आजच्या काळात 'रम्भा - शुक संवाद' कसा लिहिला जाईल ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
28 Jan 2016 - 3:12 pm
गाभा: 

मराठी विकिस्रोत प्रकल्पात शुक-रंभा संवादाचा संस्कृत पाठ मराठी अनुवादा सहीत उपलब्ध आहे. (अनुवाद मराठी विकिपीडियासदस्य व्ही.व्ही.परब यांनी उपलब्ध केला आहे) त्यातील एक परिच्छेद उदाहरणा दाखल देत आहे. उर्वरीत पाठ मराठी विकिस्रोत प्रकल्पात शुक-रंभा संवाद येथे वाचावा. चर्चेसाठी आवशकते प्रमाणे प्रतिसादातून उधृत करू शकता. विकिस्रोत प्रकल्पातील अनुवादात सुधारणा सुचवण्यास स्वागतच असेल.

रम्भा :
चलत्कटी नूपुरमञ्जुघोषा नासाग्रमुक्ता नयनभिरामा ।
न सेविता येन भुजंगवेणी वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१४॥

नाजूक कमर असलेल्या, नुपूरांद्वारे मंजुळ घोष करणाऱ्या, नाकात मोती जडवणाऱ्या, सुंदर नेत्र असणाऱ्या आणि सर्पाप्रमाणे अंबाडा धारण केलेल्या सुंदरीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१४॥

शुक :
विश्वम्भरो ज्ञानमयः परेशो जगन्मयोऽनन्तगुणप्रकाशी ।
आराधितो नाऽपि धृतो न योगे वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१५॥

विश्व चालवणाऱ्या, ज्ञानपूर्ण, परमात्मा, संसार स्वरूप, अनंत गुणांना प्रकट करणाऱ्या भगवंताची ज्याने आराधना केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१५॥

चर्चेचा विषय काय ?
१) रंभा-शुक संवादातील कोणता भाग आजच्या काळास अनुसरून नाही असे वाटते का तसे वाटत असेल तर का ?
२) आजच्या काळात रंभा-शुक संवाद लिहावयाचा झाल्यास तो कसा लिहिला जाईल ?

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Jan 2016 - 5:25 pm | पैसा

बहुतेक आता रंभेचा संवाद शुक म्हणेल आणि शुकाने दिलेले उत्तर रंभा देईल. किंवा कदाचित "काहीही हं शुका," म्हणेल. सुंदर्‍यांचे वर्णन केलंय ते काही फार बदलले नाही, भुजंगवेणी फारच कमी प्रमाणात असते. आणि शुकाने वर्णन केलेल्या प्रकारात भगवंताची आराधना आता कोणी करत नाहीत.

संदीप डांगे's picture

28 Jan 2016 - 6:03 pm | संदीप डांगे

ब्याटमनुष्यास आमंत्रण.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2016 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

"अंबाडा धारण केलेल्या सुंदरीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले."

याचा अनुवाद...

"अंबाडा धारण केलेल्या सुंदरीचा आस्वाद ज्याने घेतला नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय / असेल"

असा जास्त चांगला होईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2016 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजच्या जमान्यात शुक व रंभा दोघेही रंभेचे संवाद कोरसमध्ये म्हणतील व शुकाचे संवाद वाचून डोळे मिचकावून खदखदा हसतील अशीच जास्त शक्यता आहे. :)

प्रचेतस's picture

28 Jan 2016 - 6:32 pm | प्रचेतस

गाधवाचं लग्नमधला 'रंभेचा अंबाडाsssssss' असं म्हणणारा मकरंद अनासपुरे डोळ्यांसमोर आला.

प्रचेतस's picture

28 Jan 2016 - 6:33 pm | प्रचेतस

'गाढवाचं' असं वाचावे.

प्रचेतस's picture

28 Jan 2016 - 6:33 pm | प्रचेतस

'गाढवाचं' असं वाचावे.