रिफील (शतशब्दकथा)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
रिफील
बापाच्या उजव्या हाताची थप्पड खाडकन त्याच्या कानशिलात बसली. थपडीच्या धक्क्याने गेलेला तोल सावरायची कसरत करत भरल्या डोळ्याने त्याने बापाकडे पाहिले.
बॉलपेनची 25 पैशाची रिफील पोराने एका दिवसात हरवली म्हणून बापाचा राग अनावर झाला होता. रडक्या आवाजात तो काही सांगणार इतक्यात दुसरा धपाटा पाठीत बसला.
दिवसभर ST चालवून आलेला वैताग बापाने त्याच्यावर काढला होता.
झरर्कन त्याला सारे आठवून गेले. ते बाजूला सारत CBSE पॅटर्नमध्ये शिकणाऱ्या आपल्या पोरांना त्रासिकपणे तो म्हणाला..
"काय करता रे! कसं काय दर आठवड्याला तुम्हाला एक नवीन पेन्सिल आणि खोडरबर लागतं."
पोरीनं कसं तरी हसून वेळ मारून नेली पण बारका मांडीवरची सॅक खाली आपटून गाल फुगवून बसला.
प्रतिक्रिया
आवडली.
मस्त!
फारच छान!
मस्त!!
छोटी पण छान कथा
छान
छोटा रिचार्ज.... भारी आहे...
उत्तम
CBSE kdhun International
छान..
रिफिल
नाय म्हणनार
छान
छान.
मस्त...
छान भिडते मनाला !
मस्तं!
सर्वांचे आभार!
उत्तम
आवडली
आवडली मस्त आहे.
सुरेख
मस्त आहे.
छान!
अगदी परिणामकारक
आवल्डी !!
मले . आवळली
कथा आवडली.
मस्त..