मुलगा
जमले सभोवताली जे
सारे ओळखीचेच होते
साऱ्यांच्याच शस्त्र हाती
निः शस्त्र मीच होतो
हत्यारे उगारली जरी
उपकारकर्ता मीच होतो
जगण्याची भ्रांत त्यांना
जेव्हा केव्हा पडली
माझीच भाकरी मी
त्यांच्या पुढ्यात वाढली
सारेच कसे विसरले ते
जेव्हा नागडे होते
माझेच वस्त्र अर्धे
पांघराया शरमले होते
त्यातील एक लहानगा
अगदीच पोर होता
वार त्यानेच केला
जो माझा मुलगाच होता.