कहे कबीरा (४) - निर्भय निर्गुन गुन रे गाऊँगा

मनमेघ's picture
मनमेघ in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 8:31 pm

निर्भय निर्गुण गुण रे गाऊँगा ।
काव्य म्हणून पाहता पहिल्याच ओळीत 'निर्गुणाचे गुण गाणे' असा वरवर विरुद्ध वाटेल असा शब्दप्रयोग आहे. निर्गुण! ज्याला काहीच गुण नाहीत असा एक अर्थ आणि जे सत्व,रज, तम या गुणांच्या पलिकडचे आहे असे असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ त्या निर्गुणाच्या बाबत योग्यच आहेत, पण मला दुसरा अर्थ जास्त चपखल वाटतो.

संगीतआस्वादलेख

HOW ARE YOU?

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
1 May 2016 - 6:33 pm

हाय, कशी आहेस?
नेहमीसारखी झोपाळू?
तुझ्या जडावलेल्या पापण्यांतून
ठिबकणारी लाल रक्तबुंदी
यू नो व्हाट आय मीन
जस्ट अ डोस फॉर यू....

सेकंड फ्लोअर
आउटसाइड द बाथरुम
हिअर आय एम
वेटींग फॉर यू....

यू जस्ट कम धीस वे
अलॉन्ग विथ योर
स्कर्ट अँड शॅम्पेन
हिअर आय टेकन
अ नीडल फुल ऑफ कोकेन
टू ब्रेकअप विथ यू वन्स अगेन....

हाउ आय फरगेट
अॅज यू आर माय बेब
यू मस्ट कम
विथ हेवी ब्रिदींग
अँड स्टेयर टू मी
टिल इरेक्ट माय फिलींग्ज....

हे ठिकाण

दस दस की मॅच - कथा ( काल्पनीक )

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 4:37 pm

दस दस की मॅच - कथा ( काल्पनीक )

शाळेसमोरच्या रस्त्यावर अलिकडेच एक नवीन दुकान सुरु झाले होते . या दुकानामध्ये अनेक प्रसिद्ध सिनेमा/टिव्ही कलाकार , खेळाडु यांचे छोटे मोठे फोटो विकायला ठेवलेले असत . मोकळ्या वेळेमध्ये आपल्या आवडत्या कलाकारांचे , खेळाडुंचे फोटो विकत घ्यायला मुलांची भरपुर गर्दी होत असे . शाळेतील शिक्षकमंडळी या गर्दीकडे नाराजीने बघत जात असत . शाळेतील हुशार मुले या गर्दीकडे बघुन नाक फेंदारत असत , तर हुशार मुली या गर्दीकडे बघुन न बघितल्याचा आव आणत .

कथालेख

एक संघ मैदानातला - भाग ३

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 2:13 pm

सकाळी ग्राउंडवर गेल्यावर समजले की दीप्तीचा खांदा बसवला आहे आणि ४ दिवस विश्रांती नंतर ती प्रँक्टिस करू शकेल. ऐकून बर वाटलं..... पण आमच्या मिशाळ गब्बरला ते पटलं नाही. आम्हीच तिला मोडलंय अस समजून आप्पांनी जे काही लेक्चर द्यायला सुरुवात केली. अखंड पाऊण तास बोलून झाल्यावर बहुतेक ते दमले... शेवटी आम्ही मांडवली करत स्किल प्रँक्टिस घ्या असं सांगितल्यावर ते गप्प बसले.

समाजविरंगुळा

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१७: रस्ता: निकाल

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 10:59 am

नमस्कार मंडळी,

आपणा सर्वांना ६७व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला मतदानाद्वारे दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

तृतीय क्रमांक मिळाला आहे anandphadke यांच्या 'पावसाळी प्रदेशाकडे घेऊन जाणारा हवा हवासा रस्ता' या छायाचित्राला.

छायाचित्रणअभिनंदन

ब्राह्मणी मटन मसाला

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in पाककृती
1 May 2016 - 6:16 am

ब्राह्मणी मटण मसाला.....
असे चमत्कारीक नाव असलेली एक रेसिपि वाचनात आली..ति शे‌अर करत आहे
.................
साहित्य...
मटण १/२ किलो
एक मोठा कांदा चिरलेला
तेल
दालचिनी ईलायची दगडफुल.खसख...तमालपत्र
लवंगा आदी खडा मसाला.
गोडा मसाला..आमटी साठी वापरतात तो
तिखट मिठ
मॅरिनेट साठी........
बचकभर कोथिंबीर
पुदीनी आल+लसुण +मिरची ..
वाटण...
एक चिरलेला कांदा
निम्म खोबरे..
२ वेलदोडे +२ लवंगा
आल+लसुण
कृति.......
१..बचकभर कोथिंबीर
पुदीना+ आल+लसुण+मिरची ..

आजोळ

श्वेताली कुलकर्णी's picture
श्वेताली कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 1:36 am

साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास .

मुक्तकजीवनमानराहणी

Confession Box : भाग २ ...शिक्षकांचा 'लाडका' विद्यार्थी बनलो

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
1 May 2016 - 1:01 am
शिक्षणअनुभव

महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव ( महाराष्ट्र दिन लेखमाला)

माहितगार's picture
माहितगार in लेखमाला
30 Apr 2016 - 11:07 pm

मिपा साहित्य संपादकांनी १ मे २०१६निमित्त सुचवलेले तीन पर्याय विषय 'महाराष्ट्राचे भारताप्रती योगदान' या विषयावर आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या योगदानाचा अभिमान वाटावा, अशी इच्छा स्वाभाविक, पण यातील नेमके साध्य काय? महाराष्ट्रीय लोकांनी स्वतःच स्वत:ला प्रमाणपत्र देऊन केवळ स्वतःची भलावण एवढाच उद्देश याचे साध्य असेल का? खासकरून 'महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव' हा बहुधा ललित साहित्याचा विषय नसावा की चार विशेषणे आणि दोन अलंकार लिहिले की सारा भारत पाहा कसा महाराष्ट्राच्या राजकीय प्रभावाने दिपून जावा. पौराणिक इतिहासात राम गोदावरीपल्याड दक्षिणेत उतरल्यावर बरेच काही घडते.