डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश, मु.पो.सांगला, किन्नर कॅंप्स भाग १
फिरायला जायचं ठरवलं तेव्हा दोघांच्याही डोक्यात आणि मनात बरेच विचार होते . शांत पण निसर्गयरम्य ठिकाणी जायचं. अगदी जिथे वायफाय सोडा मोबाईलची रेंज सुद्धा नाही आली तरी चालेल. खूप गर्दी नको पण सुरक्षित सुद्धा हवं. काही वेगळं ट्राय करता आलं तरी हरकत नाही. तीच ती मोठाली हॉटेल्स , तेच ते खाणं या सर्वापासून काहीतरी वेगळं असं ठिकाण आम्ही शोधत होतो. सगळ्यांनी नेहमीची सगळी ठिकाण सांगून बघितली. कुणी केरळ ला जायचा सल्ला दिला तर कुणी शिमला मनाली सुचवलं. काहींनी परदेशात जायचा सल्ला दिला. यातील एकही ठिकाण आमच्या पसंतीस उतरत नव्हतं. कारण हि सगळी टिपिकल टुरिस्ट डेस्टिनेशन झालेली आहेत.