राम कदम निमीत्ते, काही वेगळे प्रश्न
आ. राम कदमांचा घाटकोपर दहीहंडी २०१८ मधील तरुणाईशी झालेला संवाद (युट्यूब दुवा अदमासे ३सर्या तासास पहावे) राजकीय, माध्यम आणि मराठी-भारतीय स्त्रीभूमिकेच्या तिहेरी वावटळीत सापडला. या धाग्याचा उद्देश्य राम कदम, त्यांची चाहती तरुणाई आणि टिकाकार काय म्हणाले त्या पेक्षा जे म्हणायचे राहून गेले असेल अशा काही बाजूंवर मिपाकरांची मते जाणून घेणे असा आहे.
समजा (गृहीतक १), त्या गर्दीतील एखाद्या तरुणाने एक मुलगी त्याच्याशी प्रेम-विवाहार्थ पळून येण्यास तयार आहे, मुलीचे पालक अडकाठी आणताहेत राम कदम तुम्ही मुलीला पळून येण्यास मदत कराल का? असा प्रश्न विचारला समजा (गृहीतक २) राम कदमांच्या ठिकाणी तुम्ही स्वतः (स्त्री/पुरुष जे असाल ते) आहात तर तुमची भूमिका काय असेल किंवा या प्रश्नास राम कदमांचे (तुम्हाला उपरोधाशिवाय पटू शकेल असे) आदर्श उत्तर काय असावे...
... , तुमची स्वतःची भूमिका काय असेल ?
... तुमच्या कुटूंबीयांचे काय मत असेल ?
... तुमच्या मित्रांचे मत काय असेल ?
... तुमच्या शेजार्यांचे मत काय असण्याची शक्यता असेल ?
.... तुमच्या समुहाचे भाषिक/प्रांतिक/ उप-उपजातीय, जातीय, धार्मीकांचे मत काय असेल ?
असे तुम्हाला स्वतःला वाटते.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी, मिपाकरांवर व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी , चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
.
.
.
.
.
.
.
*** स्त्री विषयक चर्चेत सहभाग घेण्यासारखे माझे इतर बरेच धागे येऊन गेले आहेत - ज्या त्या विषयाची त्या त्या धाग्यावर चर्चा करावी***
* वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने
* स्त्रीयांचे निवडस्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१
* मिशी नृत्य
* कुंकू, पडदा आणि संवाद
* स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ
* जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन
* स्त्री विषयक 'शुचितांचे प्रकार: (प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता इ.) आणि समकालीन प्रयोजन (?)
* स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?
* अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वाचनालयास, 'स्त्रीया परक्या'
* चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न
* ..आणि 'ती'ला चर्चच्या गाभार्यात प्रवेश हवा आहे !
* मस्तानी, काशीबाई आणि बाजीरावांकडून ... शुभेच्छा ! (अजून येणे बाकी !!)
* स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम
* भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...
* शोषण नाही कोठें ?
* स्त्रीया आणि कॉपीराईट
** पाककृती आणि कॉपीराईट
* आई , समजूत आणि वास्तव
* आजच्या काळात 'रम्भा - शुक संवाद' कसा लिहिला जाईल ?
* मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात)
* भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
OMG
__/\__
मुद्दे
उगाच रच्याकने कशासाठी
राम कदमांच्या निमित्ताने
या धागा लेखातील प्रश्नांवर मत प्रदर्शनाची विनंती
राम कदमांना पोरगी आहे का
मला सुद्धा त्याच दिवशी हा
@ ट्रम्प , मला आपल्याकडून
अभ्यास वाढवून सांगतो .
धागा लेखातील प्रश्नांवर आपले मत काय ?
कारण राम कदमांनी मुलगा आणि
राम कदमांवर मी सुद्धा व्हिडीओ
मुद्दा असा आहे की राजकीय
तंतोतंत सहमत
तुम्हाला मुलगी पसंत आहे आणि
घाटकोपर दहि हंडी २०१८ चा
कन्याहरण समर्थनीय केव्हा?
कोणत्या काळातील गोष्ट करत
काय सांगता ? राखी सावंत आणि
झाले ते स्वयंवर....
कन्याहरणाचे अनेक संदर्भ दिले
बरोबर आहे
गा.पै.,
कन्याहरणाचे नियम
रावसाहेब दानवे ( महाराष्ट
थोडी लावली असावी
विडियो पाहिला. खुपच पांचटपणा
अरे
महामहिम