लिहितो कविता तुमच्यासाठी...

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 Nov 2016 - 5:10 pm

नाखु
Tue, 22/11/2016 - 15:26
नवीन कवीता कधी ? लोक खोळंबून राहिलेत तुम्ची नवकविता वाचायला. लवकर टाकणे नवकविता.

अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघाची संयुक्त मागणी

--------------------------------------

(खुला सा :- नाखु(न) ;) अंकल आणी त्यांचे मंडळाचे विनंतीस मान देऊन , आंम्हाला त्यांनी टाकलेल्या (वरील) ताज्या खरडीवरून हे काव्य शीघ्र प्रसविले आहे! धीराने घ्यावे! )

लिहितो कविता तुमच्यासाठी
जमवून सारी सामग्री
शब्द, कल्पना, यमके सारी
करूनी त्यांची "ही" जंत्री!

विषय कोणता घेऊ सांगा?
प्रेमं?, निसर्ग? की दुर्घटना?
की कवितेचा विषय होऊनी
मांडू मी ती स्व वेदना?

वाचुन किंवा दुर्लक्षुनंही
पटलावरती येऊ मी?
की पटलाचे होऊन स्पंदन
बनू त्यातले बीजच मी?

सांगा सांगा लवकर सांगा
धीर मना तो मुळि न धरे!
शब्दांचेही वाय्रासम हे
येता अंती शांती उरे!

विषय सत्वरी ना मिळता मज
मिटुनि ठेवितो कविता मी
संध्यासमयीचा पाचोळा
वृक्षतळाशी जमतो मी

पुन्हा अवेळी वारा येईल
उधळुनी लाविल पुन्हा मला
ऐशी आमुची कविता सारी
क्षणंभरांचा हा मामला!
==०==०==०==०==०==
अतृप्त...

कविता माझीशांतरसकवितामौजमजा

प्रतिक्रिया

कवि मानव's picture

22 Nov 2016 - 5:51 pm | कवि मानव

आवडली कविता !!!

विषय सत्वरी ना मिळता मज
मिटुनि ठेवितो कविता मी
संध्यासमयीचा पाचोळा
वृक्षतळाशी जमतो मी

एक तुतारि द्या मजला आणुनी
फुंकीन मी xxx xxxx स्वप्राणाने

आवडली सुलभ कविता.

खटपट्या's picture

22 Nov 2016 - 9:47 pm | खटपट्या

आवडली कविता.
आणि विषय काय विचारता. अजरामर विषय आहेच ना जिव्हाळ्याचा वगैरे....तांब्या

अत्रुप्त आत्मा's picture

22 Nov 2016 - 10:50 pm | अत्रुप्त आत्मा

@अजरामर विषय आहेच ना जिव्हाळ्याचा वगैरे....तांब्या. ››› ह्या ह्या ह्या! अजरामर विषय नाही.. जीवनविषय! ;)

प्रचेतस's picture

22 Nov 2016 - 10:58 pm | प्रचेतस

=))

प्रचेतस's picture

22 Nov 2016 - 11:01 pm | प्रचेतस

कविता आवडली.

बाकी नाखुनअंकलचे विनंतीला मान देऊन काव्य जसे प्रसवलेत तसे आमच्याही विनंतीला मान देऊन भावंविश्वचे पुढील भाग मोकळे करावेत.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2016 - 6:43 am | अत्रुप्त आत्मा

@तसे आमच्याही विनंतीला मान देऊन भावंविश्वचे पुढील भाग मोकळे करावेत.››› अस्सं क्काय?

ल्लुल्लुल्लुल्लु ! दू दू आगोबा.

शार्दुल_हातोळकर's picture

22 Nov 2016 - 11:16 pm | शार्दुल_हातोळकर

मस्त कविता !!

परिक्षण वजा समीक्षा वजा "सुलभी"करण

लिहितो कविता तुमच्यासाठी
जमवून सारी सामग्री
शब्द, कल्पना, यमके सारी
करूनी त्यांची "ही" जंत्री!

कवीराज आपल्या रसिकांनाच विचारत आहेत की तुमच्या साठीच हे ऐवज्/जिन्नस जमा केले आहेत कविता करायला अता तुम्हीच तुमची आवड सांगा.

विषय कोणता घेऊ सांगा?
प्रेमं?, निसर्ग? की दुर्घटना?
की कवितेचा विषय होऊनी
मांडू मी ती स्व वेदना?

उपहागृहात गेल्यावर कसे नुसते भाजी म्हणून चालत नाही तर तुम्हाला पनीर हवे का तंगडी कबाब्,कोफ्ता हवा का चिकन करी असे सांगावे लागते,तुम्हाला दिलेल्या माहीतीवरून आणि तुम्च्या (भोट) चेहर्यावरून तोच सुचवतो "दिल लजीज" घ्या आमची पेष्शल डिश आहे ती आणि तुम्हीही आनंदाने मान्य करता.

वाचुन किंवा दुर्लक्षुनंही
पटलावरती येऊ मी?
की पटलाचे होऊन स्पंदन
बनू त्यातले बीजच मी?

क्षुधाशांती हे जरी प्राथमीक उद्दीष्ट असले तुमचे तरि तिथली चव जिभेला आणि दर खिश्याला अनुक्रमे आवडले व परवडले पाहिजेत ना. तेंव्हा दोन्हींचा ताळमेळ बसविणे आवश्यक्च संसारी मनुष्याला.तो ताळ्मेळ उर्वरीत महिन्याचे अंदाजपत्रकाला धक्का लावणार नाही याची खबदरदारी घेतलेला असावा.

सांगा सांगा लवकर सांगा
धीर मना तो मुळि न धरे!
शब्दांचेही वाय्रासम हे
येता अंती शांती उरे!

अता उगा रेंगाळण्यासाठी उपहार्गृह म्हणजे काय बाग आहे का चहाचा कट्टा तिथे चटकन ऑर्डर देऊन मोकळे व्हा आणि पुढच्या कष्टमरकडे जाऊ देणेच उचीत आहे.

विषय सत्वरी ना मिळता मज
मिटुनि ठेवितो कविता मी
संध्यासमयीचा पाचोळा
वृक्षतळाशी जमतो मी

बर्याचदा आपल्या कुंडलीतील पापग्रहांच्या एकाचवेळी आलेल्या कट्ट्यामुळे "हे" नाही ते नाही असा पाढा बिचारा वेटर (वेट करायला लावणारा तो वेटर संदर्भ :आत्मुलिखित फुललेले दगड) वाचत असतो. मग अंगात त्राण असेल तर दुसरे क्षुधाशांतीगृह शोधावे किंवा मुकाट आहे त्यातच उदरभरण करावे लागतेच.

पुन्हा अवेळी वारा येईल
उधळुनी लाविल पुन्हा मला
ऐशी आमुची कविता सारी
क्षणंभरांचा हा मामला!

पण कधी कधी अवचित योग येईल, कुठला कट्टेकरी कुठल्या गावाला, अनोळखी ठिकाणी खादाडीला घेऊन जाईल आणि वरची सारी बंधने सोडून एक यादगार मैफिल, चवदार खिलवण्याने संपन्न होईल. म्हटल तर अवघा तीन-चार तासांचा हिशोब पण त्याचे मिळ्णारे व्याज पुढे बरेच दिवस पुरेल इतके.

बुवांच्या कवितांचा चाहता.

अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघ या मंडळाच्या विनंतीला मान दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे

विषय सत्वरी ना मिळता मज
मिटुनि ठेवितो कविता मी
संध्यासमयीचा पाचोळा
वृक्षतळाशी जमतो मी
हे कडवे खास आत्मुदा शैलीतले

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2016 - 9:12 am | अत्रुप्त आत्मा

आरा रा रा रा रा... ! ;)

प्रचेतस's picture

23 Nov 2016 - 4:07 pm | प्रचेतस

खी खी खी =))

सस्नेह's picture

23 Nov 2016 - 4:23 pm | सस्नेह

कवितेपेक्षा परीक्षण भारी !

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2016 - 9:48 am | टवाळ कार्टा

भारी

महासंग्राम's picture

23 Nov 2016 - 12:32 pm | महासंग्राम

विषय सत्वरी ना मिळता मज
मिटुनि ठेवितो कविता मी
संध्यासमयीचा पाचोळा
वृक्षतळाशी जमतो मी

या ओळी खास आवडल्यात जियो ....

गणामास्तर's picture

23 Nov 2016 - 12:35 pm | गणामास्तर

खास 'बुवाटच' नाही जाणवला कवितेत ;)

किसन शिंदे's picture

23 Nov 2016 - 1:57 pm | किसन शिंदे

हां ना राव. =))

प्रचेतस's picture

23 Nov 2016 - 4:08 pm | प्रचेतस

'बुवाटच'म्हणजे नेमके काय?

महासंग्राम's picture

23 Nov 2016 - 5:17 pm | महासंग्राम

कळीचा प्रश्न विचारला तुम्ही... कळूद्या बुवा टच म्हणजे काय ते

ग्रेंजर's picture

23 Nov 2016 - 2:24 pm | ग्रेंजर

अर्रर्रर्र! मी विडंबन आधी वाचलं, असो हि पण मस्त!!!!!!!

चतुर्भुज झाल्यापासनं गुर्जींच्या कविता लयीत यायला लागल्यात.

सस्नेह's picture

23 Nov 2016 - 4:23 pm | सस्नेह

वाचतेय...

वाचुन किंवा दुर्लक्षुनंही
पटलावरती येऊ मी?
की पटलाचे होऊन स्पंदन
बनू त्यातले बीजच मी?
सांगा सांगा लवकर सांगा
धीर मना तो मुळि न धरे!
शब्दांचेही वाय्रासम हे
येता अंती शांती उरे!
विषय सत्वरी ना मिळता मज
मिटुनि ठेवितो कविता मी
संध्यासमयीचा पाचोळा
वृक्षतळाशी जमतो मी
पुन्हा अवेळी वारा येईल
उधळुनी लाविल पुन्हा मला
ऐशी आमुची कविता सारी
क्षणंभरांचा हा मामला!

ही चार कडवी भारीच जमलीयेत.. आवडली

वपाडाव's picture

23 Nov 2016 - 8:26 pm | वपाडाव

गणा, बुवाटच म्हणजे संध्यासमयच्या ऐवजी दूसरा शब्द ना रे..!
म्हणजे कातरवेळ किंवा xxxx??
का अजुन काही अपेक्षित आहे??
खुलासा करावा

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2016 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

आलात आपण... ?
मिळायला लागला वाटतं वेळ!? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/winking-sticking-out-tongue-smiley-emoticon.gif
असो. http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/spying-smiley-emoticon.gif

रातराणी's picture

5 Dec 2016 - 5:03 pm | रातराणी

आवडली कविता

कविता चक्क वेगळ्या इशयावर! अवडलीच. अता विडंबनही द्या वाचायला म्हञ्जे मिळवली.