राजकारण आणि We...The People!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
8 May 2017 - 2:06 pm

"अरे खूप पॉलिटिक्स चालतं रे इथं. मी म्हटलं होतं ना तुला! आता बघ,तुला मेल पाठवला त्यानं..मला नाही पाठवला!", माझा कलीग तणतणत म्हणाला.

राजकारणलेख

जीवन एक अर्थ!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
8 May 2017 - 9:55 am

आयुष्य अर्ध संपलं तरी
जगण्यातला अर्थ संपला नाही
खूप जगले म्हंटल तरी
जगण्यातला मोह संपला नाही

खूप काही बाकी आहे
जगून सारंच घ्यावं ... वाटत
एकटं... दुकटं... सर्वांबरोबर...
आयुष्य वाटून घ्यावं... वाटत!

जवानी मनाची अवस्था आहे
तिला पूर्ण भोगावं वाटत!
समाज... बंधन... झुगारून देऊन
मुक्त स्वच्छंद जगावं वाटत!!

मात्र स्वप्नातून जाग येताच
आयुष्याचं वास्तव पुढे असतं
जवानी... मुक्त... स्वच्छंद.. एकटं..
विसरून कामाला लागावं लागत!!!

कविता माझीकविता

या गुलाबाच्या फुलाला...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
8 May 2017 - 4:41 am

पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा...
या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा!

सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची...
तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा!

तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना...
एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा!

चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते?
तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा!

मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी...
वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा!

प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा...
कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

हरवले सापडले : एक विलक्षण अनुभव

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जनातलं, मनातलं
7 May 2017 - 10:44 pm

दिनांक ७ मे २०१७ वेळः साधारण रात्रीचे ८-३०

मांडणीअनुभव

खास पाहिजे असलेल्या पुस्तकांसाठी मदत धागा

उपेक्षित's picture
उपेक्षित in जनातलं, मनातलं
7 May 2017 - 6:09 pm

बरेच दिवस झाले हा धागा काढायच्या विचारात होतो पण राहून जात होते, आजच मोदकचा पुस्तकावरचा धागा पाहून परत उचल खाल्ली.

तर मंडळी बर्याचदा आपल्याला एखादे पुस्तक अथवा एखाद्या विषयावरचे पुस्तक पाहिजे असते पण ते कसे/ कुठे मिळेल याची माहिती नसते तर या धाग्याचा उद्देश हाच आहे कि तुम्हाला पाहिजे असलेल्या पुस्तकाची इथे तुम्ही चौकशी करू शकता, ते कुठे मिळेल याचे पण इथे इतर सदस्य मार्गदर्शन करतील.

काही वेळा पुस्तकाचे नाव माहित असेल तर चटकन मिळून पण जाते पण बर्याचदा आपल्याला एखाद्या विशिष्ठ विषयावरचे पुस्तक पाहिजे असते ज्याचे नाव आपल्याला माहित नसते तर त्यासाठी पण कदाचित इथे मदत होऊ शकते.

वाङ्मयमाहिती

'आयटी'तल्या मोरूची कवने

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
7 May 2017 - 5:06 pm

गगनचुंबी चकचकीत इमारतीतल्या
आरस्पानी स्वागतिकेच्या डोक्यामागे
तेजोवलयासारख्या लकाकणार्‍या
भल्यामोठ्या टी व्ही संचावर
हसर्‍या गण्याचा फोटू पाहून
मोरू क्षणभर थबकला ...

जाड भिंगाच्या चष्म्यामागचे बोलके डोळे
चेहर्‍यावर स्पष्ट दिसणारे बुद्धीचे तेज
नखशिखांत उंची वस्त्रप्रावरणे ल्यालेल्या
जेमेतेम चाळीशीत कैलासवासी झालेल्या
गण्याच्या फोटूमागचा शोकसंदेश वाचला
अन मोरूच्या पायातले त्राणच गेले ...

काहीच्या काही कवितामुक्तक

हिमालयातली सायकल भ्रमंती - जलोरी पास - सुरूवात

मोदक's picture
मोदक in भटकंती
7 May 2017 - 4:37 pm

नमस्कार मंडळी,

हिमालय आणि उत्तर भारतात १५ दिवस मुक्काम ठोकून कुल्लुपासून १०,५०० फुटांवरील जलोरी पासच्या पायथ्यापर्यंत सायकलने व पुढे ट्रेक अशी भटकंती केली.

ही आगामी लेखमालेची सुरूवात. पुढील भाग सवडीने टाकतो आहेच..!

.
_

एका पुस्तकाचा शोध..

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
7 May 2017 - 3:12 pm

.

...अरे हो, हे पुस्तक बघ. तुला नक्की आवडेल.

डिसेंबर महिन्यात एका काकाच्या घरी दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान बराच वेळ गप्पा, जेवण आणि इतर विषय बोलून झाल्यानंतर काकाकडे असलेले कैलास मानस सरोवर यात्रेवरील एक पुस्तक वाचून संपवले. रात्री झोपण्याआधी काकाने अचानक एक पुस्तक हातात ठेवले.

साहित्यिकप्रकटनअनुभव

पुष्पक

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
7 May 2017 - 1:58 pm

तो पुष्पक सिनेमा काय मस्त घर करून बसलाय मनात, मधूनच कधीतरी आठवतो, मग काही फारच गमतीदार आणि काही फारच गंभीर प्रसंग आठवतात त्यातले!

१९८८ साली पुण्यात निलायम थेटरात पाहिलेला म्हणे आम्ही हा चित्रपट, मी पाहिलेला थेटरातला पहिला वहिला चित्रपट (मला आठवत नाही, आई सांगते की आपण पाहिलेला... बाजूलाच अशोका हॉटेल मध्ये होतो आपण वगैरे) असो नंतर दूरदर्शन मग घरी व्हीडीओ फाईल वरून पारायणं झाली ह्याची.

मांडणीप्रकटन