दहा मिनिटांत घरपोच.
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच. त्यांच्या अपघातांच्या बातम्याही येत असतात.
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का?
अशाच डिलिव्हरी बॉयची एक बाजू असू शकते आणि ती सांगण्याचा प्रयत्न या छोट्याश्या व्हिडिओत मी केला आहे. बघा आवडतो का.
वाचने
1424
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Projectएवढ्या झटपट वस्तू मिळवण्याचा
व्यावहारिक मत
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का?हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत. हा एक व्यवहार आहे. त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?In reply to व्यावहारिक मत by कांदा लिंबू
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे.
In reply to प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. by गवि
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय...या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात.असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.एकदा ब्लिंकीट वरून मी काहीतरी
action items?
In reply to action items? by कांदा लिंबू
उत्तम प्रश्न
रोचक अनुभव
गरजेच्या वेळेला उपयोगी आणि गरज नसताना वापरल्यास महाग