हायकू - २
हायकूवरील पहिल्या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला व अनेकांनी स्वरचित हायकू दिले म्हणून आता दुसर्या भागात हायकूचा जरा खोलात विचार करू..पहिल्या लेखात सांगायचा राहिलेला एक सोपा नियम बघा पहिल्या-तिसर्या अथवा दुसर्या-तिसर्या ओळीत यमक पाहिजे. एकच यमक जुळवावयाचे असल्याने सोपे आहे. मराठीत ५-७-५ ही भानगडच नसल्याने प्रत्येक ओळीतील शब्दसंख्या कमी जास्त होते. हरकत नाही. पण त्या रचनेत "लय" पाहिजेच. स्वत:शीच गुणगुणले तरी लय आहे की काही बदल पाहिजे हे लगेच कळेल. शब्दसंख्या मर्यादित असल्याने त्यांची निवड करतांना जास्त काळजी घेतली पाहिजे.
बेडूक आणि सर्प
फार जुनी कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेंकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात आपसांत भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडली. रागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, बेडूक हे माझे भोजन आहे, त्या मुळे तुला मी खाणारच. त्याही परिस्थितीत बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली, तो सर्पास म्हणाला, तू मला खाईल, तर आज तुझे पोट भरेल, उद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्या भराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. सर्पाने विचारले, ते कसें शक्य आहे?
बयो !! - भाग ३ (अंतिम)
बयो !! - भाग १
बयो !! - भाग २
"मग काय ते सविस्तर सांग"
-------------------------------------------------------------------------------------
"सांगते बाबा सगळं. हि बयो माझ्यापेक्षा दोन वर्षाने लहान आहे. फक्त दोन वर्षाने लहान असून तिचे खूप लाड व्हायचे घरी. तिला जे मागेल ते खायला प्यायला द्यायचे आई बाबा. मलाही द्यायचे पण तिच्याकडे आई बाबांचे जरा जास्तच लक्ष होतं. यामुळे तिला बाहेरचं चमचमीत खायची सवय लागली.
पुण्यावर जळु नका
आपल्याकडे एखादी गोष्ट नाही, म्हणून स्वत:ला अपूर्ण मानत असू. तर ती असतानाही आपण पूर्ण बनू शकत नाही. आपल्याकडच्या 'मत्सर ' ह्या शब्दाला इंग्रजीत 'एन्वी' असे म्हणतात, पण 'जळणं' या शब्दाला न्याय देऊ शकेल असा पर्याय नसावा. 'जळणं' हा मनुष्यप्राण्याचा बेसिक इनस्टीक्ट असावा नव्हे तो तर तो आपल्या जीन्समधे आदिमकाळापासून एम्बेड झाला असावा. म्हणूनच तर शेजाऱ्याकडे नवं मॉडेल आलं की, आपल्याकड 'बेबी हमारी बडी गाडी अब बडी नही रही ' असं झाल्यावर लगेचच 'बेच दे' म्हणून मोकळे. लहानपणापासून म्हातारे होईपर्यंत आपण कोळसा होईपर्यंत जळत असतो. अशा वेळेस 'जळणं'च्या सैतानाला हरवण्यासाठी प्रभूचा मुलगा आठवतो.
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ - १
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी जागतिक मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मी माझ्यापरीने काहीतरी करावे म्हणून शेतकरी साहित्य चळवळ स्थापन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता.
जडण-घडण 12
पहिल्या ऑफीस जॉबचा निरोप घेतल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस छान निवांत गेले. मनाला आलेलं साचलेपण हळू हळू निथळू लागलं. सकाळी उठायचं, रोजची कामं आवरायची, आईला मदत हवी का, ते पाहायचं, मग निवांत पेपरवाचन... दुपारच्या जेवणानंतर गेल्या अनेक महिन्यात वेळोवेळी कुठे कुठे खरडून ठेवलेल्या ओळी, कल्पना चाळायच्या... असे खूपच कागद जमले होते. छान वेळ जायचा. संध्याकाळी बाबा ऑफीसमधून आल्यानंतर आई-बाबांसोबत चहा. मग ते दोघं नेहमी एक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायचे. मी कधी त्यांच्यासोबत तर कधी एकटीच भटकायचे. माझे बाबा नीटीमध्ये होते. आयआयटी सारखीच नॅशनल इंडस्ट्रीयल इंजिनियरींग इन्स्टीट्यूट.
नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?
आमची कुठेही शाखा नाही.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !!
जे का हिंडले बिंडले
पत्ता शोधण्यात गुंगले
ते उलटे जावोनी गंडले
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही
सुजला सुफला मुळा मुठा अन
दुथडी भरी नागझरी.
सर्वांचे चितळे पोटभरी
सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी
उण्या दुण्या चे काम नसे हे
पुण्या गुण्याचे नाव असे हे.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही.
जय हे जय हे जय जय हे.......
जय.पुणे......
'द साऊथ सी बबल'… एका जागतिक महाघोटाळ्याची कथा
पुर्वी झालेले आणि संभाव्य घोटाळे हा सर्वसामान्यांना बाजारापासून दूर ठेवणारा एक मोठा घटक!!. हे गैरप्रकार नक्कीच निषेधार्ह, पण अशा घोटाळ्यांतून वा अपघातांतूनच प्रचलित व्यवस्थांना सुधारणांचे बाळकडू मिळते, त्या सुदृढ बनतात हे नाकारता येणार नाही. असे भ्रष्टाचार हल्लीच होतात, आपल्याकडेच होतात असे बिलकुलच नाही. वाचकांचा असा गैरसमज असेलच तर तो दूर करणारी ही एक ऐतिहासिक महाघोटाळ्याची सुरस कथा....
‘घोटाळा' हा शब्द अलीकडे आपल्या भलताच परिचयाचा झाला आहे, वर जेव्हा तो शेअरबाजारासारख्या (कु??)प्रसिद्ध बाबीशी जोडला जातो, तेव्हा 'घोटाळस्य कथाः रम्याः' हे ओघानेच आले.
गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१६
मागिल भाग-१५
आणि श्टेजवरून खर्या अर्थानी एक्झिट होतात...
पुढे चालू...
===========================
मग सुरु होतो एक छोटा खेळ..सूनमुखाचा.पण हा ही तयार-झालेला एक विधी आहे. हल्ली एक भलामोठ्ठा आरसा(मंगल-कार्यालयातूनच!) दिला जातो. मग सासूबाई अगदी हौसेनी त्यात आपल्यासह मुलाचा सुनेचा चेहेरा बघतात.फोटुवाले त्यांच्या मागनं खास कलात्मक फोटु घेतात.
मिसळपाव