बोललो नाही कधी पण...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
29 Mar 2017 - 12:50 pm

शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले
बोललो नाही कधी पण दुःख तर झाले!

चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली
वार काही काळजाच्या खोलवर झाले!

लागला धक्का असा अन् सांडला पेला...
पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले!

या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या
हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले!

तू दिलेली डायरी अन् पीसही जपले
डायरी आकाश माझे..पीस पर झाले!

व्हायचे असतेच ते होवून जाते पण
नेमके कळले कुठे जे आजवर झाले?

—सत्यजित

मराठी गझलकवितागझल

ट्वीटव्याख्यान या उपक्रमातील सहभागाचा अनुभव

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
29 Mar 2017 - 12:17 pm

३-६ फेब्रुवारी या काळात ट्विटरवरील @marathiword या हँडलने ट्विटर्संमेलन हा उपक्रम आयोजित केला होता. हे या उपक्रमाचं दुसरं वर्ष होतं. मराठी साहित्य संमेलनाच्या जोडीने आयोजित होणार्‍या या उपक्रमाला पहिल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सोशल मिडियावरील मराठीचं अस्तित्व भक्कमपणे समोर येणं, मराठी मंडळींना सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठीची एक विशेष संधी, अवसर मिळणं ही या उपक्रमाची निवडक उद्दिष्ट.

मांडणीव्याकरणशुद्धलेखनप्रकटनविचारअनुभव

वर्षारंभाची सायकल राइड (अंबरनाथ ते वरदविनायक महड -अंबरनाथ)

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
29 Mar 2017 - 10:34 am

गेल्या रविवारी २६ ला कल्याण सायकलीस्ट बरोबर बारवी धरण ची छोटीशी राइड केली तेव्हा, २८ ला कोणती राइड करायची याची चर्चा झाली, पण सोमवार पर्यंत धड काही ठरत नव्हते, उल्हासनगर सायकलिंग क्लब मध्ये ही नुसती चर्चा सुरु होती, बर्याच जणांना सुटी नसल्याने वा सुटी असूनही जावे लागतंय ,या कारणाने सकाळी छोटी १५/२० ची राइड करू असाच सर्वांचा कल दिसत होता. इतक्यात “गोवा मुंबई सायकल २०१७” या ग्रुप वर समीर दातार ची एक पोस्ट दिसली, वाशी ते महड राइड टोटल १३० प्लस.
गुगल बाबा कडे विचारणा केली अंबरनाथ ते महड कसे जायचे? चौक वरून १६ किमी असे उत्तर आले.

[एक्स्ट्रा शशक] किनारे

भृशुंडी's picture
भृशुंडी in जनातलं, मनातलं
29 Mar 2017 - 12:26 am

"तुला जमेल ना?", अरिकूर्म्याने वृष्णीला प्रश्न केला.
"न जमायला काय झालं?", वृष्णीचा सूर दुखावलेला होता.
"तसं नाही, ही पहिलीच मोहीम आहे अज्ञातात. आजवर आपल्यापैकी कोणीही हा किनारा ओलांडून पलीकडे गेलं नाही. तू पहिलाच आहेस, म्हणून.." अरिकूर्म्याने स्पष्टीकरण दिलं.

"तेही खरंच. आजवर आपण कधीही किनारे ओलांडले नाहीत. पण आता ती वेळ आली आहे. बरंय, येतो मी."
वृष्णीने घुमटाची काच बंद केली.

अरिकूर्माचे डोळे भरून आले. आजवरच्या कित्येक पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं हे. अनेकांनी त्यासाठी बलिदान दिलं, कित्येक जण बेपत्ता झाले.

kathaa

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
28 Mar 2017 - 5:03 pm

नमस्कार मिपाकरहो,
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांची ओळख या धाग्यात जाहीर करत आहोत.

अनुक्रमणिका

01. वर्तुळाचा एक कोन = मृत्युन्जय

02. नवी सुरुवात = आंबट गोड

03. ती आणि द्वारकाधीश = ज्योति अलवनि

04. ईश्वराचा शोधं = भृशुंडी

05. पाउलखुणा = श्वेता व्यास

कथाशुभेच्छाअभिनंदन

'नाते' म्हणून आहे!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
28 Mar 2017 - 6:41 am

तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे
या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे!

निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या
नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे!

जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो
खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!

गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले
शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे!

स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे
या काळजात फिरते पाते म्हणून आहे!

या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण
माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

गँगस्टर - 3

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
28 Mar 2017 - 12:51 am

झोपडी ठिबक ठिबक. अंधारात हरवलेली. पुढे मोकळे मैदान. अन मोकाट जनावरे विसावलेली.

कोपऱ्यातल्या त्या बिल्डींगमधले दिवे अजूनही जळत होते. सभोवताली थोडीशी झाडी. अन बाकीच्या इमारती. आम्ही पायऱ्यांवर बसलो. बोचऱ्या थंडीने अंग शहारत होते.

करीमने बीडी पेटवली.

"वही दिखी" कोपऱ्यातल्या बिल्डींगकडे इशारा करत त्याने झुरका घेतला.
हे 'तिचं' कितवं ठिकाण? गिणती नाही.

"आप उसे जाके बात क्यू नही करते?" त्याने विचारलं. च्युता साला.
मी जरावेळ त्या मातीत लवंडलो.

टप टप टप बारीश आती है. दिल बहलाती है. धूप खिलती है. बाकी सब पसीना पसीना.
"जरा धीरेसे चला साले"...

कथाप्रतिभा

मिस्टर डब्लो

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जनातलं, मनातलं
27 Mar 2017 - 11:34 pm

संशोधन गुप्त होतं म्हणून तो गप्प बसला नाहीतर ‘युरेका युरेका’ असं ओरडत नागडं पळाला असता. पण ज्याच्यामुळे या शोधाची प्रेरणा मिळाली त्या जैवशास्त्रज्ञ मित्राला बातमी देणं आवश्यक होतं. डॉक्टर नाकतोडेने शंकुपात्रात पडून असलेला मोबाईल उचलला अन लंबेला कॉल केला

“बुट्ट्या, लगेच प्रयोगशाळेत ये.”

“नंतर येतो, सध्या मी माकडांना डान्स शिकवतोय.”

“त्यांचं सोड, इथे आल्यावर तूच डान्स करायला लागशील. बेट्या तू शापमुक्त होणार आज.”

“काय सांगतोस नाकतोड्या. आलोच बघ शून्य मिनिटात.”

कथाप्रतिभाविरंगुळा