तथाकथीत पिंकारू पुरोगाम्यांचा नंबर पह्यला !

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
17 Jul 2018 - 4:33 pm

Indian secularism is not only in danger because of those who attack it, but also because of some of those who claim that they are for it........... It matters to them only when it suits them - the contrary of value based politics or ideology. संदर्भ

मला एक जुनी घटना आठवतीए , ज्यात पाहुण्यांच्या मुलाची आणि घरातल्या मुलाची छोटीशी झटापट झाली, ज्यात पाहुण्यांच्या मुलाची बाजू चूक असूनही त्याला न समजावता मी घरातल्या मुलाची समजूत काढत होतो. तो प्रसंग पाहुण्या काकांनी दूरुन न्याहाळला आणि ज्याची चूक आहे त्याला न रागवता, ज्याची चूक नाही त्याला का गप करतोयस ? तुझ्यासाठी हा लहान मुलातला क्षुल्लक संघर्ष आहे पण लहान मुलांच्या मनातील अन्यायाची अढी दीर्घ काळ राहू शकते. एवढे सांगून त्यांनी स्वतःच्या मुलाला बोलावून घेऊन त्याची चूक त्याला समजावून दिली. या विषयावर माझा एक धागा आहे आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान

या आठव्णीचे कारण आमच्या काही तथाकथित पिंकारु पुरोगामी मिपा मित्रांचा अशात आलेला अनुभव , जे स्वतःला पुरोगामित्वाचे प्रमाणपत्र दिल्यासारखे येतात , लेखक प्रतिसादकांच्या नेमक्या भूमिकेचा अभ्यास न करता पिंक टाकून चालले जातात. प्रतिसाद दिलातरी चर्चेसाठी सुद्धा वापस येत नाहीत. म्हणजे असले प्रकार पुरोगामी नसलेले करत नसत अशातला भाग नाही, मी व्यक्तिलक्ष्य तर्कदोष विरोधी मोहीम करतो आणि शुद्धलेखन शब्दवापर या वरुन विचारल्या शिवाय सुचना देऊ नयेत असे स्पष्ट धागा लेखात लिहिण्यस सुरवात केल्यानंतर त्या मंडळींच्या पिंका टाकणे कमी झाले.

झालय काय की, जे शुद्ध निष्पक्षता बाळगण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी स्पेस राहीलेला नाहीए. परंपरावादी शुद्ध निष्पक्षतावाद्यांचा स्पेस कमी करत असतील तर ते समजता येते. पुरोगामी जे स्वतःला अधिक विवेकी समजतात त्यांचे टोकाच्या भूमिकांच आग्रह समजणे कठीण जाते. माझ्या दृष्टीकोणांचे प्रमाणपत्र कुणाकडून घेण्याची किंवा कुणाकडून लादले जाण्याचे वस्तुतः कारण नसावे. पण एनी वे या लेखाच्या निमीत्ताने एक उदाहरण म्हणून माझ्या मिपा लेखनाचा जरासा आलेख अभ्यासता यावा. मी या परिच्छेदात नोंदवलेले ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास या बद्दलही मिपावर चर्चा घेऊन झाली आहे.

माझ्या सुरवातीच्या मिपा धाग्यांपैकी एक मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? अभ्यासण्याची गरज केवळ परंपरावाद्यांना नव्हे तर तथाकथित पुरोगाम्यांनाही असावी असे वाटते. माझ्या हल्लीच्या टिकेने व्यथीत होणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांनी, भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा इथे मी विनंती केल्या प्रमाणे योगदान देऊन दाखव्ण्यास हरकत नसावी, पण रचनात्मक काही करण्यापेक्षा अतीसार झाल्याप्रमाणे तथ्य नसलेली पुर्वग्रह दुषित निंदा खेदजनक वाटते. त्यांना धर्मनिरपेक्षतेत खरा रस असेल तर राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू किंवा 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व सारखेही धागे बघण्यास योगदान देण्यास हरकत नसावी. संस्कृती आणि धर्म यातील गल्लत आणि टोपीवाले कन्हैय्या ! हे धागेही सांस्कृतिक सौहार्दासंबंधानेच आहेत. राहीलच तर कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? हा सुद्धा एक सकारात्मक धागाच आहे.

पण तथाकथित पुरोगामींचा एक गट पिंकारु ट्रोलींगचे हत्यार नित्य नेमाने वापरत असल्याचे दिसते. एका मिपा सदस्यांनी या होणार्‍या त्रासापोटी एक धागा टाकला तर आमचे पिंकारु पुरोगामी सहानुभूती राहीली दूर त्या धाग्यावर येऊन एक काळ्या कुत्र्याचे छायाचित्र टाकून वरुन तुम्हाला काळा कुत्रा ही फिरकत नाही असे वाटावयास नको अशी वर मल्लिनाथी करुन; का तर केवळ धागा लेखकाची इतरत्रची मते या पिंकारु पुरोगामींना पटणारी नसतात एवढेच. (संदर्भ)

नास्तीकांसाठी हिंदू जिवनपद्धती सोबत नास्तीकांचे भारतातील योगदान हाही सकारात्मक धागा येऊन जातो त्यावर श्रद्धावंत टिकेसाठी रिघ लावतात पण एकही नास्तिक नास्तिकांचे योगदान धाग्यावर एकाही प्रतिसादाची भर घालत नाही, नास्तिक बाजूने संस्काराचे अव्हान कसे पेलावे या विषयावर नाही म्हणावयास एखादा नास्तिक बाजूचा प्रतिसाद आहे पण बाकी नास्तिक आणि पुरोगामी तसे गायबच आहेत. तेच श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ? धागा काढला कि, चंद्र बघायचे सोडून चंद्र दाखवण्यासाठी पिंकारु पुरोगामीपण हजेरी लावते. ते ठिक पण नास्तीकांसाठी मुस्लिम जिवनपद्धती असा विषय घेतला की लगेच पुरोगाम्यांच्या लेखी धागा काढण्याचा उद्देश्य चुकीचा होतो, "बघा बघा, हिंदू धर्म कसा सहिष्णु!!" म्हणून टेरी बडवायला मोकळे असा धागा काढण्या उद्देश्य म्हणून मल्लिनाथी केली जाते !!

माझा मिपावर टिळकांबद्दल लेख असतील तर त्यांच्यावर टिका करणार्‍या त्यांच्या मुलगा श्रीधर टिळक तसेच आगरकरांबद्दलही लेख आहेत, भगवदगीते बद्दल लेख आहेत तर चातुर्वण्यावर टिका ही केली आहे. गीत रामायण आणि लोक गीतातील रामायणाची सकारात्म्क दखल घेताना मर्यादांची दखल घेणारी मालिका आहे. हिंदू श्रद्धांची बाजू घेणारे लेख आणि प्रतिसाद आहेत तर बगाड, आणि इतर परंपरात जिथे अनिष्टता आहे त्यावर टिकाही केली आहे. ख्रिश्चन धर्मीय दोन + एक युरोपिय अंधश्रद्धांची दखल घेतली आहे तर शीख बौद्ध धर्मांच्या मर्यादाही वेळोवेळी उल्लेखिलेल्या आहेत. ब्राह्मणवादावर टिकाकारांची दखल घेणारे दोन लेख आहेत, जन्माधारीत विषमतेवर टिका आहे तर सद्य राजकारणात जाती आधारीत प्राबल्याबद्दल प्रश्न चिन्हे उपस्थित केली आहेत . ब्राह्मणवादावर टिकाकारांची दखल घेणारे लेखन केले तर प्रसंग परत्वे आंबेडकरांच्या निसटत्या बाजूही मांडल्या आहेत. जवाहरलाल नेहरुं ते सुभाषचंद्र बोस ते रविंद्रनाथ टागोर बद्दल सकारात्मक दखल घेतली तर टिकाही केलेली आहे.

क्वचित काही अपवाद वगळता, ९९.९९ टक्के लोक सहसा कोणतीही एखादीच बाजू घेऊन मांडत असताना , माझा कळफट कौतुक आणि टिका करताना चौफेर धावत असताना, त्यात एखादा पिंकारु त्याच्या बाजूवर टिका असली की ' हे पहा हां तुमच्या निष्पक्षतेचा भंडा फोड झालाय ' ह्या अविर्भावात पिंक टाकून मोकळा होतो. माझी जी काही निष्पक्षता असेल (किंवा नसेल) ०.१% ते १०० % ती मला स्वतःला बांधील आहे आणि असेल पण माझ्या व्यक्तिगत बांधीलकी माझी मते माझ्या अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा भाग आहेत, उपलब्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत मी कुणाचेही काही देणे घेणे लागत नाही हे एक. खासकरुन जे स्वतः निष्पक्ष नाहीत किंवा मुद्याच्या सगळ्या बाजूही समजून घेतलेल्या नाहीत कि व्यक्तिग्त टिका करण्यासाठी धावतात ?

या पिंकारु मंडळींच्या हाती लेख अथवा प्रतिसादातील मुद्यांना खोडण्याची क्षमता नसते किंवा काय असेल, धागा लेखाची संख्या ते प्रतिसादाची लांबी आणि आणखी काहीच नाही मिळाले तर जिलबीची पिंक जिचा उद्देश्य आपल्याला न पटणार्‍या लेखकाचे ट्रोलींग एवढाच असतो . आज ना उद्या येतील माझे मुद्दे खोडणारे पिंक टाकून ठेवणे गरजेचे असते. का ?

विवेक हा जर पुरोगामीत्वाचा पाया असेल तर चर्चा विषयावर चर्चा न करता , चंद्र दाखवणार्‍याचे बोटावर टिका करुन व्यक्तिलक्श्य तर्कदोषाची अंमल बजावणी करताना या तथाकथित पिंकारु पुरोगाम्यांचा विवेक नेमका कुठे असतो ह्याचा शोध घेणे आणि अशा चर्चा अनुभवांचे संकलन हा माझ्या ह्या धागा लेखाचा उद्देश्य आहे.

या पुर्वीची उदाहरणे आणि नवी उदाहरणे जशी जशी समोर येतील त्यांची दखल घेता यावी आणि तथाकथित पुरोगाम्यांच्या पुढच्या पिंकारु ट्रोलींगला तोंड देता यावे हे प्रयोजन साध्य झाले तर ठिक किमान त्यांच्या मनमोकळ्या पिंकांचे मनमोकळे आभार तर या निमीत्ताने निश्चित मानता येतील. सरते शेवटी पिंकारु आणि तथाकथित पुरोगाम्यांना एवढेच सांगणे आहे , की तुमच्या निरपेक्षतेस जेव्हा जेव्हा जिथे जिथे सापेक्षतेची भेसळ दिसेल तिथे तिथे माहितगार पाठपुरावा करताना माहितगार दिसत राहील आणि माहितगारची ज्या काही कौतुकाच्या असोत वा टिकेच्या दिशा असोत त्या तुमच्या पिंकांनी बाधीत न होता कळफलक टिचकत राहतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष करत राहतील .

तरीही जे पिंकारु पिंक टाकण्यात आपला अव्वल क्रमांक सांभाळू इच्छितात त्यांच्यसाठी आमचे माझा नंबर पह्यला हे काव्य सप्रेम भेट.

* अलिकडील काही पिंकाची उदाहरणे जोडण्याचे काम चालू

* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी चंद्र सोडून चंद्र दाखवणार्‍याच्या बोटा बद्दल चर्चा करणे टाळण्यासाठी अनेक आभार.

वावरविरंगुळा

प्रतिक्रिया

मला तरी असे वाटलं की आपले बरेच लेख वेगळीकडे घेऊन जाणारे आहेत व ओढुन विषय आणलेत. हलकं फुलकं रुचणारे लिहा.ट्रोलभैरवांना स्वतःच आमंत्रण दिल्यासारखे होते. काही दिवस लिहू नका.

सतिश गावडे's picture

17 Jul 2018 - 9:22 pm | सतिश गावडे

इतरांना लेबलं लावण्यापूर्वी कधीतरी स्वतः काय करत आहोत याचाही विचार करत जा की राव.
तुम्ही काय उद्देशाने हे असले धागे एकामागून एक काढता ते तुमचं तुम्हाला माहिती, मात्र सुरुवातीची "अभ्यासू धागे काढणारा आयडी" ही तुमची ओळख तुम्हीच धुळीला मिळवली आहे.

बघा पटतंय का :)

सर्वप्रथम विनोदी पण मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. नेहमी प्रमाणे ताज्या घडामोडी धाग्यात भारतीय अर्थ व्यवस्थेचा आकार वाढण्याचे श्रेय घेण्याच्या घाई बाबत भाजपा समर्थकांच्या निसटत्या बाजू मांडल्या, आणि दुसर्‍या बाजूला केवळ १७ तासांच्या अंतराने कायद्यापुढे समानतेचे निहीत तत्व अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या बाबत कसे नाकारले जाते आहे याचे मुद्देसूद विश्लेषण केले. दोन्ही चर्चातील प्रतिसादातील मुद्द्यांना उत्तरे दिलेली नाहीत केवळ पिंकाच टाकल्या कारण एकच Denialism या विषयावरही वस्तुस्थितीस नकार नावाची मिपावर धागा चर्चा घेतलेली आहे. पण ब्लॅक अँड व्हाईट-या फसव्या द्विभाजनाचा पगडा माणसाला Denialism मधून सहज सुटू देत नाही, मग व्यक्ती लक्ष्य तर्कदोष आणि पिंका टाकण्यावर भर दिला जातो.

माझ्या एखाद्या धाग्यात अथवा प्रतिसादात माझा अभ्यास कमी पडत असल्यास आपण आपला किंवा ईतर कुणीही आपापला अभ्यास मांडण्यास मोकळे आहे , आणि असा अभ्यास मांडला जात असेल तर मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? याचा प्रत्यय देण्यास नक्कीच आवडेल. पण जे केवळ निरपेक्षतेत सापेक्षतेची भेसळ करून पुर्वग्रहांनी अभ्यास विरहीत पिंका टाकतात त्यांना पिंकारु या लेबलचे धनी का करु नये याचे पटणारे अभ्यासपूर्ण उत्तर दिल्यास मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? याचा प्रत्यय देण्यास नक्कीच तयार आहे.

मनमोकळ्या प्रतिसादा बद्दल पुनश्च आभार

फक्त विनोद म्हणून खालील विधान करतोय. त्याखेरीज त्यात काही अर्थ शोधून दुखावले जाऊ नये.

हळुहळू माहितगारजींच्या लेखातले आणि प्रतिसादातले सर्वच शब्द हायपरलिंकयुक्त होतील का? तितका चर्चांचा व्यासंग त्यांचा आंतरजालावर नक्कीच असेल.

माहितगारजी तुम्ही खूप मनावर घेऊ नका. अनेकजण विषयाला धरून मतं लिहितात त्यांच्यावर फोकस करा. मत म्हटलं की न पटणारे लोक असणारच. आणि मत न पटलेल्या प्रत्येकाने तपशीलवार मुद्देसूद खंडन केलंच पाहिजे अशी अपेक्षा पब्लिक फोरमवर पूर्ण होणं कठीण आहे.

तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यक्त होत रहा.

सोमनाथ खांदवे's picture

18 Jul 2018 - 2:29 pm | सोमनाथ खांदवे

आजून हाणामारी ला सुर्वात कशी व्हयना !!!

तुमच्या माझ्या सारख्या दोन्ही किंवा सर्वच बाजूवर टिका करणार्‍यांपासून सगळेच दूर पळतात -त्यात मी संदर्भ आणि तर्कशुद्धता घेऊन हजर असतो, त्यामुळे आपल्याला वाटते तशी तुरळक एखाद आव्हाना पलिकडे वैचारीक हाणामारी जाण्याची शक्यता कमी असावी , तरी पण आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार

ज्योति अळवणी's picture

19 Jul 2018 - 9:47 am | ज्योति अळवणी

तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका....