वेटिंग फ़ॉर गोडोट

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
26 Oct 2016 - 8:32 am

वेटिंग फ़ॉर गोडोट म्हणजे काय?
कधीच न येणा-या आपल्या माणसाची वाट पाहतं राहणे?
व्यर्थ व निष्फळ प्रतीक्षा करत राहणे??
त्या कातर सायंकाळी तू अचानक म्हणालीस..
कंटाळले मी..कायमची जात आहे अमेरिकेस..सॅन फ्रान्सिस्को मध्ये..
पायाखालची जमीन सरकली..एक हताश पणाची जाणीव स्पाइन मधुन सरसरत गेली....
माझं काय... आपल्या स्वप्नांचे काय??? ?
काय सांगू?? वाट पहा ..कदाचित परत येईन ही...
वेटिंग फ़ॉर गोडोट म्हणजे काय?
कधीच न येणा-या आपल्या माणसाची वाट पाहतं राहणे?
व्यर्थ व निष्फळ प्रतीक्षा करत राहणे

प्रेमकाव्य

दिवाळी

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
26 Oct 2016 - 8:28 am

दिवाळी

गिरणीत वेगवेगळ्या भाजण्यांचा खमंग दरवळतोय,
अनेक छोट्या छोट्या डब्यात छोट्या छोट्या प्रमाणात
गृहिणींची लगबग आहे, त्यापेक्षा जास्त गडबड
गिरणीवाल्या काकांची आहे, तुफान गर्दी माजली आहे.
जिन्नस एकसारखे पण प्रत्येकीचे प्रमाण वेगळं ठरलेलं आहे.

धडधड डबे रिकामे होतायत..
सटासट भूरभुर करत पिठं बाहेर पडतायत...

"दोन किलो आहे,
आईने सांगितलंय भाजणीवरच टाका"
कशावर काय जातंय बघतच नाही काका,

एकावर एक, दुसऱ्यावर तिसरे,
इकडून टाकलं कि तिकडून पसार,

काकांची गिरणी लै फास्ट आहे,
पाव-अर्धाकिलो कुठे तिला जास्त आहे?

संस्कृतीकविताप्रकटन

शैशव...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
26 Oct 2016 - 8:19 am

शैशव...

जे सुख लाभले शैशवास
पुन्हा ना लाभे मानवास
अन्न वस्त्र अन निवारा
ह्याचाच लागे ध्यास

कोठे हरवले ते निरागस
बालपण अन विश्वास
जसेजसे वाढू लागलो
वाढू लागला अविश्वास

जन्मताच काय तो घेतला
एक मोकळा श्वास
आता मात्र घुसमटतोय
प्रत्येक श्वास प्रत्येक श्वास

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

आरक्षण!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
26 Oct 2016 - 6:09 am

आरक्षण ह्या विषयावर काहीही बोलायचं किंवा लिहायचं म्हणजे हल्ली जरा अवघडच झालं आहे. यामधून आरक्षण विरोधी किंवा आरक्षण समर्थक अशा दोन्हीकडच्या लोकांच्या शिव्या खायला मिळण्याचाच संभव अधिक कारण मी आरक्षण समर्थक नाही तसाच सरसकट आरक्षण विरोधकही नाही पण मी यावर बरंच वाचलं आहे.(चर्चा करण्या पेक्षा का कोण जाणे मला हा मार्ग जास्त भरवशाचा वाटतो) आणि आरक्षणाची गरज मला पटलीही आहे.सर्वसाधारणपणे आरक्षण समर्थनाची भूमिका घेणे तुम्हाला पुरोगामी म्हणून सादर करते आणि बऱ्याच लोकांना स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणे आवडते.

मांडणीविचार

चीज शंकरपाळे

इशा१२३'s picture
इशा१२३ in पाककृती
25 Oct 2016 - 10:42 pm

शंकरपाळे
साहित्य :
मैदा :दोन वाटी
चीज किसलेले :एक वाटी
जिरे जाडसर पुड :एक चमचा
मीठ : चविनुसार
तेल :दोन चमचे
खायचा सोडा : चिमुटभर

Sahity

खेल कबड्डी

रुस्तुम's picture
रुस्तुम in जनातलं, मनातलं
25 Oct 2016 - 10:40 pm

नुकत्याच भारतात झालेल्या आणि भारताने विजेतेपद राखलेल्या कब्बडी विश्वचषकानिमित्त मनात आलेले विचार खरडतोय. मिपा वर हा माझा लेखाचा पहिलाच पर्यटन.चू.भू. द्यावी घ्यावी :)

"जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया,
प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!!"

क्रीडाविचार

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Oct 2016 - 8:11 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पिसूक....
(पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.)

कथाभाषांतर

का कळत नाही तुला

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
25 Oct 2016 - 4:54 pm

का कळत नाही तुला.. माझ्या प्रेमाचे तराणे..
तुझ्यासाठी केलेले ते.. वेडपट निरागस बहाणे..

तु जवळ नसताना ती.. होणारी असह्य तडफड..
अन् तुझ्या सुखासाठी.. केलेली विचित्र धडपड..

का कळत नाही तुला.. तुच माझी राणी..
तुच माझी कविता.. माझ्या ओठांवरली गाणी..

माझा प्रत्येक श्वास.. माझा एकला ध्यास..
माझ्या वाटेवरली तु.. प्रेमाची ती आस...

प्रेमकाव्य

मला गरज आहे तुझी

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
25 Oct 2016 - 4:09 pm

गरज आहे मला आज
त्या तुझ्या आधाराची
अडखळणारे पाऊल माझे
सावरणार्या तुझ्या हातांची

गरज आहे मला
तुझ्या त्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वत:ला सामावून
टाकणार्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला
त्या तुझ्या कोमल प्रितीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणार्या
त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजही मला
माझ्यावरच्या त्या तुझ्या
नि:स्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटतांना
तू जवळ आहेस या जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे....

प्रेम कवितारेखाटन