अशी बायको असती तर
अशी बायको असती तर,आम्ही असे झालो नसतो
भर तारुण्यात कफनी घालून,
रानावनात निघालो नसतो
तिची नसती आली कुणालाच सर
अशी बायको असती तर
पेशवाई गाजवली असती,
मिजास मोठीकेली असती,
राजबिंडा बनून मिरावलो असतो
पर्वतीवर छोटस आमच असत घर
अशी बायको असती तर
सारसबागेच्या झुडुपांमधे तिला घेऊन बसलो असतो
आम्ही सुद्धा छत्रीमागे तुम्हाला कधी दिसलो असतो
तळ्यातल्या गणपतीने दिले असते अनेक वर
अशी बायको असती तर