राम कदम निमीत्ते, काही वेगळे प्रश्न

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
8 Sep 2018 - 11:51 am
गाभा: 

आ. राम कदमांचा घाटकोपर दहीहंडी २०१८ मधील तरुणाईशी झालेला संवाद (युट्यूब दुवा अदमासे ३सर्‍या तासास पहावे) राजकीय, माध्यम आणि मराठी-भारतीय स्त्रीभूमिकेच्या तिहेरी वावटळीत सापडला. या धाग्याचा उद्देश्य राम कदम, त्यांची चाहती तरुणाई आणि टिकाकार काय म्हणाले त्या पेक्षा जे म्हणायचे राहून गेले असेल अशा काही बाजूंवर मिपाकरांची मते जाणून घेणे असा आहे.

समजा (गृहीतक १), त्या गर्दीतील एखाद्या तरुणाने एक मुलगी त्याच्याशी प्रेम-विवाहार्थ पळून येण्यास तयार आहे, मुलीचे पालक अडकाठी आणताहेत राम कदम तुम्ही मुलीला पळून येण्यास मदत कराल का? असा प्रश्न विचारला समजा (गृहीतक २) राम कदमांच्या ठिकाणी तुम्ही स्वतः (स्त्री/पुरुष जे असाल ते) आहात तर तुमची भूमिका काय असेल किंवा या प्रश्नास राम कदमांचे (तुम्हाला उपरोधाशिवाय पटू शकेल असे) आदर्श उत्तर काय असावे...

... , तुमची स्वतःची भूमिका काय असेल ?

... तुमच्या कुटूंबीयांचे काय मत असेल ?

... तुमच्या मित्रांचे मत काय असेल ?

... तुमच्या शेजार्‍यांचे मत काय असण्याची शक्यता असेल ?

.... तुमच्या समुहाचे भाषिक/प्रांतिक/ उप-उपजातीय, जातीय, धार्मीकांचे मत काय असेल ?

असे तुम्हाला स्वतःला वाटते.

* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी, मिपाकरांवर व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी , चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

.
.
.
.
.
.
.

*** स्त्री विषयक चर्चेत सहभाग घेण्यासारखे माझे इतर बरेच धागे येऊन गेले आहेत - ज्या त्या विषयाची त्या त्या धाग्यावर चर्चा करावी***

* वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

* स्त्रीयांचे निवडस्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१

* मिशी नृत्य

* कुंकू, पडदा आणि संवाद

* स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ

* जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

* स्त्री विषयक 'शुचितांचे प्रकार: (प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता इ.) आणि समकालीन प्रयोजन (?)

* स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

* अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वाचनालयास, 'स्त्रीया परक्या'

* चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न

* ..आणि 'ती'ला चर्चच्या गाभार्‍यात प्रवेश हवा आहे !

* मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून ... शुभेच्छा ! (अजून येणे बाकी !!)

* स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम

* भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...
* शोषण नाही कोठें ?

* स्त्रीया आणि कॉपीराईट
** पाककृती आणि कॉपीराईट

* आई , समजूत आणि वास्तव

* आजच्या काळात 'रम्भा - शुक संवाद' कसा लिहिला जाईल ?

* मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात)

* भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !

प्रतिक्रिया

पैलवान's picture

8 Sep 2018 - 5:21 pm | पैलवान


*** स्त्री विषयक चर्चेत सहभाग घेण्यासारखे माझे इतर बरेच धागे येऊन गेले आहेत - ज्या त्या विषयाची त्या त्या धाग्यावर चर्चा करावी***

* वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

* स्त्रीयांचे निवडस्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१

* मिशी नृत्य

* कुंकू, पडदा आणि संवाद

* स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ

* जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

* स्त्री विषयक 'शुचितांचे प्रकार: (प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता इ.) आणि समकालीन प्रयोजन (?)

* स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

* अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वाचनालयास, 'स्त्रीया परक्या'

* चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न

* ..आणि 'ती'ला चर्चच्या गाभार्‍यात प्रवेश हवा आहे !

* मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून ... शुभेच्छा ! (अजून येणे बाकी !!)

* स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम

* भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...
* शोषण नाही कोठें ?

* स्त्रीया आणि कॉपीराईट
** पाककृती आणि कॉपीराईट

* आई , समजूत आणि वास्तव

* आजच्या काळात 'रम्भा - शुक संवाद' कसा लिहिला जाईल ?

* मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात)

* भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !

नुसत्या 'स्त्री' या एका विषयावर इतके धागे!!!
बाबौ!!!!!

माहितगार's picture

8 Sep 2018 - 6:39 pm | माहितगार

या धाग्यातील मुद्यांवर बी मत प्रदर्शन करा की राव.

पैलवान's picture

8 Sep 2018 - 9:30 pm | पैलवान

ते सर्व स्त्रीविषयक अनुषंगिक धागे (किंबहुना त्यांच्या लिंका) हा लेखाचा भाग असल्याने त्यावर माझे 'आश्चर्यकारक' मत व्यक्त केले आहे.
अनुषंगिक मत = बाबौ
आय होप धिस कॅन बी कन्सिडर्ड ऍज ए नॉन अनुषंगिक अन-अवांतर

माहितगार's picture

8 Sep 2018 - 9:34 pm | माहितगार

पैलवानजी उगाच रच्याकने कशासाठी, प्रश्नांना उत्तरे द्या आणि नावाची शान राखा, हा का ना का :)

खटपट्या's picture

8 Sep 2018 - 6:19 pm | खटपट्या

राम कदमांच्या निमित्ताने बाकीच्या धाग्यांची झैरात. :)

अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी - - ज्या त्या विषयाची त्या त्या धाग्यावर चर्चा करावी अशी विनंती पण केलेली हाए. तेव्हा या धागा लेखातील प्रश्नांवर मत प्रदर्शनाची विनंती आहे.

ईश्वरदास's picture

8 Sep 2018 - 8:20 pm | ईश्वरदास

राम कदमांना पोरगी आहे का माहीत नाही, पण समजा एखाद्या पंटर ला त्यांचीच पोरगी आवडली तर राम कदम वचनाला जागुन पळवून आणून देणार काय.

मला सुद्धा त्याच दिवशी हा प्रश्न पडलेला , त्यांनी दिलेल्या नं वर फोन करावा तर माझ्या हाडांची संख्या मोजण्याची वेळ यायची .

माहितगार's picture

8 Sep 2018 - 9:10 pm | माहितगार

@ ट्रम्प , मला आपल्याकडून धागा लेखातील प्रश्नांवर उत्तरे अपेक्षीत आहेतच पण आपले नामबंधू आमेरीकन अध्यक्ष आणि राम कदम यांच्यातील साम्य आणि फरकांवरही आपण प्रकाश टाकू शकल्यास या निमीत्ताने समजून घेणे आवडेल.

ट्रम्प's picture

8 Sep 2018 - 10:38 pm | ट्रम्प

अभ्यास वाढवून सांगतो .

मला वाटते 'राम कदमांच्या कथित धोरणानुसार, त्यांना त्यांच्या बायकोची आणि त्याही आधी आपण म्हणता त्या पंटरला त्याच्या आईवडिलांची परवानगी घ्यावी लागेल. कारण राम कदमांनी मुलगा आणि मुलगी दोन्हीकडच्या पालकांच्या परवानगीची अपेक्षा ठेवली असावी. पण बदलत्या काळानुसार मुलगा आणि मुलीच्या इच्छा पालकांच्या इच्छांपेक्षा महत्वाच्या झाल्या आहेत हि बाजू राम कदमांकडून मिस झाल्याचे दिसते. पण त्याच वेळी राम कदमांवर टिका करणारा समाज स्त्रीयांचे निवड स्वातंत्र्य निर्वीवाद स्विकारतो का ? सैराट मधील आर्चींसमोरचे प्रश्न खरेच संपले आहेत का ? (कि स्वतः चिखलात राहून राम कदमांवर एकतर्फी चिखल फेक चालू आहे ?) स्त्रीच्या निवडस्वातंत्र्या बद्दल मी वर धागा लेखात अगदी प्राथमीक स्वरुपाचे प्रश्न विचारले आहेत, राम कदमांवर स्त्री निवडस्वातंत्र्याचा अंतर्भाव न करण्याबद्दल जरुर टिका करावी पण स्त्री निवड स्वातंत्र्याच्या पैलुंवर आपण आपले निकटववर्तीय आणि समाज कुठे आहे याचे प्रांजळ आत्म परिक्षणही या निमीत्ताने व्हावयास नको किंवा कसे.

कारण राम कदमांनी मुलगा आणि मुलगी दोन्हीकडच्या पालकांच्या परवानगीची अपेक्षा ठेवली असावी.

मागा, तुम्ही नक्की ऐकलेय ना ते काय म्हणालेत ते? ते मुलांना म्हणताहेत, 'तुम्हाला एखादी मुलगी आवडली, आणि तुमच्या आईवडिलांची याला संमती आहे, तर मी ती मुलगी पळवून आणणार आणि ती तुम्हाला देणार'. यात मुलीच्या किंवा मुलीच्या आईवडिलांच्या संमतीचा विषय येतोच कुठे? का उगाच बुद्धीभेद करता आहात?

राम कदमांवर मी सुद्धा व्हिडीओ पाहिल्यावर खालील प्रतिसादातून अधिक टिका केली आहे. राम कदमांचे काहीच चुकले/हुकले नसते तर ही धागा चर्चा करण्याचे निमीत्तही शिल्लक रहात नाही.

.....यात मुलीच्या किंवा मुलीच्या आईवडिलांच्या संमतीचा विषय येतोच कुठे? का उगाच बुद्धीभेद करता आहात?

आयबीएन लोकमतवर उदय निरगुडकरांनी विचारलेल्या स्पष्टीकरणात ( अदमासे ३३ व्या मिनीटापासून पहावे) मुलाच्या आईवडीलांच्या संमतीनंतर मुलीच्या आई वडीलांना मागणी घालण्याची भाषा करत आहेत.

बेसिकली 'राम कदम' परंपरावादाचा पुरस्कार करत आहेत. राम कदमांची उर्वरीत पार्श्वभूमी पहाता पळून जाणे पळवून नेणे याचे समर्थन करणारी नसण्याची शक्यता त्यांच्या उदय निरगुडकरांना दिलेल्या स्पष्टीकरणातून जाणवते.

राम कदम यांच्या उदय निरगुडकरांना दिलेल्या स्पष्टीकरणातूनच नवा प्रश्न निर्माण होतो, १८+ वय सज्ञान मुलगी निवड स्वातंत्र्याची अपेक्षा करत असेल तर राम कदम पालक संमतीची अट घालत आहेत. आणि अशी अट केवळ राम कदम नव्हे उर्वरीत समाजाचा मोठा भाग आजही घालत असणार त्या संबंधाने धागा लेखात या निमीत्ताने चर्चा व्हावी असे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर आता पर्यंत आलेल्या कोणत्याही प्रतिसादकाने भूमिका घेतलेली दिसत नाही.
.

ज्योति अळवणी's picture

9 Sep 2018 - 9:47 am | ज्योति अळवणी

मुद्दा असा आहे की राजकीय व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे वक्तव्य उत्साहाच्या भरात करू नये. त्यात जर राम कदम यांना मुलीच्या पालकांची मर्जी देखील अपेक्षित होती; तर त्यांनी तसे म्हणायला हवे होते. उलट मुलीला पळवून आणिन असे ते म्हणाले म्हणजे मुलीची किंवा तिच्या पालकांची मर्जी त्यांना अपेक्षित नाही.

मुळात या घटनेनंतर प्रत्येक व्यक्तिने; ज्यांनी निषेध केला आहे; आत्मचिंतन करून आपण नक्की कोणत्या मुद्याला निषेध करतो आहोत आणि तर आपला निषेध असेल तर आपण तसे भविष्यात वागणार नाही याची काळजी घेतली तरी या एकूण मीडिया आणि राजकीय/अ-राजकीय चर्चेचा काहीतरी उपयोग होईल असे मला वाटते

नाखु's picture

9 Sep 2018 - 11:15 am | नाखु

मुदलात राम कदम यांनी अतिउत्साही पणा करून अत्यंत बेजबाबदार विधान केले आहे.त्यातही ते सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्तेपदी आहेत याचही भान ठेवून बोललं पाहिजे हीच मोठी चूक केली.

आता या संधीचे सोने करून घेतले सगळ्याच राजकीय पक्षांनी.शिवसेना नेहमीप्रमाणे आघाडीवर (विरोध करण्यात ते व कुबेर कायम पहिल्या नंबरसाठी धडपडत असतात)
आव्हाड यांच्याकरिता इसरत जहा प्रकरणातून शुभ्र होण्यासाठी ही संजीवनी होती,ती साधली

नेटवर आणि मिपावर कुणाला ही ते खरं अशी मदत करणार आहेत का,का बोलाचाच भात आहे ह्याची शंका वाटली नाही.तसेच तुमच्या मुद्दा असलेल्या पालकांची सहमती,मुलीची सहमती यावर काहीच भाष्य करावे वाटत नाही.
सर्व सूज्ञ जनतेने दोन्ही बाजूंच्या आई-वडील संमतीने व मुला मुलींनीही फक्त आई वडीलांच्या इच्छेबरहुकूम विवाह केले आहेत हे लक्षात घेऊन त्याची टिका योग्यच आहे.
गडकरी पुतळा विटंबना प्रकरणी दखलपात्र बातमी नव्हती त्यापेक्षा दहापट अधिक चर्चा, निषेध या प्रकरणी झाला आहे आणि तो उथळ आहे हे नक्की.
राम कदम तिथून हरले तर काही दीर्घ परिणाम झाला असं वाटतं

दुश्यन्त's picture

9 Sep 2018 - 1:14 pm | दुश्यन्त

तुम्हाला मुलगी पसंत आहे आणि मुलगी नाही म्हणत आहे अश्या अर्थाचं बोलूनच कदमांनी तो संवाद(?) सुरु केला होता. राम कदमाच्या मते फक्त मुलगा आणि त्याचे आई बाप यांची पसंती हवी. मुलगी आणि तिचे आई वडील काय म्हणतात त्याला त्याच्यालेखी महत्व नाही असे त्या दिवशीच्या बरळण्यावरून दिसून येते.

माहितगार's picture

9 Sep 2018 - 8:10 pm | माहितगार

घाटकोपर दहि हंडी २०१८ चा पूर्ण हा युट्यूब व्हिडीओ युट्यूबवर असूनही इतर व्हिडीओंच्या भाऊगर्दीतन शोधणे जिकीरीचे होते पण एकदाचा मिळाला. तब्बल साडेपाच तासांचा आहे. तरुण मतदारांमधील लोकप्रीयता टिकवण्यासाठी अनेक तारांकीत अतिथीं ते श्रोता समुदाय यांच्याशी संवाद आणि सूत्रसंचालन सलग एकहाती करताना दिसतात. तरुण पिढीच्या बदलत्या सवंग आवडी निवडींशी जुळवून घेणे, तरुणाईतील बोल्ड हि प्रतिमा जपणे ते तरुण पिढीस पारंपारीक संस्कारांचा आग्रह धरणे , हे साधतानाच मतदार अनुनय करता करता स्वतःची आत्मप्रौढीचा दोष पत्करुन स्वतःची स्वतःच जाहीरात अशी सगळी तारेवरची कसरत १४० बाईट मध्ये सर्व बसवण्याचा आग्रह असलेल्या पिढी सोबत.

यात आलेल्या प्रत्येक तारांकीत पाहुण्याकडून आई-वडील, बहीणीची राखी आणि देशाचा गौरव याची तरुणांना पुन्हा पुन्हा शपथ देववणे परंपरेचा सन्मान करते, पण सोबत जोडीला असलेली गिते (सवंग ?) लोकप्रीयतेसाठी हा नेता सर्वकाही करण्यास तयार याचा अट्टाहास, लोकानुनयाच्या इतर अनेक गोष्टीकरत, घाटकोपरच्या प्रत्येक मृतास शाही अंत्ययात्रा देण्याचे आश्वासन देण्यापर्यंत पोहोचतो. नुकतेच १८व्या वर्षात पदार्पण करणार्‍या युवकांना मतदार जोडून घेण्यासाठी मोफत ड्रायव्हींग प्रशिक्षण या ला जवाब स्ट्रॅटेजीकडे हा नेता वापस जातो. १० वी १२वीच्या मुलांना एवढे खुश केले तर त्यांच्या मनातील स्वप्नांच्या सुप्त आकांक्षा बद्दल संवाद परंपरेच्याच चौकटीत राहून गोंजारायच्या. संवादातील मुलगी पळवून आणणार का ? हा एखाद्या तरुणाचा प्रश्न काही सेकंदाम्चा असला तरी त्याचे उत्तर १४० बाईटात बसणारे असू शकत नाही ते तुमच्या आईवडीलांना विचारुन मग या १४० बाईटात बसवण्याचा प्रयत्न उत्तर १४० बाईटात बसणारे असू शकत नसल्यामुळे फसताना दिसतो.

सबंध व्हिडीओ साडेपाच तासाचा असला तरी २तास ५६ व्या मिनीटापासून पाहिल्यास आणि आयबीएन लोकमतवरची त्यांची मुलाखत लक्षात घेतल्यास त्यांची गोची कशी झाली याचा अल्प अंदाज येतो.

गामा पैलवान's picture

9 Sep 2018 - 2:12 pm | गामा पैलवान

लोकहो,

कन्याहरणाचे अनेक संदर्भ दिले जाताहेत. माझ्या मते कन्या जर स्वयंवरास उभी असेल तर आणि तरंच तिचं हरण समर्थनीय आहे. जो पुरुष पण जिंकेल त्यास स्वयंवरास उभ्या राहणाऱ्या कन्येने वरावंच लागतं. तेव्हा माघार घेऊन चालंत नाही. परंतु अशा वेळेस कोणी सामर्थ्यवान पुरुषाने तिचं हरण केलं तरी ते चालून जातं कारण की स्वयंवर मुळातून शक्तिमान वर मिळवण्यासाठीच रचलेलं असतं. कन्याहरणाने हा हेतू आपसूकंच साधला जातो.

मात्र इतर वेळेस कन्येच्या संमतीविना तिचं हरण करणं योग्य नाही. राम कदमांच्या परिस्थितीत कन्यासंमतीविषयी निश्चित माहिती नाही. त्यामुळे त्यांचं वक्तव्य निषेधार्ह मानायला हवं.

आ.न.,
-गा.पै.

सतिश गावडे's picture

9 Sep 2018 - 6:21 pm | सतिश गावडे

कोणत्या काळातील गोष्ट करत आहात?

हल्ली टीव्हीवरील नौटंकी सोडली तर असे स्वयंवर झाल्याचे पाहण्यात, ऐकण्यात आणि वाचण्यात नाही. तुम्हीच एखादे उदाहरण सांगा सांप्रत काळातील. :)

दुर्गविहारी's picture

10 Sep 2018 - 11:37 am | दुर्गविहारी

काय सांगता ? राखी सावंत आणि राहुल महाजन यांचे स्वयंवर विसरलात का ? ;-)

अभ्या..'s picture

10 Sep 2018 - 12:05 pm | अभ्या..

ते आहे लक्षात पण त्या दोघांच्या स्वयंवरी निवडींचे नांव त्यांच्या तरी लक्षात आहे का सध्या? ;)

कन्याहरणाचे अनेक संदर्भ दिले जाताहेत. माझ्या मते कन्या जर स्वयंवरास उभी असेल तर आणि तरंच तिचं हरण समर्थनीय आहे.

हे सगळं आता इतिहासजमा झाले आहे.
समजा एखादी कन्या स्वयंवराला उभी राहिली आणि तिच्या अटीत न बसणाऱ्या एखाद्याने बळजबरीने तिचे अपहरण केले तर? आताच्या काळात कुठल्याही प्रसंगात बळजबरीने हरण करणे मान्य नाही. तो किडनॅपिंगचा गुन्हाच ठरेल.

गामा पैलवान's picture

10 Sep 2018 - 1:59 pm | गामा पैलवान

दुश्यन्त,

तुमचं बरोबर आहे. आमंत्रितांचं स्वयंवर असेल तर इतर लोकांस कन्याहरणाचा अधिकार नाही.

आ.न.,
-गा.पै.

दुश्यन्त's picture

10 Sep 2018 - 5:53 pm | दुश्यन्त

गा.पै.,

हे आधीच्या काळात लागू असेलही कदाचित. आताच्या काळात बळजबरीने हरण म्हणजे गुन्हाच ठरेल, आमंत्रितांपैकी कुणी केले तरीही..

गामा पैलवान's picture

10 Sep 2018 - 5:58 pm | गामा पैलवान

दुश्यन्त,

माझ्या म्हणण्याचा मथितार्थ असा की प्राचीन काळी जे काही कन्याहरण व्हायचं ते नियमबद्ध होतं. उगीच दिसली बाई उचलली तिला असा प्रकार वर्ज्य असे. आज जरी प्राचीन काळाचे हवाले कोणी देऊ लागला तर त्याला ही पार्श्वभूमी स्पष्ट करून सांगावी, इतकंच.

आ.न.,
-गा.पै.

ट्रम्प's picture

10 Sep 2018 - 8:20 pm | ट्रम्प

रावसाहेब दानवे ( महाराष्ट भाजप अध्यक्ष ) शेतकऱ्यांना " साले *** " अर्वाच्य शिवीगाळ करतात ,

गिरीश बापट ( मंत्री , अन्न औषध विभाग ) विद्यार्थ्यां समोर " अजून माझा देठ हिरवा " मुक्ताफळे उधळतात ,

श्रीपाद छिदंम ( माजी उपमहापौर , नगर ) शिवाजी महाराजां बद्दल शिवीगाळ ,

प्रशांत परिचारक ( भाजप आमदार , पंढरपूर ) सैनिक सिमेवर असताना इकडे त्यांच्या बायकांना मुलं होतात , अशी सैनिकां बद्दल मुक्ताफळे .
आणि आता राम कदम .

विधानसभेत तावातावाने बोलणारे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा वेळी गलितगात्र , शक्तीपात झाल्या सारखे गप्प बसतात , हे ज्यास्त त्रासदायक .

शिवसेना व भाजप च्या नगरसेवकांनी ठराव पास करून नगर च्या श्रीपाद ला हाकलले व त्या विषयावरून तो न्यायालयीन लढाई खेळत आहे , पण बाकीचे निर्लज्ज पणे त्यांच्या पदाला चिटकून बसले आहेत .
धरणात मुतणाऱ्यांना जनतेने सत्तेबाहेर घालवले तशी वेळ सोज्वळ भाजप वर न येवो .

ट्रेड मार्क's picture

12 Sep 2018 - 8:11 am | ट्रेड मार्क

कदम साहेबांनी दहीहंडी आहे म्हणून संधी साधून दोन शेर देशी लावली असावी म्हणून असं काहीतरी बरळलेत. काही का असेना पण आपल्या पदाची शोभा ठेवायला पाहिजे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नको तिथे नको ते बोलणे टाळले पाहिजे.

रच्याकने - जिथे पाहिजे तिथे पाहिजे ते बोलत नाहीत, काय प्रॉब्लेम आहे कोण जाणे.

विडियो पाहिला. खुपच पांचटपणा चालवला होता.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Sep 2018 - 12:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अरे तो तळागाळतला(अ.का. खालचा वर्ग) असाच असतो.बहुसंख्य नगर्सेवक्/आमदार हे अशाच वर्गातून आलेले असतात त्यामुळे त्याना तसे बोलतना काही वावगे वाटत नाही.

नाखु's picture

13 Sep 2018 - 3:49 pm | नाखु

माई पण पक्षाला गाळात घाल्णारे (तळातल) का बोलावं ! नेते काय मिन्धे होते काय? तिथल्या तिथ झापायला नको!!

दहि हन्डि लाखचि आनि अक्कल चार आन्याचि पहिलेला नाखु