||हुच्चभ्रूंची कैसी लक्षणे ||
हुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे
समानांशीच सलगी करणे | कैसे असे ।।
दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू।
चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||
उठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी |
गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।।
यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक
शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||
हुच्चभ्रू तितुके मिळवावे । नीचभ्रू अवघे इग्नोरावे ।
समतोलत्वाचे देखावे | परी करावे चातुर्ये ।।