Skip to main content

यशाचे आता गा मंगल गान

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 25/11/2019 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
यशाचे आता गा मंगल गान विजय मिळाला, आनंद झाला, यशाचे आता गा मंगल गान बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या, समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान ||धृ|| बलाढ्य असा तो शत्रू होता, तोफा बंदूका शस्त्रसज्जता फंद फितूरी किती करविली, अंती आपणच ठरलो विजेता विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१|| युद्धखोरपणा उगा नका दाखवू, शत्रृ रणांगणी पाहून घेवू युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस, लढता लढता मरण पत्करू शरणागती नसे कदापी, ध्वजासवे उंच करू आमची मान ||२|| - पाषाणभेद २५/११/२०१९
लेखनविषय:

वाचने 2441
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया