शोषण नाही कोठें ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
26 Jan 2016 - 12:22 pm

शोषण नाही कोठें ? (उर्फ समतेच्या चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या !)

अजून एक प्रश्न म्हणजे शोषण नाही कुठे? आपण आपल्या घरी मरमर काम करणाऱ्या स्त्रियांना किती पगार देतो? रजा देतो? आपण स्वतः जेवढं काम करतो तेवढा पगार आपल्याला हक्क म्हणून हवा असतो पण या अशा स्त्रियांना आपण तसा पगार देतो का? ते सोडा. घरात काम करणाऱ्या आणि खस्ता काढणाऱ्या गृहिणीला काय मिळतं? शोषण तिथेही आहेच. लैंगिक संदर्भ आले की शोषण होतं असं थोडंच आहे? आणि जर हे एवढं सगळं शोषण आपण चालवून घेतो, तर मग पोर्नोग्राफिक फिल्म्समधलं सो काॅल्ड शोषणही आपल्याला चाललं पाहिजे. अत्यंत उदात्त ' वहिनीच्या बांगड्या ' टाईप चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रीचं काय शोषण होत नसेल? पण ते आपण चालवून घेतो की नाही? असा selective आणि दांभिक दृष्टीकोन हा आपल्या विचारसरणीचा स्थायीभाव आहे.
संदर्भ : बोका-ए-आझम यांचा ह्या प्रतिसादातून

बोका-ए-आझम यांचा ह्या प्रतिसादातील उपरोक्त परिच्छेदावरून अस्मादिकांना शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांची जातिभेद नाही कोठें ? हि नाट्यछटा आठवली.

शोषण या शब्दाची शब्दबांध मधील व्याख्या 'दुर्बल घटकांची पिळवणूक करून अनुचित फायदा घेण्याची क्रिया' अशी आहे.

एखाद्या गोष्टीची सकारात्मक बाजू दाखवली की नकारात्मक बाजूचेही समर्थन केलेच पाहीजे का ? एका चुकीच्या शोषणाच्या समर्थनाने अथवा दुर्लक्षामुळे दुसर्‍या चुकीच्या शोषणाचे समर्थन होते का ? 'शोषण नाही कोठें ?' असा प्रश्न विचारून अजून कोणकोणत्या अन्यायांचे समर्थन होऊ शकेल ? समतेच्या तत्वाच्या राई राई एवढ्या चिंधड्या उडत नाही आहेत ना ? असे काही प्रश्न या निमीत्ताने मनात उभे राहीले.

संस्कृतीसमाजविचारप्रतिक्रियासमीक्षावाद

प्रतिक्रिया

नंदन's picture

26 Jan 2016 - 7:10 pm | नंदन

शोषण या शब्दाची शब्दबांध मधील व्याख्या 'दुर्बल घटकांची पिळवणूक करून अनुचित फायदा घेण्याची क्रिया' अशी आहे.

या आणि यासारख्या अनेक धाग्यांचा एक मूक वाचक म्हणून वरील विधानाशी सहमत होणे क्रमप्राप्त आहे.