आजही माझ्याचपासून दूर मीही
तू जशी आहे तसा मजबूर मीही
भेटण्या जितकी मला उत्सुक असते
ये, व्यथे ये, तेवढा आतुर मीही
जेवढे जातो जवळ, ती लांब जाते
वाटते आता राहावे दूर मीही
लागला होता तिला माझा लळा पण,
प्रेमही केले तसे भरपूर मीही
एवढे शिकलो यशस्वी डाव त्यांचे,
जाहलो बघ खेळताना क्रूर मीही
सांगणारे सांगता लाखो कहाण्या
नीट आता वाचतो मजकूर मीही
----स्नेहदर्शन
प्रतिक्रिया
22 Oct 2014 - 2:55 pm | वेल्लाभट
छान!
23 Oct 2014 - 6:18 am | इनिगोय
वा, मस्तच! शेवटच्या दोनोळी विशेष आवडल्या.