मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दहा मिनिटांत घरपोच.

chetanasvaidya ·

मदनबाण Sun, 01/11/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि Sun, 01/11/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद Mon, 01/12/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर Sun, 01/11/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात

लेखनप्रकार
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

परदेशातील समाज जीवन

खटपट्या ·

कंजूस Sat, 01/10/2026 - 06:08
लिहिलेले अनुभव वाचायला मजा वाटतेय. त्यांचे ते स्वतंत्र असतात हीच खरी गंमत आहे. नैतर इकडे फक्त मराठी मालिका पाहा. किती भांडणं दाखवतात एका कुटुंबातील. लग्न कुणाचं होतं कुणाशी पण त्यात सगळे जण लक्ष घालतात. सासू,सासरा,नणंद, शिवाय घरात कायमची असलेली एक आत्या मावशी वगैरे.

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 10:46
लेख आवडला 👍 व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली 'कलेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉलव्हींग' ह्या संकल्पनेला मूठमाती दिल्यामुळे 'क्रायसिस व्हॅलिडेशन सायकल' मध्ये अडकलेल्या समाजजीवनाचे प्रतिबिंब जॉन आणि पीटरच्या उदाहरणातून दिसले!

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Sun, 01/11/2026 - 04:12
समाजजीवन कोकणात किंवा काही आदीवासी जमातीत - पंच मंडळ असते. लग्न, घटस्फोट, वारसा , कौंटुबिक कुरबुरी सोडवतात आणि ते बांधिलकी असते. वरच्या उदाहरणात घटस्फोट घेतला तरी मुलगा, मुलगी हे नातं आणि जबाबदाऱ्या तुटत नसतात हे दिसतंय. शिवाय कोर्टाकडे जाऊन उगाचच वकिलांचे खिसे भरत नाहीत.

Bhakti Sat, 01/10/2026 - 11:26
कोणी गोविंद घ्या , कोणी गोपाळ घ्या.
ठीक आहे निदान आनंदी तरी राहतात. इकडे सोसेल पण सोडणार नाही अशी काहीतरी विचित्र अवस्था असते.सामाजिक स्वास्थ्यासाठी स्वतः चे मानसिक स्वास्थ्य दावणीला बांधून कशाला जगणार ते! पण लिखाण मस्त शैलीत लिहिलेले आहे.

स्वधर्म Sun, 01/11/2026 - 00:41
पहिलं म्हणजे अजून लिहा! वाचायला आवडलं. आपल्याकडे कुटुंबसंस्था काही बाबतीत आधार देते पण त्यातही हेवे दावे, शोषण असतेच. त्यांच्याकडे स्वतंत्र राहणे ही एक मोठेच मूल्य आहे. शिवाय सरकार पोसत असल्याने मुले व कुटुंबाकडून फार अपेक्षा कोणी ठेवत नाहीत. आपल्याकडे काही विषेश न कामावणारी तिशी चाळीशीची मुलेही वडीलांच्या घरात राहतात ही पण बाजू आहे. बाकी फक्त रोकडा बिझनेस बघणाऱ्या अमेरिकेत केवळ चांगला माणूस आहे म्हणून त्याला कामावर ठेवले गेले ही वाचून त्यांचा समाज निर्दय नाही असेही वाटले.

सुबोध खरे Tue, 01/13/2026 - 19:51
तिथे घटस्फोट झाला कि संपत्ती दोघांत समान वाटून दिली जाते यामुळे नवरा किंवा बायको काहीही करत नसले तरी घटस्फोट झाल्यावर पैसे मिळतात त्यामुळेच त्यांना चिंता नसते. यामुळेच भरपूर पैसा असलेली लोकं लग्नापूर्वी करार ( PRENUPTIAL AGREEMENT) करतात कि घटस्फोट झाल्यास कोण किती पैसे देणार आणि हा करार कायदेशीर असतो.

"लेखन आवडलं. दुसरा किस्सा भारी होता. म्हणजे सोबत राहतात, वर्षभरापासून बोलत नाहीत, खातात-पितात आणि लहर आली की ती खाली येऊन म्हणते, ' मला तुझ्याबरोबर राहायचं नाही. ' वाह! मजा आली. लिहीत राहा." -दिलीप बिरुटे

खटपट्या Tue, 02/03/2026 - 00:05
अजुन एक अनुभव आला पण त्याचा स्वतंत्र धागा बनवण्याएवढा मोठा विषय नाही तो. एक सहकारी बरेच दिवस माझ्यासोबत काम करतो. मी काही त्याच्या कुटुंबाबद्द्ल जास्त काही विचारले नव्हते. एके दिवशी तो आला आणि मला म्हणाला की, "मला माझ्या बायोलॉजीकल वडीलांबद्दल माहीती मिळाली आहे". मनात म्हणालो की आता हे काय नविन ? त्याला विचारले, की तुला तुझे वडील कोण आहेत हे माहीत नव्हते? तर म्हणाला की त्याला दत्तक घेतले आहे एवढेच माहीत होते, आणि त्याला लहानपणापासुन हे सांगण्यात आले होते की त्याचे वडील व्हीएतनाम युध्दात वारले आणि याला अनाथ आश्रमात आणण्यात आले. तिथुन त्याला दत्तक म्हणुन सध्याच्या वडीलांनी उचलले. एक दिवस त्याला एका बाईचा फोन आला आणि ती म्हणाली की मी तुझी हाफ सिस्टर आहे. तुझे आणि माझे बायोलॉजिकल बाबा एकच आहेत. आता हे सगळं कसं माहीत झाले ? तर एक अप्लिकेशन असते, त्यात आपण आपली माहीती भरुन काही पैसे भरल्यास आपली डीएनए टेस्ट होते. त्यात तुम्ही किती अफ्रिकन, कीती युरोपियन आहात हे कळते. तसेच तुमचा डीएनए कोणासोबत जुळत असेल तर तेही कळवतात. तीला कळवण्यात आले की हा तुझा भाउ आहे आणि हा बाप आहे. मग हे दोघे बाहीण भाउ एकमेकांना भेटले, त्यांनी वडीलांना भेटायचा निर्णय घेतला. त्यांचा वडीलांना फोन केला. त्यांना सर्व सांगितले. त्यांना धक्का बसला. म्हणजे माझ्या सहकार्‍याला लहानपणापासून जी गोष्ट सांगीतली गेली तो खोटी होती. मागच्या आठवड्यात त्यांचे बायोलॉजिकल वडील फ्लोरीडातून आले. तिघे भेटले. याने हाफिसातून एक आठवड्याची रजा काढली होती. तिघे एका हिलस्टेशन ला आठवडाभर राहीले. खूप गप्पा मारल्या. अशी ही ह्रुद्य भेट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यांचे काय होत असेल. पण नंतर कळले की ही गोष्ट इकडे कॉमन आहे. आणि नवीन अप्लिकेशन मुळे आता अशा गोष्टी वाढत चालल्या आहेत. असो.

In reply to by खटपट्या

गवि Tue, 02/03/2026 - 07:34
आता हे सगळं कसं माहीत झाले ?
हे कळलं.. पण आता हे सगळं कसं झालं? किंवा हे नेमकं काय झालं होतं? हा प्रश्न सुटला का? त्या माणसाला चुकीची माहिती दिली गेली. हे कोणी दुष्टाने आणि काय प्रेरणेने केलं ? असं खोटं सांगणाऱ्या व्यक्तीला तरी सत्य माहीत होतं का? त्या माणसाला लहानपणापासून वाढवण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली त्यामागे काही उद्देश असेल. खोटे सांगितले असं म्हणून त्या पालकाला अगदीच मोडीत काढले जात आहे का? मूळ वडील, जे व्हियेतनाम युद्धात नसावेत आणि वारलेले नक्कीच नाहीत, त्यांना आपल्याला एक मूल झालेले आहे याची माहिती किंवा पर्वा नव्हती का? त्यानंतर दुसरी मुलगी अन्यत्र . ठीक आहे.. तिलाही आपला बाप शोधावा लागला आणि मग भाऊ बहीण मिळून याला भेटायला आले. आणि ती हृदय भेट? उदय शेट्टीचे वडील शंकर शेट्टी यांना टफ काम्पिटिशन किंवा "काम"पिटीशन आहे.. मुलांना ऍप द्वारे पित्याला शोधत यावे लागावे आणि मग पित्याला धक्का वगैरे बसावा, मग रजा टाकून हृद्य भेट.. असा कोणता तो मेळा, जत्रा वगैरे होता ज्यात हे सर्व हमेशा हमेशा के लिये बिछड गये थे? तर हे हृद्य वगैरे वाटले नाही पण एक वेगळी जीवनशैली म्हणून रोचक आहे वाचायला.

In reply to by गवि

खटपट्या Wed, 02/04/2026 - 04:47
ह्रुद्य वगैरे माझ्या द्रुष्टीने. त्यांच्या द्रुष्टीने नसावी. कारण इकडे मुलांना १८ व्या वर्षी घर सोडावे लागत असल्यामुळे आइबापाबद्दल एवढा जिव्हाळा नसावा. माझ्या ज्या काही तीन चार स्री सहकारी आहेत त्यातल्या कोणालाच सध्या नवरा नाही. आणि त्यांना त्यांच्या मागील नवर्‍याबद्द्ल माहीत ही नाही. एकीला विचारले तर तिने खांदे उड्वून बेफिकीरी दर्शवली. मीही जास्त विचारले नाही कारण इकडे अशी चौकशी केलेली लोकांना आवडत नाही. दुसरी गोष्ट ही की बहुतेक वेळेला आइ मुलांना घेउन जाते आणि बाप पुढे शेण खायला मोकळा होतो. बर्‍याच वेळेला तो आपल्या मागील अपत्यांबद्द्ल माहीती ठेवत नाही. समाज आत्मकेंद्री आहे असे म्हणू शकतो. त्यामुळे आला दिवस ढकलला आणि मजा केली की झाले. आता या केस मध्ये या बापाने कधी मागची विचारपूस केली नसण्याची शक्यता जास्त आहे. त्यात आयशी ने पोरं डोइजड होत आहेत म्हणून फोस्टर मध्ये पाठवली असण्याची शक्यता आहे. आपल्याएवढी नाती घट्ट नसतात येवढेच म्हणेन. वेगळी जीवनशैली तरुणपणात ठीक आहे पण म्हातारपणात खायला उठते ही जीवनशैली. मी हार्ट्फोर्ड या निव्रुत्तांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या ठीकाणी काही दिवस रहायला होतो. तिथे बाजुच्या घरात एक म्हातारा रहात होता. त्याला भेटायला आठवड्यातुन एकदा पोलीस येत असत. तो मेला की नाही ते बघायला. जर माणूस मेल्यावर वास आल्यावर कळत असेल तर अशा भौतिक पुढारलेपणाचा काय फायदा. आपले आइबाप आता काही दिवसाचे सोबती आहेत हे माहीत असून त्यांना त्यांची मुले भेटायला येत नसतील तर असा समाज कुठे चाललाय... असो.

In reply to by खटपट्या

कंजूस Tue, 02/10/2026 - 17:05
किस्सा ह्रुद्य आहेच. कसा? घटस्फोट किंवा गरीबी किंवा मुलं सांभाळता न येण्यामुळे आई बाबांनी व्यवहारीपणाने घेतलेले निर्णय. त्यांचे परिणाम मुलांवर होतातच. रक्त रक्ताकडे धावतेच. अगदी सविस्तर उत्तर देण्याऐवजी काही उदाहरणे- १. मोझेसला त्यांच्या आईने सोडणे आणि पुढे काय झाले तो इतीहास. २. रस्किन बॉन्डच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा तो चार वर्षांचा होता . वडिलांनी वाढवले. पण त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की त्याने लग्न केले नाही. नंतर आईला भेटला ही, नव्या भावालाही पाहिले तरी कडवटपणा गेला नाही. ३. Khaleid Hosaini यांनी लिहिलेली Kite Runner कथा. एका अफगाणिस्तानी मुलाला दत्तक घेऊन अमेरिकेत न्यायच्या अडचणी पुस्तकाच्या शेवटच्या भागात आहेत. पुस्तकं चांगले आहे.

In reply to by कंजूस

जयवंत दळवींच्या सारे प्रवासी घडीचे मधे मानवी स्वभावाचे यथार्थ वर्णन केले आहे. आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असताना सुद्धा मनातील कडवटपणा जात नाही.धाडकन तोंडावर दार आपटून कित्येक वर्शांनी आलेल्या व्यक्तीचा अपमान केला जातो.

In reply to by खटपट्या

कंजूस Tue, 02/10/2026 - 17:11
ओबामांच्या आईवडिलांचे चांगले चालले होते पण वडलांच्या मामाने फार कटकट केली, वडलांना लग्न मोडायला लावले आणि आई अमेरिकेत निघून आली. पण पुढे त्याची बहीण भेटतेच. ( ओबामांच्या पुस्तकातून नोव्हेंबर २०२०. Promised land)

लेखनविषय:
लेखनप्रकार
मी माझं काम गुण्या गोविंदाने करत असताना, सर्व व्यवस्थित सुरळीत चालू असताना. (मी कितीही कठीण काम असलं तरीही ते सुरळीत च करतो. आरामात च करतो, यामुळे काही वेळेला काही लोक नाराज होतात पण मी नेहमी क्लायंट आणि अंतिम आउटपुट चा विचार करतो, असो) एक दिवस मला गोऱ्या बॉस चा फोन येतो, मी एक माणूस पाठवतो आहे, मी - कशाला? बॉस - त्याला "ठेवून घे" मी - म्हणजे? बॉस - नंतर सांगतो, आयला लोक बाई ठेवतात, माझा बॉस मला एक जरड 63 वर्षाचा म्हातारा ठेवायला सांगत होता, सांगितल्या प्रमाणे हा अमेरिकन म्हातारा आला, ठोंब्यासारखा समोर बसला, त्याला विचारले - काय येतं तुला? म्हातारा (त्याचे नाव जॉन) - तू देशील ते काम करेन!

सामाजिक संकल्पनांची घटनात्मक वैधता

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सामाजिक संकल्पनांची घटनात्मक वैधता ===================== -राजीव उपाध्ये निसर्ग बौद्धिक क्षमतेची देणगी सर्वांना समान देत नाही. त्यामुळे असे असमान बौद्धिक क्षमतेची वाटणी झालेल्या सदस्यांचे मानवसमूह भावनिक, आर्थिक, शारीरिक इ० गरजांच्या पूर्ततेसाठी कळप करून एकत्र राहतात. अशा कळपात राहताना कळप एकत्र ठेवण्यासाठी, तसेच कळपांतर्गत हितसंबंध अनेक ’सामाजिक संकल्पना’ (सोशल कंस्ट्रक्ट्स) सहसा कळपातले बलिष्ठ सदस्य निर्माण करतात. अशा सामाजिक संकल्पना रुजविण्यासाठी बळ, दंतकथा, भीति अशी वेगवेगळी साधने वापरली जातात.

सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet

Bhakti ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti गुरुवार, 01/08/2026 - 21:23
दलाई लामा यांच्या सुटकेची हि मालिका होती. बरोबर हीच डॉक्युमेंटरी मी पहिली होती.पण नाव आठवत नव्हत गुगल केलं तरी नाव सापडत नव्हतं. धन्यवाद ! द ग्रेट एस्केप -अफगाणिस्तान याच सिरीजमधली सुश्मिता बॅनर्जीची (real story) अंगावर काटा आणणारी आणखीन एक मालिका होती.

किल्लेदार Fri, 01/09/2026 - 09:21
दोन तीनदा तुकड्या तुकड्यात पहिला हा सिनेमा. एकदा स्वस्थ बसून पूर्ण बघावा लागेल आता. अर्जेंटिना मधे शूटिंग झालं माहित नव्हतं. अर्जेंटिनाच्या उत्तर पश्चिम भागात लडाख सदृश प्रदेश आहे. खुदा गवाहचं बरंच शूट नेपाळच्या जोमसोम मधे झालंय तिथेही एकदा जायचं आहे. भन्नाट प्रदेश आहे तो. हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

Bhakti Fri, 01/09/2026 - 14:04
हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

मार्गी Fri, 01/09/2026 - 18:43
खूप वेगळा विषय. हारर खूप अचाट माणूस होता. इतर डिटेल्स नवे मिळाले. मागे मिपा दिवाळी अंक २०१७ मध्ये त्यावर लिहीलं होतं: हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा.

पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा लेक एका कोकरासारखे स्वछंद बागडत होती. तेवढ्यात ती एक पुस्तक घेऊन आली ,"हे पुस्तक मला पाहिजे आहे ". पुस्तकाचे पूर्ण नाव आठवत नाही पण 'माओ झेडाँग' या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक यांच्या आयुष्यावरचे ते पुस्तक होते. "तुला माहितेय का,कि हा कोण आहे?"मी विचारले ."चीनचा कम्युनिस्ट माओ "मला माहिती आहे ती म्हणाली. आज तू नळीची कृपा म्हणावी कि काय तिला पहिले महायुद्ध ,दुसरे महायुद्ध ,हिटलर ,रशिया ,चीन,जपान ,अमेरिका यांची बरीच माहिती आहे . त्यातलाच एक हा 'माओ' याबद्दल तिला माहिती आहे.

सैरभैर डायरी - २.२

कपिलमुनी ·

गवि गुरुवार, 01/08/2026 - 11:32
वाह.. भारीच. उत्कंठा वाढत चालली आहे.. असल्या लफड्यातून वकिलाने सोडवल्यावर उगाच इकडे तिकडे न जाणेच उत्तम. घरात शिरून गप पडावे.. ;-) पुभाप्र..

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/08/2026 - 12:31
अनुभव उपयोगी पडतील. रस्त्यावर कायतरी मॅटरमध्ये पडायचो व्हाईट कॉलर लोकांची विकेट जायची असल्या लफड्यात फुकटची. काही नाहीतरी खिशाला खार लागणार नी डोक्याला टेन्शन.

कपिलमुनी, उत्कंठा वाढत आहे. पण तुम्ही लिहिताना स्वतःला थोडे सैल केले आहे असे वाटले. म्हणजे, अजून जरासे कष्ट घेऊन जरा गंभीरपणाने (म्हणजे लिहिताना स्वतःला, कंटेट गंभीर नव्हे, आहे तो टोन मस्त आहे) खूप मस्त लिहिता तुम्ही. आवडले मला.

टर्मीनेटर Sat, 01/10/2026 - 14:01
सकाळपासून दोन वडापाववर पोरगा दिवसभर माझ्यासाठी पळत होता. याला फोन त्याला फोन , फाटकी पोरं पण पक्की मैत्री !
क्या बात... क्या बात... ही श्रीमंती सगळ्यांच्या नशिबात नसते! 2.2 पण मस्त 👍 और आनेदो फटाफट...

२.१ मॅडम, त्या पोरींना घेऊन या. पोरी लंगडत आल्या.. थोड्या जखमा दिसत होत्या.. "हाच होता का तो?" पोरींनी मान डोलावली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई, बाप ,नोकरी ते जेलमधला संडास सगळ गरगर फिरायला लागले २.२ "जा मॅडम पोरींना घेऊन, मेडिकल झाली असाल तर वॉश करून येऊ दे." मॅडम पोरींना घेऊन गेल्या. "पोरींना ओळखता का या?" साहेबांचा प्रश्न . "हो साहेब .

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ कडक थंडीतलं आकाश दर्शन ✪ डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं! ✪ नितांत सुंदर परिसरात केलेलं ट्रेकिंग ✪ संध्याकाळची केशरी हिमशिखरं ✪ "शेर! देखो वहाँ खड़ा है!" सत्गड़! ५ डिसेंबरला पहाटे साडेचारला उठलो. कडक थंडी आहे! अक्षरश: गच्चीमध्ये आकाश दर्शनासाठी बसता येत नाहीय. जणू पर्थच्या मैदानात जम बसवण्याइतकं अवघड आहे. पण आकाशच इतकं संमोहक आहे की हळु हळु थंडीचा मारा थंड पडला! चंद्राचं राज्य असलं तरी आता तो मावळतीला कललाय. चंद्राच्या थोडा अलीकडे गुरू चमकतोय. व्याध दक्षिणेला क्षितिजालगत दिसतोय. पूर्वेला खूप जास्त तारे दिसत आहेत. सप्तर्षी चांगलेच वर येत आहेत.

अदृश्य जगाचे कुतूहल-०१

Bhakti ·

In reply to by हेमंतकुमार

Bhakti Mon, 01/12/2026 - 14:58
मला वाटत नाही ,इथे मी सर्व भाग देऊ शकेल.सुक्ष्मदर्शिका चार भागात लिहिली आहे.अल्ट्रामायक्रोस्कोप ,फेज काँट्रास्ट मायक्रोस्कोप,फ्लूओरेसेन्स मायक्रोस्कोप, टेम (TEM) आणि सेम (SEM) या सर्व सुक्ष्मदर्शिका थोड्क्यात समजण्यासाठी माझा ब्लॉग नक्की वाचा :) https://bhagat-bhakti.blogspot.com/ धन्यवाद.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर Mon, 01/12/2026 - 15:31
मला वाटत नाही ,इथे मी सर्व भाग देऊ शकेल.
का हो? द्या की इथेच... काही शंका असतील तर त्या विचारायला आणि पुरक माहिती शेअर करायला सदस्यांना ते सोयीचे ठरते.

स्वधर्म Mon, 01/12/2026 - 19:51
शास्त्रीय विषय गोष्टीरूपाने सोपा करून सांगितलाय. त्यामुळे वाचतच गेलो. आणखी लिहा. मागच्या वर्षी डार्वीनचे घर पाहण्याचा योग आला. त्यात काय काय जपून ठेवले आहे डार्वीनचे स्वतः चे अक्षर वगैरे. त्यात डार्वीनने वापरलेले तीन सूक्ष्मदर्शकही पाहिले. तिथल्या लोकांनी ते कसे सुधारत गेले तेही सांगितले व त्यातून सूक्ष्म वनस्पती पाहता आल्या.

सोत्रि Tue, 01/13/2026 - 04:53
सुंदर, माहितीपूर्ण प्रवाही लेख. - (तांत्रिक) सोकाजी

निनाद Tue, 01/13/2026 - 06:09
खूप छान ओळख करुन दिली. अवांतर भारतात सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवीधरांची संख्या मोठी असली, तरी आपण जागतिक संशोधनात मागे पडतोय, हे अगदी कडू सत्य आहे! याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपली पदवी-केंद्रित शिक्षण व्यवस्था. आपल्याकडे प्रयोगांपेक्षा परीक्षेत मार्क मिळवण्यावर आणि थिअरी पाठ करण्यावर जास्त भर दिला जातो. आणि त्या त्या विभागातले संशोधन सोडून बाकी सर्व राजकारण करणारे दिव्य प्राध्यापक आणि त्यांच्या टोळ्या! . तसाही संशोधनासाठी लागणारा निधी आणि जागतिक दर्जाच्या लॅब्स आजही मोजक्याच संस्थांमध्ये मर्यादित आहेत. संशोधन ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे, पण आपल्याकडे उद्योगांकडून संशोधनात होणारी गुंतवणूक खूपच कमी आहे. आणि इथेच आपले प्राध्यापक माती खातात. मग काय करणार? त्यात भर पडते ब्रेन ड्रेनची. म्हणजे आपले हुशार तरुण चांगले पगार आणि आधुनिक सोयीसुविधांच्या शोधात परदेशात निघून जातात. जोपर्यंत आपण विद्यापीठांमधील अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजांशी जोडत नाही आणि संशोधकांना प्रशासकीय कटकटींतून मुक्त करून मोकळं वातावरण देत नाही, तोपर्यंत केवळ 'पदवीधरांची फौज असून उपयोग नाही. आपल्याला आता 'सर्टिफिकेट' देणारी यंत्रणा बदलून इनोव्हेशनला सन्मान देणारी संस्कृती रुजवावी लागेल. ते होण्याची काहीही आशा मला आता वाटत नाही...

सूक्ष्मदर्शिका -१ 1 खूप दिवसांनी सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology ) चा ग्रंथ वाचायला घेतला . तसे सर्वच विज्ञान वैज्ञानिकांच्या अचाट शोधमोहीमेने भरलेले आहे. पण सूक्ष्मजीवशास्त्र या अदृश्य जगाचे शोध खरच थक्क करणारे आणि जरा उशीरा लागले.