चालू घडामोडी - ऑगस्ट 2018

सोमनाथ खांदवे's picture
सोमनाथ खांदवे in काथ्याकूट
1 Aug 2018 - 6:39 am
गाभा: 

राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे. 
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू 

हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

20 Aug 2018 - 1:10 am | पिलीयन रायडर

इतका त्रास करून घ्यायची काय गरज आहे बरं? मी प्रत्यक्ष इंटरव्ह्यू नाही पाहिलाय तिचा, पण वाचलंय ह्या बद्दल. त्यात ती हे वाक्य अशा अर्थाने म्हणतेय की एक मूल जन्माला घालणं सोडलं तर तिला बाकी कशालाही पुरुषाची गरज नाही म्हणजेच त्याच्यावर अवलंबून राहायची गरज नाही. (माझ्यासाठी हिरे मी स्वतः विकत घेऊ शकते अशाही अर्थाचे एक वाक्य ती बोलली आहे ) तिने ट्विटर वरही हेच क्लिअर केलं होतं. Need आणि Want ह्यातला फरक आहे तो.
आता पैशाचं म्हणाल तर ती स्वतः रग्गड कमावते. रोल्स रॉईस बाळगून आहे म्हणतात बुवा. तिला काय गरज पैशासाठी लग्न करायची? आणि असेल तिचा होणारा नवरा गोरा, अमेरिकन वगैरे. त्यावरून भारतीय पुरुषांवर घसरायची तरी काय गरज..? तिने कधी तसं काही स्टेटमेंट केलंय का? तिचा चॉईस आहे ना भाऊ..

नगरीनिरंजन's picture

21 Aug 2018 - 6:57 pm | नगरीनिरंजन

आता पैशाचं म्हणाल तर ती स्वतः रग्गड कमावते. रोल्स रॉईस बाळगून आहे म्हणतात बुवा.

ह्यासाठीच पुरुषांची गरज ना बाईसाहेबांना. पुरुष नसते तर ह्यांचे हिंदी चित्रपटात येऊन कंबर हलवण्याचे काय प्रयोजन होते?
दुटप्पीपणा पाहिला की आम्हाला त्रास होतोच; त्याला इलाज नाही. पुरुषांनी उभारलेल्या सिव्हिलायझेशनच्या जीवावर बाष्कळ बडबड करु नये इतकंच.

माहितगार's picture

21 Aug 2018 - 7:16 pm | माहितगार

__/\__

पिलीयन रायडर's picture

24 Aug 2018 - 2:01 pm | पिलीयन रायडर

अग्गो बाई! पुरुषांनी उभं केलं म्हणायचं का हे सगळं?! ग्रेट्च!
गेट वेल सून हो काका!

नगरीनिरंजन's picture

8 Sep 2018 - 12:13 am | नगरीनिरंजन

आम्ही वेल आणि फाईनच आहोत हो मावशी. पुरुषांनी निर्मिलेल्या व्यवस्थेत साधा मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करुन शंभर-दीडशे वर्षं उलटली नसताना आता असा माज करणार्‍या निर्बुद्धांची तुम्ही बाजू का घेताय ते मात्र कळत नाहीय.
असो. तुम्हीच जरा स्वतःच्या तब्ब्येतीची काळजी घ्या. आहे ते टिकवायला सुद्धा उदारमतवादी पुरुषांची गरज आहेच. पुरुषांची गरज नाही म्हणणार्‍या नटमोगर्‍यांसाठी शेकडो वर्षे संघर्ष करणार्‍या स्त्रियांचा अपमान नका करु कमीतकमी.

सानिया मिर्झाने पाकिस्तान्याशी लग्न केले तेव्हा मुस्लिम का होईना परंतु एखादा भारतीय मिळाला नाही का? असा भारतीय संस्क्रुती रक्षक अभिजन शंख करत होते.
आता हा मात्र गोरा आणि हामेरिकन आहे म्हणून निषेधाचा एकही सूर उमटला नसेल काय?

इम्रान खानच्या नवीन मंत्रिमंडळातील २१ पैकी १२ मंत्री पुर्वाश्रमीच्या जनरल परवेझ मुशर्रफच्या मंत्रिमंडळात होते . म्हणजे लष्कराचा वाढता प्रभाव लक्षात यावा. खैबर पख्तुन्वाचा इम्रान खानच्या पक्षाचा मंत्री आता डिफेन्स मिनीस्टर आहे. म्हणजे लष्कर आणि अतिरेकी धार्जीण्य यात समन्वय साधणे सोपे जाईल असा आडाखा असावा. शिरीन मझाली नावाची स्त्री जी अण्वस्त्रे टाकण्यासाठी कोणती शहरे निवडावीत कोणती निवडू नयेत याची उघड चर्चा करते तीला मानवाधिकार मंत्रालय दिले आहे . आणि २००८ च्या मुंबई हल्ल्याच्यावेळी चा परराष्ट्रमंत्री पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री म्हणून कारभार बघणार आहे.

इम्रान खान ने मंत्रिमंडळ कर्मठ निवडलेले आहे पण त्याची महत्वाची परिक्षा आर्थीक आघाडीवर परकीय चलनाची गंगाजळी सांभाळताना येणार आहे. येत्या तीन महिन्यात इम्रान खानला बारा अब्ज डॉलरची गरज भासणार आहे. आय एम एफ आणि आमेरीका धार्जीण्य न दाखवण्याच्या इम्रानच्या वल्गना चालू आहेत . सौदी आणि अथवा चीन ने आउट ऑफ द वे जाऊन लार्ज फंडींग पुरवले तर इम्रान सांभाळला जाऊ शकेल नाही तर नाही म्हणूनही आमेरीकेच्या तालावर नाचावे लागेल . आर्थीक आघाडीवर काय होते ते येत्या दोन तीन महिन्यात कळेल.

प्रत्यक्षात संघर्ष शक्यता मर्यादीत राहीली तरी काश्मिरी अतिरेकी कारवाया आणि सिमेवर संघर्ष मुद्दाम वाढवण्याची रणनिती पाकीस्तानकडून होऊन इम्रान - मोदी वादाने मिडीया बातम्यांनी भरु शकतो. यात पाकिस्तान आणि इम्रानला नित्याप्रमाणे पाश्चात्य देश आणि आमेरीकेवर अप्रत्यक्ष दबाव वाढवण्याची आर्थीक फायदे पदरात पाडून घेण्याची संधी मिळेल, तर दुसर्‍या बाजूस असे काही झाले तर मोदींना २०१९च्या निवडणूकात कणखर नेतृत्व हवे म्हणून भारतीय मतदाता पुन्हा मोदीकडे वळणे असे काही होऊ शकतेच.

तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे

प्रसाद_१९८२'s picture

21 Aug 2018 - 11:41 am | प्रसाद_१९८२
माहितगार's picture

21 Aug 2018 - 12:36 pm | माहितगार

सकारात्मक आणि रचनात्मक असे समस्या निदानही सुचवावे. जसे की स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने चित्रकला स्पर्धा इत्यादी, नाही तर असे काही पाहून फ्रस्ट्रेट व्हायला होईल.

सोमनाथ खांदवे's picture

21 Aug 2018 - 12:57 pm | सोमनाथ खांदवे

मिपावर असले व्हिडीओ टाकू नका हो , ती बांडगूळा ची जात सुधारणार नाही पण इथं आपण शिव्या पोस्ट करू शकत नसल्या मूळे टेम्पर आऊट होणार . त्या पेक्षा आपण त्याला मिपामान्य शाप देऊ .
" हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे "
https://googleweblight.com/i?u=https://www.misalpav.com/node/21649&hl=en-IN

प्रमोद देर्देकर's picture

21 Aug 2018 - 2:34 pm | प्रमोद देर्देकर

आता तो मोँगा खान येणार इथं आपली बाजू मांडायला

मार्मिक गोडसे's picture

21 Aug 2018 - 2:56 pm | मार्मिक गोडसे

UPA च्या GDP ने NDA च्या GDP चा धोबीपछाड केला.

https://www.moneycontrol.com/news/business/economy/gdp-back-series-data-...

माहितगार's picture

21 Aug 2018 - 3:27 pm | माहितगार

'धोबीपछाड' शब्दोपयोगा बद्दल साशंकता आहे, बाकी राजकीय जुगलबंदी चालूद्यात.

अनुप ढेरे's picture

21 Aug 2018 - 4:23 pm | अनुप ढेरे

उलट आधीजे माहिती होतं तेच पुन्हा शिक्कामोर्तब झालय. २००७ पर्यंत तुफानी रेट होताच. जी वाजपेयी सरकारची कृपा होती. NDA-1ने जबरदस्त अर्थव्यवस्था UPA-1च्या ताब्यात दिली. ८+%ने वाढणारी आणि महागाईचा दर ४% असणारी. सुरुवातीला याचा फायदा झाला ते दिस्तं आहेच. २००७ पर्यत. त्यानंतर UPA ने दिवे लावलेले दिसत आहेत. UPA ने NDA-2 ला १०% महागाई आणि फक्त ५/६%ने वाढणारी अर्थव्यवस्था दिली. याखेरीच बुडीत कर्जांचा डोंगर देखील दिला. आता पुन्हा अर्थव्यवस्था ८% ने वाढत आहे आणि महागाई ४% आहे. ही मोदी सरकारची अचिव्हमेंट आहे.

मार्मिक गोडसे's picture

21 Aug 2018 - 4:50 pm | मार्मिक गोडसे

८+%ने वाढणारी आणि महागाईचा दर ४% असणारी. सुरुवातीला याचा फायदा झाला ते दिस्तं आहेच. २००७ पर्यत. त्यानंतर UPA ने दिवे लावलेले दिसत आहेत.
२००८ ची जागतिक मंदी आणि खनिज तेलाचे आकाशाला भिडलेले दर ह्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला, परंतू त्याही परिस्थितीत GDP फार घसरला नाही ह्याचे श्रेय UPA 2 ला दिले पाहिजे.

अनुप ढेरे's picture

21 Aug 2018 - 5:11 pm | अनुप ढेरे

कारणं द्यायची काहीतरी उगाच. उलट २०१३ ला भारत फ्रॅजाईल फाईव्ह या गटात टाकला गेलेला. ममो सरकारमुळे. सरकारी बॅंकांची लूट, एअर इंडिया, बिएसेनेल्ची लुट, नैसर्गिक संसाधनांची लूट, बॅड लोन्स, १४% स्पर्शुन आलेली महागई हे पासॉने केलं मन्मोहन सरकारने. त्यांना मिळालं काय, पुढे दिलं काय...
इथे उलट मोदीनी लागोपाठा २०१४ आणि २०१५ असे दुष्काळ असुन देखील महागई नियंत्रणात ठेवली. लागोपाठ दोन राष्ट्रीय दुष्काळ हे अत्यंत दुर्मिळ असतं. काँगी भगत तेल-तेल असेच ढोल बडवत असतात. "आम्ही माती खाल्ली ती तेला मुळे. मोदींनी अर्थव्यवस्था चांगली ठेवली ती तेलामुळे" एवढच ढोलकं! वाजपेयी सरकारने दिलेली उत्तम अर्थव्यवस्था मातीत घातली/विकुन खाल्ली.

मार्मिक गोडसे's picture

21 Aug 2018 - 5:43 pm | मार्मिक गोडसे

मोदींनी अर्थव्यवस्था चांगली ठेवली ती तेलामुळे" एवढच ढोलकं!
चांगली बिंगली काही ठेवली नाही, बिनडोक नोटबंदी आणि GST सारखे हेकटपणे निर्णय घेवून सरासरी GDP ग्रोथ UPA पेक्षा कमीच ठेवली.

मार्मिक गोडसे's picture

21 Aug 2018 - 3:47 pm | मार्मिक गोडसे

का? डाव उलटला की?

माहितगार's picture

21 Aug 2018 - 4:11 pm | माहितगार

गोडसे साहेब ह्याच धाग्यावर जरा आधी शोधून पहा भाजपा प्रेमींना अर्थशास्त्राच्या मुद्यावर थंडक ठेवण्यासाठी मीच सांगितले त्यांचे ट्रोलींग पण सहन केले. एकमेकांची धोबी पछाड डाव उलटणे आपापसात असते हो ! GDP देशाचा असतो तो कमी झाला असेल तर सरकारवर कठोर टिका करा , काँग्रेस भाजपाला एकमेकांची धोबी पछाड नक्कीच करु द्यात . " भारताचा GDP कमी झाला अरे वा ! भाजपाची धोबी पछाड " , केव्हा एकदा भारताचा GDP कमी होतो म्हणून वाट पहात होतो का आपण ? तसे नक्कीच नसावे असा विश्वास आहे म्हणून म्हटले.

मार्मिक गोडसे's picture

21 Aug 2018 - 4:55 pm | मार्मिक गोडसे

भाजपाची धोबी पछाड " , केव्हा एकदा भारताचा GDP कमी होतो म्हणून वाट पहात होतो का आपण ?
वाट नक्कीच बघत नाही, फ़क्त चुकीचे दावे करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करू नये.

अनुप ढेरे's picture

21 Aug 2018 - 5:12 pm | अनुप ढेरे

दिसाभुल तुम्ही करत आहात. वाजपेयी सरकारच्या अचिव्हमेंट सोनिया सरकारच्या आहेत सांगुन.

मार्मिक गोडसे's picture

21 Aug 2018 - 5:50 pm | मार्मिक गोडसे

म्हणजे मोदी सरकारच्या अपयशाला ते स्वतःच जबाबदार आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

अनुप ढेरे's picture

22 Aug 2018 - 9:49 am | अनुप ढेरे

सरकार अपयशी आहे हा प्रचार फक्त काँगि लोक करत आहेत. उलट जी अर्थव्यवस्था मिळाली होती ती आता बरीच सशक्त आहे.

मार्मिक गोडसे's picture

22 Aug 2018 - 10:15 am | मार्मिक गोडसे

उलट जी अर्थव्यवस्था मिळाली होती ती आता बरीच सशक्त आहे.
बीजेपी सरकारने मागील चार वर्षात नक्की असं काय केलंय अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी?

अनुप ढेरे's picture

22 Aug 2018 - 11:43 am | अनुप ढेरे

- नैसर्गिक संसाधनांचा कंपलसरी लीलाव
- GST (प्लीज ही सोमिया सरकारची आय्डिआ होती म्हणू नका. ही कल्पना वाजपेयी सरकारच्या काळातली आहे. हा कायदा आणायला सर्व राज्य एकत्र आणणं गरजेचं होतं. त्यासाठी राजकीय भांडवल लागतं. ते मोदींनी मिळ्वलं आणि ही सुधारणा आणली.)
- प्रत्यक्ष कर संकलनात वाढ ( GST आणि मेबी नोटबंदीमुळे)
- तेलाच्या प्रॉडक्टवरची सबसीडी कमी. डिझेल वर शून्य सबसीडी आणि केरेसीनची कमी.
- सरकारी खर्चात कपात
- महागईचा दर १२ वरून ४ वर
- लागोपाठ दोन दुष्काळ असुनदेखील अन्न महागई १५ वरुन ४ वर.
- बँकाच्या बुडीत कर्जासाठी आर्बिआय ला पावर.
- बुडीत कर्ज सोडवायला दिवाळखोरी कायदा. (या कायद्यांतर्गत भुषण स्टीलच्या ५०००० कोटी कर्जापैकी ४००००कोटी वसुल. इतर मोठ्या १२ बुडीत कर्ज केसेस निवारणात आहेत.)
- महागई नियंत्रणाचं टार्गेट आणि अधिकार आर्बिआयकडे

नगरीनिरंजन's picture

23 Aug 2018 - 7:39 am | नगरीनिरंजन

वा! स्पिनमास्टर!
नोटबंदीमुळे जवळ जवळ २% जीडीपीचे नुकसान झाले ते नजरअंदाज करुन त्या तुलनेत क्षुल्लक असलेल्या करसंकलनाकडे बोट दाखवायचं. शिवाय जीएसटी काँग्रेस आणू पाहात असताना बीजेपीने "संसद चालू न देणे हा विरोधकांचा हक्क आहे" असं म्हणून जीएसटी येऊ दिला नाही. म्हणजे जीएसटी आणण्यास उशीर झाल्याने देशाचे नुकसान झाले त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन श्रेय लाटायचे. लिलाव न केल्याने झालेले नुकसान हा घोटाळा असेल तर उशीर केल्याने झालेले नुकसानही घोटाळाच मानला पाहिजे.
तेलावरची सबसिडी कमी करण्याची प्रक्रिया युपीएच्या काळापासूनच चालू आहे. बीजेपीने सुरुवात केली असं काही नाही. उलट आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती गगनाला भिडलेल्या असताना पेट्रोल महाग झालं म्हणून ममोंना दोषी ठरवून बोंब ठोकण्यात प्रधानसेवक आघाडीवर होते. तेच स्वतःच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी असताना टॅक्स कमी न करुन वर डेफिसिट मॅनेजमेंट चांगली केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली.
सरकारी खर्चात कपात केली असेल पण त्याच बरोबर उच्चशिक्षणावरच्या खर्चाचे बजेट कट केले. आरोग्यसेवांवरच्या खर्चाचे बजेट कमी केले. काँग्रेसच्याच रोजगार योजना पुढे चालू ठेऊन त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.
लागोपाठ दोन दुष्काळांचे कौतुक सांगणार्‍यांनी २००८ मध्ये प्रचंड मोठे आर्थिक संकट असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेला बर्‍यापैकी इन्शुलेट करणार्‍या अर्थशास्त्रींचे आभार मानायला विसरु नये. शिवाय हा दुष्काळ संपत असतानाच नोटबंदी करुन लोकांचे कंबरडे मोडले त्याबद्दल तर चकार शब्द काढत नाहीत.
एनपीएच्या बाबतीत रघुराम राजन जेव्हा कडक पावले उचलत होते तेव्हा त्यांना विरोध केला. एका पीएसयुची मालकी दुसर्‍या पीएसयुला विकून ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे प्रकार केले. व्याजदरातून इन्फ्लेशन नियंत्रणाचे अधिकार आरबीआयकडेच असतात, ते आत्ता दिले असे नाही. उलट गुरुस्वामी सारख्या धर्मांध स्यूडोइकॉनॉमिस्टाला बोर्डावर बसवून त्रास द्यायची सोय करुन ठेवलीय.
बाकी सगळी ग्रोथ जॉबलेस आहे हे तर स्पष्ट असताना भजी तळा वगैरे सल्ले देऊन प्रधानसेवकांनी आपली समज दाखवून दिली आहेच.
आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की चांगलं शिकले सवरलेले लोक आतून इतके धर्मांध आहेत की काहीही करुन ह्या सरकारचं समर्थन करताहेत; हे सरकार सरळसरळ धर्माचं राजकारण करतंय हे दिसत असूनही. ह्या राजकारणाने इनोव्हेशन न होणे, नव्या कंपन्या व संधी न येणे यामुळे अर्थव्यवस्थेचे जे नुकसान होतेय त्याची तर गणनाच नाही. अनेक श्रीमंत लोक देश सोडून चाललेत.
काँग्रेसबद्दल प्रेम नाही; पण त्यांना नावं ठेऊन सत्ता हस्तगत केलेल्यांनी त्यांच्यापेक्षा चांगलं असावं इतकी किमान अपेक्षाही पूर्ण होत नाहीय.

अनुप ढेरे's picture

23 Aug 2018 - 10:17 am | अनुप ढेरे

काहीही!
एकतर जिएस्टी वाजपेयी सरकारची कल्पना होती. त्याचं श्रेय सोनिया सरकारने लाटायचा प्रयत्न केला.

---

तेलावरची सबसिडी कमी करण्याची प्रक्रिया युपीएच्या काळापासूनच चालू आहे.

निखालस खोटं! ही प्रक्रिया वाजपेयींनी सुरु केलेली जी यांनी स्लो केली.

२००८ मध्ये प्रचंड मोठे आर्थिक संकट असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेला बर्‍यापैकी इन्शुलेट करणार्‍या अर्थशास्त्रींचे आभार मानायला विसरु नये.

वर एक म्हणतायत की २००८च्या संकटामुळे महागई वाढली आणि ग्रोथ कमी झाली. नक्की काये? इन्शुलेट झाली का नाही अर्थव्यवस्था.

एनपीएच्या बाबतीत रघुराम राजन जेव्हा कडक पावले उचलत होते तेव्हा त्यांना विरोध केला.

हे कुठे दिसलं तुम्हाला? उलट २०१४/१५ पासुन भसाभस खरे एन्पिए बाहेर यायला लागले. आधी कसे काय नाही आले. राजन २०१३मध्ये गव्हरनर झाले. त्याअधी अर्थसल्लागार होते. असं काय २०१४मदध्ये की खरे एन्पिए बाहेर आले?

व्याजदरातून इन्फ्लेशन नियंत्रणाचे अधिकार आरबीआयकडेच असतात, ते आत्ता दिले असे नाही.

पुन्हा चूक. मनिटरी पॉलिसी कमीटी आणि त्याला दिलेलं इन्फ्लेशन टर्गेटिंग हे २०१५ का २०१६ चं आहे.

नगरीनिरंजन's picture

23 Aug 2018 - 4:55 pm | नगरीनिरंजन

जर जीएसटी वाजपेयींची कल्पना होती तर निव्वळ सोनियाने श्रेय घेऊ नये म्हणून भाजपने व मोदींनी त्याला विरोध केला काँग्रेसच्या काळात? वा! काय राष्ट्रवाद आहे! वा!

हेच लॉजिक आधारला लावलं तर काय दिसतं? आधारविरुद्ध छाती बडवणारे प्रधानसेवक आता जिकडेतिकडे आधार लिंक करा म्हणताहेत. शिवाय हेतू हा सांगितला जातोय की सरकारी योजनांचे लाभधारक ओळखता यावेत म्हणून व सत्पात्री दान देता यावे म्हणून ते आवश्यक आहे. मग जे लोक सरकारी योजनांचा लाभ घेत नाहीत त्यांची बँक खाती व फोन नंबर आधारला जोडायचे काय कारण?

मॉनेटरी नियंत्रण हे नेहमीच सेंट्रल बँकेचं काम असतं. २०१५-१६ मध्ये त्याची कमिटी केली गेली पूर्वी अशी कमिटी नव्हती इतकंच.
अशी कमिटी करण्याचा हेतूही गुलदस्त्यात आहे.

राजन यांनी बँकांची बॅलन्स शीट स्वच्छ करायचा तगादा लावला होता.

https://indianexpress.com/article/business/banking-and-finance/npa-clean-up-should-have-started-much-earlier-rajan-2937015/

As with inflation, it was the duty of the central bank to press for bank clean-up earlier, when few among the public support the central bank’s activism,” he said, addressing the 10th Statistics Day conference at the RBI headquarters here.
He also said the lenders were initially reluctant to implement the clean-up which started from December 2015 with RBI identifying 150 largest accounts which were facing problems in servicing their debt obligations. “Fortunately, after an initial reluctance, banks have entered the spirit of the clean-up and some have gone beyond what was demanded of them,” he said, adding that it was “easy to ignore” the problem of loan losses hoping that it goes

२००८ च्याक्रायसिसमुळे वाढ कमी झाली हे खरेच पण ती तुलनात्मकरित्या. म्हणजे ते संकट नसते तर आणखी वाढ झाली असती. कोणत्याही परिस्थितीत ह्या सरकारपेक्षा सरासरी वाढ युपीएच्या काळात चांगली होती हे तर सरकारी संस्थेनेच सांगितलंय.

माहितगार's picture

23 Aug 2018 - 10:21 am | माहितगार

@ नगरीनिरंजन

...काँग्रेसबद्दल प्रेम नाही; पण त्यांना नावं ठेऊन सत्ता हस्तगत केलेल्यांनी त्यांच्यापेक्षा चांगलं असावं....

जनतेच्या अपेक्षा कितपत पूर्ण होताहेत आणि नाही याचे परिमाण नॅशनल सँपल सर्वेक्षण टाईप सर्वेक्षणांमधून यावयास हवे, आर्थीक आकडेवारी एक घटक असतो, तर मिडीया क्रिएटेड परसेप्शन सर्वस्वी वेगळा घटक असतो. आणि अनेक एकत्रित परिणामातून निवडणूकीचे निकाल येतात ते २०१९ मध्ये काय येतील ते काळाच्या ओघात दिसेल. व्यक्तिगत स्तरावर अपेक्षा पूर्ण होताहेत अथवा नाही हे सब्जेक्टीव्ह गणित असावे. पण आपल्या उपरोक्त वाक्यातील अपेक्षेत गैर काही नसावे हेही खरे.

...अनेक श्रीमंत लोक देश सोडून चाललेत....

इथे नेमके काय अपेक्षीत आहे ? हा केवळ परसेप्शनवर अवलंबून न रहाता फॅक्ट बेस्ड विसृत चर्चेचा भाग असावा आणि इतर सदस्यांनी या विषयावर नगरीनिरंजन यांच्याशी मोदी समर्थकांनी अवश्य चर्चा करावी.

...ह्या राजकारणाने इनोव्हेशन न होणे, नव्या कंपन्या व संधी न येणे यामुळे अर्थव्यवस्थेचे जे नुकसान होतेय त्याची तर गणनाच नाही. ...

हे विरोधकांचे आपोझीट गोबेल्स प्रचाराचे टेक्नीक नाही ना अशी प्रथमदर्शनी शंका वाटते. नव्या कंपन्या सुरु करण्यात काँग्रेस काळात नव्हती अशी नेमकी कोणती व्यवधाने मोदी काळात वाढली आहेत ? व्यवसाय मैत्रीपूर्णतेत सुधारणा हे मोदींचे लक्ष्य होते असे ऐकुन होतो ते किती प्रत्यक्षात आले ते सर्वेक्षणे आणि आकडेवारीने तपासले जावयास हवे ऑफ हँड कॉमेंटला काय अर्थ आहे ? मोदींच्या राष्ट्रवादी राजकारणाने टेक्नॉलॉजी क्षेत्रातील इनोव्हेशन कशी थांबू शकतात ? ऊलट आय आयटी च्या सीट वाढवणे आय आयटी झालेल्यांना ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयात शिकवण्यसाठी पाठवणे अशी पावले उचलताना मोदी सरकार दिसते आहे. उदा. द्वितीय महायुद्धकालीन जर्मनीचा मी समर्थक नाही -सांगण्याचा मुद्दा आवळा आणि भोपळ्याची मोट बांधण्याबद्दलच्या साशंकतेचा आहे- जिथ पर्यंत तंत्रज्ञान विकास आणि औद्योगीक उत्पादन वाढ या गोष्टी आहेत त्यांचा राष्ट्रवादी राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध असतोच असे नाही.

आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की चांगलं शिकले सवरलेले लोक आतून इतके धर्मांध आहेत की काहीही करुन ह्या सरकारचं समर्थन करताहेत; हे सरकार सरळसरळ धर्माचं राजकारण करतंय हे दिसत असूनही.

धर्म आणि राजसत्ता यांची फारकत असावी याचा तात्विक समर्थक आहे. पण तटस्थ विश्लॅषक म्हणून बघताना या विषयात काही गोष्टी जाणवतात आधीच्या आणि राज्यसरकारातील आताच्याही काही तथाकथीत सेक्युलर सरकारांनी स्वतःसुद्धा लांगुलचालनवादी धर्मीय आणि जातीय राजकारणाचे आधार घेतल्याच्या परिणामातूनच परंपरावादी राजकारणास संधी मिळाली. आपल्या मिपाच्या ताज्या घडामोडी धाग्यावर कुणितरी येऊन मुस्लिम लीगची भलावण करते, मिपावरचे सेक्युलर मुस्लिम लीग शब्दातच धर्मीय राजकारण आहे हे लक्षात न घेता अशा भलावणीची बाजू घेतात यातून नेमक्या कोणत्या सेक्युलॅरीझमचे चित्र उभे रहाते आणि अशा तथाकथित सेक्युलॅरीझम वर परंपरावाद्यांना विश्वास का आणि कसा वाटेल ? आणि ज्यांना असा विश्वास वाटत नाही ते शिकले सवरलेले आहेत हे तुम्हीच सांगताय. जो पर्यंत सेक्युलरांचा तथाकथितपणा आणि लांगुलचालन लोप पावणार नाही, तथाकथित धर्म निरपेक्षतेत सापेक्षतेची भेसळ असेल तोपर्यंत खर्‍या शिकल्या सवरलेल्यांचा विश्वास उडणे स्वाभाविक असावे.

आता उडालेला विश्वास वापस संपादन करण्यासाठी विरोधी पक्ष काय करत आहेत तर आम्ही सुद्धा बहुसंख्यीय धर्मीय राजकारण करु शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न . म्हणजे आक्षेपार्ह लांगुलचालनवादी कृती न थांबवता दुसर्‍याही बाजूचे लांगुलचालन याला सेक्युलॅरीझम म्हणतात ? हि तुमच्या (म्हणजे राजकारण्यांच्या ) सेक्युलॅरीझमची व्याख्या आणि कमिटमेंट आहे ? राजकारणी माणूस धर्मीय नैतिकतेने शुद्ध असावा ही म.गांधीकृत व्याख्या राजकारणात धर्मीय उत्पातमुल्य आणि मतपेटीमुल्यापुढे वाकते तेव्हा तेव्हा हा सेक्युलरांचा वैचारीक घोटाळा चालू झालेला असतो.

...नोटबंदी...

अंमलबजावणीत त्रुटी असणे आणि एखादे तत्व चुकणे यात फरक असावा . नोटबंदी अर्थशात्रीय तत्वांवर अगदीच चुकीची नसावी हे नोटबंदीत पर्सनली सफर होऊनही मांडावे वाटते. जेव्हा ग्रोथरेट वाढतात तेव्हा ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना महागाईची झळ बसत नसते पण ज्यांच्याकडे पैसा पोहोचलेला नाही त्यांना ती झळ बसत असते म्हणूनच ग्रोथरेट असूनही विरोधीपक्ष सत्तेत येऊ शकतो आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यची जबाबदारी असलेल्या सरकारने त्या दिशेने पाऊले उचलण्याचे धारीष्ट्य दाखवले ह्याचे अमंलबजावणीतील त्रुटी स्विकारुनही अशा धारीष्ट्याचे स्वतःचे महत्व असावे. अर्थात इतरांची राजकीय कारणांनी मते वेगळी असू शकतात.

बाकी प्रतिसादातील टिका कुठे कुठे योग्य ही असू शकेल. उर्वरीत टिकेस स्विकारायचे कि प्रतिवाद हे भाजपा आणि मोदी समर्थक बघतील.

ह्ये काय, राजकारनात इतकं सम्तोल लिवायचं नसतं. आप्ल्या साईटचं खरं डोंगराइत्कं वाढ्वून आनि नाय काय गावलं तर खोटंनाटं लईच रंगवून सांगायचं अस्त नव्हं का ?! आप्ला ईजय व्हयाला हवा. सत्यबित्य सग्ला साला अंधश्रद्धा.

आनी जो कोनी खोटं दनकून सांग्तो त्येलाच हाल्ली शेक्युलर आनि काय ते- हां ईचारवंत- म्हंत्यात नव्हं का ? ;) =))

माहितगार's picture

24 Aug 2018 - 12:56 pm | माहितगार

खरय अस सगळ चालू असताना, सळसळून उठणे आणि देशप्रेमाच्या आणाभाका पुनःश्च घेऊन देशासाठी त्याग करण्यास सदैव तयार टेवणार्‍या मनांची मशागत ज्यांनी ज्यांनी म्हणून केली त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे वाटते.

सुनील's picture

24 Aug 2018 - 5:59 pm | सुनील

एखाद्या प्रतिसादाला उपप्रतिसाद मिळाला तरी संपादन करण्याची सोय फक्त "काहींना"च आहे.

"ग्रब्रिएल" त्या मोजक्या काहींपैकी दिसतात!!!

मार्मिक गोडसे's picture

24 Aug 2018 - 6:27 pm | मार्मिक गोडसे

एखाद्या प्रतिसादाला उपप्रतिसाद मिळाला तरी संपादन करण्याची सोय फक्त "काहींना"च आहे.

खरंय, ठराविक लोकांनाच ही सोय का दिली असावी?

माहितगार's picture

24 Aug 2018 - 8:17 pm | माहितगार

आपली नेमकी समस्या लक्षात आली नाही. प्रतिसादातील उणीवेसाठी प्रतिसाद संपादीत करुन हवा असेल तर संपादकांना विनंती करण्याची सुविधा उपलब्ध असते असे वाटते.

मार्मिक गोडसे's picture

24 Aug 2018 - 8:46 pm | मार्मिक गोडसे

वाटते ,की आहे? ह्याला काही कालमर्यादेचे बंधन आहे का?
काही जण आपल्या एकाच प्रतिसादात अनेकवेळा बदल करतात, नवीन बदल समजण्यासाठी संपूर्ण प्रतिसाद वाचवा लागतो, जेथे जेथे बदल केलं तिथे बोल्ड मध्ये लिहिले तर नवीन बदल सहज समजून येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2018 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसादातील उणीवेसाठी प्रतिसाद संपादीत करुन हवा असेल तर संपादकांना विनंती करण्याची सुविधा उपलब्ध असते असे वाटते.

+१ मजकूरातील चुकीचे व्याकरण, अर्थात गडबड होईल असे टंकन, इत्यादीत सुधारणा करण्यासाठी कोणीही विनंती करू शकतो.

नगरीनिरंजन's picture

23 Aug 2018 - 4:30 pm | नगरीनिरंजन

चर्चा ससंदर्भ व मुद्देसूद असावी हा आग्रह स्तुत्य आहे. पण वरती ढेरेसाहेब ठासून म्हणतात की सेंट्रल बँकेला इन्फ्लेशन कन्ट्रोलचे अधिकारच२०१४५-१६ ला ”दिले” तर काय बोलणार अशा लोकांसमोर? आधी बहुतेक रिझर्व बँकेचं काम फक्त नोटा छापण्याचं असावं. पलीकडच्या साईटवर गब्बरसिंग साहेब जेव्हा इन्फ्लेशन नियंत्रण फक्त सेंट्रल बँकेचीच जबाबदारी आहे म्हणतात तिथे हे वाद घालत नाहीत.
तसंही विधा आणि संदर्भ देऊन मतपरिवर्तन होत नाही असा अनुभव आहे. मुळात लोकशाहीत लोकांनी सरकारचे टीकाकार असले पाहिजे ही गोष्टच समजत नसेल किंवा इतर काही कारणांमुळे समजून घ्यायची नसेल तर त्याला कोण काय करणार?
असो. आता इतर मुद्द्यांकडे.
नोटबंदी...
नोटबंदीला नोटबंदी का म्हणतात कळत नाही; प्रत्यक्षात ती नोटबदली होती. मुळात हेतू नक्की काय आहे ते सांगितले नाही.
म्हणजे काळापैसा बाहेर काढायचा होता का? की खोट्या नोटा बाहेर काढायच्या होत्या? की टेररिस्ट फायनॅन्सिंग थांबवायचं होतं? कॅशलेस इकॉनॉमी हवी होती की लेसकॅश हवी होती?
नक्की काहीच माहिती दिली नाही; त्यामुळे कोणता हेतू कितपत साध्य झाला हे जाहीर करायची आपोआपच जबाबदारी नाही सरकारची. कॅग आता काय म्हणेल ते म्हणो. अर्थव्यवस्थेतली कॅश तेवढीच राहणार असेल, उलट आणखी मोठ्या नोटा येणार असतील तर अर्थशास्त्राच्या नक्की कोणत्या तत्वाला अनुसरुन हे बरोबर आहे याची मलातरी कल्पना नाही. समर्थकांनी संदर्भ दिल्यास उत्तम.

श्रीमंत लोक देश सोडून चालले आहेतः
https://m.businesstoday.in/story/at-least-23000-dollar-millionaires-have-left-india-since-2014-report/1/273018.html

The report states that while the outflow of HNWIs from India is not particularly concerning as the country is still producing far more new HNWIs than it is losing, a spike in this number is usually bad news. "HNWIs are often the first people to leave. They have the means to leave unlike middle class citizens. If one looks at any major country collapse in history, it is normally preceded by a migration of wealthy people away from that country," said Amoils. He added that as the standard of living improves in India and China, he expects several wealthy people to move back home.

सेक्युलरिजम
काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे अवाजवी लांगूलचालन केले म्हणून असंतोष आहे हे समजण्यासारखं आहे. त्यामुळे व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसला जावे लागले.
पण ह्याचा अर्थ असा नाही की नवीन सरकारने बहुसंख्यांचे लांगूलचालन करावे. जे काँग्रेसला जमले नाही ते खरेखुरे निधर्मी सरकार देणे हा खरा पर्याय होता. पण ते न करता व विकासकामांवर लक्ष केंद्रित न करता जो पक्ष आधीच सत्तेबाहेर गेला आहे, ज्याला जनतेने नाकारले आहे त्यापक्षाचा समूळ नायनाट करण्याची भाषा केली जातेय हे पूर्ण लोकशाही विरोधी आहे. खरा सेक्युलरिझम भारतात कधी आलाच नाही; पण आजकालचा सरकारमान्य दहशतवाद पाहता कॉग्रेसने केलेले लांगूलचालन कमी हानीकारक होते असे म्हणायची वेळ आली आहे.

इनोव्हेशन...

पहिली गोष्ट म्हणजे मोदींच्या राजकारणाला राष्ट्रवादी राजकारण म्हणणे बंद करा. “मी राष्ट्रभक्त आहे आणि मला विरोध करणारे राष्ट्रद्रोही आहेत” असे म्हणणारा व खुशाल खोटे बोलणारा नेता कधीही राष्ट्राचे भले करत नाही हा इतिहास आहे.
बाकी विज्ञान परिषदेत वैदिक विज्ञानाच्या गप्पा करणे, गोमूत्र-गोमयावर संशोधन करणे वगैरे विनोदी प्रकार सोडले तरी शैक्षणिक क्षेत्रात मूलभूत सोयी करण्यापेक्षा बुलेट ट्रेन टाईप प्रोजेक्ट्स करुन इंडिया शायनिंग करायची वृत्ती जास्त दिसते.

https://www.theindianwire.com/education/modi-visits-iit-b-students-question-govts-anti-education-politics-69553/

The disturbed student sentiment is a result of various governmental measures in the past few months. They include the decreasing budget allocation for institutes of higher learning and retraction of the Government of India- Post Matric Scholarship (GoI-PMS) for reserved categories (ST/SCs and OBC) in Institutes like Tata Institute of Social Sciences (TISS). The most recent one includes the shortcomings of the new Higher Education Committee of India Bill (HECI Bill).

इनोव्हेशनची संस्कृती तशी भारतात फार पूर्वीच बंद पाडली गेली आणि कॉंग्रेसनेही फार भरीव काही केलं नाही; पण ह्या सरकारनेही काहीच केलं नाही ही वस्तुस्थिती त्याने बदलत नाही.
असो.

माहितगार's picture

23 Aug 2018 - 6:06 pm | माहितगार

उत्पादनात लागणार्‍या इन्नोव्हेशनची गरज विज्ञान तंत्रज्ञानात असते, सोशल सायन्सेस मध्ये नव्हे. सोशल सायन्सेस म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान नव्हे. सोशल सायन्सवर किती पिएचड्या ओतल्या तरी राजकीय आणि सरकारी निर्णय मतपेटीवर आधारीत होतात सोशल सायन्सच्या पिएचड्या वाचून नव्हे. खासकरुन ज्यांच्या देशभक्ती साशंकीत आहेत त्या लोकांच्या पिएचड्या डोक्यावर घेऊन नव्हे. देशभक्तीचा मामला शिंपल असतो प्रमाणपत्र दे म्हणले रात्री बारावाजता सुद्धा झेंड्याला सॅल्युटमारुन राष्ट्रगीत म्हणावे. जे म्हणणार नाहीत त्यांना देशप्रेमाचे पाठ चिनी कम्युनीझम पद्धतीने द्यावेत. चिनी कम्युनीझमच्या मानाने मला ते मोदीच काय भाजपा लय शामळू प्रकरण वाटते. त्या कंदाहारच्या विमान अपहरण प्रकरणातही बोटचेपेच होते बोटचेपे पणा करुनही शिव्या खायच्या कोणा देवाने यांना सांगितले ते कळत नाही.

कुणि मला पंतप्रधान करत नाही ते ठिक नाही तर ज्या देशद्रोह्यांच्या फाशीच्या विरोधात काहुर माजवले त्या फाश्या अयोग्य होत्याना ? फाशी माफ का केली नाही असे म्हणत काँग्रेस नेतृत्वाला आधी आत टाकले असते. मग ते फाशी देणे तर बरोबर होते म्हणाले की फाशीचा विरोध करणर्‍यांना पुढच्या ४८तासात आत केले असते, भारताचा लष्कर प्रमुख असतो तर , देशभक्तीचा मामला शिंपल असतो प्रमाणपत्र दे म्हणले रात्री बारावाजता सुद्धा झेंड्याला सॅल्युटमारुन राष्ट्रगीत मी म्हणतो इतरांनीही म्हणावे., असे एका वाक्यात ऐकवून, भारत विरोधी कारवाया करणार्‍या प्राध्यापक मंडळींना खास करुन जीनयु आणि जादवपूर उलटे लटकवून खालून मिरच्यांचा धूर देऊन मागच्या सात जन्मातील पापे आठवतील एवढी फटके देण्याची व्यवस्था नक्कीच केली असती. या देशद्रोह्यांचे सुदैव आहे मी महात्मा गांधींचा अंहिसावाद मानतो आणि म्हणून देशाचा लष्कर प्रमुख होऊ शकत नाही ते.

नगरीनिरंजन's picture

23 Aug 2018 - 7:51 pm | नगरीनिरंजन

=))

आमच्या शुभेच्छा आहेत पण आपल्यासोबत!

शब्दबम्बाळ's picture

24 Aug 2018 - 12:28 am | शब्दबम्बाळ

मीच फक्त देशभक्त आणि मीच ठरवणार आणखी कोणी आहे का ते! :D
"माझी बॅट माझे नियम" असे चालायचे लहापणी तेच काही लोक मोठेपणी सुद्धा करतात वाटत!

उत्पादनात लागणार्‍या इन्नोव्हेशनची गरज विज्ञान तंत्रज्ञानात असते, सोशल सायन्सेस मध्ये नव्हे.

क्या बात!! आयटी सेल वापरून (अप)प्रचार करणे हे ही इन्नोव्हेशनच होते हो भारतीय राजकारणात! आता मानगुटीवर बसतेय ती वेगळी गोष्ट...

देशभक्तीचा मामला शिंपल असतो प्रमाणपत्र दे म्हणले रात्री बारावाजता सुद्धा झेंड्याला सॅल्युटमारुन राष्ट्रगीत म्हणावे. जे म्हणणार नाहीत त्यांना देशप्रेमाचे पाठ चिनी कम्युनीझम पद्धतीने द्यावेत.

एक्कच नंबर हा! नाही म्हणजे इतक्या महिन्यात काही फरक पडला असेल विचारात असे वाटले होते पण देशभक्तीचे घट्ट/पातळ असले "फॅट" मोजण्याचे यंत्र अजून पण "तुमच्याकडेच" आहे वाटत.

राष्ट्रगीत म्हणा आणि इतर वेळी लोकांना लुटा किंवा गायी वाचवायला त्यांना मारून टाका... तरीही तुम्ही देशभक्तच हा!
देशात कचरा करा, उघडयावर लघवी करा आणि राष्ट्रगीत म्हणा, तुम्ही लगेच देशभक्त!

भारताचा लष्कर प्रमुख असतो तर , देशभक्तीचा मामला शिंपल असतो प्रमाणपत्र दे म्हणले रात्री बारावाजता सुद्धा झेंड्याला सॅल्युटमारुन राष्ट्रगीत मी म्हणतो इतरांनीही म्हणावे., असे एका वाक्यात ऐकवून, भारत विरोधी कारवाया करणार्‍या प्राध्यापक मंडळींना खास करुन जीनयु आणि जादवपूर उलटे लटकवून खालून मिरच्यांचा धूर देऊन मागच्या सात जन्मातील पापे आठवतील एवढी फटके देण्याची व्यवस्था नक्कीच केली असती.

नाही म्हणजे, न्यायालये आहेत देशात हे आपल्याला माहित नसले तर आठवण करून देतो! कोण राष्ट्रद्रोही वगैरे ठरवायला कायदे देखील आहेत.
तुम्ही कोण ठरवणारे? जरी लष्कर प्रमुख झाला असतात (बाता मारायला काय जातंय?) तरीपण तुम्हाला हेच बोललो असतो.
मागच्या वेळी काहीतरी देशासाठी रक्त सांडलं, कुर्बानी द्यायला चालले तरच देशभक्त वगैरे असली डेफिनिशन होती तुमची... बदलली आता ती?

माहितगार's picture

24 Aug 2018 - 11:48 am | माहितगार

मागच्या वेळी काहीतरी देशासाठी रक्त सांडलं, कुर्बानी द्यायला चालले तरच देशभक्त वगैरे असली डेफिनिशन होती तुमची... बदलली आता ती?

नाही देशभक्ती विषयक अपेक्षा आजीबात बदललेल्या नाहीत, जेएनयु आणि जादवपूर मधील प्राध्यापक मंडळी नेमकी कुठे कमी पडली याचे सविस्तर विश्लेषण माझे तुमच्याही धाग्याच्या आधी करुन झाले आहे ते पहावे. जगातला कोणताही देश बहुसंख्यांच्या अथवा राज्यकर्त्यांना पाठींबा देणार्‍यांच्या इच्छाशक्ती आणि हेजिमोनीवर चालतो हे वास्तव जीनयुच्या जादवपूरच्या तथाकथीत प्राध्यापकांनी पण नाकारुन दाखवावे. आसेतू हिमाचल एक न राहू शकलेल्या देशाला सातत्याने परकीय आक्रमणे आणि मानहानीला सामोरे जावे लगले आहे हे वास्तव कसे बदलेल ? आसेतू हिमाचल भारताचा भाग असलेल्या देशांना भिकार्‍याचा कटोरा घेऊन फिरावे लागते हे वास्तव जनतेपासून किती लपवता येते ? पाकीस्तानचा नवा पंतप्रधान इम्रानखान काही ट्रिलीयन डॉलरचे कर्ज असल्याची स्वतःच कबुली देतो सौदी आरब चिन ते युरोमेरीका सगळीकडे येते चार महिने भीक मागत फिरणार आहे. एकसंघ भारतावरचे प्रेम शाबुत ठेऊन पाकीस्तानचे भाग एकसंघ भारताचे भाग असते तर एवढी नामुष्कीची वेळ आली असती का ? जिओग्राफीकली एक असलेल्या देशांचे अर्थशास्त्र एक असू शकते परस्परात्ली युद्धे हनीकारक आणि महागडी असतात , देशाची व्याख्या हि जिओग्राफीकलच असावी लागते त्याला धर्म भाषा वंश आधारीत राष्ट्र निर्मीतीच्या युरोपीयन व्याख्या अवास्तव आणि तर्कशुन्य असतात हे फुटीरतावादी चळवळींना तर्कपूर्ण पणे पटवण्याची पहिली जबाबदारी देशातील विचारवंतांची आणि प्राधान्याने प्राध्यापकांची असते, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे ही जबाबदारी सुद्धा त्यांची असते - सीमेवर लढाईला जात नाही कमीत कमी तेवढेतर करा, मी चीनचे उदाहरणच एवढ्यासाठी दिले की कुणीही शहाणपणा केला की आधी लेबरकँप मध्ये पाठवले जाते सरकारी पगार घेऊन नक्षलवादाच्या गप्पा हाणता येतात त्यांनी लालबहादूरशास्त्रींचा मंत्र घेऊन आधी स्वतः मजूर म्हणून आणि सीमेवर जवान म्हणून काम करुन मग विद्यापीठात शिकवण्यास यावे, आणि राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्याची जबाबदारी राजधानीच्या शहरातील प्राध्यापकांची तर आधी असते, आणि देशप्रेम विषयक जबाबदारीत कुचराई करायची आणि विद्वान असल्याच्या वल्गना करायच्या त्या ज्यांचे देशप्रेम जागृत आहे त्यांनी का ऐकुन घ्याव्यत ? राष्ट्रप्रेमाची हेजीमोनीवरच देशाचे अस्तीत्व आणि बहुसंख्यांचे हित असते आणि स्वराष्ट्रप्रेमाचे प्रदर्शन करण्यात आणि या विषयावर कठोर वचने ऐकवण्याबाबत बहुसंख्यांनी लाजण्याचे काही कारण नसावे. देशाचे अस्तीत्व या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. जिनएनयु जादवपूरच्या ज्या प्राध्यापकांना शरीयाच्या बाजू घ्यायच्या आहेत त्या शरीयांतील शिक्षांच्या इक्विव्हॅलेंट शिक्षाच सुचवली ना ? हि शिक्षा देशद्रोही समर्थकांना बोचत असेल तर शरीयाचे ग्रंथप्रामाण्य, नक्षलवादी ते अतीरेकींयांचे अमानवीय हिंसाचार बोचावयास हवेत की नको ?

माझी आधीची आपल्या धाग्यावर केलेल्या निम्नलिखीत भागाशीही मी ठाम आहेच. ते इतर वाचकांच्या माहिती साठी पुन्हा कॉपीपेस्ट करतो.

देशप्रेमा बद्दल ज्यांच्या प्रिऑरिटी सुस्पष्ट आहेत त्यांना प्रश्नांचा बाऊ करण्याचे कारण काय असावे ? मला कूणी एक लाख वेळा देश प्रेमाची शपथ घे म्हटले तर मी अब्जावधी वेळा घेईन, कुणी शंका घेतली तर आधी त्याच्या देशप्रेमाचा आदर व्यक्त करेन आणि मग मी सुद्धा तुझ्या एवढाच देशप्रेमी आहे चल दोघे मिळून देशासाठी कुर्बानी देऊ म्हणेन. ज्यांची हि तयारी नसते त्यांचे देशप्रेम पातळ असू शकते आणि अशा पातळ फाटण्याची शक्यता असलेल्या पोतेर्‍यांकडे समाज बोट दाखवेल याला ते स्वतःच जबाबदार असतात,

तुम्ही कोण ठरवणारे?

देशाच्या अस्तीत्वात देशप्रेमाने स्वआहुती देण्यास खारीचा वाटा घेणारी काळाच्या ओघात विसरले जाणारी फुलाची पाकळी , ज्या पाकळ्याच्चे योगदान देशाचा आधारस्तंभ असते. सुजाण नागरीक लोकशाहीचा आधारस्तंभ असेल तर देशप्रेमी नागरीक देशच्या अस्तीत्वाचे आधारस्तंभ असतात आणि देशप्रेमी नागरीकांचा देशावर आधीकार आधी असतो. आणि हा आधिकार ते त्यांच्या इच्छाशकीच्या सातत्यपुर्ण देशप्रेम आणि देशासाठी स्वाअहुती देऊन टिकवत असतात. आणि ते ठरवणारे आम्ही अभिमानी देशप्रेमी !!

...नाही म्हणजे, न्यायालये आहेत देशात हे आपल्याला माहित नसले तर आठवण करून देतो! कोण राष्ट्रद्रोही वगैरे ठरवायला कायदे देखील आहेत.

देशप्रेमी मंडळींना स्वतःच्या देशाचे कायदे आणि न्यायालये मान्य असतातच, हो ते आम्हा देशप्रेमींना अभिमन्यू प्रमाणे आईच्या गर्भात असताना पासून कल्पना असते. पण देशाची एकसंघतेचा कायदा सर्वात मोठा कायदा असतो, आणि देशाची एकसंघता नाकारणारे देशाच्या कायद्यांचे आणि न्यायव्यवस्थेचे पहिले दोषी असतात. याच देशाच्या संस्कृती, कायदा आणि न्यायालयीन उदारतेचा आणि व्यवस्थेचा गैरफायदा घेत देशा विरुद्ध फितुरीच्या भूमिका बजावणार्‍यांना चार खडे बोल सुनावून वेडात दौडणारे देशप्रेमी या देशात जन्मतात हे सडेतोड प्रतिक्रीयांनी वेळच्या वेळी दाखवून द्यावे लागते. खरे तर अशी फितुरीची लागण हे देशाचे दुर्दैव , त्याच वेळी देशप्रेमींच्या देशप्रेमाची वेळीच शक्तीवर्धक लस टोचुन देशप्रेमी रक्त सळसळवण्यासाठी देशप्रेमी कटू पण सत्य शब्दातून फितुरांचे एकप्रकारे आभारच मानत असतात.

..तरीही तुम्ही देशभक्तच हा!

अगदी ठळकपणे

देशभक्ती व्यक्तिपरत्वे कमी अधिक प्रमाणावर घट्ट पातळ असणे स्वाभाविक असावे, बाकीचे हजार गुन्हे आणि देशाच्या विघटनाची भाषा बोलणे या गुन्ह्यांमध्ये जमिन अस्मानचे अंतर असते. बाकी गुन्ह्यांमुळे देशाचे विघटन होत नाही. जेव्हा भारतमाता देशद्रोह्यांना सहन करते तेव्हा, देशाच्या विघटनाविरुद्ध उभे टाकणार्‍या देशभक्तांचे हजार अपराध तिने क्षमाकरुन पोटात घेण्यास हरकत नसावी. देशाच्या विघटनास जबाबदार देशद्रोह आणि इतर अपराध यांची तुलना होऊच शकत नाही.

...नाही म्हणजे इतक्या महिन्यात काही फरक पडला असेल विचारात असे वाटले होते...

फरक कुणात पडावयास हवा ह्याचे आजच्या तथाकथित गुरुजनांना सांगता येत नाही म्हणूनच त्यांना गुरजन म्हणून पुर्वीसारखे संबोधणेही कठीण होते म्हणून आधी तथाकथीत प्राध्यापक (देशाशी फितुरी पसरवणार्‍या) मंडळींना सुतासारखे सरळ करावयास हवे. आपल्या गुरुजनांचे गुरुजन कोण होते त्यांना स्वर्गातून वापस आणून प्रश्न विचारावयास हवेत की ते त्यांच्या विद्यार्थीजनंना देशप्रेमाचे पाठ व्यवस्थित शिकवण्यास नेमके कुठे कमी पडले ? नुसतेच वयाने वाढले देशप्रेमान उणे झाले ते तुमच्या शिक्ष्ण देण्यात उणीव राहील्या कारणे आणि त्यांना त्यांच्या कमी पडण्याची प्रायश्चित्ते घेण्यास सांगितली पाहिजेत.

...इन्नोव्हेशनच...

तेच तर साम्गतोय टेक्नॉलॉजीकल इन्नोव्हेशन आणि राजकारण चालवण्यासाठी सोशल सायन्स मधल्या पिएचड्या लागत नाहीत, प्रत्येक राजकारणी निवडून येतो राजकारणात यशस्वी होतो तेव्हा स्वतः जात्याच प्रत्यक्ष अनुभवातून सोशल सायन्समधला डॉक्टरेट होत असतो, आणि म्हणून सोशल सायन्स मधल्या पिएचडी च्या नावाखाली देश विघटनाचे समर्थ्न करणारी इनोव्हेशन्स होत असतील असे सोशल सायन्स गुंडाळून ठेवावे देशाला अशा वाळवीचा काय उपयोग नाही, आधी देशप्रेमाचे बोला मग बाकी !!

शब्दबम्बाळ's picture

25 Aug 2018 - 12:29 am | शब्दबम्बाळ

निबंध लिहू नका, असल्या तोंडाच्या वाफा दवडून कोणी "फक्त स्वतःलाच " आणि स्वतःच्या विचारांची आरती ओवाळणाऱ्या लोकांनाच देशभक्त समजत असेल तर बालबुद्धी म्हणून दुर्लक्ष करता येईल.
ननि यांनी मुद्दे मांडले होते त्यात कुठे फुटीरतावादी आणि जेएनयू होते? पण तुम्हाला मुख्य मुद्दे सोडून फक्त (तथाकथित) देशभक्तीचे उमाळे फुटतात त्याला इतरांनी काय करावे? का जाणून बुजून मुद्दे सोडून चर्चा (तथाकथित) देशभक्तीकडे न्यायची असते काय माहित...

जिथेतिथे मुद्द्याला धरून लेखन करा म्हणून इतरांना सान्गायचे आणि स्वतः मात्र मी कोणाला धुरी देईन आणि कोणाला प्रमाणपत्र देईन असले फालतू प्रतिसाद देत बसला आहात!

आणि अगदीच म्हणता आहेत ना कुर्बानी, कुर्बानी तर माझ्यामते तुमच्या काळात एखाद तरी युद्ध झालं असेलच कि शत्रूशी, कितीदा कुर्बानी दिलीत ते ऐकायला आवडेल.
का फक्त रोज सकाळी उठून मी कुर्बानी देईन अशी घोकंपट्टी केली आणि राष्ट्रगीत म्हटले कि तुमचा देशभक्तीचा क्रायटेरिया भरतो? (हे व्यक्तिगत वाटत असेल तर संपादक मंडळ काढून टाकू शकते, परंतु इथे काही आयडीनी देशभक्तीचे जे स्वतःचे "नियम" प्रस्थापित करायचं ठरवलं आहे त्याला उत्तर देण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही)

आणि मग जे लोक देश सोडून परदेशात स्थायिक होतात ते तर देशद्रोहीच होतील तुमच्यानुसार नाही का? एक तर ते स्वार्थासाठी चक्क देश सोडतात, ते बाहेरच्या नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्व देखील सोडायला तयार असतात. केवळ चांगल्या राहणीमानाकरिता देशाला सोडून परदेश पकडतात, मग कुर्बान व्हायचं तर कुठच्या कुठे राहील! मग देश सुधारायचा कोणी, नाही का?
आणि तिकडे तर सिनेमागृहात भारताचे "राष्ट्रगीत" पण वाजवलं जात नाही. तुमचा मुख्य क्रायटेरिया तर इथेच गंडला!

मी मागच्या वेळी एक प्रश्न विचारला होता तुम्हाला, त्याच उत्तर अजून दिले नाहीत! सामान्य माणसाचं आयुष्य...
"समजा एक माणूस देशात पूर्ण टॅक्स भरतो, देशाचे सगळे नियम पाळतो कुठेही कचरा करत नाही. गरिबांना जेवण देखील देतो. स्वतःच्या कुटुंबासोबत एका गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील देतो. "पण तो देशासाठी कुर्बान व्हायला तयार नाही". कारण त्याला या गोष्टी आयुष्यभर करत राहायचं आणि हे सगळे लोक त्याच्यावर अवलंबून आहेत.
मग त्याच देशप्रेम घट्ट, पात्तळ, उतू गेलेलं कि नासलेले? घ्या ठरवून तुम्हीच."

आणि आमच्या देशाचे सैनिक हे फक्त "कुर्बानी" द्यायला नाही आहेत. ते देशाचे संरक्षण करायला आहेत, त्यांना देखील कुटुंब आहेत जेव्हा कोणा सैनिकाला स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागते तेव्हा ते "राजकीय अपयश" असते. वर्षानुवर्षे आपल्या आणि शेजारच्यांच्या हुकलेल्या राजकीय निर्णयांमुळे सैनिकांना आपले प्राण देऊन किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे कृपया "कुर्बानी" हा शब्द इतका स्वस्त असल्याप्रमाणे वापरू नका.

माहितगार's picture

25 Aug 2018 - 12:24 pm | माहितगार

...त्यामुळे कृपया "कुर्बानी" हा शब्द इतका स्वस्त असल्याप्रमाणे वापरू नये.

अगदी बरोबर आहे, याच न्यायाने देशप्रेम्यांचे प्रेम स्वस्त झाल्या प्रमाणे देशद्रोह्यांच्या फुटीरते सोबत मोजू नये. देशप्रेमी व्यक्ती देशासाठीच्या कुर्बानीचे मोल स्वस्त करुन मोजत नसतात हा कॉमनसेन्स असावा. आपण देशासाठी कुर्बानी का देतो याची देशप्रेमी व्यक्तीस यथोचीत कल्पना असते. आणि ज्यांना कल्पना नसते तेच देशविघातकांना पाठीशी घालणारे युक्तीवाद करत फिरतात. सोबत बाकी सजीवांच्या कुर्बान्यामात्र स्वस्त करुन विकतात. :(

"समजा एक माणूस देशात पूर्ण टॅक्स भरतो, देशाचे सगळे नियम पाळतो कुठेही कचरा करत नाही. गरिबांना जेवण देखील देतो. स्वतःच्या कुटुंबासोबत एका गरीबाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च देखील देतो. "पण तो देशासाठी कुर्बान व्हायला तयार नाही". कारण त्याला या गोष्टी आयुष्यभर करत राहायचं आणि हे सगळे लोक त्याच्यावर अवलंबून आहेत.
मग त्याच देशप्रेम घट्ट, पात्तळ, उतू गेलेलं कि नासलेले? घ्या ठरवून तुम्हीच."

याचे उत्तर सक्तीच्या लष्करी सेवेच्या गरजेत असावे. म्हणजे आपल्या गुण्या गोविंदाने रहाण्याच्या स्वप्नासाठी सीमेवर कोणी कुर्बानी देत असते हे स्वतः अनुभवण्यास मिळते, आणि मग देशद्रोह्यांची पाठराखण करण्याची इच्छा कमी होऊ शकते. जो देशप्रेमी असतो तो कुर्बान व्हायला मनाने सज्ज असतो आणि आपल्या प्रमाणे एक्सक्युजेस देत नाही. जे एक्सक्युजेस देतात त्यांचे देशप्रेम पातळ असते, आणि फितुरी करतात त्यांच्या देशप्रेमाचे पोतेरे झालेले असते. आपल्या इच्छेप्रमाणे ठरवून दिले

...आणि मग जे लोक देश सोडून परदेशात स्थायिक होतात ते तर देशद्रोहीच होतील तुमच्यानुसार नाही का? एक तर ते स्वार्थासाठी चक्क देश सोडतात, ते बाहेरच्या नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्व देखील सोडायला तयार असतात. केवळ चांगल्या राहणीमानाकरिता देशाला सोडून परदेश पकडतात, मग कुर्बान व्हायचं तर कुठच्या कुठे राहील! मग देश सुधारायचा कोणी, नाही का?
आणि तिकडे तर सिनेमागृहात भारताचे "राष्ट्रगीत" पण वाजवलं जात नाही. तुमचा मुख्य क्रायटेरिया तर इथेच गंडला!

नाही आपला युक्तीवाद गंडतोय. ( भारतीय उपमहाद्वीपीय प्रदेश सोडून) जे दुसर्‍या देशाचे नागरीकत्व घेतात त्यांनी त्या त्या देशावर देशप्रेम करावे. भारतासाठी सदिच्छा ठेवाव्यात. आणि भारतीयांनी त्यांच्यासाठी सदिच्छा ठेवाव्यात. परदेशात राहूनही जे भारतीय नागरीकत्व कायम ठेवतात तो पर्यंत देशप्रेमाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. मी प्रत्येकवेळी अथवा थिएटरात राष्ट्रगीत म्हणा असे कुठेही म्हणालो नाहीए. पण कुणी शंका घेतली अथवा शंका न घेताही म्हण म्हणाले तर समोरचेच्या अपेक्षेपेक्षा हजार गुणा अधिक वेळा म्हणावे.

...परंतु इथे काही आयडीनी देशभक्तीचे जे स्वतःचे "नियम" प्रस्थापित करायचं ठरवलं आहे त्याला उत्तर देण्याचा दुसरा मार्ग दिसत नाही...

देशद्रोहाच्या आरोप्यांचे गोडवे गाणार्‍या प्रतिसादकांच्या फितुर प्रतिवादांवर कोणत्याही कारवाईची अपेक्षा संपादकांकडून करत नाही, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णूता कि काय म्हणतात ते भारतीय देशप्रेमींच्या अंगात फितुरी समर्थकांपेक्षा अधिक चांगले वसले आहे आणि फितुरीचा प्रतिवाद करण्याची क्षमता अब्जावधी(अनंत)पटींनी अधिक आहे.

...का फक्त रोज सकाळी उठून मी कुर्बानी देईन अशी घोकंपट्टी केली आणि राष्ट्रगीत म्हटले कि तुमचा देशभक्तीचा क्रायटेरिया भरतो?

किमान एवढे करतो एवढे सिद्ध होते ना =)) आपण तर तेवढेही न करता कुर्बानी देण्यास तयार असलेल्यांचे पाय ओढता, "सहिष्णू असल्यामुळे पाय ओढणार्‍यांकरताचे विशेषण लावत नाहीए" (एफसीस अ‍ॅडेड) :)

...आणि अगदीच म्हणता आहेत ना कुर्बानी, कुर्बानी तर माझ्यामते तुमच्या काळात एखाद तरी युद्ध झालं असेलच कि शत्रूशी, कितीदा कुर्बानी दिलीत ते ऐकायला आवडेल....

(अधिकृत भारतीय सैन्याला अधिकृतपणे रसद पुरवून प्रत्येक वेळी) पण त्यापेक्षाही महत्वाचे मानसीक सामर्थ्य दिले, त्यांच्यातला कुणी पडला तर मीही त्यांच्या माघारी बंदूक हातात घेऊन त्यांचे देशाच्या संरक्षणाचे अधुरे राहिलेले कार्य पुढे नेण्यास सदैव तत्पर राहीलो तत्पर असेन. जिएंगे तो और भी लडेंगे. आपल्यासारखे शेळपटासारखे (देशप्रेम) पातळ करुन फितुरा तू किती गोड फितुरा तू किती गोंडस असे फितुरांचे गोडवे गाण्याचा डाग घेऊन फिरत नाही आणि कोणत्याही देशप्रेम्यांच्या देशप्रेमाला फालतुही समजत नाही. अस्सल देशप्रेम्यांच्या देशप्रेमाला फालतु किंवा तथकथित समजणे हि फितुरीच्या मार्गावरची पहिली पायरी असते, फितुरीचा डाग नको असेल तर स्वतःस वेळीच सावध करुन घ्यावे .

...देशभक्तीचे उमाळे फुटतात त्याला ...

जे खरे देशप्रेमी आहेत ते एकमेकांच्या देशप्रेमाच्या उमाळ्यांना सलामअसा/ प्रणाम करत असतात. देशप्रेमाची अबोध बालबुद्धीही देशप्रेमींसाठी अमोघ मुल्याची असते. ज्यांचे देशप्रेम पातळ असते त्यांना हे न उमगणे सहाजिक असावे. ( देशभक्तांसाठी बालबुद्धी शब्द वापरणार्‍यांना मूर्ख शब्द वापरुन मूर्ख शब्दात समाविष्ठ होऊ शकणार्‍या चांगल्या लोकांचा अपमान करायचा नाही म्हणून मूर्ख शब्द वापरत नाही )

निबंध लिहू नका...

एक स्वतः करायचे आणि दुसर्‍यांना नको म्हणायचे आम्ही कमीत कमी देशप्रेमाचे निबंध लिहीतो फुटीरतेचे प्रबंध नव्हे. आपल्या फुटीरतेच्य गोडवा प्रबंधांनाही - सहिष्णूता न संपून देता लिहू नका न म्हणता- लिहूद्या राहू द्या सज्जपणे प्रतिवाद करुन देतो म्हणतो. आमचे देशप्रेमाचे निबंध देशाच्या मातीला, खाल्लेल्या मीठाला, पिलेल्या पाण्याला, सुखदवर देणार्‍या आईच्या दुधाला, तिच्या सुमधूर भाषेला, त्याच्या प्रांगणातल्या फुलांना, शीतल हवेला सदोदीत जागत असतात. वंदेमातरम

माहितगार's picture

25 Aug 2018 - 1:12 pm | माहितगार

ननि यांनी मुद्दे मांडले होते..

भारतीय उपमहाद्वीपीयांच्या निष्ठा भारत मातेच्या चरणीच असाव्यात आणि

ननिंच्या या प्रतिसादातील उपदेशात अभिप्रेत धर्मनिरपेक्षतेत एकाच बाजूला टार्गेट करणारी सापेक्षतेची अंशतः भेसळ जाणवल्यामुळे चर्चा येथवर आली. आणि यदा यदा धर्मनिरपेक्षतेत सापेक्षतेची ग्लानी येते तेव्हा तेव्हा माहितगारसारखे देशप्रेमी देशप्रेमाचे सृजन करतात.

हे नमुद करायचे राहीले होते.

अभ्या..'s picture

25 Aug 2018 - 1:39 pm | अभ्या..

यदा यदा धर्मनिरपेक्षतेत सापेक्षतेची ग्लानी येते तेव्हा तेव्हा माहितगारसारखे देशप्रेमी देशप्रेमाचे सृजन करतात.
दिसलं दिसलं....विश्वरुप दिसलं.
त्यो एक कृष्ण...अन दुसरे तुम्हीच... बास्स्स्स्स्स्स्स.
बूटं तेवढी वूडलॅन्डची घालत जावा झोपताना. सोल जाड असतो म्हणे. बाणबिण घुसनार नाही.

माहितगार's picture

25 Aug 2018 - 3:25 pm | माहितगार

.

सार्वजनिक इमारती मध्ये गुटखा खाणाऱ्यानीं थुंकू नये म्हणून देवाचे फोटो लावणाऱ्याची मानसिकता
आणि तरी सुद्धा थुंकणाऱ्याची मानसिकता एकच असते , तसेच " नावडतीचे मीठ आळणी , आवडतीचा शेंबूड गोड ' म्हणी प्रमाणे तुमच्यावर कंपू चा हल्ला सुरू झालेला दिसतोय

दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांचे अल्पसंख्यांकाबद्दलचे प्रेमही केवळ मतपेटीभरु आणि निव्वळ बेगडी असते अहो.(अल्पसंख्याकांना सुद्धा व्यवस्थित समजते अहो, बेगडीपणामुळे जीनासुद्धा गांधीम्ना स्वच्छ सांगत अहो हिंदू म्हणून भेटायला या म्हणून ) . मिपावर शेवटी मी कितीसा पुरोगामी आहेस ?
म्हणून कविता लिहिली एकपण फिरकला नाही, कितीसा पुरोगामी आहेस ? चे आव्हान घेतले नाही म्हणून त्यांच्या बाजूने 'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर'चा विषय घेतला तिथे पण साध सोप आव्हान पण झेपल नाही कारण टागोरांच्या कविते बाबत पिंकारू पणा करता येत नाही ना !
माझ्या खालच्या यादीतील विषयांवर - माझे धागे आवडत नै तर स्वतंत्रपणे लिहावे ना - एक काडीचे तरी योगदान असते का ? निघतात दुसर्‍यांना धर्मनिरपेक्षता शिकवण्यासाठी . ** भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
; राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू ; 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ; संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ; विवीध अभिव्यक्ती कलांमधील, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील यशवंत मुस्लीमांची व्यक्ती चरीत्रे इत्यादी एक ओळीचे सकारात्मक योगदान नसते. ना मुल्क सारख्या चित्रपटावर केलेल्या टिकेचे आव्हान घेऊ शकतात - ना स्वतंत्रपणे लिहू शकतात बाकीची आव्हाने दूर राहिली. पुरोगाम्यांचा क्रमांक पिंकारुपणात परंपरावाद्यांच्या आधीच लागतो. बरं राजकीय तर राजकीय इथे राहुल गांधींंच्या भाषणाबाबत नुकतीच टिका केली , तिकडे पण फिरकून निदान राहुल गांधींची तरी बाजू घ्यावी तर तेही जमत नाही. म्हणूनच माझ्या कवितेतून प्रश्न विचारलाय तथाकथित पुरोगाम्यांना

..आपल्यातल्या आपल्यांचा
होऊ शकला नाहीस

त्यांचाही होऊन रहाणे
खरेच जमेल का तूला ?...

शब्दबम्बाळ's picture

27 Aug 2018 - 3:23 am | शब्दबम्बाळ

आमच्या इथे एक आजोबा होते, दिसेल त्या मुलाला पकडून ते रोज शुभंकरोती म्हण, गीतापठण कर म्हणून मागे लागायचे.
आज्जी आतून म्हणायच्या "अहो, स्वतः तरुणपणात तर काही केलं नाही आणि आता वय झालं आणि मोकळा वेळ आहे म्हणून इतरांच्या मागे लागतंय होय?!"

ता.क. - याचा वरच्या मी कुर्बानी का दिली नाही वगैरेंच्या स्पष्टीकरणाशी काहीही संबंध नाही! ;)

बाकी नेहमीप्रमाणे तोंडाच्या वाफा दवडलेल्या आहेतच!
फक्त "देशद्रोहाच्या आरोप्यांचे गोडवे गाणार्‍या प्रतिसादकांच्या फितुर प्रतिवादांवर" आणि "आपल्यासारखे शेळपटासारखे (देशप्रेम) पातळ करुन फितुरा तू किती गोड फितुरा तू किती गोंडस असे फितुरांचे गोडवे गाण्याचा डाग घेऊन फिरत नाही " असले प्रतिसाद पुन्हा द्याल तर योग्य प्रकारे लायकी काढण्यात येईल.

स्वतःला पाहिजे तितका देशभक्त समजा! मला किंवा अन्य कुठल्याही आयडी ला "फितूर" "शेळपट" "फितुरांचे गोडवे गाणारे" विशेषण वापरायचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही!
पुन्हा जर असले फालतूपणा केलात तर तिथल्या तिथे दुप्पट जहाल उत्तर मिळेल. आयडी राहो अथवा जाओ!

संपादक मंडळाने याची नोंद घ्यावी कि इथला "माहितगार" हा आयडी माझ्या आयडीला देशद्रोही आणि फितूर ठरवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. अजूनपर्यंत मी बऱ्यापैकी पातळी न सोडता प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे पण हेच पुढे झाले तर माझा नाईलाज असेल. त्यांना योग्य ती समाज देण्यात यावी.

"देशद्रोहाच्या आरोप्यांचे गोडवे गाणार्‍या प्रतिसादकांच्या फितुर प्रतिवादांवर कोणत्याही कारवाईची अपेक्षा संपादकांकडून करत नाही,"

स्वतःला आरोपी आणि संशयित मधला फरक समजण्याचे सामान्यज्ञान तरी आहे का? मी कुठल्या देशद्रोह्यांचे "गोडवे गायले" आहेत ते इथेच दाखवून द्यायचं.
नाहीतर स्पष्ट माफी मागा!

आमच्या इथल्या न्यायालयांवर पूर्ण विश्वास आहे जेव्हा निर्णय येईल आणि जेव्हा सिद्ध होईल कोणी देशद्रोही आहे तेव्हाच मी ते मानेन!
कुठल्या ऐकीव माहितीच्या आधारे मी (तुमच्यासारखे) कोणालाही जज करत नाही.

ओ माहितगार! तीन चार दिवस झाले...
प्रतिसाद दाखवा नाहीतर स्पष्ट माफी मागा!

आणि दोन्ही जमत नसेल तर वाचकांना कळेलच की माहितगार हा आयडी "फितुर" "शेळपटासारखे (देशप्रेम)" असे आणि इतर शब्द वापरून कशा पिंका टाकतोय ते!

माहितगार's picture

2 Sep 2018 - 3:44 pm | माहितगार

१) वरची सर्व चर्चा तपासून घ्या चर्चेला व्यक्तिगत वळण देण्यास आपण स्वतःच सुरवात करण्याचा दोष आपल्याकडेच आहे हे दिसून येईल.

२) देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या प्रतिसादांना 'फालतू' म्हणण्याची जुर्रत आपल्या कडुन घडली याचा अपणास सोईस्कर विसर पडला असेल तर पुनाश्च निदर्शनस आणतो.

३) झेपत नसेल तर भारतीय देशप्रेमींशी वाकड्याने न जाणे श्रेयस्कर असते.

४) देशप्रेमींच्या देशप्रेमास 'फलतू' ठरवून कुणाच्या स्वतःच्या देशप्रेमावर सावट आले असेल तर असे सावट स्वतःचे देशप्रेम व्यक्त करुनच दूर होऊ शकते. देशप्रेमींवर धाक धपटशहा करुन नव्हे

५) ज्यांना स्वतःच्या देशाची माफी मगण्याची लाज वाटते त्यांनी इतरांना माफ्या मागत फिरु नये.

शब्दबम्बाळ's picture

5 Sep 2018 - 12:39 am | शब्दबम्बाळ

गेट वेल सून मामू!
नाही सापडला ना प्रतिसाद! मुखवटे गळून पडू लागले कि खरा चेहरा नीट दिसतो...

बाकी आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधी कोणी आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे उगवले नव्हते आणि कोणाला पुरावे देण्याची गरज लागली नव्हती.
हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! (त्यांना सत्तेत आणण्यात माझाही हातभार आहेच म्हणा)
बर आणि असले लोक स्वतः काय दिवे लावतात हे खालचा व्हिडीओ बघून कळेलच! :D

जेव्हा चर्चा भरकटायची असेल तेव्हा मग असले मुद्दे उकरून काढायचे आणि मी कसा देशभक्त आणि तू कसा देशद्रोही हे कीबोर्ड बडवून सिद्ध करायला लागायचे हेच काही लोकांचे उद्योग असतात!
img

माहितगार's picture

5 Sep 2018 - 10:01 am | माहितगार

पहिली गोष्ट पहिले, ज्यांना आपली देशभक्ती पातळ असल्याचा उघडपणे अभिमान वाटतो त्यांच्याशी उपहासातले नातेही नाकारतो.

आपण आपल्या प्रतिसादाच्या शेवटी जे भारत द्वेष्ट्यां प्रार्थनेचे सॅम्युएल जॉनसन यांचे वाक्य दिले आहे, 'पॅट्रीयॉटीझम इज लास्ट रेफ्युज ऑफ स्काउंड्रेल' त्याचा मराठी अनुवाद, 'देशभक्ती हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे' असा होतो.

आणि अशा भारतद्वेष्ट्या प्रार्थनेचा मतितार्थ "...पंचमहासत्ता र्शेजी केले शत्रु श्रेष्ठजाण । या विचारें पावलें समाधान । फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥
ऎशा देश फुको चालावे । देशीय पुनरपि नाहीं उभावे । कोनाची धरती कोन जन्माचे मायबाप, जगावे खळगीचे ऐश्वर्य । ऎक्यपण कसले, परकेप्रेम अन फितुर दास जन्मांतरी तुमीचच जी मायबाप ॥५॥ जोहार परकीयासी फितुरांचा जोहार !! .." असा होत असावा.

....मी कसा देशभक्त आणि तू कसा देशद्रोही हे कीबोर्ड बडवून सिद्ध करायला लागायचे हेच काही लोकांचे उद्योग असतात!...

आणि त्याच्या आधीचे आपल्या प्रतिसादातील वाक्य

.....बाकी आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधी कोणी आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे उगवले नव्हते आणि कोणाला पुरावे देण्याची गरज लागली नव्हती....

उलटा ** कोतवल को डाटे' स्टाईलमध्ये, सॅम्युएल जॉनसनच्या देशभक्तांनाच 'नीच' संबोधणार्‍या वाक्यावरील आपल्या दृढ विश्वासातून कुणी आपणच आपली महती सिद्ध करत असेल तर अजून कोणते पुरावे हवेत. जेव्हा साशंकता येतात तेव्हा खोकल्याची उबळ झटकून देशाची माफी मागावी आणि 'वंदे मातरम' म्हणावे.

... त्या आधी
.......हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! ...

'....हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! ...' असा विचार मनात आणणार्‍या, देशप्रेम पातळ असलेल्यांनो, या सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम माय भूमीत, देशप्रेम पातळ असलेल्यांना विदेशी हितसंबंधांचा दंश होऊन वैचारीक फितूरी येते तेव्हा तेव्हा गाढे देशप्रेम असलेले जन आणि जमाती या भारतीय मातीतून पैदा होतात. केवळ अमुक पक्ष सत्तेत आला म्हणून नव्हे, देशप्रेम पातळ असलेल्यांना ओळखून किमान आधे मधे तरी गाढ्या देशप्रेमींना हा देश पुढे आणून त्यांच्यावर विश्वास ठेवतो.

...(त्यांना सत्तेत आणण्यात माझाही हातभार आहेच म्हणा)....

आपल्या वाक्याचा अर्थ -प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे असेल ते- आपल्यालाच ठाऊक असणार पण जे असेल ते , आपण सत्तेत आणलेल्या माणसाचे हे भाषण ऐका आणि देशाचे गौरवगान करणार्‍यांची जाणीवपुर्वक बदनामी करणार्‍या माध्यमांनी भरवलेल्या काळाच्या उबळीपासून वेळेत सावध होण्याचा प्रयत्न करुन पहावा.

(बाकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कोणत्याही पद्धतीने कोणतेही सरकार सत्तेत आणण्यात आमचा कोणताही सहभाग नाही हा आमचा कुणासच मत नव्हते हा आमचा डिसक्लेमर - आम्ही मुखवटे चढवत नाही आणि वैचारीक सातत्यही आहे, आमच्या लेखनाच्या पूर्ण वाचन आणि आकलनात कुणी कमी पडत असेल तर खेदपुर्वक शुभेच्छाच देऊ शकतो.)

....बर आणि असले लोक स्वतः काय दिवे लावतात हे खालचा व्हिडीओ बघून कळेलच! ....

देशप्रेम व्यक्त करण्याच्या महत्वाचे आकलन न होण्यात तर वैचारीक फितुरांची गोची होते आणि त्यांची त्यांना लक्षात येत नाही. 'वंदे मातरम' किंवा 'भारतमाता की जय' 'जय हिंद' असे दोन तीन शब्द म्हणण्याची तयारी तेही आपापल्या भाषेत पुरेसे आहे, आणि आपण दिलेल्या युट्यूब लिंकेत त्या मंत्र्याची ती तयारी आहे ही फार मोठी गोष्ट आहे हे देशप्रेम पातळ असलेल्यांना समजणार नाही हे ओघाने आलेच. बरे होण्याची गरज असलेले देशप्रेमींनाच आजारी म्हणतात ह्यावर हसावे की रडावे कळणे मुश्कील आहे. आपण बरे व्हाल की नाही कल्पना नाही पण आपल्याला चांगली देशप्रेमाचे धडे देणारी सून मिळो ही शुभेच्छा. आणि आपणास देशप्रेमी सून मिळाली तर देशप्रेमाच्या खालील युट्यूब तिच्यासाठी.

थॉर माणूस's picture

8 Sep 2018 - 5:21 am | थॉर माणूस

त्याचा मराठी अनुवाद, 'देशभक्ती हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे' असा होतो.

सॅम्युएल जॉनसनच्या देशभक्तांनाच 'नीच' संबोधणार्‍या वाक्यावरील

अरेरे... आता हे मनोरंजक पातळीवरून विनोदीपातळीच्याही खाली घसरायला लागले की हो. लोक कुठल्या वाक्याचा काय अर्थ लावतील हे सांगणे अशक्यच आहे म्हणायचे. :)

अहो ते "देशभक्ती" हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे असे वाक्य आहे हो. ते वाक्य देशभक्तांबाबत कसे काय असेल? ते नीच लोकांबाबत आहे ना? म्हणजे ज्या लोकांना आपला मुद्दा धड सिद्ध करता येत नाही तरीही तो त्यांना काहीही करून इतरांच्या मानगुटीवर बसवायचाच असतो तेव्हा तसे करण्यासाठी ते देशभक्तीचा ढोल शक्य तितक्या मोठ्याने वाजवतात असा काहीसा अर्थ मला तरी माहिती होता आजवर.

कशाचा संबंध कुठे लागेल काही सांगता येत नाही बाबा. असो, चालूद्यात.

जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, विश्वची माझे घर... :)

....म्हणजे ज्या लोकांना आपला मुद्दा धड सिद्ध करता येत नाही तरीही तो त्यांना काहीही करून इतरांच्या मानगुटीवर बसवायचाच असतो तेव्हा तसे करण्यासाठी ते देशभक्तीचा ढोल शक्य तितक्या मोठ्याने वाजवतात....

एखादा मुद्दा देशभक्तीने सिद्ध होत नसेल तर त्या मुद्यावर टिका करा, देशभक्ताच्या देशभक्तीवर टिका करण्याचे प्रयोजन दिसत नाही. एखाद्या वाक्याचा लक्ष्यार्थ वाच्यार्थापेक्षा वेगळा असू शकतो हे तत्वतः मान्य, पण वाक्यातील 'भावार्थ' नावाचा प्रकार असतो , हे 'भावार्थ' वाक्याचे वजन वाच्यार्थाकडे आहे की लक्ष्यार्थाकडे आहे हे ठरवत असावेत.

एका बोटाच्या थुंकीचा वास, दुसर्‍या बोटावरची थुंकी दाखवून जात नाही. कुणि कसेही मोजले तरी -'नीच लोकांचा शेवटचा आश्रय देशभक्ती आहे' असा बदल केला तरी-, सॅम्युएल जॉनसनचे वाक्यातील भावार्थ खर्‍या खुर्‍या देशभक्तांनाही 'नीच'च संबोधतो; किंवा किमान स्तरावर, 'नीच लोक स्वतःस देशभक्त समजतात' असे म्हणत कळत-नकळत, देशभक्त म्हणवणार्‍यां प्रामाणिक देशभक्तांनाही नीचलोकांच्या पारड्यात तोलतो किंवा कसे.

आपल्या युक्तीवादात संबंधांची गल्लत होत असली तरी, "जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, विश्वची माझे घर" स्विकारत मनमोकळा संवाद साधलात त्यासाठी अनेक आभार. :)

ट्रम्प's picture

24 Aug 2018 - 9:15 am | ट्रम्प

मागा जी ,
मेमन साठी रात्री न्यायालय उघडायला लावणारे , अफजल गुरू ला शाहिद घोषित करून भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणारे , 60 वर्ष दाढ्या कुरवाळून जम्मू काश्मीर मधील हिंदू ना देशोधडीला लावणाऱ्या रागा च्या अल्पसंख्याक संकरित घराण्याची वकिली करणारे ,
8 / 10 मुलं असतांना 2 मुलं असून इमानदारीने टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या पैशातून गॅस सबसिडी घेणारे ,
आसाम / बांगलादेश मध्ये घुसखोरी करून त्या राज्याची राजकीय , आर्थिक परिस्थिती कोलमडून पडण्यास कारणीभूत ठरणारे आणि दाऊद /सिमी /लष्करे तैययब च्या स्लीपर सेल ला पोसणारे यांच्या आणि त्यांची वकिली करणाऱ्या कडून तुम्ही देशभक्ती ची अपेक्षा करताय ? कमाल आहे राव तुमची .

अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाखाली देशाचे वाटोळे करण्यास उत्सुक असलेली ही जमात टॅक्सपेयर च्या पैशातून उच्चशिक्षण घेऊन देश आणि देशातील जनतेचीच मारायला निघाले आहेत .
फुकट भेटणाऱ्या उच्च शिक्षणातून देशाची सेवा करणे दूर स्वतःची आर्थिक प्रगती तरी करायला पाहिजे पण नाही उलट उच्च शिक्षणाचा उपयोग देशविघातक कारवाया मध्ये करतात .

कुठलाच पक्ष परिपूर्ण असू शकत नाही , म्हणून भाजपच्या ही चुका होत असतील पण भाजप वाले देशद्रोही गद्दार लोकांना पाठीशी घालणार नाही आणि याच कारणासाठी विरोधकांनी कितीही कोल्हेकुई करू द्या सामान्य मतदार निवडणुकीत उमेदवाराची जात न बघता भाजप च्या पाठीमागे खंबीर उभा असतो .

सहमत आहे, देशद्रोहींना देशप्रेमाबाबत तडजोद होत नाही हे सुनावत, राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी सकारात्मक राजकीय दबावाची योगदानाच्या भूमिकेचे स्वतःचे महत्व नक्कीच आहे. देश विघटनाचे समर्थन करणार्‍यांपेक्षा, बाकी हजार उणिवा असलेले देशप्रेमी परवडतील.

सुबोध खरे's picture

24 Aug 2018 - 12:12 pm | सुबोध खरे

विद्यमान सरकारवर तिखट टीका करणे हे मान्य आहे. नोटबंदी, जीएसटी, विफल झाले मोदी सरकार हे साफ अयशस्वी आहे हे कुणाचे वैयक्तिक मत असू शकते तो लोकशाहीचा भाग आहे.

परंतु

फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे हे अजिबात मान्य होणार नाही.

पुरोगामी म्हणवण्यासाठी असल्या हलकट लोकांची साथ देणारे लोक सुद्धा देशद्रोहीच आहेत.

माहितगार's picture

24 Aug 2018 - 12:48 pm | माहितगार

सौ टके की बात !

डॉ. सुबोधजी, देशप्रेम हृदयात बाळगणार्‍या आणि देशप्रेम व्यक्त करण्यास न लाजलेल्या प्रत्येकास, त्या प्रत्येकात देशप्रेम जागवलेल्या प्रत्येकास माझे शत शत प्रणाम ! ज्यांना देशप्रेमव्यक्त करण्यासही लाज वाटते असे आपलेच फितुर बांधव पाहीले की, आपल्या मनात देशप्रेमाची ज्योत जागवणार्‍यांबद्दलचा आदर शतगुणित होतो. देशप्रेम जागवणार्‍यांचे महत्व अधिक ठळक होते. फितुरांना सामील होणार्‍या देशबांधवांना देशप्रेमाची महती समजावून देण्यात आपण कमी पडतो आहोत याचा दुसरीकडे नाही म्हटले तरी अल्पसा खेदही वाटतो. देशप्रेमाची भाषा बोलताना त्वेश जागा झाला नाही, दगाबाजांशी संवाद करताना शब्दात कठोरता आली नाही तर ते देशप्रेम कसलं ? एखादा माठ नीट भाजलेला आहे की नाही ते त्यावर लाकडाने टपली मारुनच तपासले जाते, संत मुक्ताईने संत नामदेवांची शब्दशः अशी परिक्षा घेतली तशी देशप्रेमाचे मडके नीट भाजलेले आहे की नाही याची परीक्षा घेण्यात काही वावगे नाहीच प्रसंगी अशी कठोरताच देशाला सुरक्षीत ठेवत असते.

आपण म्हणता तसे प्रांजळ्पणे सांगतो, माझा अलमोस्ट लिहून तयार असलेला पुढचा लेख परंपरावादातील काही नाजूक भूमिकांची चिकित्सा करणार आहे. पण अशी कोणतीही चिकित्सा करतो म्हणजे मला देशप्रेम व्यक्त करण्याची लाज वाटणे शरमेचे ठरेल, हे तथाकथित पुरोगाम्यांना समजत नसेल असे नाही पण संकुचित-हित्संबंध आणि राजकीय भूमिकांचे चष्मे एवढे प्रीय झालेले असतात की संत मुक्ताई प्रमाणे प्रसंगी टपली मारुन काजवे चमकवले जात नाहीत तो पर्यंत सूताचा गूणही देणे अवघड असावे.

स्वधर्म's picture

24 Aug 2018 - 2:14 pm | स्वधर्म

ही वरची टिप्पणी तुंम्ही नक्की कोणावर अाणि कोणत्या मुद्दयावर केली अाहे, ते स्पष्ट केले तर बरे होईल. मी या संपूर्ण चर्चेत फक्त नोटबदलीविषयी मत मांडले होते. इतके उपप्रतिसाद अाले अाहेत, की नक्की तुंम्ही कोणाच्या मुद्द्यावर हे बोलला अाहात समजत नाही.

नगरीनिरंजन's picture

24 Aug 2018 - 10:41 pm | नगरीनिरंजन

देशाच्या न्यायालयाने अजून देशद्रोही ठरवलेले नसताना न्यायालयापेक्षा स्वतःला जास्त शहाणे समजणार्‍यांना व देशाच्या नागरिकांचा अपराध सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जाण्याचा हक्क मारणार्‍यांनाही देशद्रोही म्हणले पाहिजे.

माहितगार's picture

25 Aug 2018 - 8:42 am | माहितगार

ननिजी, मी जिएनयु प्राध्यापकांच्या नेमक्या निसटत्या बाजूंवर सविस्तर प्रतिसाद मालिका मागे लिहिली आहेत. नेमकी भूमिका तुम्हाला शोधून वाचावी लागेल. जिएनयु काही क्षण बाजूस ठेवा. इन एनी केस जादवपूर प्रकरण सुस्पष्ट उदाहरण आहे. जादवपूर प्रकरणावर आपण तथाकथित पुरोगामी तोंड का उघडत नाही. जादवपुरच्या बाबतीत न्यायालयातून कारवाईस स्वतः कथित पुरोगाम्यांनीच पुढाकार घेऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध का करत नाही.

शहाबानो केस नंतर न्यायालयीन आणि राज्यघटना उत्पातमुल्य आणि मतपेटीच्या जोरावर धाब्यावर कशी काय बसवली गेली ? त्यावेळी तथाकथित पुरोगाम्यांनी आणि धर्मांधांच्या पाठीराखे स्वतःस केवळ न्यायालयांपेक्षा शहाणेपद घेतले नाही भरतीय राज्यघटनेचे हरण केले आणि जे खरोखर देशप्रेमी असतात ते राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेची आपोआप बूज राखतात राज्यघटनेची फसवणूक करत नाहीत. जिथून राज्यघटनेला वाकवणार्‍या चुकीच्या मार्गांची सुरवात झाली त्या घटनात्मक उद्दीष्टांचे आधी पुर्नस्थापन करावे आणि मग प्रतिपक्षाला व्याख्याने द्यावीत.

देशाच्या एकतेची आणि देशप्रेमाची अपेक्षा करणार्‍यांच्याही लेजीटीमेट अपेक्षा असतात सर्व कायद्यात राष्ट्राची एकसंघता सर्वोच्च प्राधान्याची असते ती देशप्रेमीव्यक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते हे मी वर स्पष्ट केलेच आहे. बाकी उर्वरीत शंकाना माझे आधीचे प्रतिसाद पुरेसे आहेत. अहिंसेच्या अपेक्षेबाबत माझा वेगळा पूर्ण लेख लौकरच येईल.

शब्दबम्बाळ's picture

24 Aug 2018 - 10:56 pm | शब्दबम्बाळ

फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे हे अजिबात मान्य होणार नाही.
पुरोगामी म्हणवण्यासाठी असल्या हलकट लोकांची साथ देणारे लोक सुद्धा देशद्रोहीच आहेत.

आता आपण कोण?
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश??
जर नसाल तर आपले शिक्के आणि प्रमाणपत्रे आपल्याजवळ ठेवा!

कोणता चष्मा घालून कुठल्या प्रतिसादात फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण समर्थन दिसले ते स्पष्ट दाखवून द्या. पाल्हाळ नको उगीच!
सरकारची तळी उचलायला कोणाची ना नसेल पण उठसुठ "देशातल्या इतर नागरिकांना" हलकट, देशद्रोही शिक्के मारणारे लोक सुद्धा देशद्रोही का म्हणू नयेत?(मी असली पांचटगिरी करणार नाही पण इथल्या काही आयडींना देशद्रोह कावीळ झालेली दिसतेय त्याच लायनीवर हे पण!)
आपल्या आवडत्या पक्षाने फुटीरतावादाला समर्थन असणाऱ्यांसोबत "सत्तासोबत" केली तरीही ते मात्र याना चालते!

सुबोध खरे's picture

25 Aug 2018 - 9:10 am | सुबोध खरे

मी एक सामान्य नागरिक आहे. ज्याने आपल्या तारुण्याची २२ वर्षे लष्करात काढलेली आहेत.

काश्मीर, पूर्वांचलातील फुटीरतावाद म्हणजे काय हे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय आणि अनुभवलंय.

वरील दोन वाक्ये यात सुद्धा तुम्हाला पक्षीय दृष्टिकोन दिसतोय?

ती वाक्ये द्वेषाने तुम्ही तुम्हाला म्हणालो आहे हे गृहीत धरून असे प्रतिसाद देताय.

आपला दृष्टिकोन भाजप द्वेषाने किती भरलाय कि सध्या सरळ दोन ओळीतही तुम्हाला पूर्वग्रह दिसतोय?

आपल्या समोर एखादा राष्ट्रध्वज जाळत असेल किंवा देशविरोधी घोषणा देत असेल तर न्यायालयाने त्याला दोषी म्हणे पर्यंत तुम्ही वाट पाहणार का?
किंवा याकूब मेमनला फाशी झाली याबद्दल निषेध करणारे मेणबत्त्या जाळणारे पुरोगामी हे देशद्रोही नाहीत का?

उगाच मुद्दा पुढे रेटण्यासाठी काहींच्या काही

शब्दबम्बाळ's picture

27 Aug 2018 - 4:07 am | शब्दबम्बाळ

काही गोष्टी स्पष्ट बोलणेच आवश्यक असते! म्हणून मी तुम्हाला धाग्यावर कोणी या गोष्टींचं समर्थन केलं आहे का स्पष्ट विचारलाय.
तुमच्या प्रतिसादावरून हे दिसून येतंय कि किमान तुम्ही या धाग्यावरच्या प्रतिसादांच्या रोखाने बोलत नाही आहात.
काही लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधू नयेत म्हणून हे करावं लागलं.
वाईट वाटल्यास माफी असावी.

या धाग्यावर माहितगार नामक आयडी कोणालाही देशद्रोही ठरवू पाहत आहे. (सध्या मी रडार वरती आहे)
तुम्ही दिलेल्या प्रतिसादामध्ये "फुटीरतावादी" हा शब्द आहे त्यावर इथे काहीच चर्चा झालेली नाहीये पण "देशद्रोही" हा शब्द इतका कॉमन करून टाकलाय या लोकांनी कि उद्या कोणालाही देशद्रोही ठरवून टाकतील. (जसे आत्ताच मला ठरवायचं चाललंय)
तुम्ही सैन्यदलात सेवा केली आहे त्याबद्दल आदर ठेऊन देखील मी हेच म्हणेन कि "देशद्रोही" ठरवायचं अधिकार हा न्यायालयाचा आहे.
तो कोणत्याही सामान्य माणसाच्या हातात बिलकुल देऊ नये आणि तशी पद्धत देखील पाडू नये.

"आपल्या समोर एखादा राष्ट्रध्वज जाळत असेल किंवा देशविरोधी घोषणा देत असेल तर न्यायालयाने त्याला दोषी म्हणे पर्यंत तुम्ही वाट पाहणार का?"

भारतात सध्या एकमेकांवरच्या संशयातून जे मॉब लीचिंग होत आहे त्यात लोकांचे जीव जात आहेत.
जर उद्या कोणाबद्दल तो देशद्रोही असल्याची बातमी पसरवली गेली आणि दुर्दैवाने स्वतःला देशभक्त समजणाऱ्या लोकांकडून त्याचे काही बरे वाईट झाले आणि नंतर कळून आले कि तो देशद्रोही वगैरे नव्हता तर झालेलं नुकसान कोण आणि कसे भरून देईल?

माहितगार यांनी आधीच्या धाग्यावर चक्क झुंडशाहीचे समर्थन केले आहे. आणि अशा प्रवृत्तींना माझा कायमच विरोध राहील. ते संभाषण खाली देत आहे

त्यांना माझा प्रश्न होता :

याशिवाय इतकाच निषेध म्हणत असाल तर हातात झेंडा घेतलेल्या वकिलांनी आणि जमावाने "न्यायालयाबाहेर" निवाडा होण्याआधीच त्याला बदडले त्याच काय?
न्यायालयाने असे प्रकार रोखायला हवेत असे सांगून पण पुन्हा मारहाण झाली त्याच काय?
जेन्यू च्या विद्यार्थ्याला भाजपच्या विधायकाने भर रस्त्यात लाथा घातल्या होत्या, बंदूक असती तर गोळ्या घातल्या असत्या असेही म्हणाला होता त्याच काय? हे सगळे संविधानाला अनुसरून वाटते का? हे समाजात भीती पसरवणारे वाटत नाही?

त्यावर माहितगारांचा प्रतिसाद:

कायदा त्याची वळणे घेतो. समाजाला एखादी गोष्ट रुचली नाही तर दबाव पडणे सहाजिक आहे. खासकरून देशप्रेमासारख्या गोष्टींबाबत खेळ होतो तेव्हा समाज हातावर हात ठेवून बसेल असे कसे समजावे."

हेच बघा कि इथेच कोणीतरी "भारतचा झेंडा कोणा मुसलमान मुलाने फाडला" असा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. नंतर कळले (पुम्बा यांनी बातमीची लिंक देखील दिलेली आहे) की तो मुलगा मुसलमान नव्हताच! दुसऱ्याच कोणत्या जातीचा होता. पण हे माहित नसताना लोकांनी मुसलमानांबद्दल हेट कमेंट्स दिल्या, दुर्दैवाने दंगल वगैरे झाली असती तर कोण जबाबदार मानायचे?

जर कुठे काही आक्षेपार्ह दिसले तर सामान्य माणसाने पोलिसांना कळवावे आणि जे काही पुरावे असतील ते सुपूर्त करावेत. पोलीस आणि न्यायालय तिथून पुढचे काम करेल. आणि आपण आपले काम करू शकू.

मीडिया ट्रायल आणि मॉब जस्टीस पूर्णतः बंद व्हायला पाहिजे. बिहार मधल्या घडलेल्या घटनेचं वृत्तांकन पाहिलं पर्वा आणि सुन्न व्हायला झाल.
तरुणांना शिक्षण, नोकरी आणि जबाबदारी असणे किती गरजेचे आहे नाही तर समाजाचे अधःपतन किती होऊ शकते ते पहा. पहिले ४-५ मिनिटच बघून नको होत...

सुबोध खरे's picture

27 Aug 2018 - 9:36 am | सुबोध खरे

मीडिया ट्रायल आणि मॉब जस्टीस पूर्णतः बंद व्हायला पाहिजे.
पूर्ण सहमत
बाकी मेगाबायटी प्रतिसाद मी वाचतच नाही( कुणाचेही असो)
तेंव्हा त्याबद्दल काही बोलणे नाही

माहितगार's picture

2 Sep 2018 - 5:34 pm | माहितगार

@ शब्दबम्बाळ

आपण स्वतः माझे वाक्य अर्धवट क्वोट केलेत, सांगण्याचा मुद्दा हा की तथाकथित पुरोगामी आगीत तेल ओतण्यात परंपरावाद्यांपेक्षा अगदी पुढे असतात. वरच्या प्रतिसादातील भोजपूर बातमीचा देशप्रेम विषयक उपरोक्त चर्चेशी अन्योन्य संबंध नाही. संबंध नसलेली बातमी क्वोट करण्या इतपत आपणास अनावर होते. मी अशा अनावर होण्याचे समर्थन करत नाही, पण 'आमचे अनावर होणे इतरांच्या अनावर होण्यापेक्षा अधिक चांगले', हा तथाकथितांचा दुटप्पीपणा आहे त्या बद्दल साशंकता आहेत.

जादवपूर विद्यापीठातील देशाच्या एकतेची जी थट्टा केली गेली त्या बद्दल प्रश्न उपस्थित करुनही त्याबाबत पाळले गेलेले मौन सहज दिसते. असाच प्रकार याकुब मेमनच्या फाशीचा काही अती शहाण्यांनी विरोध केला, फाशीस तत्वतः विरोध असेल तर, फाशीच्या शीक्षेचा इतर वेळी विरोध करता आला असता ना पण तो नेमका याकुब मेमनच्या बाबतीत करणे कित्पत औचित्यास धरुन होते. हे सर्व समाज बघत असतो. मग समाजाचा राग कुठेतरी अनावर होतो , हे सामाजिक राग अनावर होण्याचे समर्थन नाह, समजून घेणे आहे, हे लक्षात घ्यावे. देशप्रेमाच्या विषयाचा खेळ करण्यात काही प्राध्यापक मंडळींच्या भूमिका साशंकीत असाव्यात ह्या बाबत मी मागच्या पहिल्या चर्चेत काय विश्लेषण केले ते आपण शोधण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नसताना आउट ऑफ काँटेक्स्ट अर्धवट विधान नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. झूंडशाहीचे समर्थन करतो असे मी कुठेही लिहिलेले नाही. ' कायदा त्याची वळणे घेतो' हे आधी लिहिलेले आहे. खासकरून देशप्रेमासारख्या गोष्टींबाबत खेळ होतो तेव्हा समाज हातावर हात ठेवून बसेल हि अपेक्षा अवाजवीच आहे - हे लिहिले म्हणजे झूंडशाहीचे समर्थन केले असा होत नाही, देशप्रेमावर सावट आले तर देशप्रेम व्यक्त करुन मोकळे होणे हा राजमार्ग आहे, हे मत त्या आणि या धाग्यात मी व्यक्त केले ते आपण लक्षात घेऊ इच्छित नाही ही आपली समस्या आहे.

झेंडा प्रकाराबद्दलची माझा प्रतिसाद 'रचनात्मक सकारात्म्क मत परिवर्तन कसे करता येईल ' असा आहे. यात तुम्हाला कुठे झुंडशाही सुचवलेली दिसते का ? प्राध्यापकांच्या निसटत्या बाजूंबद्दल संताप व्यक्त केला पण सोबत गांधींसारखा अहिंसावादी आहे हे लिहिले त्याकडे आपण सोईस्कर डोळे झाक केली हि तथाकथीत पुरोगामींची समस्या आहे. देशप्रेमाचे मनमोकळे व्यक्त करायचे नाही तर टिका होणार मग नंतर स्वतःच गुंता करुन खुंतण्याला अर्थ नसतो.

माहितगार's picture

2 Sep 2018 - 10:12 pm | माहितगार

जिएनयुतील तुकडे तुकडे गँग काश्मिर बाबत काय म्हणताहेत युट्यूबवर पहा ( देशाच्या अंखंडते इतकी विरोधी भूमिका आहे की मी युट्यूब इथे जसाच्या तसा जोडणे शहाणपणाचे समजत नाही) तथाकथित प्राध्यापक निवेदीता मेनन ; तथाकथित विद्यार्थी उमर खालीद

...आपल्या आवडत्या पक्षाने फुटीरतावादाला समर्थन असणाऱ्यांसोबत "सत्तासोबत" केली तरीही ते मात्र याना चालते!

आता आपणसुद्धा न्यायालयीन निर्णयाचा दाखला दिलेला आहे असे दिसत नाही.

अगदी बरोबर फुटीरतावाद्यांबद्दलची 'सत्तासोबत' चुकत असेल तर -अशा परिस्थितीस कारणीभूत झालेल्या- फुटीरतावाद्यांचे गुरुजन आणि त्यांनी आधार घेतलेले शब्द-ग्रंथ प्रामाण्य हे ही प्रश्नांकीत व्हावयास हवे ना ? आणि हि वस्तुस्थिती पाठीशी घालणार्‍यांनाही प्रश्नचिन्हांकीत केले जावयास हवे ना ?

आणि प्रश्नस्थिती या पेक्षा हाता बाहेर गेल्यावर उपस्थित करायचे की आधीच उपस्थित करणे उत्तम ?

बाकी विशीष्ट बाजुच्य राजकीय समर्थनात रस नाही तरीपण जो पर्यंत देश विघटनाचे समर्थन होत नाही तो पर्यंत तात्पुरत्या राजकीय तडजोडी रास्तही असू शकतात.

....उठसुठ "देशातल्या इतर नागरिकांना" हलकट, देशद्रोही शिक्के मारणारे लोक सुद्धा देशद्रोही का म्हणू नयेत?

खर्‍यांचे लेखनात हलकट हे विशेषण 'फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे ' यासाठी आलेले दिसते आणि देशद्रोह्यांची साथ देणार्‍यांना देशद्रोही म्हटले आहे. देशद्रोह्यांची साथ देणारे देशद्रोहीच असतात की अजून वेगळे काही असतात ? आणि 'देशातल्या इतर नागरीकांनी', त्यांनी असे काही म्हटलेले नसताना आपण असा जावई शोध लावू शकता, -कावीळ पांचटगिरी नेमकी कुठे होते हे लक्षात यावे म्हणून इतर वाचक आणि आपल्या स्वतःच्या सोयीसाठी नोंदवून ठेवतो.

...पाल्हाळ नको उगीच!

जोपर्यंत मिपाधोरणात बसते तो पर्यंत उत्तरांची लांबी आणि शैली सांगणारे आणि चर्चा व्यक्तिगतते नेणारे आपण कोण ? पाल्हाळ आहे की नाही वाचायचे की फाट्यावर मारायचे जो तो वाचक ठरवेल, नको म्हणणारे आपण कोण ?

आता आपण कोण?
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश??
जर नसाल तर आपले शिक्के आणि प्रमाणपत्रे आपल्याजवळ ठेवा!

देशप्रेम्यांचा देशावर पहिला आधीकार असतो आणि देशद्रोहावर आक्षेप घेणे आणि देशावर वेळ आल्यास प्रसंगी प्राणांची बाजी लावणे हे देशप्रेम्यांचे कर्तव्यही असते. विसृत चोख उत्तर आधीच्या प्रतिसादांमधून दिलेले आहेच. तरीही खरे स्वतःला सामान्य नागरीक म्हणून घेतात हि त्यांच्या मनाची मोठी बाजू .

आता इतर संबंधीत मुद्द्यांवर येऊ, सलमान खानच्या देशप्रेमा बाबत शंका नाही, एक उदाहरण म्हणून सलमानखान न्यायालयातून सुटून येत नाही तो पर्यंत तो आरोपी असतो, आणि सुटल्यावर .. काय ते आपल्याला माहितच असावे. खाली संविधानाच्या अवमानने बद्दल आपण लिहिले आहे आणि त्याबाबतही पोलीस चैकशी आणि कारवाई व्हावी अशी आपली किंबहूना इतरांचीही अपेक्षा असणारच, न्यायालयातून मुक्तता होई पर्यंत त्यांच्यावर होणार्‍या पोलीस कारवाईवर आक्षेप घेण्यास कारण नसावे तसे जिएनयु प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयातून निर्दोषमुक्त होई पर्यंत पोलीस कारवाईच्या नावाने शंख करण्याचे काही कारण नसावे, आणि आरोपींना आरोपी म्हणण्यासही. ज्यांच्यावर न्यायालयातून ठपका नाही त्यांची सोशल मिडिया आणि मिडीयातून बदनामी करताना तथाकथित पुरोगामी एकतर्फीपणा करतात की नाही हे चष्मेलावलेले स्विकारतील अथवा न स्विकारतील तटस्थ प्रेक्षक आणि तटस्थ विश्लेषकांना हे व्यवस्थीत दिसत असते.

आता पुढच्या मुद्याकडे येऊ

जि एन यु बाजूस ठेवा, पाठीशी घातल्यावर काय होते त्याचे जादवपुर प्रकरणातील कायद्याची मस्करी जिवंत उदाहरण होते, जादवपूर प्रकरणात काहीच कारवाई कशी काय झाली नाही ? कायदे कमी पडले की आमच्या देशभक्तीची प्रमाणपत्रे मागू नका म्हणणारे कमी पडले ? जादवपूर वाल्यांनी जादवपूर प्रकरणात शासकीय अथवा न्यायालयीन कारवाई करण्याचे कायदे कमी पडत असतील तर कायदे बदलण्याचे केंद्रीय भाजपा अथवा स्थानिक भाजपा कडूनही फारसे काही दिसले नाही त्यास तथाकथित पुरोगाम्यांचा भाजपा समर्थक विरोधी अवास्तव गोबेल्स प्रचार कारणीभूत ठरला नाही असे कसे म्हणावे ? जादवपुर प्रकरणात देशाची थट्टा टाळण्यात कायदे कमी पडले असतील तर संबंधीत कायद्यत सुधारणेचे समर्थन आपण करता का ?

ट्रम्प's picture

22 Aug 2018 - 5:46 pm | ट्रम्प

भाजप सरकार अपयशी आहे असा प्रचार किती ही काँग्रेस च्या लोकांनी केला तर मतदार त्यांना फाट्यावर मारतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे , शिवाय चौकट राजा रागा सारखा एक ही ' विशेष ' माणूस भाजप मध्ये नाही ही जमेची बाजू .

दोन महिन्यांपूर्वी महिलांच्या सुरक्षितता वरून कानउघाडणी करणाऱ्या वर्ल्डबँक ने आता GDP बद्दल भारताची पाठ थोपटली आहे म्हणून जनतेत संभ्रम पसरवण्या करिता काँग्रेस चे स्वपार्श्वलाल प्रवक्ते सुरजीत वाला काँग्रेस ने न केलेल्या कामगिरी बद्दल ' आमच्या काँग्रेसची च लाल ' म्हणवून घेत आहेत .

माहितगार's picture

21 Aug 2018 - 7:10 pm | माहितगार

..........If one looks at the per capita income levels, India is far behind many countries whom we have beaten on the GDP growth rate. Take France for instance. India has an estimated per capita income of $7,060 while France has $43,720, some six times more than that of India. India is ranked at the 123th position when it comes to per capita income at PPP while France is in the 25th position. For the record, China, which has a population of 1.4 billion has a per capita income of $16,760. Perhaps, the governments, both UPA and NDA, are too fixated on the GDP figures and less on the broad-based economic recovery that can bring in actual changes for the common man on the ground.... संदर्भ GDP game: How to cherry-pick your.. Dinesh Unnikrishnan.

युपीए २ मध्ये कथित विकास दर अधिक असूनही कदाचित महागाईच्या बडग्याने आणि 'कॉमन'-वेल्थच्या प्रभावाने युपीएला पराभव पत्करावा लागला असे काही झाले का ठाऊक नाही . ज्यांच्या हाती नौकर्‍या नाहीत, शेती आणि उद्योग चालवण्यासाठी व्याजदर अवास्तव आहेत त्यांना या जिडीपी विवादातून कोणत्याही एका पक्षाबद्दल प्रेम उत्त्पन्न होण्याची शक्यता तुर्तास कमी असावी.

शब्दबम्बाळ's picture

22 Aug 2018 - 12:14 am | शब्दबम्बाळ

जंतर मंतर वरती संविधानाची प्रत जाळली गेली, बाबासाहेब, दलित आणि आरक्षण विरोधी नारे दिले गेले! तरीही मिपावर काहीच घडोमोडी नाहीत?
इतर वेळेस देशद्रोह ठरवायला पुढे असलेले सगळेच गायब!

महाराष्ट्रात ATS ने धडक कारवाई करत बॉम्ब आणि इतर शस्त्रांसहित काही संशयित लोकांना अटक केली आणि त्यांचा दहशतीचा डाव उधळून लावला, त्याबद्दल अभिनंदन करायचे राहिले बाजूला केवळ ते लोक हिंदू आहेत आणि ठराविक हिंदू संघटनांशी संबंधित आहेत म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला गेला!

त्याच कारवाई मधून दाभोलकरांच्या खुनामधील संशयित देखील पकडला गेला आहे.

सचिन अंदुरेच्या मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल जप्त; या पिस्तुलानेच दाभोलकरांची हत्या?

काय होणारे पुढे काय माहित अजून...

संविधान जाळणारे माथेफिरू होते आणि त्या कर्तृत्वाच्या समर्थनार्थ संपूर्ण ब्राह्मण समाजाला ओढू पहात होते , पण ते विसरले की ब्राह्मण ला कट्टर विरोध फक्त ब्राह्मण च करू शकतो .

गावोगावी भाजप कार्यकर्त्यांनी ऑन दी स्पॉट सेल्फ डिसीजन घेऊन कार्यवाही करत दलित अत्याचार , गाईंच्या वाहतूक करणाऱ्याच्या केलेल्या हत्या या गोष्टी मूळे भाजप ची प्रतिमा थोडी मळलेली होती , म्हणून 2019 मधील निवडणूक मध्ये पक्षाच्या उजळ प्रतिमे साठी ATS कारवाई मध्ये काही प्याद्यांचा बळी दिला गेला का ? .
सुब्रह्मण्यम स्वामीनीं गांधी राजघरान्या वर टाकलेली नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चे केस सोडता गेल्या चार वर्षात कॉ व राकॉ ने केलेल्या भ्रष्टरचाराचे कुठलेही प्रकरण बाहेर काढले गेले नाही . देशातील बावळट जनतेने बच्चन प्रमाणे दोन्ही काँग्रेस ची गाडलेली गाठोडी बाहेर काढतील या आशेने मोदी व फडणवीसांना भरभरून मते दिली , पण गेल्या चार वर्षात एक ही गाठोडे बाहेर निघाले नाही .
बाकी फक्त हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या दाभोळकर व पानसरे केस माझ्या तर्फे फुल इग्नोर साईड ट्रॅक ,कारण त्यावर बोलणे म्हणजे तिकीट काढून ओ माय गॉड आणि पी के सिनेमे बघणे .

नगरीनिरंजन's picture

23 Aug 2018 - 7:53 am | नगरीनिरंजन

जंतर मंतर वरती संविधानाची प्रत जाळली गेली, बाबासाहेब, दलित आणि आरक्षण विरोधी नारे दिले गेले! तरीही मिपावर काहीच घडोमोडी नाहीत?
इतर वेळेस देशद्रोह ठरवायला पुढे असलेले सगळेच गायब!

कारण देशप्रेम, घटनेचा आदर, समान नागरिक वगैरे फक्त सत्ता मिळवण्यापुरतंच आहे हे उघड बोलायचं नसलं तरी बहुतेक "देशप्रेमी" मंडळींना चांगलंच माहित आहे. खरा अजेंडा वेगळा आहे आणि त्या दिशेने हळू हळू पण दमदार वाटचाल चालू आहे. मध्ययुगीन काळात जेव्हा "खरी घटना" लागू होती आणि शोषण करायचे जन्मजात अधिकार होते ते खरे अच्छे दिन! ते परत आणायला हवेत ना!

पुंबा's picture

23 Aug 2018 - 9:16 am | पुंबा

मुस्लिम मुलाने झेंडा फाडल्याच्या व्हिडियोमागील सत्य.
https://www.thequint.com/news/webqoof/fake-news-boy-tears-indian-flag-pa...

खरं म्हणजे कन्हैया ने वक्तव्य केले आहे त्याच्या अगदी उलटा अर्थ निघतो . ' आता पर्यंत कन्हया ने कित्तेक वेळा मोदींना चावण्याचा प्रयत्न केला , पण मोदींनी त्याला एकदाही प्रतिसाद न दिल्या मूळे तो पिसाळलेल्या कुत्र्या सारखा चावत सुटला आहे .

नरेंद्र मोदींसंदर्भात कन्हैय्या कुमारनी दिलं चावणाऱ्या कुत्र्याचं उदाहरण
Updated: Aug 23 2018 04:50 p.m. | Written by लोकसत्ता ऑनलाइन

कुत्रा आपल्याला चावला तरी आपण कुत्र्याला चावत नाही असं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कन्हैय्या कुमार यांनी दिलं आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये कन्हैय्या कुमार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना असं विचारण्यात आलं की, "तुम्हाला लोकप्रिय करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग असल्यामुळे त्यांना तुम्ही धन्यवाद द्याल का?". या खोचक प्रश्नाला तितकंच तिरकस उत्तर देताना कन्हैय्या कुमार यांनी ही प्रसिद्धी मिळण्यासाठी किती गमवायला लागलंय याचा दाखला दिला. अनेक धमक्या येतात, जाहीर सभांमध्ये हल्ले होतात, आवाज बंद करण्याचे प्रकार होतात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो असे अनेक दाखले देत ही प्रसिद्धी खडतर असल्याचे सांगितले.
नरेंद्र मोदींसंदर्भात कन्हैय्या कुमारनी दिलं चावणाऱ्या कुत्र्याचं उदाहरण
https://www.loksatta.com/mumbai-news/kanhaiyya-kumar-gave-reference-of-d...
जाता जाता कन्हैया साठी एक सुभाषित : -
मच्छर आपल्या गाडीला चावू शकतो पण आपण मच्छर च्या गाडीला चावू शकत नाही .

सर टोबी's picture

24 Aug 2018 - 9:59 pm | सर टोबी

नमो फेब्रुवारी २०१९ पर्यंत देशातील सुमारे पन्नास पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे स्वतः उदघाटन करणार आहेत.

जनता अगोदरच त्यांच्या हातवार्यांना, थापांना आणि रेकून बोलण्याच्या शैलीला कंटाळली आहे. या पन्नास कार्यक्रमांमुळे ती पूर्ती वैतागून जाऊन त्यांना बहुतेक घरी पाठविलं.

डँबिस००७'s picture

25 Aug 2018 - 3:04 am | डँबिस००७

केरळ राज्यात आलेल्या भयानक पुरामुळे मनुष्यहानी व बरीच मालमत्तेची व वित्तहानी झाली आहे. केरळ सरकारच्या नविन अनुमानाप्रमाणे वित्तीय हानी २०,००० कोटीच्या घरात गेलेली आहे. केरळ राज्य सरकारच्या चुकीच्या हाताळण्यामुळे पुर परीस्थीती काबु बाहेर गेली अस केरळातले लोक बोलुन दाखवत आहे. व्यवस्थीत नियोजन न केलल्यामुळे केरळ राज्यात ईतकी वाईट परिस्थीती उत्पन्न झाली. मुळ्ळ्पेरीयार नावाच्या धरणातल्या पाण्याच्या पातळीत धोकादायक लेव्हल पर्यंत वाढ झाल्याने धरणाची झडपे उघडली, त्यामुळे पुर परीस्थीती तयार झाली. धरणाची झडपे उघडताना नागरीकांना कोणतीही धोक्याची सुचना दिली नव्हती त्यामुळे येणार्या परिस्थीतीला सामोर जाण्यास नागरीक तयार नव्हते. ह्या पुरात बरीच मनुष्य हानी झालेली आहे. पण ह्या सर्वांना राज्य सरकार व जवाबदार अधिकारी कधीच पकडले जाणार नाहीत.

ह्या प्रकरणात केंद्र सरकारने केरळ राज्याला ६०० कोटी रु ची सहाय्यता घोषीत केली, भारतातल्या बर्याच राज्य सरकारांनी आपापल्या परीने सढळ हस्ते मदत घोषीत केलेली आहे. देश विदेशातल्या उद्योजकांनी, केरळ, तामिळ सिने तारकांनी सुद्धा भरघोस मदत केलेली आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत केरळ सरकारला दिलेला निधी विना वापर पडुन आहे, त्याचा ताळेबंद केरळ सरकारकडुन केंद्र सरकारला दिलेला नाही ना , ही रक्कम केंद्र सरकरला परत करण्यात आलेली आहे. तो निधी कित्येक हजार कोटीच्या घरात आहे. पण केरळ सरकारला केंद्र सरकार कडुन आता वेगळे २०,००० कोटी हवे आहेत.

यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसने जाहीर केली . पण अशी कोणतीही घोषणा
यु ए ई ( दुबई ) देशाने केलेली नसल्याचे यु ए ई च्या सरकारी प्रवक्त्याने सांगीतले आहे. मुख्यमंत्री विजयन ह्यांना ह्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी सांगीतल की यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार अशी माहिती युएईतल्या अनिवासी व्यावसायीकाने त्यांना दिली होती.

भारत सरकार गेले दोन दशक पेक्षा जास्त वेळेपासुन "कोणत्याही नैसर्गीक विपत्तीच्या परिस्थीतीत केंद्र सरकार विदेशी आर्थिक मदत स्विकारणार नाही " अस धोरण राबवत आहे. तरी सुद्धा भारत सरकार , यु ए ई ( दुबई ) देशाकडुन येणार्या ७०० कोटीची मदत केरळ सरकारला परवानगी द्यावी अशी केरळ राज्य सरकार गळ घालत होत. मुळातच यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार नसताना
केरळ सरकारला कोणाकडुन ७०० कोटीची मदत अपेक्षीत होती ?

पुर्ण गोष्टीची माहीती नसताना सुद्धा यु ए ई ( दुबई ) देशाकडुन येणार्या ७०० कोटीची मदत केंद्र सरकार नाकारत आहे अशी चुकीची माहीती मिडीया पसरवत होती. यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार नसल्याची नविन माहीती समोर आल्यावर केंद्र सरकारला ह्या प्रकरणात जाब विचारणार्या मिडीयाची आता दातखीळ बसलेली आहे.

पुरग्रस्त राज्यात पैश्याचा अपहार कसा केला जातो ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/65535609.cms?utm_source=c...

नगरीनिरंजन's picture

25 Aug 2018 - 4:55 am | नगरीनिरंजन

गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत केरळ सरकारला दिलेला निधी विना वापर पडुन आहे, त्याचा ताळेबंद केरळ सरकारकडुन केंद्र सरकारला दिलेला नाही ना , ही रक्कम केंद्र सरकरला परत करण्यात आलेली आहे. तो निधी कित्येक हजार कोटीच्या घरात आहे.

ह्याचा उल्लेख दिलेल्या बातमीत नाही. ह्या माहितीचा सोर्स देता येईल का?

सुबोध खरे's picture

25 Aug 2018 - 1:50 pm | सुबोध खरे

केरळला केंद्र सरकार सापत्न वागणूक देत आहे म्हणून आम्हाला अरब अमिरातीकडून पैसे पाहिजेत.

40% of Central funds unutilised, says CAG

The latest report of the Comptroller and Auditor General of India on local self-government institutions in Kerala tabled in the Assembly on Monday has revealed that ₹1,263.5 crore of the ₹3,162.96 crore available for various Central schemes during the year ending March 2016 had been unutilised.

https://www.thehindu.com/news/national/kerala/40-of-central-funds-unutil...

सुबोध खरे's picture

25 Aug 2018 - 1:53 pm | सुबोध खरे

तरी बरं या सर्व योजना गांधी नेहरू नावाच्या आहेत. संघ मोदी वाजपेयींच्या नावाच्या नाहीत.

The unutilised funds mainly related to the Integrated Housing and Slum Development Programme (IHSDP), ₹358.02 crore, Indira Awas Yojana (IAY), ₹234.81 crore, Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission, ₹185.19 crore and the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, ₹131.57 crore.

नगरीनिरंजन's picture

26 Aug 2018 - 10:14 am | नगरीनिरंजन

अत्यंत नालायकपणा व अकार्यक्षमतेचा कळस आहे हा केरळ सरकारचा. शिवाय युएईच्या मदतीच्या बाबतीतही खोटारडेपणा उघडा पडला आहे त्यांचा.
इतकी साक्षरता असलेल्या राज्यात लोकांना सरकारचा खोटारडेपणा कळायला हवा खरं तर; पण मला बिलकुल आशा नाही. साक्षरच काय उच्चविद्याविभूषित लोकही वस्तुनिष्ठपणे विचार करु शकत नाहीत हे या देशाचे दुर्दैव आहे.
तुमचेच उदाहरण घ्या ना. एक डॉक्टर, लष्करी अधिकारी व जग पाहिलेली व्यक्ती असूनही मोदीचा खोटारडेपणा तुम्हाला दिसत नाही.
शेवटी धर्म व जात महत्त्वाची मानून लोक आपापल्या “तारणहारांना” पाठिंबा देत राहतात; पण ह्या तारणहारांची निष्ठा नक्की कोणाप्रति आहे हे तपासण्यासाठी सतत जागरुक राहून टीकाकाराची भूमिका घेतली पाहिजे हे विसरुन जातात. दैवदुर्विलास!

डँबिस००७'s picture

26 Aug 2018 - 8:22 pm | डँबिस००७

इतकी साक्षरता असलेल्या राज्यात लोकांना सरकारचा खोटारडेपणा कळायला हवा खरं तर;

केरळ राज्याचे आताचे मुख्यमंत्री पिणराई विजयन हे लँवलिन पॉवर केस मध्ये आरोपी आहेत !! ७०० कोटी रु भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप आहे. ही केस ७-८ वर्षांपुर्वीची आहे. तरी सुद्धा अच्चुतानंदन सारख्या स्वच्छ पुर्व मूख्यमंत्र्याला डावलुन विजयन ह्यांना मुख्यमंत्री करण्यात आल ! केरळ राज्याच्या परंपरेनुसार दर पाच वर्षांने कॉंग्रेस व कम्युनीस्ट पार्टी सत्तेत असते.
कम्युनीस्ट पार्टीमुळे राज्यात एकही उद्योग आलेला नाही. ईतके वर्षे केरळमधला सुशिक्षीत मध्यपुर्वेत काम करत आहे. त्यामुळे बेरोजगारी सारखे प्रश्न तिथल्या सत्तेत असल्यांना पडत नाहीत.पण येणार्या जागतीक बदलामध्ये तिथली रोजगार भरती कमी होत आहे !!
पुढे येणार्या काळात मोठे प्रश्न केरळ राज्यासमोर येणार आहेत.

अंधाधुंद माईनींग, जंगल तोड, बेजवाबदार अधिकारी व अत्याधिक पाउस ह्या मुळे केरळ राज्य पुरात संपुर्ण बुडाल ! फक्त दोन जिल्हे सोडुन संपुर्ण राज्य पुरात लोटले गेलेले आहे !

नगरीनिरंजन's picture

26 Aug 2018 - 10:58 pm | नगरीनिरंजन

बेरोजगारीबद्दल तर सगळ्या भारतात हेच चित्र कमीअधिक स्वरुपात आहे. जे जे राज्यकर्ते बदलत्या काळाकडे दुर्लक्ष करतील त्या त्या ठिकाणी भयंकर कठीण काळ येणारच आहे.
मुळात जगभर प्रोटेक्शनिजम व आत्यंतिक नॅशनलिजम यायचं यायचं कारण केवळ धर्मांधता किंवा सगळीकडे देशद्रोही वाढले अचानक हे नसून रिसोर्स टंचाई हे आहे.
त्यामुळेच परदेशात नोकर्‍या मिळणे अवघड होणे, नवीन गुंतवणूक न येणे या गोष्टी होतात. २ कोटी रोजगार निर्माण करण्याची इच्छा असताना काही लाखांत रोजगार निर्माण होणे हे काय दाखवते?
ह्यावर उपाय म्हणून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे व लहान-मध्यम उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने धर्म-जात, आपण आणि ते ह्या मुद्द्यांवरुन लोकांमध्ये भांडणं लावून काही मूठभरांची धन करण्याचे प्रकार चालू आहेत.
अर्थात हे आत्ता कितीही माथेफोड करुन सांगितलं तरी समजण्याच्या मनस्थितीत कोणी नाही.
ह्युमन इन्जेन्युइटी रिसोर्स टंचाईवर मात करेल ह्या आशेवर बसलेत आणि लोक. प्रत्यक्षात टोळ्या करुन स्वतःसाठी संसाधने मिळवणे हेच आणि एवढंच लोक करणार. सुरुवात मोठ्या टोळ्यांनी होईल आणि हळू हळू टोळ्या लहान होत जातील.
त्यात ह्या नेसर्गिक आपत्तींचे खापर केवळ स्थानिक भ्रष्टाचारावर फोडले जातेय. पण क्लायमेट चेंजबद्दल कोणी बोलत नाहीय.
मोदींचा विश्वास नाही क्लायमेट चेंजवर; पण भारताला त्याची झळ बसणार की नाही ते त्यावर ठरत नाही. इतर राज्यांमधे सगळं व्यवस्थित आहे असंही नाही. उत्तराखंडातल्या पुरावेळी दिसलंच. पण ह्या सगळ्याचा शांत डोक्याने विचार करता येईल अशी परिस्थितीच ठेवलेली नाही. फूट पाडून टोळीयुद्ध आधीच सुरु करण्याचे प्रयत्न जोरात सुरु झालेत.

ट्रम्प's picture

26 Aug 2018 - 7:13 pm | ट्रम्प

खरे साहेब बुलेटप्रूफ जॅकेट घालून बसा !!!!!! तीर सुटले आहेत .

टॅक्सपेयर च्या पैशातून शिक्षण, आरक्षण घेतले पण म्हणतात ना ' पादऱ्याला पावट्या चा आधार ' अशी गत झाली आहे मोदी विरोधकांची . कितीही उच्च शिक्षण घेतले तरी सामाजिक जबाबदारी मुक्त वागणूक ज्याच्या अंगी भिनलेली असते आशा व्यक्ती अक्कल ना बक्कल , अन गावभर नक्कल करत फिरत असतात.

ट्रेड मार्क's picture

25 Aug 2018 - 8:39 am | ट्रेड मार्क

देशद्रोही कोण हा प्रश्न असेल तर अफझल गुरुच्या फाशीच्या विरोधात मोर्चा काढणारे , तसेच नंतर त्याला फाशी दिली म्हणून त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करणारे, तसेच याकूब मेमन साठी मध्यरात्री कोर्ट उघडायला लावणारे हे तर नक्कीच देशद्रोही आहेत.

अफझल गुरु, याकूब मेमन यांनी भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले याबद्दल कोणाला काही शंका आहे का? असल्यास स्पष्टपणे सांगावे. नसेल तर मग भारताच्या विरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या या लोकांचा एवढा पुळका असणाऱ्यांना देशद्रोही का म्हणू नये? आणि मग हाच न्याय पुढे लावून जनेवि किंवा AMU मधल्या तथाकथित विद्यार्थी पुढाऱ्यांना गरीब बिच्चारे म्हणून त्यांचे गोडवे गाणाऱ्यांना काय म्हणावे? आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण रहात असलेल्या एरियात केवळ भुकेपोटी चोरी केली म्हणून चोर शिक्का बसलेल्या लोकांसोबत नाव जोडले जाऊ नये याची काळजी करणाऱ्या लोकांना या देशद्रोह्यांची काळजी करणाऱ्यांसोबत जोडले जायला काहीच वाटत नाही?

याकुब मेमन च्या समर्थकांचे ,
बाटला हाऊस मध्ये आतेरिकी मेला म्हणून रात्रभर न झोपणाऱ्या म्याडम चे ,
डोकलम मध्ये चिनी सैन्यची भाजप वाटाघाटी करून परतावत असताना चिनी राजदूता ची गुपचूप भेट घेणाऱ्या चौकट रागा चे ,
पाकिस्तान मध्ये जाऊन भाजप ला सत्तेतून दूर करण्यासाठी भीक मागणारा मणिशंकर चे ,
उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्या नंतर मुस्लिम खतरे में असे बोलणारा व काँग्रेस चे नेते आणि पाकिस्तानी राजदूत ची एकत्र पार्टी ठेवणारा हमीद अन्सारी चे देशप्रेम आम्हाला दिसलेच नाही हो !!!!!!!!!!
का यांच्या देशप्रेमाची व्याख्या उच्चपातळीवरची आहे ?
वर उल्लेख केलेले सगळे देशप्रेमी पाकिस्तान किंवा अरबी देशात असे देशप्रेम दाखवू शकले असते का ?
का भारतात विचारस्वातंत्र्य आहे म्हणून राष्ट्रध्वज जाळायचा , तुकडे होंगे हजार म्हणायचे आणि त्यांच्या समर्थकांनी मात्र निषेध न करता ' हे पाहायला न्यायालय आहे ' मर्दुमकी करायची ?
आर्थिक , सामाजिक , राजकीय फायदा करून घेण्यासाठी सद्सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून काय फायदा ?

डँबिस००७'s picture

25 Aug 2018 - 11:44 am | डँबिस००७

ट्रेड मार्क , ट्रंप ,

सही बोललात !

नाखु's picture

26 Aug 2018 - 1:37 pm | नाखु

एका धाग्यात कुमार केतकर यांचे आकंठ प्रेमात गुणगान केले होते, त्यांच्यासाठी खुशखबर.
निस्पृह, तटस्थ आणि साक्षेपी केतकर यांचा आता कॉंग्रेसचे लोकसभा जाहीरनामा समितीत समावेश केला आहे.
कुबेरांना राज्यसभेचे डोहाळे लागले असतीलच त्यांना या बातमीने आनंद वाटला असेल.
संपूर्ण बातमी आजचा मटा मध्ये
वाचकांची पत्रेवाला नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2018 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

Raghuram Rajan lauds Modi's fiscal math; says must focus on this 1 problem before polls, and it's not Rupee

रघुराम राजन यांचा चष्माबदल ?!

नगरीनिरंजन's picture

26 Aug 2018 - 11:16 pm | नगरीनिरंजन

चांगली बातमी. दोन्ही बाजूंनी चष्माबदल होतोय ही चांगली गोष्ट आहे.
एनपीएसाठी परत राजन यांच्याशी सल्लामसलत करणे हेही स्तुत्यच आहे व शिवाय रुपया पडला तरी काही होत नाही हे भारतीयांना कळले हाही चांगला चष्माबदल आहे.
करंट अकाऊंट डेफिसिट नियंत्रित ठेवा असा सल्ला देण्यापूर्वी फिस्कल अकाऊंट मॅनेजमेंटची स्तुती करुन राजन यांनी चांगली प्रथा पाडली आहे. शर्करावगुंठीत औषध चांगल्या प्रकारे स्विकारलं जातं.

डँबिस००७'s picture

26 Aug 2018 - 7:29 pm | डँबिस००७

रघुराम राजन यांनी चष्मा /पार्टी बदलेली
दिसतेय , चक्क श्री मोदीजींच कौतुक ? कमाल आहे ?

ज्यांना सहन होत नाही त्यांनी बर्नाॅलची सोय स्वतःच करावी !!

नाखु's picture

26 Aug 2018 - 8:58 pm | नाखु

सांगतो त्यामागे संघाचा हात आहे

तशी प्रथाच आहे मिपावर प्रत्येक गोष्टीचा संघाशी संबंध जोडण्याची.

अडाणी ओंडके नाखु

डँबिस००७'s picture

27 Aug 2018 - 12:30 am | डँबिस००७

कै. श्री अटल बिहारी यांच्या मृृत्यु नंतर
काढलेल्या व्हिडीओत त्यांना श्रद्धांजली देण्याऐवजी हीन दर्ज्याची टिका केलेली आहे !! आता पर्यंत दुआ बद्दल असलेला थोडा आदर ही गळुन पडला !!
श्रद्धांजली देताना मृृत व्यक्ती बद्दल
संवेदनशील असण्याचा संकेत मोडुन जग प्रसिद्ध अटजी बद्दल ईतक्या खोट्या गोष्टी सांगीतल्यात !
बाबरी सारख्या अनेक गोष्टींचा तसेच पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या मृृत्युबद्दलही अटलजींनाच दोषी ठरवलय !
https://youtu.be/R_uTryBkUh4

हाच माणुस करुणानिधीनां श्रद्धांजली देताना मात्र त्यांच्या कार्याबद्दल सांगताना थकत नव्हता !!

खरच मा श्री मोदीजींना विरोधी पक्षाचीच नव्हे तर अश्या विकल्या गेलेल्या मिडीया ला वठणीवर आणायच आहे !!

मिडीया व डावे भारतातील जनतेला दिशाभुल करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत !!

ह्या प्रकारावर आपला काय विचार आहे !!

डँबिस००७'s picture

27 Aug 2018 - 3:27 pm | डँबिस००७

Raksha Bandhan 2018: रक्षाबंधनानिमित्त बहिणींना शौचालय भेट

रक्षाबंधननिमित्त रविवारी जिल्ह्यात एकूण २४०० शौचालये भावांनी बहिणींना भेट दिली आहेत. बेळगाव जिल्ह्यात गरजूंना शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. रामचंद्रन यांनी ठेवले होते. ज्या घरी शौचालये नाहीत त्या घरी शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी सुमारे २४०० शौचालये बहिणींना भेट स्वरूपात मिळाली आहेत. विशेष म्हणजे आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही अनेक भावांनी पदरमोड करून बहिणीला शौचालयाची ओवाळणी दिली आहे. या अनोख्या भेटीने भारावलेल्या बहिणींनी शौचालयासमोरच भावाला राखी बांधून औक्षण केले. इतर वेळी सहसा न दिसणारे हे चित्र रविवारी बेळगाव जिल्ह्यात पहायला मिळाले.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/on-the-occasion-of-ra...

डँबिस००७'s picture

27 Aug 2018 - 8:17 pm | डँबिस००७

देश बदल रहा है !! स्वच्छ हो रहा है !!

देशात अशी लाट आणण्याच सर्व श्रेय फक्त श्री मोदीजींनाच जात आहे ! त्यामुळेच २०१९ पुर्वी देशात ५ लाख शौचालय बांधुन पुर्ण होतील !!

Over 6 crore toilets built across rural India under Swachh Bharat Mission http://www.uniindia.com/over-6-crore-toilets-built-across-rural-india-un...

देशात ६ कोटी शौचालय बांधुन झालेली असताना, हिंदु पेपर Not one toilet built under Swachh Bharat Mission अश्या मथळ्या खाली बातमी देतो की दिल्ली शहरात स्वच्छ भारत मिशनच्या खाली एकही शौचालय बांधुन झालेल नाही. भारतातील मिडीया किती खालच्या पातळीवर गेलेले आहेत ह्याचाच एक पुरावा आहे.

सुबोध खरे's picture

29 Aug 2018 - 9:39 am | सुबोध खरे

@डँबिस००७
Not a single toilet was constructed in the national capital since the inception of the Swachh Bharat Mission two-and-half years ago, with funds to the tune of Rs 40.31 crore for this purpose lying 'idle', the CAG said on Tuesday.

According to a report by the Comptroller and Auditor General (CAG) tabled in the Delhi Assembly, the AAP-led city government did not allocate the Mission funds to implementing agencies as per their requirements.

उघड्यावर शौचास बसणे हे सार्वजनिक आरोग्यास हानिकारक आहे असे केवळ श्री मोदी म्हणाले म्हणून रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारी माणसं तेथे सरकार चालवत आहेत. दोष त्यांना द्या

येथे तरी माध्यमांचा दोष दिसत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 1:01 am | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत स्पृहणिय उपक्रम ! त्या सर्व भावांचे आणि डॉ. आर. रामचंद्रन यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल !

Biofuel Flight: जैवइंधनावर उडाले पहिले विमान

नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात भारतानं आज ऐतिहासिक भरारी घेतली. जैवइंधनाच्या जोरावर भारतातील पहिल्या विमानानं आज यशस्वी उड्डाण करण्यात आलं. या यशामुळं जैवइंधनावर विमान उड्डाणाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या गटात भारताला स्थान मिळालं आहे.

स्पाइसजेटच्या 'क्यू ४००' या विमानात जैवइंधन भरून डेहराडून ते दिल्ली अशी चाचणी घेण्यात आली.
डीजीसीए व स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांसह एकूण २० जणांनी या विमानातून प्रवास केला. तब्बल २५ मिनिटे हे विमान आकाशात होतं. आजच्या उड्डाणासाठी विमानात वापरण्यात आलेल्या इंधनापैकी २५ टक्के जैवइंधन होतं, अशी माहिती 'स्पाइसजेट'नं दिली आहे. जैवइंधनाच्या वापरामुळं कार्बनचं उत्सर्जन कमी होतं. शिवाय, सध्याच्या इंधनाच्या (एटीएफ) तुलनेत ते कमी लागतं,' असा दावा कंपनीनं केला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमनं जेट्रोफाच्या बियांपासून या इंधनाची निर्मिती केली आहे.

आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांनी जैवइंधनावर आधारित विमानाचं उड्डाण केलं आहे. मात्र, विकसनशील देशांमध्ये अशी चाचणी घेणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. जगातील पहिल्या जैवइंधन विमानानं या वर्षी सुरुवातीलाच लॉस एंजलिस ते मेलबर्न असं उड्डाण केलं होतं.

तीन मूर्ती स्मारकाबाबत मनमोहन सिंग यांचे मोदींना पत्र

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालय (एनएमएमएल) आणि तीन मूर्ती स्मारक यांच्यात केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या वास्तूंमध्ये बदल करून नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे.

दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. या प्रकल्पातून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा आणि योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सिंग यांनी केली.
पत्रामध्ये सिंग यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, वाजपेयी यांनी नेहरूंच्या निधनानंतर संसदेत केलेल्या भाषणात नेहरूंबद्दल गौरवोद्गार काढले होते. नेहरूंसारख्या उत्तुंग आणि महान व्यक्तिमत्त्वाचे तीन मूर्ती भवनात पुन्हा वास्तव्य होऊ शकणार नाही, असे वाजपेयींनी म्हटले होते. सध्याचे सरकार मात्र नेहरूंचा अमीट वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते तर ते संपूर्ण देशाचे होते. तीन मूर्ती स्मारक आहे तसे जतन केल्याने आपण वारसा आणि इतिहासाचा आदर करणार आहोत, असे सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.

दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध करावा हे काही कळले नाही !! काँग्रेसने देशावर ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केले. याचा अर्थ ह्यांचेच जास्तीत जास्त पंत प्रधान होऊन गेले तरीही केंद्र सरकारच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध करावा म्हणजे किती पराकोटीची व्यक्ती पुजा काँग्रेसवाले करत आहेत !!

नाखु's picture

27 Aug 2018 - 8:52 pm | नाखु

दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे

साहजिकच आहे,तीन मूर्ती म्हणजे नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी इतकेच असा अर्थ लावून घेतला आहे!!!
हे चुकीचे आहे हे मनमोहन मनोमन वाटत असूनही काहीच उपाय नाही.

याव्यतिरिक्त इतर काही कांग्रेसी पंतप्रधान होते असा दावा करु नये (तशी त्या पक्षाच्या नोंदवहीत नोंद नाही)

खुलाशी नाखु वाचकांची पत्रेवाला

तीन मूर्तीभवन मध्ये सध्या काय आहे ? काँग्रेस का विरोध करत आहे ? त्याबद्दल जरा स्पष्ट करून सांगा ना म्हणजे आम्ही पण काँग्रेस ला चार शिव्या ( मनात ) हासडू .

नरेंद्र मोदींच्या हत्येचा माओवाद्यांचा कट: पुणे पोलिसांचं देशभरात अटकसत्र
पाच राज्यांमध्ये पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे मारले आहेत. पी वरावर राव, गौतम नवलखा, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, अनू भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट होता असा दावा करण्यात येत आहे.
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून त्याच्याशी संबंधित या अटका आहेत. पुण्यामधून वरावर रावना अटक केल्यानंतर त्यांच्या हैदराबाद येथील घरावरही छापा मारण्यात आला. नवलखाना दिल्लीतून अटक करण्यात आली व साकेत कोर्टात हजर करण्यात आले. त्यांचा तांबा महाराष्ट्र पोलिसांकडे देण्यात येणार आहे. पोलिसांनी नवलखा यांच्या घरातून बॅग, लॅपटॉप व काही कादगपत्रं जप्त केली आहेत.
मानवाधिवकारकार्यकर्त्या वकिल सुधा भारद्वाज यांना फरीदाबादमधून अटक करण्यात आली व महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले. भारद्वाज यांच्या बदरपूर येथील घरावरही छापा मारण्यात आला. त्यांची मुलगी अनू हिलाबी पोलिलांनी ताब्यात घेतले आहे. अरूण परेराना पुण्यातून अटक करण्यात आली असून परेरा यांनी आपण निष्पाप असल्याचा दावा केला आहे. आपण काही खटल्यांमध्ये सरकारविरोधी काम केल्याने अटक केल्याचा त्यांचा दावा आहे. आपली अटक म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

वृंदा करात , आणि गालावर गोड खळी वाले राजकुमार नीं त्या मुद्द्यावर भाजपा वर हल्ला केला आहे

माहितगार's picture

29 Aug 2018 - 7:14 pm | माहितगार

.

डँबिस००७'s picture

29 Aug 2018 - 8:07 pm | डँबिस००७

All 5 human rights activists to be kept under house arrest till next hearing: SC

कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेवर ठपका ठेवण्यात आला होता. यासंदर्भात तपासामध्ये एल्गार परिषदेशी संबंधित कार्यकर्त्यांचे व बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे लागेबांधे असल्याचे पोलिसांना आढळले होते. या प्रकरणी पोलिसांनी काल देशभरात विविध ठिकाणी कारवाई करत नक्षलींशी संबंध असल्याचा ठपका ठेवत पाच जणांना अटक केली होती. यामध्ये वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्सालवीस या पाच जणांचा समावेश होता. या पाचही जणांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. हे पाचही जण ५ सप्टेंबरपर्यंत नजर कैदेत राहतील असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे

तथाकथीत डाव्या माओवादी संघटनांच्या लोकांना अटक सुरु झाल्या पासुन देशात " केंद्र सरकारने " ईमरजेंसीच लागु केली आहे व
ह्या संघटनेवर अत्याचार होत आहे अशी हाकाटी पेटवायला सुरुवात झालेली आहे.

अटक झालेले लोक विचारवंत , बुद्धी जीवी आहेत असा त्या लोकांचा दावा आहे.

सुबोध खरे's picture

29 Aug 2018 - 8:34 pm | सुबोध खरे

तथाकथीत डाव्या माओवादी संघटनांच्या लोकांना अटक सुरु झाल्या पासुन देशात " केंद्र सरकारने " ईमरजेंसीच लागु केली आहे व
ह्या संघटनेवर अत्याचार होत आहे अशी हाकाटी पेटवायला सुरुवात झालेली आहे.

अटक झालेले लोक विचारवंत , बुद्धी जीवी आहेत असा त्या लोकांचा दावा आहे.

ते सर्व ठीक आहे परंतु याच लोकांना काँग्रेच्या कार्यकाळात पण बऱ्याच वेळेस अटक झाली होती तेंव्हा मानवाधिकाराचे उल्लंघन किंवा आणिबाणीसदृश्य परिस्थिती अशी कोल्हेकुई ऐकली नव्हती.

यापैकी वरवरा राव हे माओइस्ट आहेत आणि गौतम नवलखा हे काश्मीर मध्ये मानवाधिकार हक्काचे कार्यकर्ते आहेत आणि तेथे सार्वमत घ्यायचे आग्रही आहेत.

डँबिस००७'s picture

29 Aug 2018 - 8:12 pm | डँबिस००७

एल्गार परिषद : आरोपींचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध – पुणे पोलीस

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्यांचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान पुणे पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सीपीआय माओवादीकडून एल्गार परिषदेला पैशांचा पुरवठा करण्यात आला असून परिषदेमार्फत जनतेला भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही सांगितलं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून यावेळी पेन ड्राईव्ह, कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत विविध पुरावे हाती लागले असून तपासात ई-मेल्स, पत्र असे भक्कम पुरावे हाती लागले आहेत. एल्गार परिषदेच्या आडून शासनाविरोधात जनतेला भडकवण्याचे नियोजन होते याचेही पुरावे हाती आले आहेत असं पोलिसांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी आरोपी वरवर राव नेपाळमधून शस्त्र विकत घ्यायचा अशी माहिती दिली आहे.
हाती आलेल्या इलेक्ट्रिक पुराव्यांची पाहणी केली असता प्रतीबंधित सीपीआय-माओवादी संघटनेने व्यूहरचना आणि रणनीतीचा भाग म्हणून भारतात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यवस्था उलथून टाकण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा कट रचला आहे. अशा प्रकारचे संघटन तयार करण्याचा ठराव सीपीआय माओवादीच्या ईस्टर्न रिजनल ब्यूरोच्या बैठकीत संमत झाला आहे, आणि त्याबद्दल पुरावा उपलब्ध आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
ईस्टर्न रिजनल ब्यूरो सीपीआय माओवादीचा एक भूमिगत गट आहे. याच कटाचा भाग म्हणून महाराष्ट्रात एक फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे. सीपीआय माओवादीने रचलेल्या कटात सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांचा स्पष्ट सहभाग असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सीपीआय माओवादीच्या सदस्यांकडून बेकायदेशीर कृत्यांकरिता निधी जमवणे, शहरी भागातील विद्यार्थ्यांना, तरुणांना भडकावणे, शस्त्र जमवणे याबद्दलचा पुरावा उपलब्ध झाला आहे. या कटात वरिष्ठ सदस्यांचाचा सहभाग असल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

तपासादरम्यान सीपीआय माओवादी, त्यांचे वरिष्ठ सदस्य आणि हिंसाचार करणाऱ्या प्रतिबंधित संघटनांचं संबंध असल्याचं समोर आलं आहे. राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी विविध संघटना त्यांचे पदाधिकारी तसंच सर्वोच्च राजकीय पदाधिकाऱ्यांवर हल्ले करुन घातपात करण्याचा कट सीपीआय माओवादीने रचल्याचंही समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान २८ तारखेला नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुंबई, ठाणे, फरिदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद आणि रांची या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यावेळी हार्ड डिस्क, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, मोबाइल, सीम कार्ड तसंच गुन्ह्याशी आऱोपींचा संबंध असल्याचं स्पष्ट दर्शवणारी कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. तपासात आरोपींविरोधात भक्कम पुरावे हाती लागल्यानेच त्यांना अटक करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ट्रम्प's picture

29 Aug 2018 - 8:34 pm | ट्रम्प

आश्चर्य आहे !! अजून एक ही पुरोगामी कोकलात आला नाही .
अटक केलेल्या पाच अर्बन टेररिस्ट पैकी तीन जणांना काँग्रेस सरकारने अटक करून , कोर्टात केस चालवून न्यायाधीशांनी 4 वर्षांची शिक्षा ठोठावली होती .

अरुण फेरिरा (2007) 4 वर्ष
वेरणोन गोंसलवीस (2007) 4 वर्षे
गौतम नवलाखा (2011 ) 5 वर्ष

नाखु's picture

30 Aug 2018 - 8:33 pm | नाखु

परस्पर निर्दोष असल्याचे निवाडापत्रक दिले सुद्धा

डँबिस००७'s picture

31 Aug 2018 - 7:43 pm | डँबिस००७

GDP Growth rate for 1st qrt is said to be 8.2%. for year 2018-19
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/q1-gdp-at-8-...

डँबिस००७'s picture

31 Aug 2018 - 7:46 pm | डँबिस००७

अर्बन नक्षली मध्ये भिषण शांतता पसरलेली आहे !!
रफाल विमान खरेदी प्रकरणात राहुल गांधींनी आपल्याच पायावर कुर्हाड मारुन घेतली आहे !!

गामा पैलवान's picture

8 Sep 2018 - 1:27 am | गामा पैलवान

पिराताई,

अग्गो बाई! पुरुषांनी उभं केलं म्हणायचं का हे सगळं?! ग्रेट्च!

गेले कित्येक सहस्रके पुरुषांनी स्त्रियांवर पिढ्यानुपिढ्या अन्याय केल्याचं म्हंटलं जातं. खरंखोटं माहित नाही. पण जर खरं धरलं तर ही सर्वच व्यवस्था बहुधा पुरुषांनी उत्पन्न केलेली असावी असा निष्कर्ष निघतो.

आ.न.,
-गा.पै.