II मी प्रेमपुरीचा विठ्ठल II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
4 Jul 2017 - 3:44 pm

मी प्रेमपुरीचा विठ्ठल

माझी वेगळीच रखमाई

तुझं जमणार नाही माझयासंगं

का करते उगा तू घाई ? II

तू सुखी राहा तुझी बाई

लांबच बरी तू वाटते

उगा तंगड्या घालू नको मधी

सात जन्मात मिळायचो नाही II

माझी येगळीच तर्हा

तिऱ्हेवाईक मी येगळा

रखमा शिवराळ असली तरी

तिच्यासंगेचं मी बरा II

मला ठावं तुझे डाव

नको तिथे डोकं लाव

भोळा ढंगाने जरी मी

नको मला आजमाव II

आत आवाज मज येई

तुझया नाटकी शाळेचा

नेहेमी दुर्लक्ष करितो

धन्य माझी ती रखमाई II

कविता

..तिथे ती भेटते

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
4 Jul 2017 - 3:42 pm

ढगाच्या आतले
विजेचे वेटोळे
सुटून मोकळे
डोंगरा डसते...तिथे ती भेटते

निबिड रानात
पोपटी पानात
झुकून बघत
मोतिया थेंबात ...किणकिण हासते

भणाण वाऱ्यात
लाटेच्या गाजेत
चांदीच्या वर्खात
किनारा कोरत ... माझ्याशी बोलते

कविता माझीकविता

II हात सोड कटेवरचे , उचल बडव्यांशी लढावया II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
4 Jul 2017 - 3:07 pm

भ्रम कैवल्याचा साधला

भक्ती नामातच तू बांधला

कुणी पहिला रे तुला

दगडामध्येच अडकला

खांब सोनेरी रुपेरी

तरी उभा विटेवरी

बडवे मातले ते सारे

उगा भक्तांसी छळे ऱे

दावुनी कोरी नोट त्यांसी

उभे माउली दर्शनासी

बनवून माऊलीस दासी

बडवे राजभोग भोगती

तुझा दरबार पातला,

दुर्लभ भक्त दर्शनासी

स्वतः समजून ते राजे

शिवीगाळ गाभारा माजे

कैसी शिस्त नाही जाण

कोऱ्या नोटेस फक्त मान

तुझ्या दरबारी विठुराया

फक्त लक्षुमीची छाया

हात सोड कटेवरचे

कविता

समोसा

सारिका होगाडे's picture
सारिका होगाडे in पाककृती
4 Jul 2017 - 5:17 am

नमस्ते मिपाकर,
समोसा हा माझा आवडता पदार्थ, कोणाला नाही आवडत? पण कधी घरी करून बघावा हा विचार मनात नाही आला, आत्तापर्यंत! कॅनडाला स्थलांतरित झाल्यानंतर इथे बऱ्याच पंजाबी मैत्रिणी झाल्या आणि भेटीगाठी सुरु झाल्या. बोलता बोलता कळले की नान, सामोसे, छोले भटोरे, पिझ्झा घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे करावेत. त्याबद्दल टिप्सही मिळाल्या. मग वाट कशाला बघायची? लगेच सुरुवात केली सामोसे बनवायला. फोटोही काढले आणि लिहायलाही घेतले. संपूर्ण प्रक्रिया इथे देत आहे.
वाचकहो, तुम्हीही करून बघा आणि कसे झाले ते नक्की सांगा!

श्रीगणेश लेखमाला २०१७

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in गटसाहित्य
3 Jul 2017 - 10:53 pm

श्रीगणेश लेखमाला २०१७ च्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे.

लेखमालेचा विषय : आयुष्यात घडलेल्या चुका आणि त्यातून कसा मार्ग काढला वगैरे.. (वेगळा विषय सुचला तर जरूर कळवा)

निवडक मिपाकरांना व्यनी करून लेख मागवायचे आणि गणपती आल्यावर प्रत्येक दिवशी एक प्रकाशित करायचा. (हे असेच चालत आलंय बहुदा... हे योग्य की जाहिर आवाहनाचा धागा काढायचा?)

जाहीर आवाहन केल्यावर एकसे एक लेख येतील असे वाटतेय. संख्या जास्त झाल्यास निवड करू अथवा दरदिवशी दोन लेख प्रकाशित करण्याचा पर्याय आहेच.

बाकी धाग्याचा अथवा व्यनीचा मसुदा आणि बाकी चर्चा प्रतिसादात करूच. इथे जास्त काही लिहीत नाही.

तुफान आलंया !!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
3 Jul 2017 - 4:40 pm

तुफान आलंया !!

हिरव्यागार शेताचा मालक मी जरी
सोबत होती फक्त रणरणती सावली ,
खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी
भरलेली विहीर तर कधीच आटली ,
ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी
ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली
…पण उजळेल आता तिची कुस
……उद्या पडेलच की पाऊस …!!!

कविता

किस्से गोवा ट्रिपचे- भाग १

पी. के.'s picture
पी. के. in जनातलं, मनातलं
3 Jul 2017 - 3:40 pm

कॉलेजचे दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील असा सुवर्ण काळ असतो कि कितीही काळ निगुन गेला तरी एकादी पुसटशी आठवण देखील आपल्या चेहेरयावर स्मित आणते. आज इतक्या वर्षा नंतर देखील कॉलेज च्या दिवसात मित्रानं बरोबर घालवलेला क्षण अन क्षण जसाच्या तसा आठवतोय आणी आठवतंय ती गोव्याला केलेली भन्नाट ट्रिप.

हे ठिकाणप्रकटन

पीएमटी आणि तुकाराम मुंढे साहेब

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
3 Jul 2017 - 2:52 pm

बी जे मेडिकल कॉलेजला प्रोफेसर होता तेव्हापासून आम्ही श्रीकरला पाहतो आहोत. त्याच्या त्या लाल एम ५० वरून तो येजा करीत असे. पुढे तो आयएएस झाला.

मांडणीविचार

II बळीराज किंकर अख्नंडीत माझे II

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
3 Jul 2017 - 2:51 pm

छन्दीष्ट्य वातावरणी
जर्जर धारा हि सारी
जरब कायम असे दिनकराची
दुर्भिक्ष्य ते जान्हवीचे पाणी II

यति नग सारे
काष्ठ मांडी हाट सारा
त्रागा मरुत वाही
रिक्त अंबार सारे II

कंगाळ बळीराज
करी मख
घेउनि नांगर हाती
अर्ध्वयु अवतरती स्वअभ्युदयासि II

अक्षर आरोहण अर्ध्वयु
ते साधे
अनृत अनुज मानुनी
बलीराजासी
उध्रुत उधम इंद्रजाल सारे
बळीराज किंकर अख्नंडीत माझे II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

कविता