माझं केप टाऊन

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
23 Nov 2016 - 2:20 pm

कधी कधी अनपेक्षितपणे काही संधी मिळून जातात आणि नंतर ते सगळंच स्वप्नवत् असल्याचं वाटू लागतं. केप टाऊनला जाऊन येऊन साधारण दीड महिना लोटल्यावर त्याच्या आठवणी स्वप्नासारख्या पुसट होऊ नयेत असं वाटतं म्हणून त्यांना शब्दांत बांधून ठेवायचा हा प्रयत्न.

प्रवास

antibiotic resistance ,मानवासमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा धोका.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
23 Nov 2016 - 2:13 pm

ॲन्टीबायोटीक्स अर्थात प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला हे अनेकांना ज्ञात असेलच.पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर बॅक्टेरीअल इन्फेक्शन ट्रिट करणे सोपे झाले .त्यानंतर अनेक प्रकारची प्रतिजैविके शोधली गेली.यातून बॅक्टेरीयल एन्फेक्शनने होणारे मृत्यु वा इतर कॉम्प्लीकेशन टाळता येऊ लागली.साहजिकच जगाचे आयुर्मान त्यामुळे वाढले.

औषधोपचारविचार

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
23 Nov 2016 - 12:51 pm

लिहितो विडंबन स्वतःच साठी
समोर दिसता कच्चा माल
शब्द कल्पना यमके सारी
आपसुक धरती त्यावर ताल

विषय निवडीचा नसे विकल्प
चारोळी, गजल की पोवाडा,
जो कविने विषय मांडला
त्यावरी केवळ तुटून पडा

वाचून किंवा दुर्लक्षूनही
डोळ्यांपुढती नाचत राही
मग डोक्याची होते मंडई
लेखणी खुपसून फाडून खाई

लिहा लिहा तुम्ही लिहा कविता
धीर जराही मनी न धरा!
जोरात चालूदे गिरणी तुमची
पिठही पाडा भराभरा

विषय सत्वरी ना मिळतो जर तर
उघडा गालीब किंवा ग्रेस
उडवा धुरळा यमकांचा की
वाचन करता यावा फेस

आरोग्यदायी पाककृतीकाणकोणकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडनागद्वारभूछत्रीअद्भुतरसइतिहासकृष्णमुर्ती

जग घूमेया थारे जैसा ना कोई |

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
23 Nov 2016 - 12:22 pm

रोजच्या रुटीन आणि आपाधापीच्या या जागालगतच एक दुसरं जग आहे, इष्काचं जग. ते जग तर्काच्या पलिकडे आहे. ती का आवडते, सांगता येत नाही. तिच्या सहवासाची जादू शब्दांच्या पलिकडे आहे. आणि तो एक न संपणारा सिलसिला आहे. कधीकधी तर दोघात इतकी खोल दरी येते की आता सगळं संपलं असं वाटतं. पण तो किंवा ती कधी आस सोडत नाहीत. हा एकतर्फी जोश तसाच कायम राहातो. दुसर्‍याचा प्रश्नच नाही ! तुमची लगनच तुमचं सर्वस्व असतं. आणि इतरांना अशक्य वाटणार्‍या पुनर्मिलनाच्या आशेवर मात करत, तुमच्या इष्काची नशा तुम्हाला जीवनाशी लढत राहाण्याची ताकद देते.
___________________

मांडणीप्रकटन

खादाडी

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
23 Nov 2016 - 11:50 am

गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय.......

संस्कृतीपाकक्रियाइतिहासमुक्तकराहणीमौजमजाप्रकटन

उडदामाजी "काळे"-गोरे

गुलाम's picture
गुलाम in जनातलं, मनातलं
22 Nov 2016 - 11:44 pm

'प्रधानसेवकांची मोठी घोषणा. काळ्यांविरुध्द सर्जिकल स्ट्राईक.'
(आता सगळे काळे हद्दपार होणार.. आपले तर १००% पांढरे.) गुलाम बेहद खुष झाला.

समाजजीवनमानअर्थकारणराजकारणप्रकटनविचारअनुभवमत

संभ्रम-ध्वनी (कथा)

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in जनातलं, मनातलं
22 Nov 2016 - 7:27 pm

मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती.

कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वरच बोलणे झाले, पण तिसऱ्याच दिवशी कार्तिक ने ताराला कॉफीसाठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, तिची ग्रॅजुयेशन झाल्यावरची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे, म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली.

कथाविरंगुळा

मिश्र डाळींची भजी

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
22 Nov 2016 - 6:48 pm

मुसळधार पावसात किवा बाहेर स्नो फॉल होत असताना गरम गरम भजी म्हणजे क्या कहने? तर पेश आहेत ही मिश्र डाळींची भजी..
मूग डाळ, हरबरा डाळ आणि उडीद डाळ एकेक वाटी असे समप्रमाणात घ्या.
त्या एकत्रच भिजत घाला. ७ ते ८ तास भिजवा.
म्हणजेच संध्याकाळी भजी हवी असतील तर सकाळी डाळी भिजवा. दुपारच्या जेवणात किवा ब्रंचला हवी असली तर रात्री डाळी भिजत घाला.
वाटताना त्यात दोन तीन मिरच्या, लसणीच्या २-३ पाकळ्या आणि आल्याचा लहानसा तुकडा घाला.
मिरच्यांचे प्रमाण आपापल्या तिखट पणाच्या आणि मिरच्यांच्या आवडीनुसार ठरवा. मी दोन मिरच्या घेतल्या.
कमीत कमी पाणी घालून वाटा.

लिहितो कविता तुमच्यासाठी...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 Nov 2016 - 5:10 pm

नाखु
Tue, 22/11/2016 - 15:26
नवीन कवीता कधी ? लोक खोळंबून राहिलेत तुम्ची नवकविता वाचायला. लवकर टाकणे नवकविता.

अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघाची संयुक्त मागणी

--------------------------------------

(खुला सा :- नाखु(न) ;) अंकल आणी त्यांचे मंडळाचे विनंतीस मान देऊन , आंम्हाला त्यांनी टाकलेल्या (वरील) ताज्या खरडीवरून हे काव्य शीघ्र प्रसविले आहे! धीराने घ्यावे! )

लिहितो कविता तुमच्यासाठी
जमवून सारी सामग्री
शब्द, कल्पना, यमके सारी
करूनी त्यांची "ही" जंत्री!

कविता माझीशांतरसकवितामौजमजा

अवजार

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
22 Nov 2016 - 3:45 pm

याआधी : मैथिली , माकडीचा माळ , शिट्टी

________________________________________

संध्याकाळ होत आली तसं हरी गाढाव जोंधळ्यात शिरलं. आत शिरल्यावर बऱ्याच वेळानं दोनदा खिकाळलं. मग बाहेर आलं. इकडं तिकडं बघितलं. जाग्यावरंच दोन उड्या हाणल्या. आन पुन्हा एकदा जोंधळ्यात शिरलं. यावेळेस मात्र जरा बेतानं खिकाळलं.

कथाप्रतिभा