तुफान आलंया !!

फिझा जे न देखे रवी...
तुफान आलंया !! हिरव्यागार शेताचा मालक मी जरी सोबत होती फक्त रणरणती सावली , खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी भरलेली विहीर तर कधीच आटली , ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली …पण उजळेल आता तिची कुस ……उद्या पडेलच की पाऊस …!!! एक सर झाली की पेरणी करेन , गुरांबरोबर चार दिस मीही राबेन , तरारेल मग शेत जोमाने , डाव सगळा मांडेन मी नव्याने, भुईला करून टाकेन हिरवं शिवार , बैल गाडीवर मग होईल सवार , .....कापडं नवीन घालेन, असेल माझाच कापूस .....उद्या पडेलच की पाऊस !!! मातीत मिसळले बरेच आधीच हाय खाऊन , प्रश्न सुटतील का पण अशी आत्महत्या करून , विठू उभा राहील पाठीशी बनून ढग वाहतील झरे गावातून बघ ! ....तोरण म्हणून बांधू आपण ऊस .....उद्या पडेलच की पाऊस !!! पाऊसराजाच्या स्वागताला करू सज्ज धरणी घामाच्या धारांनी श्रमून अडवु थेंब थेंब पाणी ! गाऊ दऱ्याखोऱ्यांमध्ये अंकुरांचे गीत, एकजुटीने करूया साकार आपले हित , श्रमदान कराया लेकरू बी सज्ज झालंया, गावात आता उमेदीचं तुफान आलंया !! गावात आता उमेदीचं तुफान आलंया !! हे तुफान म्हणजे जणू गावाचा उरूस विठुराया आता पडू दे जोरदार पाऊस ! ---फिझा
वर्गीकरण
लेखनविषय:

0 टिप्पण्या 624 दृश्ये