Skip to main content

कविता

कवीतेला वय असते

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 19/09/2026 12:54 या दिवशी प्रकाशित केले.

तारुण्यातला उसळणारा,
भावावेग मागे रहातो,
उथळ,गढूळ पाण्याचा डोह,
नितळ,शांत,स्वच्छ  बनतो

​यौवनात जे सौंदर्य होते,
वार्धक्यात तेच तत्त्व बनते,
पिकल्या पाना  सोबत,
कविताही म्हातारी होते!

उगाच नसतो शब्दांचा थाट,
नसतो अलंकाराचा घाट,
दोन ओळींच्या मौनामधून,
वहातो प्रगल्भतेचा पाट .

कवितेलाही वय असते, 
कवीसोबत तीही वाढते,
शब्दांच्या या गोंदणाला, 
अनुभवाचे कोंदण मिळते.

काव्यरस

हारलो यादवीला

लेखक नाहिद नालबंद यांनी मंगळवार, 15/09/2026 15:06 या दिवशी प्रकाशित केले.

राहिले नाही कधी सुख सोबतीला 

दुःख तर पुजलेच होते पाचवीला 

 

बायको असतेच महत्त्वाची परंतू 

लागते हल्ली जपावे नोकरीला 

 

संगणक मदतीस आला माणसाच्या 

अन विसरले लोक दिडकी पावकीला 

 

स्पर्श मायेचा असावा जाहलेला 

उब म्हणून जास्त असते गोधडीला 

 

एवढा तो सूर्य यंदा कोपला की 

शोधताना वृक्ष दिसले सावलीला 

 

कैकदा नामोहरम शत्रूस केले

मात्र कायम हारलो मी यादवीला 

 

मायचे फिटणार नाही ऋण कधीही 

काव्यरस

सांगू सखे तू काय हो

लेखक akshardas यांनी रविवार, 30/08/2026 09:45 या दिवशी प्रकाशित केले.

सांगू सखे तू काय हो

 

पसरवी किरणे रवीची

असा शीतल चंद्र हो

 

सोसूनी थकल्या घराचा

निखळ तो आनंद हो

 

माझिया माता पित्यांचे

सद्गुणी अपत्य हो

 

ना ढासळे कधीही असा

माझा दृढ विश्वास हो

 

साथ ना सुटते जयाची

असा माझा श्वास हो

 

- अक्षरदास

सूर्याचं विश्व

लेखक akshardas यांनी शुक्रवार, 28/08/2026 23:49 या दिवशी प्रकाशित केले.

दिवसभरातलं रणरणतं ऊन कमी केलं

मुलांना भेटायचं म्हणून रूप सौम्य केलं

 

घर जवळ येताच आठवणींच फुल फुललं

गोड आठवांनी ध्यान चक्क गुलाबी झालं

 

एरव्ही जो प्रखर जळजळता तप्त गोळा

डोळेभरून पाहावं अश्या दोनच त्या वेळा

 

आई म्हणाली किती तापलंय माझं बाळ

सुनबाई जरा गार पाण्याने अंघोळ घाल

 

कितीही जग गाजवलं तरी आईचा बाळ

भूमीच्या कुशीत क्षितिजावर शमला जाळ

 

आवरून झोपला तोच आली गोड उषा

बाबा खेळाची वेळ आता झोपतोस कसा

 

उशेसोबत बागडत केव्हाच सरली निशा

शूर आम्ही सरदार आम्हाला (विडंबन)

लेखक OBAMA80 यांनी रविवार, 23/08/2026 19:36 या दिवशी प्रकाशित केले.

शूर आम्ही नवरोबा आम्हाला काय कुणाची भीती
पर्स, साडी अन् सँडलपायी कर्ज काढलं जास्ती ।।ध्रु।।

लग्नाच्या मंडपात उमगली संसाराची रीत, 
अमेझॉनशी नातं जुळलं, जडली सेलशी प्रीत!
लाख टोमणे झेलून घेईल अशी पोलादी छाती! 
पर्स, साडी अन् सँडलपायी कर्ज काढलं जास्ती

शूर आम्ही नवरोबा आम्हाला काय कुणाची भीती
पर्स, साडी अन् सँडलपायी कर्ज काढलं जास्ती ।।ध्रु।।

झुकावं वा हरून जावं, वाद न आम्हाला ठावं, 
माझंच चुकल म्हणत जगावं, हेच आम्हाला ठावं! 
शांतीपायी सारे इसरू आई बाबा ताई! 
पर्स, साडी अन् सँडलपायी कर्ज काढलं जास्ती!

Taxonomy upgrade extras