बेशिस्त
पाहून वाट शेवटी पुढे निघून गेलो
मी माझे आयुष्य थोडे जगून गेलो
थांबण्याचा शब्द होता जरी दिलेला
पावलांचे ऐकून बेवफा वागुन गेलो
गुस्ताख आठवणींचे वादळ आंधळे
आधार काडीचा घेऊन तगून गेलो
शब्दांत माझी शिस्त मी सांभाळलेली
पण आज बेशिस्त थोडी भोगून गेलो
- शैलेंद्र
छान प्रयत्न
धन्यवाद, गजल लिहिण्याचा
सुपर सर, सुपर
मस्तं!
मीटर लईच बिघडलंय. भावना छान
बरोबर, योग्य शब्द सापडले
बरोबर, योग्य शब्द सापडले
भावना सुंदर व्यक्त केल्या