture

13 Dec 2013 - 11:44 pm | वाटाड्या...

अर्थात सहमत..

मारकुटे's picture

13 Dec 2013 - 12:54 pm | मारकुटे

सिंगापुरात फार सभ्य आणि सुसंस्कृत भारतीय रहात असल्याचे पाढे आम्ही ऐकले होते. हे आता नवीनच कळत आहे.