फार जुनी कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेंकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात आपसांत भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडली. रागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, बेडूक हे माझे भोजन आहे, त्या मुळे तुला मी खाणारच. त्याही परिस्थितीत बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली, तो सर्पास म्हणाला, तू मला खाईल, तर आज तुझे पोट भरेल, उद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्या भराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. सर्पाने विचारले, ते कसें शक्य आहे?