मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Jul 2016 - 12:48 pm

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

नागपुरी तडकाकविता

सांगली धागा निमित्ताने : सांगलीची खाद्यभ्रमंती

सुज्ञ's picture
सुज्ञ in भटकंती
9 Jul 2016 - 3:56 am

प्रत्येक गावाला स्वतःचा एक स्वभाव असतो . तेथील माणसे , समाजजीवन , निसर्ग , लोकांचे दैनंदिन आयुष्य , राजकारण , गावात घडलेले बदल अशा अनेक गोष्टींमुळे त्या गावाचा एक स्वभाव तयार होत जातो. अनेक शहरांच्या अनेक तर्हा. थोडीशी खवचट आणि आता 'लोक दमड्या मोजायला तयार आहेत तर थोडी लुटालूट केली तर काय हरकत आहे .. नाहीतरी आपले गत आयुष्य गरिबीतच गेले ' असा स्वभाव बनलेली कोकणातील गावे, राजकारणी आणि दारूची दुकाने यावर नितांत प्रेम करणारी विदर्भ मराठवाड्यातील गावे , जुन्या परंपरा, देवळातील श्रीविष्णू आणि सिनेमातील नट यावर ठाम विश्वास असणारी गावे अथवा पैसा कमाओ और उडाओ इतकेच माहीत असलेली गावे .

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पानिपत.

मोदक's picture
मोदक in भटकंती
8 Jul 2016 - 7:41 pm

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

सलग दोन दिवस भरपूर गाडी चालवल्याने आंम्ही ठरवलेल्या वेळापत्रकावर मात करून पुढे जात होतो. आजचा दिवस पानिपत साठी राखीव होता. रोहतक पानिपत अंतर फक्त ८० किमी होते.
रोहतकहून आरामात आवरून निघालो, एके ठिकाणी नाष्टा केला व लगेचच पानिपतला पोहोचलो. तेथे थोडी शोधाशोध करून "काळा आम्ब" (हे खास हरियाणवी लकबीतले नांव!) कडे कूच केले.

ती कॉलर ट्युन

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
8 Jul 2016 - 6:28 pm

योगायोग... दैनंदिन जीवनात घडणारी एक गोष्ट.. काही योगायोग चांगले तर काही वाईट. काही दीर्घकाळ लक्षात रहाणारे.
पण एखादा विलक्षण योगायोग केवळ सुन्न करुन जातो आणि नेहमीसाठी लक्षात रहातो. हा योगायोगही तसाच.. ना चांगला ना वाईट. पण एका अतिशय दु:खद क्षणी घडला आणि विलक्षण सुन्न करुन गेला.

कथाप्रकटन

ठहरने को बोला है

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
8 Jul 2016 - 5:00 pm

साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं.

कथाkathaaप्रवासलेखअनुभवविरंगुळा

जुनुनियत....

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
8 Jul 2016 - 4:01 pm

चित्रपट हे एक उत्तम माध्यम आहे कथाकथनाचं पण कथा मांडताना माध्यमाचा वापर योग्य पद्धतीनं झाला नाही तर चित्रपट फसतो. फक्त गोरे-गोरे, सुंदर चेहर्‍याचे कलाकार घेतले, कुठेतरी बर्फाळ प्रदेशात चित्रिकरण केलं आणि तिच घासुन घासुन चोथा झालेली कथा 'it's different' म्हणुन सादर केली कि चित्रपट होतो हा गैरसमज आहे. हा समज द्रुढ करणारा अजुन एक चित्रपट म्हणजे 'जुनुनियत....'

चित्रपटसमीक्षा

अंड्याचा पुलाव

जागु's picture
जागु in पाककृती
8 Jul 2016 - 2:34 pm

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.

बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई"!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
8 Jul 2016 - 10:19 am


सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद.

|| ॐ ||

दि. २७ एप्रिल २०१६

ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता!

धर्मसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनालेखअनुभव

देहभान

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
8 Jul 2016 - 1:46 am

थोडी अनिच्छा, किंचित हूरहूर, जराशी धास्ती अशा सगळ्या मिश्र भावनांच्या नादात ती कॅफे कॉफी डे च्या दारात उभी होती. शेलाटा बांधा, पाठीवर रुळणारे केस आणि साधासाच पण सुंदर चुडीदार-कुर्ता. नजर शोधत होती विवाह मंडळाच्या वेब साईट वर प्रोफाईलमध्ये पाहिलेल्या चेहेर्‍याला.

कथाबातमी

राँग नंबर

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
7 Jul 2016 - 10:10 pm

साध्या सर्दि तापापासून सुरवात होऊन न्युमोनियावर दुखणे गेले. रोज एकेक दिवस मोजता मोजता आज तीन आठवडे उलटून गेले होते. रांगणेकर हॉस्पिटलमधील भिंतीवरचा प्रत्येक डाग अन रेषा आजीला आता पाठ झालेल्या होत्या. तिचे शरीर म्हणजे तर नाही नाही ती औषधे रिचविण्याचे पिंपच झाले होते. नर्सने केव्हाही येऊन कुठलीही औषधे टोचून वा तोंडात कोंबून भरावीत. हे काय आहे, कशासाठी आहे, काही उपयोग होतो आहे की नाही, कोणाला विचारले तरी धड कळेल असे उत्तर मिळेल तर शपथ! मुलगी सकाळी ऑफिसला जातांना पाच मिनटासाठी येऊन जायची. तिने डब्यात आज काय आणले असेल त्याचेही आता औत्सुक्य उरले नव्हते.

वावरप्रतिभा