श्रावणही आला फिरूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी
शालू हिरवा नेसूनी
ओली मेंदी रेखूनी
उभी ही सृष्टी अंगणी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
पायवाट मृदगंधी भिजूनी
इंद्रधनू कमान बांधूनी
डोळी श्रावण सरी भरूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|
सरली शेतातली पेरणी
फुलले ताटवे जल धारांनी
पानांवर स्पर्शबिंदू गोठूनी
श्रावणही आला फिरूनी
सख्या तू ही ये फिरूनी|