Skip to main content

तुझाच होऊनी

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 20/10/2014 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
तृुणात पाहतो तुला, फुलात मी न्याहाळतो तुझाच सूर होउनी, चराचरात गुंजतो तुझ्याच अंतरी तुला नकळता मी राहातो होउनी मी मंद गंध तुला हळु खुणावतो तुझाच अश्रु होऊनी पापणी मी भिजवतो तुझेच मौन होऊनी अधरी मी विसावतो उदास रात्री या तुझ्या बनूनी चंद्र पाहतो अंगणात मीच आणि पारिजात बरसतो श्वास मी भास मी तुझ्या समीप राहतो तुझाच होऊनी तुला तुझ्यातुनी हिरावतो पद्मश्री चित्रे
दिवाळी अंक वर्ष

वाचने 3361
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया