मनावरील ते शूर्प ओरखडे १ : (ईस्टेटीची परात)

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 8:14 pm

आज सकाळीच भारतीय स्त्रीचे सुवर्ण प्रेम ! हा लेख लिहिण्याचा योग आला, भारतीय स्त्रीच्या या आकर्षणा मागे पुर्वार्जीत मालमत्तेत स्त्रीयांना सहसा वाटा मिळत नसे -आता कायदा बदलला आहे- त्यामुळे कदाचित जिवन लढ्याच्या स्पर्धेतून येणारा पण ज्या संपत्तीवर तुमचा तांत्रिक-नैतिक दृष्ट्या अधिकार असणे अभिप्रेत नाही तिचा मोह करणारी स्त्री कुठे दृष्टीस पडली की स्त्री आदर्श असते टाईप मनात तयार झालेल्या प्रतिमांना तडे जाऊन मनावर क्वचित शूर्प ओरखडे उमटतात.

आत्ता सायंकाळी मिपा कवि लीलाधरांची किसमिस हि कुणि वर आणलेली कवितेच्या खालील ओळी वाचनात आल्या आणि आठवणी भर्रकन एक तप मागे गेल्या
संदर्भःकिसमिस -मिपा कवि: लीलाधर

आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले,
एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात,

एका संध्याकाळी नौकरीवरुन परतलेले चार-सहा सॉफ्टवेअर कंपनीत एखाद दीडवर्षाचा अनुभव असलेले बॅचलर मित्र एकत्र आपल्या शेअर्ड फ्लॅटवर गप्पा मारत बसलेले असतात, त्यांचा अजून एक मित्र येतो सॉलीड टेंशन मध्ये आहे कारण त्याची एंगेजमेंट झालेल्या मुलीशी एक मिटींग झाली आहे त्यात ती त्याला त्याचे आई-वडील सोबत राहणार नाहीत असे वचन मागते. आजच्या काळात तसे पाहता विशेष काही नाही पण तिने त्याच्या आई-वडीलांकडून मुलगा सर्वीसला असलेल्या मेट्रोपॉलीटन शहरात एक फ्लॅट विकत घेऊन देतील याचे आश्वासन मागितले त्याच्या आईवडीलांनी आपल्या आयुष्याचे सर्व सेव्हींग जोडले तर फ्लॅट होऊ शकेल असा विचार करून मुलाच्या सुखी संसारासाठी आश्वासन दिले खरे आता त्या मुलीला सासू सासर्‍यांच्या मदतीने फ्लॅट हवा आहे पण सासू सासरे मात्र नकोत- आणि सासू सासर्‍यांकडे त्या सेव्हिंग पलिकडे काही पैसे असणार नाहीत. मोठ्या शहरातील फ्लॅट आणि प्रॉपर्टींचे भाव असे गगनाला भिडलेले आहेत की सॉफ्टवेअर कंपनीतल्या मुलांना कर्जवगैरे मिळू शकतात पण डाऊन पेमेंट करुन त्यांनाही फ्लॅट अगदी एखाद दुसर्‍या वर्षाच्या अनुभवावर घेणे शक्य होतेच असे नाही. त्याने आईवडील नकोत तर ठिक पण कर्ज घेऊन फ्लॅट घेऊ आईवडीलांचे पैसे घेऊ नयेत असेही मुलीला सांगून पाहीले तिने त्यासही नकार दिला. त्या मुलाच्या मित्रांनी एकदा एंगेजमेंट झाली आहे मुलगी तुला आवडली आहे तेव्हा लग्न होऊन जाऊदे मग पहा असा सल्ला दिला त्यांचे म्हणणे सॉफ्टवेअर कंपनीत पुन्हा जॉब बदलताना चांगली पगारवाढ होईल मग तू तुझ्या आईवडीलांना फ्लॅट करता त्यांनी खर्च केलेले पैसे परत करु शकशील. पण त्याच्या काही मित्रांचे म्हणणे पडले कि आताच लग्न होण्याच्या आधिच ब्लॅकमेलींग केले जाते आहे हा टेंशन मध्ये येतो आहे, लग्न आणि खासकरुन मुले झाल्यावर ब्लॅकमेलिंग केले तर हा आईवडीलांना कशी काय आर्थीक मदत पुरवू शकेल. या परिस्थितीत त्या मुलाने काय करावयास हवे होते असे तुम्हाला वाटते ?

प्रत्यक्षात त्यामुलाने एंगेजमेंट मोडण्याचा निर्णय घेतला. पण एका मुलाच्या मनावर एक शूर्प ओरखडा ओढला गेला होता.

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

26 Feb 2016 - 8:21 pm | आनन्दा

ह्म्म.. तोच पर्याय योग्य वाटतो.

बाबा योगिराज's picture

26 Feb 2016 - 8:35 pm | बाबा योगिराज

अवघड आहे बाबा. काय चाललंय आजकालच्या पोरा पोरीचं. माझ्या मते तरी लग्न मोडणे हाच पर्याय योग्य आहे.

असला प्रकार फार जवळून बघितलेला आहे. माझ्या 2 मित्रांचे संसार अश्या प्रकारे मोडलेले आहेत. म्हणून मला तरी आधीच लग्न मोडणे हाच पर्याय ठीक वाटतो.

बाकिच्यांना काय वाटतय?

अभिजित - १'s picture

26 Feb 2016 - 8:36 pm | अभिजित - १

उत्तम निर्णय ..

नोकरी वाली मुलगी कशाला पाहिजे ? downsizing करा जरा आयुष्याचे . BCOM / BSC साधी मुलगी बघा. घरी रोज जेवण झालेच पाहिजे. डोक्याला ताप नको. या चढेल मुलीना बाजूला सारा.

माहितगार's picture

26 Feb 2016 - 8:44 pm | माहितगार

नाही या केसमधली मुलगी नौकरीवाली नक्कीच नव्हती, नक्की माहित नाही पण बहुधा साधी BCOM / BSC अशीच काहीशी असावी.

अभिजित - १'s picture

26 Feb 2016 - 8:48 pm | अभिजित - १

कमाल आहे

आता हे कलम/ही अट अगोदरच फोनवर विचारून घ्यावे.एकवेळ कुंडल्या पाहिल्या नाहीत तरी चालेल.आईवडिलांनी मुलात भावनिक गुंतावळ ठेवू नये."मुलगा जवळ राहीलच वगैरे.

गवि's picture

27 Feb 2016 - 6:05 am | गवि

ओरखडा?

अहो खोलवर घाव आणि रक्तस्त्रावापासून वाचणं यापुढे ओरखड्याचं काय?

ओरखडा मुबारक.

पण पण पण.. हे हल्ली असं मुलींच्या मागण्या असतात वगैरे एकतों तें खरें की पाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखें पींठ मिसळलेंल??

अभ्या..'s picture

27 Feb 2016 - 11:01 pm | अभ्या..

हेहेहेहेहे
आता त्या मागण्या मुलीच्याच की तिच्या घरच्यानी पढवलेल्या हे कळायला मार्ग नाही पण माझ्या बघण्यात तरी अशी भर्पूर उदाहरणे आहेत.
बाकी ओरखडा मुबारक ला तहेदिलसे अनुमोदन मुबारक.

तर्राट जोकर's picture

28 Feb 2016 - 8:09 pm | तर्राट जोकर

अनुमोदन को अनुमोदन.

दो पेग मारिये, आगे को चलिये

अगम्य's picture

27 Feb 2016 - 6:12 am | अगम्य

वेळेतच बचावला!

PIYUSHPUNE's picture

1 Mar 2016 - 5:36 pm | PIYUSHPUNE

मुर्ख मुलगी!!!

सिरुसेरि's picture

27 Feb 2016 - 11:06 am | सिरुसेरि

मुलांनी / मुलींनी आणी त्यांच्या पालकांनी सावध राहिले पाहिजे .

बोका-ए-आझम's picture

27 Feb 2016 - 12:49 pm | बोका-ए-आझम

हा सुयोग्य निर्णय. माहितगारजी, एखादा Pre-nuptial वर धागा काढा ना. या असल्या गोष्टी वाचल्यावर Pre-nuptial agreement ची फार निकड भासू लागते आपल्याकडे.

मनिमौ's picture

27 Feb 2016 - 8:56 pm | मनिमौ

अगदी बरोबर निर्णय घेतला.पुढे खूप गुंतागुंत होण्याची भीती नाही.आई वडील मुलाचे असोत किंवा मुलीचे कोणालाही त्त्याच्या कमाईच्या पैशावर डोळा ठेवायचा अधिकार नाही

पैसा's picture

28 Feb 2016 - 8:26 pm | पैसा

आईबापांनी मुलांमधे भावनिक गुंतवणूक करू नये आणि मुलांनीही आईबापांकडून असल्या अपेक्षा ठेवू नयेत. स्वतः काय ते मिळवावे. दुसर्‍याच्या जिवावर फ्लॅट अन गाड्या कशाला पाहिजेत?

कितीतरी आईबाप बघते. एखादाच मुलगा असतो. मग त्याच्यासाठी म्हणून तो नोकरीला लागताच किंवा कधी कधी शिकत असतानाच दुसरा फ्लॅट घेऊन ठेवतात. त्या पोरांना जरा जगाचा अनुभव घेऊ द्या की! धडपडू द्या आपले आपण!

क्रेझी's picture

2 Mar 2016 - 2:22 pm | क्रेझी

+१

आयुष्यभर दादागिरी पेक्षा लग्न माेडलेले चांगले.

प्रचेतस's picture

28 Feb 2016 - 11:53 am | प्रचेतस

ह्या लेखासाठी लीलाधराची 'किसमिस' निवडलेली पाहून अगदी भडभडून आले.

माहितगार's picture

28 Feb 2016 - 7:59 pm | माहितगार

:)

लीलाधरांच्या बाकी काव्याशी मी खुपसा परिचित नसेन. मी त्यांचे वाचलेले बहुधा हे पहिलेच काव्य. स्वार्थ कुठेही असू शकतो पण लीलाधरांच्या कवितेतील समस्या आढळून येण्याचे एक कारण स्त्रीयांना पुर्वी प्रॉपर्टीत वाटणी मिळण्याचे रितसर मार्ग नसावेत असे असू शकण्याच्या शक्यतेस बेनीफीट ऑफ डाऊट द्यावा काय. अर्थात लीलाधरांच्या कवितेतील रितीभातीचा संबंध पटला नाही हि स्थिती रितीभातीसहीत अथवा रितीभाती शिवाय सुद्धा येऊ शकावी.

तुमचा हा प्रतिसाद लीलाधराने वाचला तर त्यालाही भडभडून येईल. =))

माहितगार's picture

28 Feb 2016 - 8:41 pm | माहितगार

नक्की ना ! आपला प्रतिसाद वाचून मी लीलाधरांच्या माहितीसाठी त्यांच्या धाग्यावर त्यांच्या ओळींची दखल घेतल्याचे नमुद केले आहे. आता लीलाधराच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत हा धागा असेल. काय म्हणता.

लीलाधर कदाचित फ़िरकायचे नाहीत हो.

हा ना. मजाक मजाक मे रजाक हुआ तशी ती कविता असावी. ;)
वरातीनंतर त्याच्यात काही लक्षणीय फरक पडला असेल तर येईलही कदाचित. ;)

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 5:46 pm | पिलीयन रायडर

शूर्प हा शब्द आजच वाचला..

निर्णय योग्यच आहे. मला तरी वाटतं की लग्न करताना दोन्ही बाजुंनी स्वतःच्या हिमतीवर सर्व करण्याची तयारी हवी. संघर्षात दोघांची साथ हवी. लग्ना आधीच घर, गाडी तय्यार हवी, शिवाय सासरचे लोकही नकोत हे टोक झाले.

मी प्रत्यक्षात जरी असे उदाहरण कधी पाहिलेले नाही तरी एकंदरीतच मुलगी मिळणे अवघड आहे असा सुर खुपच ठिकाणी ऐकायला मिळतोय..

माहितगार's picture

1 Mar 2016 - 6:18 pm | माहितगार

'नखा' हे अध्याहृत :(

माहितगार's picture

1 Mar 2016 - 6:21 pm | माहितगार

रामायणातील शूर्पनखा नाव अल्पसे व्हिक्टीम भासते म्हणून पूर्ण लिहिले नाही. पण एकुण नखाने ओढल्यावर पडणारे ओरखडे असेच म्हणावयाचे आहे.

बॅटमॅन's picture

1 Mar 2016 - 5:54 pm | बॅटमॅन

योग्य निर्णय घेतला. उगा बिनकामी नंतर ताप करून घेण्याऐवजी अगोदरच कंडका पाडलेला कधीही बेष्ट.

सुमीत भातखंडे's picture

1 Mar 2016 - 7:11 pm | सुमीत भातखंडे

योग्य निर्णय. नंतर कटकट नको.

कपिलमुनी's picture

1 Mar 2016 - 7:40 pm | कपिलमुनी

मुलांनी मुलीच्या आई वडिलांना लग्नाचे पैसे खर्च करायला लावू नये.( त्यांचही म्हातारपणाचा सेव्हींग असता )
आणि स्वतःच्या आई वडिलांचा सेव्हिंग आपल्या संसाराला वापरू नये.

दोघे मिळून कमावू तेवढ्याच पैशांवर आपला हक्क ! हे मान्य असेल तरच लग्न करावे.
रोखठोक व्यवहार!

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 7:52 pm | एक एकटा एकटाच

योग्य निर्णय

मुक्त विहारि's picture

2 Mar 2016 - 12:38 pm | मुक्त विहारि

वडीलधा-या व्यक्तींच्या पैशावर डोळा ठेवू नये.

अप्पा जोगळेकर's picture

2 Mar 2016 - 12:59 pm | अप्पा जोगळेकर

त्या मुलाचे अभिनंदन.

पण एका मुलाच्या मनावर एक शूर्प ओरखडा ओढला गेला होता.

अहो कसले ओरखडे आणि कसलं काय ? इथे काय किंवा तिथे काय शेवटी जागाच भरायची ना ?

क्रेझी's picture

2 Mar 2016 - 2:27 pm | क्रेझी

योग्य निर्णय!
हल्ली ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की संगणक अभियंता मुलगा असला तर मुली साध्या १२वी पास जरि असतील तरी त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत! नुकतंच माझ्या मित्राचं दुस-यांदा लग्न मोडलं कारण हेच!!

माहितगार's picture

2 Mar 2016 - 2:48 pm | माहितगार

ज्यांची कँपस सलेक्शन्स होत नाहीत त्यांना जॉबच्या स्टार्टींग सॅलरी ते वय वर्षे २८ पर्यंत मुलांचे सेव्हींग बँकेस स्वतःचा १०-२० टक्के शेअरही कसा उभा करु शकताहेत का सध्या फ्लॅट्सच्या किमती अभाळाला पोहोचता आहेत. ५० लाखाचा फ्लॅट घ्यायचा असेल तर कर्ज घेणार्‍याचा शेअर सध्या किती असावा लागतो ? असे प्रश्न पडतात सध्या काय स्थिती आहे माहित नाही.

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2016 - 7:39 pm | राजेश घासकडवी

हल्ली ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की संगणक अभियंता मुलगा असला तर मुली साध्या १२वी पास जरि असतील तरी त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत!

याबद्दल माझी एक थियरी आहे. कदाचित चूक असेल कदाचित बरोबर असेल. काळच ठरवेल.

मला असं वाटतं की 'मुलगाच हवा' या हव्यासापोटी अनेकांनी आपल्या मुली गर्भाशयातच मारल्या. त्यामुळे सध्या मुली कमी आणि मुलं जास्ती असं चित्र दिसतं आहे. सध्याची आकडेवारी पाहिली तर पुढची वीस वर्षं तरी हे चित्र बदलणार नाही. त्यामुळे लग्नाच्या बाजारात मुलींचा भाव वाढणं साहजिक आहे. त्याचे हे दृश्य स्वरूपात परिणाम दिसत आहेत. पुढच्या काही वर्षांत लग्नासाठी मुलींहल्ली ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की संगणक अभियंता मुलगा असला तर मुली साध्या १२वी पास जरि असतील तरी त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या मुलींना हुंडा द्यायची प्रथा सुरू झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही.

मुक्त विहारि's picture

2 Mar 2016 - 7:48 pm | मुक्त विहारि

...अनेकांनी आपल्या मुली गर्भाशयातच मारल्या."

हे तर आहेच शिवाय.

मुलीच्या आईच्या अपेक्षा पण वाढलेल्या असतात.

मैत्रिणींबरोबर असलेली चढाओढ, भला उस के हजबंड का पगार, मरे हजबंड से ज्यादा क्यों?" ह्या यादीत पण भर पडत असतेच.

असो,

मुला-मुलांच्या वाढलेल्या अपेक्षा ह्यावर मीच एक धागा काढला होता...त्याची आता परत द्विरुक्ती (की हजारोक्ती?) नको.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 8:01 pm | तर्राट जोकर

हे सत्य असले तरी मुलींच्या अपेक्षा ह्या मुलींच्या संख्येवर अवलंबून नाहीत. समाजाच्या मानसिकतेवर आहेत. गेल्या वीस वर्षात बरंच बदलंलय. मुलींची संख्या कमी झाल्यापेक्षा अपेक्षा पूर्ण करणार्‍या मुलांची संख्या कमी आहे असे कारण मला वाटतं. पन्नास वर्षांआधी मुलीचे लग्न व्हावे हीच एकमेव अपेक्षा होती, त्यामुळे हा प्रश्न नव्हता. आता मुलगी योग्य घरात जावी ह्याबद्दल लोक आग्रही असतात. अपेक्षेनुसार योग्य घरे कमी असतात. मुलांना फक्त मुलगा असल्याची योग्यता लग्नाच्या बाजारात पुरत नाही. जी पूर्वी असायची. खालच्या वर्गातल्या सामाजिक व्यवस्थेत ती अट आजही असल्याने त्यांच्यात मुली मिळत नाहीत वा वराबद्दल खूप अपेक्षा असल्याने लग्न मोडतात असे घडत नाही. मुली मारण्याचा दर खालच्या वर्गात अधिक असला तरी.

असो, मुविंच्या हजारी धाग्याला कांपीटीशन होईल हा धागा.

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2016 - 8:33 pm | राजेश घासकडवी

हे सत्य असले तरी मुलींच्या अपेक्षा ह्या मुलींच्या संख्येवर अवलंबून नाहीत.

नाही कशा? टोकाचं उदाहरण द्यायचं झालं, तर जगात फक्त हजार मुली राहिल्या तर प्रत्येकीला बिलियनेअरच हवा अशी अट घालता येईल.

पन्नास वर्षांआधी मुलीचे लग्न व्हावे हीच एकमेव अपेक्षा होती, त्यामुळे हा प्रश्न नव्हता. आता मुलगी योग्य घरात जावी ह्याबद्दल लोक आग्रही असतात.

बरोबर. समाजाची मानसिकता बदललेली आहेच. मुलगी म्हणजे एकेकाळी धोंड समजली जायची. तिला कधी एकदा उजवून टाकतो असा विचार असायचा. आता मुली शिकल्या सवरल्या आहेत, स्वतः नोकऱ्या करतात. अशा परिस्थितीत त्या लायाबिलिटी नसून अॅसेट झालेल्या आहेत. आणि ही व्हॅल्यू वाढत असतानाच असे अॅसेट जर लग्नाच्या बाजारात कमी झाले तर त्यांची किंमत वाढणार हे साधं मार्केट इकॉनॉमिक्स आहे. (इथे मला अॅसेट म्हणताना स्त्रियांचं वस्तूकरण वगैरे अर्थातच करायचं नाही. लग्नाचा बाजार हा शब्दप्रयोग आपण ज्या मर्यादेत वापरतो त्याच मर्यादेत बोलायचं आहे)

मुलांना फक्त मुलगा असल्याची योग्यता लग्नाच्या बाजारात पुरत नाही. जी पूर्वी असायची.

मी म्हणतो आहे तेच तुम्ही वेगळ्या शब्दांत म्हणत आहात. एके काळी फक्त पुरुष कमवत असत, आता ते चित्र बदलतं आहे. आणि मुलींची कमतरता आहे, त्यामुळे कमावत्या स्त्रीच्या मागे तिच्यापेक्षा जास्त कमावणारे जास्त पुरुष असतात. तिला जास्त चॉइस आहे. पूर्वी तो चॉइस नव्हता.

असो, या लेखातल्या विशिष्ट कथेबद्दल - मुलाने केलं ते योग्यच केलं असं माझं मत आहे. पण माझी विधानं सर्वसाधारण समाजात काय चित्र दिसेल याबद्दल आहे. पुन्हा, पुढच्या वीस वर्षांत हे चित्र अधिक स्पष्ट होईल असं मला वाटतं. खरंखोटं काय ते काळच ठरवेल.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 10:21 pm | तर्राट जोकर

सर, जे तुम्ही म्हणताय त्यातलं थोडंसं मीही म्हणतोच आहे. पण किंचित फरक असा आहे की ज्या मुली अ‍ॅसेट झाल्या असं वाटतं त्या खरेतर मुलांच्या अपेक्षा आहेत. म्हणजे मुलांनाही आजकाल नोकरी करणारी, तोलामोलाचं शिक्षण, पगार असलेली मुलगी हवी असते. पुर्वी सारखं माणसाला माणूस घरात आणलं असं नाही. अपेक्षा दोन्ही बाजूंनी अफाट बदलल्या आहेत. जिथे अपेक्षा पूर्ण करु शकणार नाहीत तिथे डिफिसीट येणारच. त्याचा तसा संख्येशी संबंध नाही असे मला म्हणायचे होते. आजकाल फक्त बारावी झालेली मुलगीही इंजिनियर मुलाचे स्वप्न घेऊन बसते. तसेच दहावी नापास मुलींशी किती मुलं आज लग्न करायला तयार होतील हा ही प्रश्न आहे. नोकरदारांपेक्षा मजबूत कमावणारे आणि स्थिरस्थावर असणार्‍या व्यावसायिक, शेतकर्‍यांना डिमांड कमी आहे. लोकसंख्येची जातीय पॉकेट्समधे झालेली विभागणीही कारणीभूत आहे. जीवनशैलीचा फरकही. वधुवरांच्या बदलत्या अपेक्षेनुसार डिमांड-सप्लाय ची भानगड उद्भवली आहे. त्याला अनेक कंगोरे आहेत. ती मुलींच्या कमी झालेल्या लोकसंख्येमुळे नाही असे वाटते. जिथे मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे त्या प्रदेशांमध्ये काय परिस्थिती आहे हे बघायला पाहिजे.

असो. हा विषय मोठा आहे.