स्त्री विषयक 'शुचितांचे प्रकार: (प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता इ.) आणि समकालीन प्रयोजन (?)

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
3 Feb 2016 - 12:27 pm
गाभा: 

खरे म्हणजे ज्यांना कमी शब्दात हवे पण रुपक शैली चालते त्यांच्या साठी हा विषय जरासा अप्रत्यक्ष पद्धतीने मी माझ्या जुन्या जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन धागा लेखातून मांडलेला आहे. अलिकडच्या काळात मिपावर काशीबाई ते मस्तानी; स्त्री पोषाख आणि संस्कृती ते पॉर्न अशा विषयांवर मनमोकळी चर्चा झाली आहे. तेव्हा कदाचित याही विषयावर मनमोकळी चर्चा होऊन या विषयावरील चर्चेत अधिक लोकांना सहभागी करून घेणे शक्य असल्यास पहावे म्हणून हा चर्चा विषय मिपा वाचकां पुढे ठेवतो आहे.

- हा धागा लेख वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? आणि स्त्रीयांच्या प्रती यू अ‍ॅटीट्यूड अर्थात श्रोताभिमुख अभिवृत्ती या धागालेखांना समजून घेणे कदाचित उपयूक्त होऊ शकेल.

खुलं खुलं आभाळ तसा..
मीही खुला खुला..
दारं, खिडक्या, भिंती यांची..
सवय झाली तुला..
-कवीवर्य ज्ञानेश वाकुडकर
मनाच्या खुलेपणा बद्दल कवीवर्य ज्ञानेश वाकुडकर विचारत असलेल्या प्रश्नातील दारं, खिडक्या, भिंती या मानवी मनांच्या भिंती आहेत आणि या भिती जगातील अर्ध्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्येवर अन्याय्य असतील तर आम्ही आमच्या मनातील अनावश्यक आणि अन्याय्य पडदे आणि भिंतीं दूर सारू शकू का हा मानवी संस्कृतीच्या सुसंस्कृतपणाच्या प्रगतीसाठीचा महत्वाचा टप्पा असू शकेल का ?

शुचिता शब्दाचा ज्या पद्धतीने स्त्री विषयक वापर होतो त्या बद्दल शब्दार्थ आंतरजावर दिसले तरीही नेमकी व्याख्या दिसली नाही, कुणि व्याख्या नमूद करण्यात साहाय्य करू शकल्यास हवे आहे. खाली एका प्रतिसादात शुचिता शब्दाचा अर्थ पावित्र्य असा दिला गेला आहे. मागच्या एका धाग्यात कामभावना कागदांवरच्या रेषेत नसते ती माणसाच्या मनात असते असा रजनीशांचा संदर्भोल्लेख आलेला आहे त्याच पद्धतीने पावित्र्य हे स्त्रीच्या शरीरात असते का माणसाच्या मनात असते ? एकनिष्ठतेची व्याख्या पावित्र्य अशी करावयाची आणि कुटूंब या टिम युनीटच्या गरजे पलिकडील एकनिष्ठता लादायची असे काही होते आहे का ? या लेव्हलला जरासा अवघड प्रश्न विचारतो -दुखावले जाऊ नका- आमची संस्कृती विवीध मानवेतर प्राण्यांनाही पवित्र मानते आणि हे प्राण्यांबद्दलचे पावित्र्य स्विकारताना त्यांचे शरीरसंबंधांचे स्वरूप जर आड येत नसेल तर स्वतः मानवी स्त्री बाबत तसे ते आड का यावे ?

मानवी संस्कृतीत समुह, प्रांत, देश, संस्कृती, पंथ, धर्म, भाषा इत्यादी पैकी ज्या कोणत्या म्हणून ओळखी एखाद्या स्त्री (अथवा स्त्री समुहास) लागू पडतात त्यानुसार सर्वसाधारणपणे शुचितेच्या कोणत्या न कोणत्या प्रकाराची अपेक्षा स्त्रीयांकडून केली जाताना दिसते. या सर्व शुचिता वरकरणी एकाच प्रकारच्या वाटत असल्यातरीही त्यात उपप्रकार असतात का ? जसे की, प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता, सांस्कृतीक शुचिता, पांथिक शुचिता, धार्मीक शुचिता इत्यादी -यात एका IVF हॉस्पीटलच्या जाहीरातीत एका नव्या शुचितेची भर पाहिली ती म्हणजे अंड-शुचिता जाहीरातीत मॅरेज सर्टीफीकेट आणि नवरा सोबत असणे आवश्यक असे काहीसे लिहिले होते असो- आणि त्या काळ स्थळ, परिस्थिती, नाते समुहानुसार बदलत्या असणार. या विवीध शुचितांना बराच मोठा इतिहास, मिथके, परंपरा, पुस्तकी आदेश, कौटूंबीक आदेश, समुहाचे आदेश, जोडीदाराचे आदेश, मुलांचे आदेश इत्यादी असणार हे ओघाने आलेच. अशा या विवीध शुचिता प्रकारांचे स्त्रीया कधी स्वप्रेरणेने अथवा सवयीचा अथवा आदेशाचा भाग म्हणून पालन करत असतात (अधाशी मिश्यांच्या तालावर नाचत असतात), कुठे कसूर झाल्यास प्रसंगी विवीध प्रकारच्या शिक्षांना अथवा प्रतारणेस -सौम्य ते आघोरी- सामोर्‍या जाताना दिसतात. या अशा विवीध शुचितांचे मराठी/महाराष्ट्रीय/भारतीय/जागतीक स्त्रीवर समकालीन प्रभाव काय आहेत त्यांचे प्रयोजन काय आहे किंवा रादर प्रयोजन शिल्लक आहे का ?

मी शुचितांचे वेगवेगळे प्रकार सुचवले आहेत त्यात योनी शुचिता हा प्रकार सर्वसाधारण पणे माहित असतो, पण पारंपारीक भारतीय संस्कृतीत स्त्री कडून केवळ योनी शुचिता शरिर शुचिता या प्रकारांच्या पलिकडे जाऊन मनो शुचितेचीही अपेक्षा केली जाते. खरे म्हणावयाचे झाल्यास मनो शुचितेची अपेक्षा केवळ स्त्री कडूनच नाही तर विशीष्ट परिस्थीत पुरुषांकडूनही केली जाताना दिसते परंतु ह्या धाग्याचा उद्देश स्त्री पर्यंतच मर्यादीत ठेवायचा आहे. कुटूंब हे युनिट खेळातील एका टिमच्या समकक्ष समजले तर आपली टिम यशस्वी व्हावी म्हणून टिमच्या ध्येया प्रती लॉयल्टी ठेवणे अथवा लॉयल्टीची अपेक्षा -जी परिस्थीती सापेक्ष आणि केवळ कौटूंबिक टिमप्लेयर म्हणुनच्या केवळ आवश्यक कर्तव्यांपुरती मर्यादीत आहे - ठेवणे यात काही गैर नसावे. पण अशा मर्यादीत उद्देशाच्या लॉयल्टीच्या पलिकडे जाऊन मनो शुचिता, प्रेम शुचिता, योनी शुचिता, कुटूंब शुचिता, सांस्कृतीक शुचिता, पांथिक शुचिता, धार्मीक शुचिता व्यक्ति स्वातंत्र्याचा बळी देऊन लादल्या जाण्याची खरेच गरज असते का ? किमान समकालीन व्यक्तिस्वांतत्र्याच्या काळात त्यातील टाकाऊ मुल्ये कोणती याचा शोध घेतला जाऊ शकेल का? हा ह्या धागा चर्चेचा मुख्य विषय आहे.

एका मिथकात नहात असलेल्या आईच्या आदेशासाठी पूत्र पित्याशी लढतो, तर द्सर्‍या टोकाच्या एका मिथकात कुणी गंधर्व केवळ मनात आला म्हणून -मनो शुचिता- वडलांचा आदेश मानावयाचे टोक गाठत एका आईची हत्या पुत्राकडून घडवली जाते , तर दुसर्‍या एका धर्मात धार्मीक नियमानुसार अधिकृतपणे घटस्फोटीत अथवा विधवा असल्यास पुर्नविवाह संमत आहे यात जिवनात टोकाची शरीर शुचिता दाखवत विवाहीत जोडीदारा- टूबी प्रिसाईज + वडील, सखखे भाऊ आणि स्वतःची मुले- शिवाय इतर कुणाला पुरुषास स्त्रीचे नखही दिसू नये अशी शरीर शुचिता + कुटूंब शुचिता आहे या पैकी कोणतीही शुचिता मोडली तर अगदी दगडाने ठेचून मारले जाऊ शकण्याची -काही ठिकाणी अ‍ॅसीड, नाक कापणे ऑनर किलींग, जेनीटल म्युटीलेशन - अशा अमानुष शक्यताही नाकारता येत नाही, एका ठिकाणि वडील, सखखे भाऊ आणि स्वतःची मुले सारे समोर असले तरीही स्त्रीला दगडाने ठेचले जाऊ शकते दुसर्‍या केसमध्ये एक मुलगा आपल्याच आईला मारतो आहे (स्त्रीवर अत्याचार होतोच पण तीच्या मुलांच्या मनावर कोण अत्याचार होत असतील कोण जाणे ?) अशा एका धर्मात पुर्नविवाह मान्य असल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या योनी शुचिता नाही मग कुटूंब आणि शरीरदृष्य शुचितेच्या टोकाच्या आग्रहाचे कारण काय असावे ? या मानवी वृत्तीच्या मागे नेमके काय आहे ? स्त्रीने कुटूंबातील टिमप्लेयर म्हणून कर्तव्ये यथायोग्यपणे पार पाडल्यानंतर ती बाहेर कुठे पहाते या वरून पतीला-मुलांना-कुटूंबीयांना-समाजाला असुरक्षीत वाटण्यासारखे नेमके काय असते ? या मनोशुचितेचे आणखीही कंगोरे आहेत ते तपासण्या पुर्वी या स्टेजला एक नेहमी विचारली जाणार्‍या शंकेची/टिकेची दखल ती म्हणजे स्त्रीला शुचिता-बंधन स्वातंत्र्याची मागणी हि पुरषी आप्पलपोटेपणाच्या हावरटपणातून होत असते -काही पुरुषांची तशी अपेक्षा असेल पण कामभावना आणि आशा हि काय केवळ पुरुषांनाच असते का ? कामभावना आणि आशा स्त्रीयांना सुद्धा असते आणि त्यांच्या स्त्रीत्वाच्या त्या मानवी भावनांचा तुमच्या मनात विनाअट पावित्र्यराखून आदर केला असता या शंकेचे निरसन व्हावयास नको का ?- महत्वाचे म्हणजे हा धागा लेख कोणत्याही प्रकारे स्त्री देहाचे ऑब्जेक्टीफिकेशन, ट्रेड इन ह्युमन बीइंग्स, कोणतेही शोषण याचे समर्थन करत नाही, बुरखा ते विरुद्ध टोक या स्त्रीच्या पोषाख स्वांतंत्र्यावर अनावश्यक निर्बंधांचे समर्थन करत नाही.

उपरोल्लेखीत शंकेची दखल घेतल्या नंतर आपण मनोशुचितेकडे वापस येऊ, एखाद्या स्त्रीची अथवा स्त्री समुहाची त्यांच्या व्यक्तीगत निवडी अथवा लादल्या गेलेल्या परिस्थीतीवरून कुत्सीत अवहेलना आणि कुत्सित असलेले तथाकथित विनोद करणे आणि अशा अवहेलनेच्या वागणार्‍यांची समज योग्य समजून त्यांच्या भूमिकेतील त्रुटी समजावून न देता आपला (कुटूंबाचा/समुहाचा) ऑनर कमी झाला समजणे या दोन्ही परस्पर विरोधी भूमिका मनोशुचितेच्या ओव्हर द बोर्ड अ‍ॅक्टीव्हीटीचे लक्षण असतात की अजून कशाच्या ?

प्रेम शुचिता यात कुणावर कुठे केव्हा प्रेमकरू नये इत्यादी या विषयी बंधने अथवा बंधंनांचे मार्गदर्शन असते -यात अगदी नाते/जात/गल्ली/गाव शुचितेची अपेक्षा सुद्धा केलेली असू शकते म्हणजे जसेकी आपल्या नात्यात/जातीत/गल्लीत/गावात काय कमी मुले आहेत म्हणून अमुक तमूक गल्ली बाहेरच्या मुलावर प्रेम करते- ;

सांस्कृतिक शुचितेत संबंधीत संस्कृतीची बंधने स्विकारावी लागतात, अमुक दिवशी प्रेमव्यक्त करणे आमच्या संस्कृतीत
बसत नाही म्हणून तमुक दिवशी तुम्ही प्रेमव्यक्त करू नका, यातले दुसरे उदाहरण कर्नाटकातील एका मंदिरात अंधश्रद्धेने असेल पण स्वेच्छेने -इतर कुणासही आडवे न येता, कोणतीही शोषणाची बाजू नसताना, - पोषाखा शिवाय देवाची प्रार्थना आपखुशीने करणार्‍या स्त्रीयांचे व्यक्तिस्वातंत्र्यात उर्वरीत समाजाच्या सुसंस्कृतीच्या संकल्पनांसाठी हस्तक्षेप वाजवी ठरतो का ? (येथे काही राज्यांमध्ये स्त्रीयांना विशीष्ट परिस्थीत कमी कपडे वापरण्याचे जबरदस्तीचे बंधन होते याचे मुळीच समर्थन करावयाचे नाही स्त्रीने कोणता पोषाख करावा याचे अधिकतम स्वातंत्र्य देणे आणि जे काही स्वातंत्र्य स्त्रीने वापरले तदोपरांत तिचे कोणतेही शोषण अथवा अन्याय न करणे या खर्‍या सुसंस्कृत स्थितीला एक माणूस म्हणून तुम्ही आणि आम्ही पोहोचू शकतो का ?

पंथ आणि धार्मिक शुचितेत संबंधीत पंथ आणि धर्माच्या नियमांचे पालन करावे लागतेच त्या शिवाय गल्ली शुचितेप्रमाणे संबंधीत धर्मापलिकडचे मुलगे निवडण्यास परवानगी नसते. यात स्वखुशी आणि फूस लावणे यातील सीमा रेषेची व्याख्या मोठी कठीण असते खासकरून मुख्यशत्रूवत पंथ-धर्मा-गल्लीकडे लक्ष जाणे हा सर्वाधिक मोठा अपराध नाते/जात/गल्ली/गाव/पंथ/धर्म घटक समूहांच्या अधीक तीव्र अविश्वास आणि संघर्षांनाही कारणीभूत होऊ शकतो.

शेवटी तुमच्या/आपल्या कळत नकळत आपल्याकडून अन्याय होणारी स्त्री तुम्ही नाही आहात, तिचे व्यक्तीस्वातंत्र्य पायदळी तुडवण्यापुर्वी एक माणूस म्हणून तुमची ती कुणी लागत असते, जन्म एकच असतो का अधिक कुणी एकच म्हणते कुणी अधिक म्हणतात अधिक जन्म मिळणार असतील तरी या जन्मी आवडलेला माणूस तिला या जन्मीच हवा असू शकत नाही का? तुमच्या घरादाराची कुटूंबाची काळजी घेतल्यानंतर तिचे स्वतःचे काही भावविश्व तिला जगून पाहताच येणार नाही का ?

धागा लेखातील माझे मुख्य मुद्दे लिहून झाले आहेत. (अर्थात लेख पुढे चालून गरजेनुसार अद्ययावत करेन त्यामुळे जे आधी वाचन करतील त्यांना कदाचित पुढील भेटीत पुन्हा वाचण्याची इच्छा असल्यास ठिकच)

चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी आणि परस्पर व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी आभार

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

3 Feb 2016 - 12:45 pm | ब़जरबट्टू

पापकार्ण घेऊन तय्यार...

एका हजारी प्रतिसादाचे ताकद असलेला धागा.. :)

विजय पुरोहित's picture

3 Feb 2016 - 1:26 pm | विजय पुरोहित

सहमत....
भयानक लठ्ठालठ्ठी होणार या धाग्यावर...

प्रतिसादांना येण्यास जरा विलंब झाल्यामुळे तुमच्या भविष्यवाणी बद्दल साशंक झालो होतो आता काकासाहेबांचा प्रतिसाद आलाय आणि एकदाची धागा चर्चा वाहती झाली ! :)

संदीप डांगे's picture

3 Feb 2016 - 1:43 pm | संदीप डांगे

पॉर्नच्या धाग्यावरचा ह्या विषयाशी संबंधित प्रतिसाद चिकटवतो, बाकी इतर मुद्दे पुढे आले की चर्चा करुच.

मादी मिळवण्याच्या इतर प्राण्यांमधे व मनुष्यामधे असलेल्या पद्धतीतला फरक बघता एक गोष्ट लक्षात येते ती ही की इतर प्राण्यांमधे सक्षम नरालाच मादी मिळते, मनुष्यात 'सक्षम नर' ही संज्ञाच स्पष्ट नाही. मादी मिळवण्यासाठी इतर नरांशी युद्ध, स्वतःचे शरिर अधिक सुंदर करणे, उत्कृष्ट घर बांधणे इत्यादी प्रकार नाहीत. (मादीच्या मागे मागे फिरणे हे असले तरी ते खात्रीलायकरित्या मादी मिळण्यातच यशस्वी होईल असे नाही. एखादेवेळा मादी फसून संभोग होईलही पण लग्नास लायक असा तो नर नसेल तर कायम सुख अशक्य असते.) लायक नर नैसर्गिकरित्या निवडल्या जाणे व मादिने त्यास पसंती देऊन संग करणे हे होत नाही. हे का होत असावे बरे...?

माझ्या मते मनुष्य समाज दुर्बलांनाही संधी मिळावी ह्या विचारावर चालतो. कळपात एखाद्या नराचीच चलती असते. त्याला सर्व माद्या उपलब्ध असतात. त्याची मोनोपोली तोडायची असेल तर इतर नरांस त्याच्याशी द्वंद्व करावे लागते अथवा आपला वेगळा कळप तयार करावा लागतो. मनुष्याच्या कळपातही आधी असेच असावे, पण जास्त अक्कल व कमी बळ असल्याने त्यावर त्याने सर्वांना संधीची समान उपलब्धता या नावाखाली लग्नप्रकार शोधून् काढला असावा. मादींसाठीच्या भांडणात आपल्याच कळपाची शक्ती कमी होते हेही लक्षात आले असेल. कारण इतर प्राण्यांसारखी मनुष्याची लैंगिक वासना विशिष्ट काळाशी संबंधित नाही. ती २४बाय७ तयारच असते. (ह्यालाही नैसर्गिक कारण आहेच) पुढे स्थिरस्थावर झाल्यावर स्थावर मालमत्ता जमवण्यास सुरुवात झाली. मालमत्तेत सर्वाधिक जीव गुंतलेल्या मनुष्याने आपल्याच वारसाकडे ही मालमत्ता जावी म्हणून आपल्या स्त्रियांना इतर पुरुषांशी समागमास मज्जाव केला, त्यातून पातिव्रत्य जन्मास आले. एकाच पतीशी एकनिष्ठ राहणार्‍या स्त्रीस प्रतिष्ठा मिळू लागली. अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणार्‍या पुरुषास प्रतिष्ठा होती.

काही आदिवासी जमातींमधे, 'गोटूल' प्रथेत लग्न हा प्रकार होण्याआधी अनेक पुरुषांशी संग करण्यास स्त्रीला मोकळीक असते. काही आदिवासींमधे स्त्रीची गर्भधारणा करण्यास जो यशस्वी होईल त्यास पती होण्याची संधी मिळते. काहींमधे लग्न तर मुलांना मुले होईपर्यंतही टाळली जातात. ज्या समाजाचा स्थावर संपत्ती जमवण्यावर भर आहे अशाच समाजात लग्नसंस्था घट्ट व पातिव्रत्य परमपवित्र मानले जाते असं निरिक्षण आहे. आदिवासींमधे अशी स्थावर स्वामित्वाची भावना नसल्याने व कबिला म्हणजेच एक कुटूंब असे मानत असल्याने त्यांच्या पद्धती आधुनिक म्हण्वल्या जाणार्‍या समाजापेक्षा वेगळ्या आहेत.

तसेच लग्न झाले म्हणजे स्त्री वा पुरुष एकाच जोडीदाराशी कायम लॉयल राहिलच याची कोणतीही खात्री लग्नसंस्था देत नाही. लग्नसंस्था ही फक्त खोटी स्वप्ने दाखवून समाजातल्या मुक्त नैसर्गिकपणाला आवर घालून समाजनियंत्रणात ठेवण्यास जन्माला आलेली कृत्रिम व्यवस्था आहे. लग्नसंस्था ही समाजातल्या बहुसंख्य असलेल्या दुर्बळांनी संख्येने कमी असलेल्या बलाढ्यांना सामाजिक नियम रुढींच्या नावाखाली निष्प्रभ करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. उत्तरोत्तर दुर्बळांची संख्या वाढत गेल्याने दुर्बळांची ही व्यवस्थाच नैसर्गिक आहे असे बलाढ्यांनाही वाटायला लागले.

अधिकचे जोडलेले:
दुर्बळांची संख्या जास्त असल्याने त्यांनी बलाढ्यांनी आपल्या बायका पळवू नये, व्यभिचार होऊ नये, त्यातून वारसाचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूनही हे शुचितेचे नियम लादले असावे. यात बायकांवरचा अविश्वास नसून बायकांना कमोडिटी म्हणून वागवण्याचा प्रकार आहे. गायी-गुरांइतकीच किंमत घरच्या स्त्रीला दिली जात असे. गाई-गुरांच्या गळ्यात दोरखंड तर स्त्रीयांच्या गळ्यात मंगळसुत्र. मंगळसुत्राची कारणमिमांसा टनाटनवाल्यांनी कितीही गोंडस आणि वैज्ञानिक सांगितली तरी एखाद्या स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे पाहून बदलणारी नजर सर्व वैज्ञानिक सत्य सांगून जाते.

ब़जरबट्टू's picture

3 Feb 2016 - 4:46 pm | ब़जरबट्टू

प्रतिसाद आवडला ..

तुमच्या एकाच प्रश्नाची उत्तर देतो आणि थांबतो - खरे म्हणजे याचे उत्तर शुचितैनी द्यायला हवे.
शुचि म्हणजे पवित्र.. शुचिता म्हणजे पावित्र्य असे म्हणता येते. आणि आपण ज्या संदर्भात हे शब्द वापरले आहेत त्याला हे लागू देखील पडते.

बाकी चर्चेला आपला पास. सध्या वेळ नाही.

टवाळ कार्टा's picture

3 Feb 2016 - 2:41 pm | टवाळ कार्टा

सध्ध्या हे घ्या...लागते तर आणखी पाठवतो :)

petrol

अरे अरे अरे....मिपा सारख्या सभ्य वगैरे संस्थळावर स्त्रियांबद्दल अशी चर्चा पाहून डोळे पाणावले.

संदीप डांगे's picture

3 Feb 2016 - 7:44 pm | संदीप डांगे

अंग पुसायच्या टॉवेलने?

पैसा's picture

3 Feb 2016 - 7:57 pm | पैसा

काहीही हं सं. तो कॅलिको चा रुमाल आहे छान छान!

संदीप डांगे's picture

3 Feb 2016 - 8:06 pm | संदीप डांगे

आकाराने विकार निर्माण केला नाही तर आम्ही निर्विचारच होतो. =))

अजया's picture

3 Feb 2016 - 7:57 pm | अजया

रुमाल आहे हो.बघा की :)

काकासाहेब केंजळे's picture

3 Feb 2016 - 9:11 pm | काकासाहेब केंजळे

स्त्रीयांवर कुणीही योनीशुचिता लादलेली नाही, ती त्यांच्याकडे नैर्सगीकच आहे.
पुरुष वा नर हा नैसगीकच बुद्धीमत्ता, शाररीक क्षमता, सहनशिलता, यात स्त्री वा मादीपेक्षा वरचढ आहे.त्याची लैंगिक भावना स्त्रीपेक्षा शंभरपटीने अधिक आहे ,त्यामुळे त्याने स्वतःवर कोणतीच लैंगिक बंधने लादून घेतलेली नाहीत, त्याला आवडणार्या कोणत्याही व कीतीही स्त्रीयांशी रत व्हायला तो नेहमीच तयार असतो ,याउलट स्त्रीची लैंगिक ईच्छा अत्यल्प वा शून्य असते .त्यामुळे साहजिकच त्यांनी याला योनीशुचितेचा मुलामा देऊन पुरुषांपासून लांब राहयचा मार्ग म्हणून निवडले आहे.
पुरुष जात्याच उजवे असल्याने ते प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य उपभोगतात व स्त्रीया " आमच्यावर शुचीता लादली हो" चा टाहो फोडतात, खासकरुन अमेरीकन स्त्रीवादाने जगभर पाय पसरल्यापासून..

अभ्या..'s picture

3 Feb 2016 - 9:21 pm | अभ्या..

वॉव. काके तुस्सी तोप हो.

बादवे त्या मिपाच्या जिलेबीताईणा बोलवा पटकन. मिपाविषयक शुचितांचे प्रकार(आयडी शुचिता, धागा शुचिता, काकू शुचिता ई.) आणि समकालीन प्रयोजन नावाने कढई चढवा आता म्हणाव.

अरर र्र अर्धीच आली कमेंट. नो प्रॉब्लेम.
हिअर रिमेनिंग.

वॉव काके तुस्सी तोप हो.

इंडिअन मॅजिक की रोप हो.

हम पुरुषोंके स्वयंभू पोप हो.

आनेवाले सदियोंकी होप हो.

.
काका तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है.

संदीप डांगे's picture

3 Feb 2016 - 9:31 pm | संदीप डांगे

ते अमेरिकन स्त्रीवादाच्या विरुद्ध नेमका कोणता पुरुषवाद आणतायत ते कन्फर्म करा आधी, भविष्यातल्या योजनांवर पाणी फिरायचे नाही तर... ;-)

पक्षी's picture

4 Feb 2016 - 11:26 am | पक्षी

काका तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है.

काका हमारे नेता है..............!

सुबोध खरे's picture

4 Feb 2016 - 11:34 am | सुबोध खरे

अगदी अगदी

पैसा's picture

3 Feb 2016 - 9:50 pm | पैसा

तुमच्या प्रतिक्रिया वाचून थक्क होते दर वेळी. एका परिक्रमेला गेलेल्या आंतरजालीय मित्राची खूप आठवण येते हे सगळे वाचून.

बोका-ए-आझम's picture

3 Feb 2016 - 10:27 pm | बोका-ए-आझम

लहानपणापासून स्त्रियांच्या असलेल्या गोष्टींऐवजी नसलेल्या गोष्टींकडे बघण्याची अत्यंत सवय!
त्यांना आपलं म्हणा!

प्रदीप साळुंखे's picture

3 Feb 2016 - 10:35 pm | प्रदीप साळुंखे

त्याला आवडणार्या कोणत्याही व कीतीही स्त्रीयांशी रत व्हायला तो नेहमीच तयार असतो ,याउलट स्त्रीची लैंगिक ईच्छा अत्यल्प वा शून्य असते .

चाणक्यनीतीमध्ये याच्या नेमकं उलटं आहे.

तर्राट जोकर's picture

4 Feb 2016 - 12:06 pm | तर्राट जोकर

चाणक्य अमेरिकन स्त्रीवादाचा बळी होता, तुम्हाला काय माहित?

काकासाहेब, आदरपूर्वक साष्टांग नमस्कार.
पुरूषाची बुद्धिमत्ता स्त्रीपेक्षा किती सरस आहे हे आपण एकामागे एक जे सरस प्रतिसाद देत आहात त्यावरून दिसतेच आहे.
आता टंकनतसदी नाही घेतलीत तरी चालेल.

बोका-ए-आझम's picture

3 Feb 2016 - 10:36 pm | बोका-ए-आझम

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची ही काकारुपी पहाट तुम्ही अशी चोचवलेल्या काकडीसारखी कुस्करून टाकू नका मिपा बायकांनो!

काकासाहेब केंजळे's picture

3 Feb 2016 - 10:33 pm | काकासाहेब केंजळे

मिपाचे हे व्यवच्छेदक लक्षणच झाले आहे , ज्याचा प्रतिवाद करता येत नाही त्याची टिंगळटवाळी करत सुटणे,सरळ मान्य करुन टाकावं या माणसाचा आपल्याला प्रतिवाद करता येत नाही ते!

एक म्हणजे तुम्ही जे इथे लिहिता त्याला अर्थ असतो हे मान्य करावं लागेल आणि दुसरं म्हणजे, साॅरी पण... तुम्ही माणूस आहात हे मान्य करायला लागेल. दोन्ही गोष्टी अंमळ कठीण आहेत, अशक्यच म्हणा ना!

संदीप डांगे's picture

3 Feb 2016 - 10:41 pm | संदीप डांगे

असं मला तर वाटत नाही. तुमच्यासोबतच असं का होत असावं?

नाव आडनाव's picture

3 Feb 2016 - 10:51 pm | नाव आडनाव

काका, मी काय म्हणतो - तुमचं महत्व त्यांना कळलं नाहीय. तुमची टिंगलटवाळी करतात म्हणजे काय? तुम्ही त्यांना ज्ञान देता आणि तुम्हाला काय मिळतं... टिंगलटवाळी... :(

आता तुम्ही त्यांना शिक्षाच करा. येऊच नका इथे... बरोबर वाचलंय तुम्ही - येऊच नका इथे. आता त्यामगचं लॉजिक सांगतो - तुमचं महत्व ओळखलं नाही ओ सामान्य जनतेने. जी गोष्ट आहे ना, त्याची किंमत कळत नाही. तुम्ही नसल्यावर बघा कसे आठवण काढतील तुमची रोज.

ठरलं तर मग? नाही ना येणार ऊद्यापासून?

प्रदीप साळुंखे's picture

3 Feb 2016 - 10:39 pm | प्रदीप साळुंखे

टंकनतसदी नाही घेतलीत तरी चालेल

नाही,
काकासाहेबांसारखा काॅमेडियन कोणीतरी पाहिजे,त्याशिवाय मज्जा नाही.

अजया's picture

3 Feb 2016 - 10:46 pm | अजया

बघा काका.एक नाही दोन नाही तीन तीन 'पुरुष' का बरं तुमची थट्टा उडवतात? ते पुरुष म्हणजे उजवे,बुध्दिमान वगैरे सर्व गुणांनी युक्त असणार ना !

काकासाहेब केंजळे's picture

3 Feb 2016 - 11:00 pm | काकासाहेब केंजळे

अजयाबाई , अमेरिकन स्त्रीवाद ,निओफेमिनिझमला फक्त स्त्रीयाच बळी पडतात हे तुम्हाला कुणी सांगतले, काही पुरुषही फसतात.अश्या फसलेल्या पुरुषांचे वरती प्रतीसाद आले आहेत.

बोका-ए-आझम's picture

3 Feb 2016 - 11:09 pm | बोका-ए-आझम

काय आहे हा अमेरिकन स्त्रीवाद? एकदा कळू तरी दे. ते जाऊ दे. तुम्हाला या विषयावर जी माहिती आहे ती धागा काढून मांडा ना. विज्ञान लेखमालेत एखादा लेख लिहायचा होतात यावर (हे जरा जास्त झालं का?) उगाचच डाॅ.खरे, माहितगार यांचे धागे कशाला हायजॅक करत आहात?

प्रदीप साळुंखे's picture

3 Feb 2016 - 11:11 pm | प्रदीप साळुंखे

अरेच्चा,तुम्ही तर भलतेच मोठे काॅमेडियन निघालात.

संदीप डांगे's picture

3 Feb 2016 - 11:08 pm | संदीप डांगे

dd

पण मी चाललोय झोपायला... असो.

- एक फसलेला पुरुष :(

उगा काहितरीच's picture

4 Feb 2016 - 12:04 am | उगा काहितरीच

असो असो , काकांच्याही म्हणन्यात तथ्य असू शकते. काका म्हणतात की "स्त्रीयांच्या लैंगिक भावना या पुरूषांच्या तुलनेत कमी असतात." आता बघा कोणत्याही पुरूषाला कसे कळणार की स्त्रीयांच्या लैंगिक भावना किती तिव्र आहेत ते ? कारण कोणत्याही पुरूषाला स्त्रीच्या शरीरात प्रवेश करून "अनुभवता" येणारच नाही. आणी स्त्रीला स्वतःला कसे कळणार की पुरूषांच्या तुलनेत स्वतःच्या भावना किती तिव्र आहेत ते. ते नेमकेपणाने कळण्यासाठी स्त्रीला पुरूषाच्या शरीरात प्रवेश करावा लागेल . उदाहरण द्यायचे झालं तर कोणत्याही पुरूषाला बाळाला जन्म देताना किती वेदना होतात हे कळूच शकत नाही. व कोणत्याही स्त्रीला टेनीस बॉल मध्य प्रदेशात लागल्यावर काय वेदना होतात ते कळूच शकत नाही. पण काकासाहेब माझ्याकडे एक प्ल्यान आहे. एखाद्या ट्रान्सजेन्डरची मुलाखत घ्यायची कारण तोच एक्याक्टली सांगू शकेल स्त्रीला पुरूषांच्या १/१० लैंगिक भावना असतात का १/५ की १००/१ ! पण यातही मला शंका आहे ट्रान्सजेन्डर लोक हे पूर्ण पुरूष वा पूर्ण स्त्री नसतात बहुतेक . डॉक्टर लोक याबद्दल जास्त माहिती देऊ शकतीत.
.
.
.
.
.
(** उपरोध! काकासाहेबांची क्षमा मागून ! )

काय ईतक्यात बासरी शिकताय म्हणे तुम्हि. हो माई छानच वाजवतात बासरि नेफळ्यांच्या नाना ला सुद्धा शिकवलि होति त्यानि :))

खटासि खट's picture

4 Feb 2016 - 7:25 am | खटासि खट

ऐकत नाहीत हं मिपाकर.

तरी आमची आजी ओरडायची, "मेल्यांनु ! त्या कँपात जाऊन बेकरीत खात जाऊ नका. एकदा ते बाटवलेलं अन्न खाल्लं की वरणभाताला तोंड लावणार नाहीत." आजी आंजावर नव्हती पण फार द्रष्टी हो

बॅटमॅन's picture

4 Feb 2016 - 11:59 am | बॅटमॅन

=)) =)) =))

श्री श्री श्री मोक्काट्ट गाढव यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.... आत्ता येतीलच ते!!

पिलीयन रायडर's picture

4 Feb 2016 - 5:28 pm | पिलीयन रायडर

काकासाहेबांनी प्रसवलेलं हे एक रत्न मिसलच की!! कुठे कुठे नाचावं बाई.. सगळेच धागे पेटते ठेवलेले आहेत!

माहितगार's picture

4 Feb 2016 - 8:47 pm | माहितगार

पिरा तै, लेखाच्या सुरवातीसच हा धागा लेख वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? आणि स्त्रीयांच्या प्रती यू अ‍ॅटीट्यूड अर्थात श्रोताभिमुख अभिवृत्ती या धागालेखांना समजून घेणे कदाचित उपयूक्त होऊ शकेल हे स्पष्ट केले तरीही काकासाहेबांनी त्याकडे दुर्लक्श केले यात नवल नाही त्यामुळेच काकासाहेब आधीच निष्कर्श ठरवून माहिती गोळा करत नाहीत ना अशी काकासाहेबांबबत शंका वाटते.

यू अ‍ॅटीट्यूड म्हणजे आपल्या आजूबाजूच्या स्त्रीयांना जरी समजून घेतले तरीही स्त्रीयांना कामभावना असते हे कळण्यासाठी वैज्ञानीकांची आवश्यकता नसावी हे आपसूक कळावे. प्रश्न केवळ काकासाहेबांचा नाही इतरही मोठ्या (पुरुष) जनस़ंख्येस ही माहिती असतेच असे नाही (दुसर्‍या विरुद्ध बाजूस संशयी वर्गही मोठ्याप्रमाणावर असतो पण या लेखात मांडलेली भुमीका स्विकारल्यास संशयी ऊद्देशाचार अस्त होण्यास मदत व्हावी) उरतात ते काकासाहेब वर्गीय मंडळी त्या गटासाठी स्त्रीयांची कामवासना या विषयावर वेगळ्या धागा लेखाची गरज असावी असे वाटते.

विवेकपटाईत's picture

4 Feb 2016 - 8:38 pm | विवेकपटाईत

काका साहेब राग मानू नका आणि संकेतस्थळ सोडून जाऊ हि नका. संध्याकाळी थकलेल्या शरीराने आणि मनाने घरी परतल्यावर मिसळपाव खाऊन मन कस फ्रेश होत.
ज्याच्या जवळ तर्क नाही तो टिंगल टवाळी करणारच, त्यात आश्चर्य काय. एका पुरोगामी संकेतस्थळा वर माझे प्रतिसाद पुष्कळदा ऊडविले जातात कारण त्यांच्या जवळ तर्क किंवा कुतर्क दोन्ही नाहीत. मिसळपाव वर तर्क आणि कुतर्क दोघांना भरपूर वाव आहे.
बाकी मला आंग्ल भाषा जास्त काळत नाही हे निओफेमिनिझमला म्हणजे काय. मला तर फक्त सनी लीयोनी माहित आहे, आपल्या देशात ५६ इंच छातीवाल्या/ मफलर वाल्या पेक्षा जास्त लोकप्रिय आहे.