वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
२८ फेब्रुवारी २०१५
इडन पार्क, ऑकलंड
न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरच्या ऑकलंडच्या ईडन पार्कच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन यजमान देशांतली पूल ए मधली मॅच रंगणार होती. न्यूझीलंडने श्रीलंका, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचा पराभव करुन आपल्या पहिल्या तीनही मॅचेस जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडला आरामात धूळ चारली होती, पण बांग्लादेशविरुद्ध ब्रिस्बेनच्या दुसर्या मॅचवर पाऊस पडला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने ही मॅच विशेष महत्वाची होती. ही मॅच जिंकल्यास क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश मिळवणं ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने सुकर होणार होतं.