रिमझिम रिमझिम
रिमझिम रिमझिम पाऊसधारा
न्हाऊनी निघाला आसमंत सारा
बेधुंद अशा या क्षणी
साथ तुझी हवी साजणी
ओले ओले वृक्ष अन वेली
पानांवरून टपटपते पाणी
त्यात आठवली तुझी कहाणी
ओलावली मग डोळ्यांची पापणी
खळखळत वाहणा-या या नद्या
मिळतात सागराला सा-या
का न मग होई आपले मिलन
प्रश्न पडे हा फार गहण
भरारत वाहणारे हे वारे
आले अंगावर शहारे
दुःखाने मी कळवळतो
हृदयाच्या वेदनेने विव्हळतो
चिंब चिंब झाले माझे तन
दुःखाने भिजले माझे मन
आसवांचा आला आहे पूर
सापडेना आयुष्याचा सूर