Skip to main content

(सत्य घटना)

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 07/12/2016 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
...................... ६५ वर्षाचे काका रस्त्याने जात असतात.. काका "तात्या टोपे" होते.. मस्त दाट केसांचा विग.घातलेला होता... लक्ष्मी रोड शनी पार सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून काका कडे कडेने जाताना एका भरधाव जाणा-या रिक्षावाल्याने काकांना धक्का दिला... काका चा तोल गेला व ते पडले. पडताना आई गं व्हीव्हळले .... बाजूच्या लोकांनी काकांना उठवले व बाजूच्या दुकानाच्या पाय-यावर बसवले..पाणी दिले.. काका ना धक्का लागल्या त्यांचा विग डोक्यावरून उडाला अन रस्त्यात पडला...गडबडीत कुणाच्या लक्षात आले नाही.... रिक्षावाल्याने पण कचकन ब्रेक दाबला व रिक्षा हळूहळू मागे आणत तो काका बसले होते त्या दुकानावर विचारपूस करायला गेला.... रिक्षा मागे आणताना रिक्शांचे मागचे चाक विग वर पडले व विगचा ३/४ भाग बाहेर व १/४ भाग चाकाखाली आला .......सीन भयानक दिसत होता... एक तात्या खाली वाकून केसाकडे बघत होता... काय बघताय? गर्दीतल्या एकाने विचारले........ काही नाही..केस दिसतायेत...बाकीचा भाग जमिनीत की कुठे गेला असावा..शिवाय रक्ताचा थेंब पण नाही......... बाकीचा भाग बहुतेक जिमखान्यावर फिरत असावा........एक जण म्हणाला.... मीन व्हाईल पाणी पिल्याने काकांना तरतरी आलेली होती..... काका उठले.रिक्षावाल्याने रिक्षा पुढे घेतली ..काकांनी विग उचलला ..झटकला व डोक्यावर चढवून सारस बागेच्या दिशेने चालू लागले.
लेखनविषय:

वाचने 3089
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

लोल्झ =)))) अकु नेव्हर डिसापॉईंट्स !! =))))