मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दहा मिनिटांत घरपोच.

chetanasvaidya · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच. त्यांच्या अपघातांच्या बातम्याही येत असतात. दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? अशाच डिलिव्हरी बॉयची एक बाजू असू शकते आणि ती सांगण्याचा प्रयत्न या छोट्याश्या व्हिडिओत मी केला आहे. बघा आवडतो का.

वाचने 1424 वाचनखूण प्रतिक्रिया 12

मदनबाण Sun, 01/11/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि Sun, 01/11/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद Mon, 01/12/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर Sun, 01/11/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात