वाट वेगळी तिथेच नक्की झाली

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
15 Aug 2016 - 9:56 am

जगात साऱ्या ओळख पक्की झाली
या देशाची खूप तरक्की झाली

हाती मोठे घबाड आल्यावरती
नियत आपली चोरउचक्की झाली

दोन दिशांनी आलो होतो आपण
वाट वेगळी तिथेच नक्की झाली

दाणादाणा जमवीत आली जनता:
पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली

पाउल माझे तेव्हा चुकले आहे
नजर तुझी जेव्हाही शक्की झाली

डॉ. सुनील अहिरराव

gazalहे ठिकाणकलाकवितागझल

‘मिसळपाव’चं रहस्य: भाग १: खबर

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
15 Aug 2016 - 9:44 am

प्रेरणा: संदीप डांगे यांचा ‘प्रस्ताव: मिसळपाव बॅज’ हा धागा आणि कैक ‘कट्टा’ धागे
*****
“साहेब, भावड्या आलाय. बसवलंय मी त्याला. कधी आणू तुमच्याकडं ते सांगा.”
“पाटील, विचारपूस केलीत का तुम्ही?”
“होय साहेब, काहीतरी गडबड आहे असा मला सौशय होताच गेले काही महिने. तुम्ही पर्वानगी दिलीत तर लागतोच मागं. भावड्या सांगतोय ते माझा सौशय वाढवणारं आहे साहेब.”
“हं, बोलवा त्याला.”
*****
“रामराम, सायेब.”
“रामराम. बस भाऊ. काय नवीन?”
“काय न्हाई सायेब, परवा आपल्या त्या ह्या मॉलला गेल्तो.”

विनोदविरंगुळा

मिपा प्रतिज्ञा

लीना कनाटा's picture
लीना कनाटा in जनातलं, मनातलं
14 Aug 2016 - 9:51 pm

मिपा माझे संस्थळ आहे.
सारे मिपा सदस्य माझे वाचन बंधू आणि भगिनी आहेत.
माझ्या मिपावर माझे वाचनीय प्रेम आहे.
माझ्या मिपा वरील विविध धाग्यांचा मला अभिमान आहे.
असे धागे पाडण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी सगळ्या मिपा सदश्यांचे धागे वाचीन आणि प्रत्येकावर पिंक टाकेन.
माझे मिपा आणि माझे मिपासदस्य यांच्याशी मैत्री राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद यातच माझे वाचनसौख्य सामावलेले आहे.

जय मराठी. जय मिपा.

विडंबन

बेशिस्त

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
14 Aug 2016 - 11:58 am

पाहून वाट शेवटी पुढे निघून गेलो
मी माझे आयुष्य थोडे जगून गेलो

थांबण्याचा शब्द होता जरी दिलेला
पावलांचे ऐकून बेवफा वागुन गेलो

गुस्ताख आठवणींचे वादळ आंधळे
आधार काडीचा घेऊन तगून गेलो

शब्दांत माझी शिस्त मी सांभाळलेली
पण आज बेशिस्त थोडी भोगून गेलो

- शैलेंद्र

gazalगझल

१४ ऑगस्ट २०१६

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
14 Aug 2016 - 11:02 am

८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं....

सुचलं तेव्हडं लिहावं
दिसलं त्तेव्हडं वाचावं
रुचलं तेव्हडं ऐकावं
आवडलं तेव्हडं बोलावं
विचारलं तेव्हडं सांगावं
दिलं तेव्हडं घ्यावं
पचलं तेव्हडं खावं
जमलं तेव्हडं चालावं
जीवन तृप्त असावं

आणि कुणी म्हटलं तसं

"ह्या जन्मावरं
ह्या जगण्यावरं
शतदा प्रेम करावं"

शुभेच्छा देण्यार्‍यांचे आणि न देण्यार्‍यांचेही आभार.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

जीवनमानमत

आयुष्य

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
14 Aug 2016 - 9:05 am

आयुष्यात सुख दुःख , जणू किनाऱ्याची लाट
गुलाबाच्या छोट्या छोट्या , झाडांची ती वाट
कधी दुःखाची ती ओहोटी , कधी सुखाची भरती
कधी वास त्या फुलाचा , कधी पाय काट्यावरती
आता दुःख म्हणून रडायचं , कि सुखी होऊन हसायचं
फुल ठेवून बाजूला , नुसतं काट्यातच पडायचं
निर्णय आपलाच , कसं आयुष्याकडे बघायचं
सारं आपल्या हाती , कसं आयुष्य जगायचं

- अभिषेक पांचाळ

कविता

कॅनव्हास

विश्वेश's picture
विश्वेश in जे न देखे रवी...
14 Aug 2016 - 12:03 am

गेले अनेक दिवस
तुझे नि माझे रंग
एकमेकात मिसळतो आहे मी …

मला माहिती नव्हते
कि सगळे रंग एकत्र आले
कि बनतो तो काळा रंग …

आता चाचपडतो आहे
त्या अंधारात शोधत
तुझ्या त्या वेगवेगळ्या छटा …

तुझ्या डोळ्यांचा निळा
त्या अधरांचा गुलाबी
अन तुझ्या हातातल्या गुलमोहराचा लाल …

खूप वेळा पुसायचा प्रयत्न केला
स्वताला, स्वताच्या रंगांना
पण, सगळे इतके गडद झाले आहे कि …

पुसताना भीती वाटते आता,
कॅनव्हास फाटण्याची …
किंवा
पुन्हा पांढरा पडण्याची …

नकोच ते ....

- विश्वेश

फ्री स्टाइलमुक्तक