पैलवान-१
"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी.
"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी.
येई हो अण्णा रे माझे माऊली ये ।
कीबोर्डवरी बोट ठेऊनी वाट मी पाहे ।। धृ।।
आलिया गेलिया कोणी धाडी निरोप ।
कराडमधी आहे माझा मायबाप ।। १।।
काळा शर्ट अन विजार कैसा सुंदर दिसला ।
घोड्यावर बैसोन अण्णा शुक्रवारी गेला ।। २।।
अण्णांचे चार शब्द आम्हा नित्य जाळ लावी ।
अण्णादास म्हणे आता कोण कळ लावी ।। ३।।
सांज मुकी आक्रंदताना
ह्रदयाची उदास वाणी
पाखरांची हरवून वाट
सांजकीनारी ना साजणी
ओढून आसवांत रात्र
अंबरात केविलवाणे दिवे
या चिरेबंदी अंधारात
अवचित मिटून जावे
सर्वस्व उधळून तरीही
झेलीत शापांचे चांदणे
आयुष्याचा दाटून काळोख
धूसर पडसाद जुने
असुरी अनाहत दिशा
गहिवरला अंतरी गुंजारव
हेलावतो अतूट बंध
दिठीत तेवतो जन्म तुझ्यास्तव
बंधने झुगारणे माझ्याच हाती
मानणे ना मानणे माझ्याच हाती
कापलेले पंख किती उडणार सांगा
प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा
दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा
वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा
छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा
रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा
जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला
हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा
बरेच दिवस झाले हा लेख लिहायचा असे चाललेलं आज योग आला. त्याला कारण ही तसेच आहे, गेल्या महिन्यात एका पाहुण्यांच्या घरी कामा निमित्त जाण्याचा योग आला, मी आपला साधारण संध्याकाळच्या वेळी गेलो, जसे सर्वांचे असते तसेच आमच्याही गप्पा टप्पा झाल्या त्याच बरोबर गॉसिपिंग मधून इतर पाहुण्यांचे क्षेम कुशल कळाले.
भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट! "भारतासाठी अभिमानास्पद" असे मुद्दाम लिहिले आहे. कारण आज डॉ अब्दुल कलाम हयात असते तर त्यांना त्यांच्या अनेक सन्मानांसारखेच या सन्मानाचेही फारसे अप्रूप वाटले नसते. परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेल्या माझ्यासारख्या चाहत्याला या क्षणी अवर्णनीय आनंद झाला नसता तरच आश्चर्य!
आम्ही बरे भोगी
योग नको तुमचा
चौकट ज्याची असे
अध्यात्माची
योग, अध्यात्माचा जगी
नित्य असे दणका
देह भोगणारा
तळमळतसे
अजूनही शमली
नाही वासनाही
अध्यात्माची शाल का
पांघरावी ?
अध्यात्म अवघे
बजबजले अनंती
उपयोग शून्य त्याचा
व्यवहारामधी
कुणी म्हणे शांतीसाठी
कुणी म्हणे साठीसाठी
अद्यात्माचा दवा
अतिउत्तम
तुम्हा सांगतो ऐका गोष्ट
अध्यात्माची नशा
नाही उतरत
सर्वदाही
मदिरेच्या नशेला
काळाचे बंधन
अध्यात्माची नशा नुतरे
कधीही
येताच तू, किनारा
शब्दात व्यक्त होतो
बेभान लाट होते
वारा अनर्थ करतो
पदरावरी तुझ्या ग
फुलती फुले अनेक
संध्येस धुंदी येते
गंधात स्पर्श फिरतो
डोळ्यातले तुझे ते
निः शब्द भाव भोळे
उर्मीत भावनांच्या
ओठात शब्द घसरे
चढतो असाच कैफ
जाणीव भ्रष्ट होते
लहरीत भावनांच्या
मजसी भुरळ पडते
तो काळही थबकतो
अंधार पेट घेतो
लाजूनी सागरही
ओहोटीत मंद हसतो.