अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वाचनालयास, 'स्त्रीया परक्या'

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
11 Nov 2014 - 1:25 pm

स्त्रीयांनी धार्मीक संस्कृतीच जतन करावं मात्र इतर क्षेत्रांएवढच शिक्षण क्षेत्र स्त्रीयांपासून कसे दूर ठेवले जाईल याचा प्रत्येक प्रयत्न प्रत्येक धर्मातील धर्ममार्तंड करत असतात किंवा केलेला असतो. सध्या बातम्यात येत आहे ती अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे वाचनालय ज्या मुख्य वाचनालयात सर्वाधिक पुस्तकांची उपलब्धता आहे त्या मौलाना आझाद वाचनालयात मस्जिदी प्रमाणेच प्रवेश बंद आहे. हा प्रवेश बंद असणे हि गोष्ट नवीन नाही. नवीन हे आहे कि विद्यार्थीनी वाचनालयात भेदभाव विरहीत प्रवेश मागत आहेत आणि कुलगुरू विद्यार्थिनी आल्या तर पुरुष विद्यार्थी वाचकांच्या भेटी वाचनालयाला वाढतील आणि बसण्यास जागा पुरणार नाही असा अजब तर्क देतात त्या वाचनालयातील बसण्याच्या जागांची संख्या आहे तब्बल १२००.

संदर्भ टाईम्स ऑफ इंडिया वृत्त आणि फर्स्ट पोस्ट

धर्मशिक्षणबातमी

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

11 Nov 2014 - 1:35 pm | बॅटमॅन

त्या विद्यापीठाचे ते स्वातंत्र्यच आहे असे म्हणून मूग गिळायला पाहिजे होता एव्हाना काही लोकांनी. गिळलाही असेल, दुसरी अपेक्षाच काय म्हणा त्यांच्याकडून.

hitesh's picture

11 Nov 2014 - 2:05 pm | hitesh

तेच की !

बरं झालं ब्याटवुमन असा आयडी घेतला नाही ते. नाहीतर मूग गिळुन गप्प बसावे लागले असते.

काय झालं उद्दामसाहेब, गिळलेले मूग पचले नाहीत वाट्टे?

नाखु's picture

12 Nov 2014 - 11:43 am | नाखु

पचले नाहीतच शिवाय त्या "अपचना"चा दरवळ धाग्या धाग्यात वाहू$$$न राहिलाय.
सबब बॅट्या तु रुमाल बांध कसा!!

कानाबरोबर नाकावरही घट्ट कानटोपीवाला
ना.खु.

hitesh's picture

11 Nov 2014 - 1:36 pm | hitesh

शनीशिंगणापुरच्या चौथर्‍यावरही स्त्रीयांना बंदी आहे ना ?

शनिशिंगणापूर आणि विद्यापीठ यांत साम्य का बघताय.
शनिशिंगणापूर चे मंदीर हा ऑप्शनल असू शकते .विद्यापीठ हे त्या भागातील विद्यार्थ्यांना नाईलाज असतो.
अवांतरः तीस/पस्तीस वर्षाम्पूर्वी लिलीलेल्या."कोसला" तला साम्गवीकर सतत आठवत रहातो

नाईलाज कसला हो ज्ञानाची भुक नसलेली पोर ही.
आम्ही तर ज्ञानात वाढ व्हावी यासाठी आमच्या व्यतिरीक्त दुसर्या विद्या मंदिरात ही जाउन बसायचो.
आणि त्या निमीत्ताने ज्ञानाची देवाणघेवाण व्हायची
विचारांच्य कक्षा रुंदायच्या
आणि बरचं काय काय व्हायचं

माहितगार's picture

11 Nov 2014 - 3:38 pm | माहितगार

मारवाजी एकच प्रतिसाद दोनदा चारदा देण्यासाठी कोणत सॉफ्टवेअर वापरताय :) (ह. घ्या)

hitesh's picture

11 Nov 2014 - 2:08 pm | hitesh


मशिदीत स्त्रेयाम्ना प्रवेश नसतो हा उल्लेख मात्र खटक्ला.

स्त्रीयाना मशिदीत जायची परवानगी आहे.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 2:35 pm | माहितगार

शिंगणापूरात आणि येथे समान संधीच्या बाबतीत आम्हालातर कै फरक कधी नै दिसला. समान संधी प्रकारात बहाई धर्म सर्वात उदार समजलाजातो म्हणे तेथे सुद्धा स्त्रियांना धर्मगुरु होता येत नाही म्हणे !

पैसा's picture

11 Nov 2014 - 3:03 pm | पैसा

बायकांसाठी वेगळी मशीद कुठे कुठे असते असे माझ्या एका मुस्लिम सहकार्‍याने सांगितले होते.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 3:17 pm | माहितगार

कल्पना आहे, लेखातील उल्लेख प्रार्थना स्थळातील प्रार्थनेतील समानसंधी संदर्भाने आहे. महिलांसाठी वेगळे प्रार्थना स्थळ आणि दलितांसाठी वेगळे प्रार्थनास्थळ फरक काय हो ? जाती आधारीत भेदाभेद तो जाती आधारीत भेदाभेद पुरुषांची जात निराळी आणि स्त्रीयांची जात निराळी हा नियम लावला की काम झाले.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 3:24 pm | माहितगार

बायकांसाठी वेगळी मशीद कुठे कुठे असते असे माझ्या एका मुस्लिम सहकार्‍याने सांगितले होते.

बादवे, मिपावर वेगळा अनाहिता कट्टा आहे तसे वेगळी प्रार्थनास्थळे असण्यास हरकतही नाही म्हणा.

बाळ सप्रे's picture

11 Nov 2014 - 2:11 pm | बाळ सप्रे

अशा धर्माशी निगडीत कुठल्याही संस्थेला कुठलीही सरकारी मदत/ पैसा मिळता नये.. मग काय ते करा आपापले नियम..
सरकारी पैशावर असा माजोरीपणा ??

hitesh's picture

11 Nov 2014 - 2:24 pm | hitesh

अलिगढ विद्यापीठ म्हणजे मेरे मेहेबुब षिनेमातले ना ?

असल्या रोम्यान्ट्क कॉलेजात लायब्ररीत कोण करंटा जात असेल !

माहितगार's picture

11 Nov 2014 - 2:38 pm | माहितगार

असल्या रोम्यान्ट्क कॉलेजात

जेथे बै नै तेथे रोम्यान्स ? आम्हासी अजब हे निरुपण !

>>जेथे बै नै तेथे रोम्यान्स ?

ज्याची त्याची आवड!! ;)

माहितगार's picture

11 Nov 2014 - 2:50 pm | माहितगार

नाविलाज को क्या विलाज अशी काही महन आहे महने

हे काय नविन आहे का माहितगार भौ तुम्हास्नी ?

माहितगार's picture

11 Nov 2014 - 3:31 pm | माहितगार

माहितगार माहित नसलेल्या गोष्टीत अनभिज्ञ असतो आणि आपल्याला रस नसलेल्या काहीकाही गोष्टींबाबत अनभिज्ञताच बरी असते. आणि म्हणून आपला उल्लेख आम्हाला कल्लाच नै .

>>हे काय नविन आहे का माहितगार भौ तुम्हास्नी ?
त्यांना माहीत असो नसो, तुम्हाला मात्र बरीच माहीती असल्यासारखा प्रतिसाद वाटला !! =)))) *DASH*

हे काय नविन आहे का माहितगार भौ तुम्हास्नी ?

माहितगार's picture

11 Nov 2014 - 3:33 pm | माहितगार

मारवाजी येकच प्रतिसादाच द्वित्त कै है ? है कै ? या धाग्यावर तस कै नै बाबा, या धाग्यावर सोताचा त्यो धागा इसरुन चुकूनशान आल्यात अस दिसतय.

फक्त त्याना लायब्रीत जाता येत नाही. बागेत वगैरे मुली मुले जाऊ शकतात तर मुलानी तिथे जावे. लायब्रीत का बसाबॅ ? असे मला सांगायचे आहे.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 8:45 pm | माहितगार

त्ये को एजुकेशन मधून नै हो. मुलींसाठीच्या वेगळ्या कालेजातन हाय. मिपावर अनाहिता गट हाय पण सोबत समद्या संगबी चर्चा लेखन करता येत न्हव का ? पण अलिगढात ३ किलोमीटरच अंतर ठेऊन बसत्यात म्हने, आता तुम्ही म्हनशान ३ किलोमीटराच अंतर बी काय अंतर झाल ? र्‍हिदयात अंतर नसल म्हणजे झाल पण र्‍हिदयात अंतर हाय म्हणून तर वाचनालयाचे दरवाजे बंद हायेत बायांना अशी बायांचीच तक्रार हाय म्हनं.

पैसा's picture

11 Nov 2014 - 3:03 pm | पैसा

शबाना आझमी आणि जावेद साहेबांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 3:27 pm | माहितगार

त्यंचा मिपा आयडी कंचा ?

पैसा's picture

11 Nov 2014 - 8:22 pm | पैसा

असले पट्टीचे विचारवं(जं)त मिपावर नको ब्वा! मी आप्ले टीव्हीवर कुठे दिसतात का ते बघत होते!

प्रसाद१९७१'s picture

12 Nov 2014 - 4:50 pm | प्रसाद१९७१

अश्या गोष्टीवर ते विचार जंत लगेच गप्प बसतात पैसा ताई.

शिद's picture

11 Nov 2014 - 7:26 pm | शिद

धर्मनिरपेक्ष व स्त्रीमुक्तीवादी विचारवंताच्या प्रतिक्षेत.

माहितगार's picture

11 Nov 2014 - 8:40 pm | माहितगार

मी पयला ( आपणास प्रतिसाद देणार्‍यात)

स्पंदना's picture

12 Nov 2014 - 4:32 am | स्पंदना

आज टीव्हीवर बातमी पाहिली त्यानुसार ज्युनियर कॉलेजच्या मुलींना युनिवर्सीटीत येउ नका अस सांगितलं आहे ना की मुलींनी येउ नये. युनिवर्सिटीत ऑलरेडी प्रोफेशनल कोर्सेस करणार्‍या इतर सर्व विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश आहे ज्यात मुली सुद्धा येतात.
बोलताना ते महाशय थोडेसे विनोदी मोडमध्ये जाउन २००० मुलींपाठोपाठ ४००० मुले येतील अस म्हणताहेत, ते सुद्धा ज्युनिअर्स अजुन मौज मजेच्या मोड मध्ये असल्याने मुलींपाठी मुले येतील अस आहे.

माहितगार's picture

12 Nov 2014 - 9:13 am | माहितगार

कोणत च्यानल म्हणताय ? ग्रॅज्यूएशनचा अभ्यास करणार्‍या मुला मुलींना ग्रॅज्युएशन सर्टीफिकेट मिळेपर्यंत अंडर-ग्रॅज्युएट म्हणतात. पीएचडी नसलेले सगळे एका अर्थाने ज्युनीयर म्हणावयाचे असतील तर भाग वेगळा. ज्युनीयर कॉलेजचा अर्थ आपण ११ वी १२वी घेतो. अलिगढ मु. विद्यापीठात मुली आवाज उठवताहेत त्या अंडर-ग्रॅज्युएशनच्या म्हणजे ग्रॅज्युएशन करत असलेल्या १) त्या अर्थाने त्या ज्युनीयर कॉलेजच्या नाहीत. २) अंडर-ग्रॅज्युएशनच्या मुलांना ते वाचनालय अ‍ॅक्सेस करता येत आहे मुलींना करता येत नाही म्हणजे डिस्क्रिमिनेशन निश्चीत आहेच ३) मुलींसाठी जे काही स्वतंत्र वाचनालय आहे हे मुख्य वाचनालयाच्या तोला मोलाच नाही, अस आंतरजालावरील बातम्यातून दिसतय संदर्भ इंडीयन एक्सप्रेस

हे व्हिसी महाशय जरा जास्तच विनोदी असावेत या पुर्वीच्या बॅचच्या मुलींनी वाचनालयाच्या अ‍ॅक्सेसची मागणी केली तेव्हा मुलींच्या सुरक्षीततेची जबाबदारी पालक म्हणून तुम्ही घेणार का ? असे उलटे पत्र ४००० मुलींच्या पालकांना या विनोदी व्हिसी महाशयांनी पाठवले होते असे मी वाचलेले इंडीयन एक्सप्रेसचे वृत्त म्हणते.

आमच्याकडे सक्काळी सक्काळी ७ वाजता एनडीटीव्ही च्या बातम्या लागतात, त्यात ऐकलं होतं जी.
आता तुम्ही दिलेली माहिती वाचुन या महाशयांचा पंक्तीप्रपंच अन पत्रप्रपंच दांडगा दिसतो आही.