भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम !

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 10:09 am

वस्तुतः मानवजातीला सोने जड जवाहीर्‍यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे, भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे. भारतीयांचे आणि त्यातही भारतीय स्त्री आणि त्यानंतर भारतीय अदृश्यस्रोतोद्गम सुवर्णप्रदर्शक पुरुषधनींचे ही पिवळ्या चकाकत्या धातूवर एवढे प्रेम एवढे वरचढ आहे की सोन्याच्या बाजारपेठेतील जागतीक किमतीची चढ उतार भारतातल्या लग्नांच्या मोसमावर ठरते, आणि सोन्याने तुम्हाला वेडे केले आहे टिकेनी म्हटले तरीही, भारतीयांना आपल्या पाठीवर शाबासकीची थाप पडल्यासारखे कौतुक वाटते.

ऐतिहासिक काळापासून जागतीक व्यापारात निर्यात करण्याच्या बदल्यात भारतीय व्यापारी आणि जनतेने इतर वस्तु घेण्या पेक्षा सोने घेण्यासच प्राधान्य दिले असावे. भारतीय जनतेची सोन्याची मागणी पुर्ण करु शकेल इतपत प्रमाणात सोन्याच्या खाणी भारतात बहुधा इतिहासात सुद्धा राहील्या नसाव्यात, तरीही भारतीय एवढे सोने मिळवत आणि बायकांना आणि देवांना दागिन्याने मढवत कि अफगाणी लूटारुंनी भारतावर सातत्याने हमले केले. बाबराचे आत्मचरित्र र्रेकॉर्डेड आहे आणि तो त्यात भारतात सोन खूप आहे ते मिळवण्यासाठी भारतावर स्वारी करु इच्छित असल्याचे स्पष्ट नोंदवले आहे अर्थात वर म्हटल्याप्रमाणे अफगाण लुटारुंचे सुवर्ण प्रेमाचे स्वरुप संपत्ती प्रेमाचे राहीले असावे. अगदी ब्रिटिश इस्ट इंडीया कंपनीच्या उत्तरार्धा पर्यंत त्यांना त्यांच्या मालाचा मोबदला असो का राजे लोकांचा कर असो तो सोन्याच्याच स्वरुपात चुकवावा लागत असे, आणि भारतीयांच्या सुवर्णप्रेमाने ब्रिटीशही हवालदिल होत.

जोपर्यंत भारत निर्यात अधिक होती आयातीची गरज नव्हती तोपर्यंत चालुन गेले, वसाहत-उत्तर काळात भारताची निर्यात कमी झाली इतर आयात वाढली पण त्यासोबत सोन्याची आयात सातत्याने चालत राहीली म्हणजे परदेशात विकुन निर्यातीचा पैसा मिळवून भारतीय लोक सोन्याची ऐश करत होते त्या एवजी भारतीय सोन्याची ऐय्याशी चालू ठेवण्यासाठी भारतातला पैसा आम्ही परकीयांना देऊ लागलो आणि आजही हे चालुच आहे.

भारतात शेती जशी वाढत गेली तसे धर्मग्रंथात काहीही लिहिले असो शेती नांगरण्यास बैल लागतात आणि म्हणून भारतीयांनी बदलत्या काळानुसार गोहत्या बंदीचा आग्रह भारतभर स्विकारला. पण सोन्याच्या बाबतीत रामायणात सुवर्ण मृगाची कथा येते तर बौद्ध जातकांमध्ये मेल्यावरही सुवर्ण पिसे लेऊन येणार्‍या पती आणि सुवर्णप्रेम न संपणारी त्याची विधवा रुपक कथेतून सुवर्ण प्रेमाची मर्यादा सांगण्याचा धार्मिक ग्रंथांनी उल्लेख केले पण भारतीय स्त्रीने त्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष करुन सुवर्ण प्रेमाचा वारसा शतकोंशतके व्यवस्थीत जपला, मग तिकडे रिझर्व बँकेचा गवर्नर आणि देशाचे अर्थमंत्रालय त्यांच्या समोर येणारे पेच कसे का सोडवेनात.

पैसा शक्यतो कर भरलेला असावा, पण एकवेळ कर न भरलेला पैसा असेल तरी चालेल तो किमानपक्षी देशात रहायला हवा, सोन्याच्या आयातीसाठी देशातून जो पैसा मोजला जातो तो साराच्या सारा देशा बाहेर जातो. बरे या सोन्याच्या आधारावर काही चार उत्पादने घेतायेतील कारखानदारी वाढेल असे काही नाही, वाढतातती सोन्याची दुकाने आणि सोन्याचे स्मगलींग आणि बेकार चोरांकडून नित्याच्या सोनसाखळीच्या चोर्‍या. स्वदेशीचा आग्रह धरताना भारतीय माणूस सोन्याच्या बाबतीत स्वदेशीचा आग्रह धरताना दिसत नाही, सोन्याची गोष्ट आली की आमचे देशप्रेम का कोण जाणे बरेच पातळ होते. युरोमेरीकन ज्या वस्तुंची गरज आहे त्या उत्पादक देशांवर स्रोत मिळवण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हुकुमत तरी गाजवतात भारतीय तेही करत नाहीत.

आमेरीकेत जाऊन आलेल्या काही महिलांना आपापसात बोलताना ऐकलय की तिकडे असताना सोन्याचे दागिने घेण्याचा घालण्याचा तेवढा मोह होत नाही पण भारतात आले की सोन्याच्या दागिन्यांचा पुन्हा मोह होतो. म्हणजे दोष त्यांचे भार्तीय स्त्री असण्याचा नसावा आमेरीकेच्या हवेत नसलेला काही दोष भारताच्या मातीत, पाण्यात किंवा भारतीय हवेत असेल का ? कि भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम याचे अजून काही वेगळे रहस्य असेल.

संस्कृतीसमाजअर्थकारण

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

26 Feb 2016 - 10:16 am | श्रीरंग_जोशी

भारतीयांच्या सोने खरेदीच्या वेडापायी गेल्या काही वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच ताण पडतोय. सरकारने आयात कर वाढवला तर पुन्हा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु झाली :-( .

भारतात बँकांच्या लॉकर्समध्ये वर्षानुवर्षे पडून राहणारे सोने त्यांच्या मालकांनी विकल्यास देशांतर्गत सोन्याचे व्यवहार वाढून सोन्याची आयात कमी होऊ शकते असे मला वाटते.

सोन्याचे भाव खूप वाढोत जेणे करून खरेदी करण्यापेक्षा असलेले सोने विकण्याचा मोह भारतीय लोकांना अधिक व्हावा (असा एक भाबडा आशावाद).

लेखाशी आणि श्रीरंगजीच्या प्रतिसादाशी सहमत.

मार्मिक गोडसे's picture

27 Feb 2016 - 6:13 pm | मार्मिक गोडसे

भारतात बँकांच्या लॉकर्समध्ये वर्षानुवर्षे पडून राहणारे सोने त्यांच्या मालकांनी विकल्यास देशांतर्गत सोन्याचे व्यवहार वाढून सोन्याची आयात कमी होऊ शकते असे मला वाटते.

ह्यावर हा उपाय आहे.

प्रदीप साळुंखे's picture

26 Feb 2016 - 10:25 am | प्रदीप साळुंखे

सुवर्ण अलंकारांनी भारतीय स्त्री विदेशी स्त्रियांपेक्षा सुंदर दिसते.

भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम याचे अजून काही वेगळे रहस्य असेल.

हजारो वर्षापासून हे चालू आहे.
रहस्याचा शोध घ्यावा लागेल.

माझ्यासारख्या काही चक्रम असतात. लग्नात एकदा घातलेले दागिने दुसर्‍यांदा मुलाच्या मुंजीत घातले मग पुन्हा लॉकरमधे गेले. आता मुलांच्या लग्नात दोघांना देऊन मोकळी होईन. म्हणजे लॉकरचे भाडे भरायला नको. सोन्याच्या बांगड्या घातल्या की बांगड्या बदलत रहाव्या लागत नाहीत म्हणून त्या सोय म्हणून वापरते. पण लोकांचा सोन्याचा सोस बघितला की एवढे काय आवडते ते कळत नाही. प्रचंड दागिने घातलेली बाई बघितली की मलाच उकडायला लागते.

1

1

माहितगार's picture

26 Feb 2016 - 2:54 pm | माहितगार

स्त्रीयांच्या नावावर प्रॉपर्टी असावीच क्रेडीबल चांगल्या कंपन्यांचे शेअर्स, शेत जमिनी, कमर्शीअल आणि इतर प्रॉपर्टीज मध्ये त्यांनी जरुर शेअर जोपासावयास हवा. समुदाय विशेषाला लक्ष करावयाचे नाही पण माझ्या बालपणी काही काळ स्त्रीयांमध्ये डोक्यात प्लास्टीकची फुलेही माळण्याची फॅशन येऊन गेली असेल - मला आठवते एका विशीष्ट समुदायाच्या स्त्रीया सोन्याने रोजच्या जगण्यातही लदबदलेल्या आणि फॅशनचीही हौस पुरवण्यासाठी घरच्या कुंडीत असलेले गुलाबाचे फुल न वापरता आंबाड्यात प्लास्टीकच्या गुलाबाचा (भयानक) अवतार! इकॉनॉमिक्स नंतर शिकलो पण माझ्यात या कारणावरून अल्पसा स्त्रीआभूषंणांविषयी पुर्वग्रह राहीले असण्याची शक्यता नाकारत नाही.

पहिल्या फोटोतली कन्या मल्लू असणार, नायर वैगरे. त्यांच्याकडे मुलींना किलोच्या हिशोबात सोनं देतात.

पैसा's picture

27 Feb 2016 - 11:59 am | पैसा

दोन्ही मल्लू.

अगदि सेम.मीहि अशीच वैतागलीये.

श्रीरंग_जोशी's picture

26 Feb 2016 - 11:48 pm | श्रीरंग_जोशी

आपल्या अवतीभवतीची आणखी काही उदाहरणे.

सांप्रत काळात पुरुषांनी अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालण्याची समानतावादी सामाजिक सुधारणा परिणामकारकपणे राबवण्याचे श्रेय (माझ्या माहितीप्रमाणे) स्व. रमेश वांजळे (माजी आमदार खडकवासला विधानसभा मतदारसंघ) यांच्याकडे जाते.

त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूणारे आणखी दोघे
श्री सम्राट मोझे

श्री दत्ता फुगे

माझ्या निरिक्षणाप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा सकाळ संध्याकाळ जप करणार्‍या राजकीय पक्षाचे सदस्य या समानतावादी सामाजिक सुधारणा करण्यात आघाडीवर असतात. बाकीचेही काही प्रमाणात हातभार लावताना दिसतातच.

चांदणे संदीप's picture

27 Feb 2016 - 1:23 am | चांदणे संदीप

श्री. दत्ता फुगे यांनी जेव्हा नुकताच सोन्याचा शर्ट घातला होता, तेव्हा हे नकळत लिहिल गेलं होतं....

"कसा घालू मी सोन्याचा शर्ट अंगात,
तीन दहाच्या नि एक वीसची फाटकी नोट पाकिटात!"
;)
असो, असलंच लिहिलं जाणार आमच्याकडून.

Sandy

श्रीरंग_जोशी's picture

27 Feb 2016 - 1:29 am | श्रीरंग_जोशी

तुम्ही तर शब्दप्रभू. सोन्याचे काय आज आहे, उद्या नाही. शब्द तर कायमच राहणार....

बाकी "सोन्याचा शर्ट घातला होता" यावरून एक संवाद आठवला.

कोन कुठला सोन्या, त्याची न आपली, वलख ना पालख...
आता तो सोन्या, त्याचा शर्ट आपल्याला कशापाई देईल?

- यदाकदाचित नाटकातून साभार...

अभ्या..'s picture

27 Feb 2016 - 12:17 pm | अभ्या..

च्यायला दळभद्री तरी कसे म्हणावे असल्या डोहाळ्यांना.
चड्डी बनेल बी सोन्याच्या घालायचा किनै.
मध्ये पुण्यात असलेच एक कॅरेक्टर पाहिलेले. विदाऊट गोल्ड ५० किलोच्या वर वजन नसेल पण असा ताठून चालत होता गडी. अरारारारारा. शर्ट, घड्याळ, ब्रेसलेट, कडे, माळा, गॉगल एवढेच काय बुटाच्या टोकांना पण सोन्याने मढवले होते.

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2016 - 4:14 pm | पिलीयन रायडर

आपण बावळट दिसतो हे कळत नाही का ह्या लोकांना..

काय ते ध्यान...

माहितगार's picture

2 Mar 2016 - 4:40 pm | माहितगार

+१ :)

विवेकपटाईत's picture

27 Feb 2016 - 5:33 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. त्या सोबत सोने हि मिळाले असते तर...

त्या सोबत सोने हि मिळाले असते तर...

=))

जव्हेरगंज's picture

27 Feb 2016 - 7:03 pm | जव्हेरगंज

शीर्षक वाचून मला वाटले एखाद्या भारतीय स्त्रीची प्रेमकथा वगैरे असेल :)

सोंड्या's picture

29 Feb 2016 - 6:36 am | सोंड्या

कोन बोल्तो सोना फक्त लेरीज बायकांची वस्तू हाए.
गल्यात चार-पाक चेनी आनी दारान काॅर्पिओ आसल्यावच दाद्या शेठ शोबतो

साईबाबा, तिरूपती बालाजी ह्या आणि अशाच गडगंज श्रीमंत देवस्थानांना पंतप्रधानांनी सोनं देण्याचं आवाहन केलं होतं पण पुढे त्याचं काय झालं माहित नाही. ते सोनं जरी बाहेर आलं तरी सोन्याची आयात करावी लागणार नाही!