ती कॉलर ट्युन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
योगायोग... दैनंदिन जीवनात घडणारी एक गोष्ट.. काही योगायोग चांगले तर काही वाईट. काही दीर्घकाळ लक्षात रहाणारे.
पण एखादा विलक्षण योगायोग केवळ सुन्न करुन जातो आणि नेहमीसाठी लक्षात रहातो. हा योगायोगही तसाच.. ना चांगला ना वाईट. पण एका अतिशय दु:खद क्षणी घडला आणि विलक्षण सुन्न करुन गेला.
जवळपास पाच वर्षापुर्वीची गोष्ट.
माझं लग्न होवून जेमतेम दोन महिने उलटून गेले होते. लग्नानंतरच्या पहिल्या सणाकरिता पत्नीला नेण्यासाठी सासरे आले होते. शनिवारी सायंकाळी त्या दोघांना बस स्टॉपवर सोडून आलो. तासाभरातच पत्नीने रेल्वे स्टेशनला पोहोचून गाडीत बसल्याचे कळवले. अजून थोडा वेळ गेला आणि मेहूण्याच्या एका जवळच्या मित्राचा फोन आला...माझ्या धाकट्या (अविवाहित) मेहूणीने स्वतःला संपवले होते. त्या मित्राने सांगितले की माझ्या पत्नीला आताच म्हणजे प्रवासात असताना याबद्दल काही कळू देणे योग्य होणार नाही तेव्हा मी तिच्याशी काही बोलू नये.
तातडीने निघून शक्यतो पत्नीच्या आधीच तिथे पोहोचावे हा विचार करुन मी आई-वडील आणि माझ्यासाठी दुसर्या दिवशी सकाळची विमानाची तिकिटे काढली, पहाटे विमानतळावर जाण्याकरिता कॅबही ठरवली. सकाळी कॅबचालकाने मला कॉल केला, घर सापडूपर्यंत त्याला मला आणखी एक-दोन वेळेस बहूधा कॉल करावा लागला.
नंतर पत्नीच्या माहेरी पोहोचलो. हताशपणे सगळेजण अत्यंविधीच्या तयारीला लागले होते, त्यात मीही सामील झालो.
इतक्यात एक कॉल आला, क्रमांक जरा ओळखीचा वाटला.
"साहेब मी कॅब ड्रायवर बोलतोय " अरे.. हा तर सकाळचा कॅबचालक याने का कॉल केला असेल?
"हो.. बोला" मी गोंधळत विचारले.
"साहेब ते तुमचं गाणं कॉपी करायच होतं, तुम्ही फोन उचलू नका"
"बरं..." त्याला माझी कॉलर ट्युन कॉपी करायची होती.
पुन्हा माझा फोन वाजत राहिला मी उचलला नाही.
मी सुन्न झालो... ती कॉलर ट्युन होती "या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे"
[ही सत्यघटना आहे आणि इथे ती लिहिणं खूप कठीण होतं.]
प्रतिक्रिया
so sad....
हम्म
ओह
या जन्मावर या जगण्यावर...शतदा
+१
........
हम्म----
अरेरे,
कदाचित तेव्हा तुम्हाला सुचले
कॅबचालकाच्या फोन करण्याने मला
चालू प्रसंगातून चित्त विचलीत
:( दुर्दैवी...
ह्म्म. लोकांना माहीत नसतं आपण
अतिशय सुन्न करणारी घटना!
दुर्दैवी घटना.
बरोबर आहे..मी कॅबचालकाला दोष