(तुडुंब)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
7 Dec 2016 - 8:22 pm

प्राजुची कदंब कविता वाचली. छानच आहे. आता इतकी सुरेख लयबद्ध कविता वाचून आमचं मन आनंदाने तुडुंब झालं! मग राहवेना....ईर्शाद...

कळवळणार्‍या अवजड देहा, दिसता कुक्कुट छान
उपवासाची ऐशीतैशी, सुटे 'मिती'चे भान

खवचट टवळे, डँबिस भोचक, विशाल ललना फुले
येताजाता खुसफुसणाऱ्या, कन्या आणिक मुले

हिरवापालक तांबूसगाजर, मिक्सर फिरवी त्वरे
चेंडूवरती साक्षात्कारी, तटतटता अंबरे!

खाद्यसखा की म्हणू तुडुंब, जणु मैद्याची बोरी
पानोपानी पहा खिजविते संकल्पा वासरी

हास्यविडंबन

गतं न शोच्यं ! !

जयन्त बा शिम्पि's picture
जयन्त बा शिम्पि in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 7:43 pm

आपल्या भारतात दोन परंपरा सुरु आहेत. त्याविषयी येथे लिहिण्याचा हा प्रयत्न.शासकिय उच्च पदावरील व्यक्ती, जेंव्हा मरण पावते, त्यावेळी राष्ट्रभर अथवा राज्यभर सात्/तीन्/एक दिवसाचा दुखवटा पाळला जाण्याची घोषणा केली जाते.शासकिय जाहिर केलेले कार्यक्रम रद्द केले जातात. मरण कोणालाही चुकलेले नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे, हे काही नवीन नाही. कोणतीही व्यक्ती, मग ती आपल्या घरातील असो, समाजातील असो वा उच्च पदावरील असो, दु:ख्ख तर होणारच." मरणांती वैराणी " असे आपल्या कडे म्हटले जाते. मरण पावल्यानंतर, त्या व्यक्तिशी असलेले वैर संपुष्टात येते, आलेच पाहिजे.

धोरणप्रकटनसद्भावना

(सत्य घटना)

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 6:42 pm

......................
६५ वर्षाचे काका रस्त्याने जात असतात..
काका "तात्या टोपे" होते..
मस्त दाट केसांचा विग.घातलेला होता...
लक्ष्मी रोड शनी पार सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून काका कडे कडेने जाताना एका भरधाव जाणा-या रिक्षावाल्याने काकांना धक्का दिला...
काका चा तोल गेला व ते पडले. पडताना आई गं व्हीव्हळले ....
बाजूच्या लोकांनी काकांना उठवले व बाजूच्या दुकानाच्या पाय-यावर बसवले..पाणी दिले..
काका ना धक्का लागल्या त्यांचा विग डोक्यावरून उडाला अन रस्त्यात पडला...गडबडीत कुणाच्या लक्षात आले नाही....

विनोद

(मी आज केलेला आराम - डिसेंबर २०१६)

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 3:36 pm

नमस्कार मंडळी.

मी आज केलेला आराम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन पोटभर आराम सुरू केला.
आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

नोव्हेंबर महिन्यात मिपाकरानी केलेला एकूण आराम पुढीलप्रमाणे

रात्रीची झोप - २४० तास
दुपारची झोप - १६ तास .
(वरील तास धाग्यावर कोणीच माहीती न दिल्याने वैयक्तिकली अंदाजपंचे काढली आहे - ऑफीसमधील झोपेचे तास कळवल्यास ट्रॅक करणे सोपे जाईल.)

विडंबनविरंगुळा

भूनंदनवन काश्मीर – भाग ३ (चरार-ए-शरीफ़ – पाखेरपोरा – युसमर्ग)

के.के.'s picture
के.के. in भटकंती
7 Dec 2016 - 12:45 pm

====================================================
भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४
====================================================

भूनंदनवन काश्मीर – भाग ३ (चरार-ए-शरीफ़ – पाखेरपोरा – युसमर्ग)

शेवटी तो दिवस उगवलाच.....

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 10:36 am

त्यादिवशी सकाळी ऑफिसला निघतांना उंबरठ्यावरच एक डांग्या शिंक आली होती. त्या आवाजाने पॅसेजच्या सिलिंगवरील एक पालीचं पिल्लू अंगावर पडलं नाही पण घाबरून दरवाज्याच्या फटीतून घरामध्ये घुसलं. 'मार दिया जाय, या छोड दिया जाय' हा विचार करण्यात काही सेकंद गेली. ते पिल्लूही "चार दिवस रहाते, किडा-मुंगी खाते, धष्ट-पुष्ट होते, मग तू मला मार" असं चुकचुकत गेल्याचा भास झाला म्हणून लगबगीने दरवाजा लॉक करून निघालो. लिफ्टमधे माझ्याबरोबर तिन-चार काळे कपडेवाले होते. (थायलंडमधे राजासाठी वर्षभर "दुखवटा" असल्याने लोकांचे काळे कपडे नेहमीचेच झालेत).

नोकरीबातमी

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १० )

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 7:02 am

सुम्याच्या खालवत चाललेल्या प्रकृतीच्या आठवणी

गुरूनाथ सरावाप्रमाणे रोज सोनचाफ्याची फुलं परडीत जमा करून सुम्याला आणून द्यायचा.त्यातलं एक फुल सरावाप्रमाणे सुम्या आपल्या केसात माळायची.उरलेली फुलं देवाच्या फोटोवर आणि आपल्या गेलेल्या प्रियजनांच्या फोटोवर वहायची.असं करीत असतानाचे ते क्षण तिला मनात येणार्‍या काळजी करणार्‍या विचारापासून दूर ठेवायचे.

कथालेख

प्रयोगशील शाळा

मद्रकन्या's picture
मद्रकन्या in जनातलं, मनातलं
7 Dec 2016 - 1:55 am

रविवारच्या लोकमत मंथन पुरवणी मध्ये प्रयोगशील शाळांबद्दल लेख आला होता. या शाळांच्या कार्यपद्दतीची थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहे या लेखात. त्यात महाराष्ट्रातल्या काही शाळांची नावं पण आहेत.

http://epaper.lokmat.com/epapernew.php?articleid=LOK_MTHN_20161204_5_1&a...

याच लेखाच्या निमित्ताने नाशिक मधील आनंद निकेतन शाळे बद्दल थोडी माहिती:
शाळेची वेबसाईट

शिक्षणलेख