सोपं नसतं मायबाप होणं.........!!!!
सोपं नसतं मायबाप होणं .......!!!!!
इवल्याशा जीवाला घास भरवताना
अडखळणाऱ्या पायांना आधार देताना
बोबड्या बोलांमध्ये स्वतःला शोधणं,
सोपं नसतं, हातांच्या कुशीत लेकरांना सांभाळत
रात्र रात्र जागणं ,
सोपं नसतं मायबाप होणं !!
काडी काडी वेचून आपलं घरटं बांधणं,
उन्हं अंगावर झेलून लेकरांना सावली देणं,
कधी जमीन बनून तर कधी आभाळ बनून
घरट्यातला प्रेमाचा ओलावा कायम ठेवणं
सोपं नसतं, भिजत असताना लेकरांचे 'इंद्रधनू' पाहणं,
सोपं नसतं मायबाप होणं !!!!!
पंख फुटलेले पिल्लू उडू लागते,