✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सांज..

प — प्राजु, Fri, 02/01/2008 - 00:01

प्रतिक्रिया द्या
8826 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
विसोबा खेचर Fri, 02/01/2008 - 00:08 नवीन

वा

वा प्राजू, खरंच छानच कविता केली आहेस. अगदी चित्रदर्शी झाली आहे. कवितेतली सांज डोळ्यासमोर येते...! और भी लिख्खो... संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली अंबराला नवी किनार देऊन सांज आली या ओळी फार आवडल्या... आपला संध्या-रामरक्षा व पर्वच्याच्या सांजेतला, आणि आपला ग्लेनमोरांजीतल्या सांजेतला, तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/01/2008 - 01:00 नवीन

संध्या ....

आपला संध्या-रामरक्षा व पर्वच्याच्या सांजेतला, आणि आपला ग्लेनमोरांजीतल्या सांजेतला काय हे तात्या? मी काल संध्याकाळी, संध्या करून, व्याकरणाच्या पुस्तकातील संधी वाचीत शेजारच्या संध्येशी बोलण्याची संधी शोधत होतो!! प्राजू, कविता छान! (संध्यासक्त) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वरदा Fri, 02/01/2008 - 00:11 नवीन

मस्त

सुरेख वर्णन
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 02/01/2008 - 00:12 नवीन

मस्त

पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली या ओळी आवडल्या.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 02/01/2008 - 00:18 नवीन

सुंदर सांज!

प्राजु सुरेख काव्य झालंय. अवांतर - तुझं गीत वाचून "संधिकालि ह्या अशा धुंदल्या दिशा दिशा" ह्या गाण्यानं मनात एकदम फेर धरला! चतुरंग
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 02/01/2008 - 00:54 नवीन

वाह! झकास

वाह! झकास जमली आहे कविता. घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली या ओळी विशेष आवडल्या
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 02/01/2008 - 03:22 नवीन

अप्रतिम

अप्रतिम कविता गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली ह्या ओळी विषेश आवडल्या. मला हि कविता वाचून काहि ओळी (त्या इतक्या सशक्त नाहि आहेत पण तरीही) सुचल्या त्या इथे वाचा. -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 02/01/2008 - 10:59 नवीन

छान!

गजलसदृष्य कविता आवडली. घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली.. ह्या ओळी विशेष आवडल्या.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 02/01/2008 - 11:28 नवीन

सांज ये गोकुळी

अशीच सुधीर मोघ्यांची ,श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली नादमय कविता आहे. आशा भोसलेंनी जीव ओतून गायली आहे. सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू साउली धूळ उडवीत गाई निघाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या परतती त्यासवे, पाखरांचे थवे पैल घंटा घुमे राऊळी पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेघ होई डोहातले चांदणे सावळे भोवती सावळ्या चाहुली माऊली सांज, अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा मंद वाऱ्यावरी वाहते बासरी अमृताच्या जणू ओंजळी केशवखुमारांचे यावर विडंबन असेलच. मी एकदा कुठेतरी वाचले होते. पण ते हस्तलिखित होते. पर्वत्यांची दिसे सून लांब काजळाची जरी दाट रेघ ............... असे पुसटसे आठवते आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
S
siddhumarathe Fri, 02/01/2008 - 15:18 नवीन

छान!

वाह , छान कविता.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/01/2008 - 20:20 नवीन

तात्या,

तात्या, वरदा, स्वाती, विनायक, ऋषिकेश, चतुरंग.. धन्यवाद. प्रमोदराव, अहो गझल सदृश म्हणू नका. कारण मला गझल येत नाही लिहायला आणि या कवितेत तर गझलेचे सगळे नियम मी धाब्यावर बसवले आहेत. आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. - प्राजु
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 10:50 नवीन

प्राजु ताईंची माफी मागून....

संधीकाली `घोट' पोटी रिचवून सांज आली गटाराला नवा पाहुणा देऊन सांज आली वस्त्यावस्त्यांतून पेटली ती भट्टी लपलेली त्रुषार्थाची त्रुष्णा विझवून सांज आली मुले-बाळे अन् माऊली घरी परतलेली `अस्ता'स चैतन्याच्या घेऊन सांज आली सुरू आता कोलाहल अन् शिव्यांची लाखोली आयुष्याची लक्तरे फेडून सांज आली पावलास त्या घराची वाटही न गवसलेली वाटेवरच्या नजरा अन् थिजवून सांज आली उद्ध्वस्त होत मने अन् गात्रेही गोठलेली रक्त शुष्क भावनांचे पिऊन सांज आली -------------
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 02/08/2008 - 00:50 नवीन

वा

वा वा... अभिजीत.. केशवाच्या पाऊलावर पाऊल... माफि वगैरे नका हो मागू... छान जमली आहे.. पण इथे का लिहिली आहे तुम्ही... स्वतंत्र लिहायचित ना? - प्राजु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा