तुझाच होऊनी

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:01 am

तृुणात पाहतो तुला,
फुलात मी न्याहाळतो
तुझाच सूर होउनी,
चराचरात गुंजतो

तुझ्याच अंतरी तुला
नकळता मी राहातो
होउनी मी मंद गंध
तुला हळु खुणावतो

तुझाच अश्रु होऊनी
पापणी मी भिजवतो
तुझेच मौन होऊनी
अधरी मी विसावतो

उदास रात्री या तुझ्या
बनूनी चंद्र पाहतो
अंगणात मीच आणि
पारिजात बरसतो

श्वास मी भास मी
तुझ्या समीप राहतो
तुझाच होऊनी तुला
तुझ्यातुनी हिरावतो

पद्मश्री चित्रे

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

21 Oct 2014 - 1:21 pm | आयुर्हित

वाह व्वा!
चपखल शब्दप्रयोग.
अतिशय तरल कविता!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Oct 2014 - 3:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

व्वाह!! अत्यंत सुंदर रचना!!

मित्रहो's picture

21 Oct 2014 - 7:19 pm | मित्रहो

सुंदर रचना, सुरेख शब्द आणि नादबद्धता.

बहुगुणी's picture

21 Oct 2014 - 9:23 pm | बहुगुणी

शब्दरचनेतली नादमयता आवडली

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2014 - 8:58 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर कविता. एकरुपता आवडली.

सविता००१'s picture

22 Oct 2014 - 11:10 am | सविता००१

आवडली कविता